Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘व’ अक्षरावरून मुलांसाठी अर्थासहित १५० नावे

‘व’ अक्षरावरून मुलांसाठी अर्थासहित १५० नावे

‘व’ अक्षरावरून मुलांसाठी अर्थासहित १५० नावे

प्रत्येक आई वडिलांनी आपल्या बाळाचे नाव ठेवताना त्याचा अर्थ सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. बाळाच्या नावाचा उच्चार सोपा हवा, धर्म आणि राशीनुसार ते असले पाहिजे, तसेच नावाचा अर्थ सकारात्मक असला पाहिजे. ज्योतिषीशास्त्रावर विश्वास असणाऱ्या लोकांचे असे मत आहे की बाळाच्या नावाचा अर्थ चांगला असेल तर बाळाच्या वर्तमानावर तसेच भविष्यावर चांगला परिणाम होतो. आणि ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो त्यासुद्धा लोकांचे असे मत आहे की नावाचा अर्थ जर चांगला आणि प्रभावी असेल तर समाजात त्याचा चांगला प्रभाव पडतो. नावाचा अर्थ चांगला असणे खूप महत्वाचे आहे. ज्योतिषीशास्त्रानुसार नावाच्या अर्थामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यावर आणि व्यक्तिमत्वावर त्याचा प्रभाव पडतो आणि जर ह्या शास्त्रावर विश्वस नसेल तरीसुद्धा तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की नावामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आणि हे सगळं नावाच्या अर्थामुळेच शक्य होते. जर तुम्ही चांगला अर्थ असलेले एखादे छानसे नाव तुमच्या मुलासाठी निवडलत तर समाजात त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. नावाच्या अर्थामुळे मुलाच्या जीवनात त्याला प्रेरणा मिळते आणि त्यामुळे तो नेहमी उत्साही आणि आनंदी राहू शकतो.

जर तुम्ही मुलाचे नाव ह्या अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलांच्या लेटेस्ट आणि छान नावांची अर्थासहित यादी इथे दिली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

पासून सुरु होणारी मुलांची नावे

बाळासाठी नाव शोधणे कठीण काम आहे. जर तुम्ही बाळासाठी नाव शोधात असताना त्या नावाचा अर्थ लक्षात घेतलात तर तुमच्या बाळासाठी लेटेस्ट आणि छान असे नाव शोधण्यास मदत होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी अक्षरावरून एखादे नाव शोधात असाल तर इथे अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे.

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
वरद विनायक, गणपती हिंदू
वर्धन विपुलता हिंदू
वर्धमान एका राजाचे नाव हिंदू
वरुण पर्जन्यदेव हिंदू
वल्लभ प्रियकर हिंदू
वसु संपत्ती हिंदू
वसुदेव श्रीकृष्णाचे पिता हिंदू
वसंत एक ऋतू हिंदू
वागीश वाणीचा परमेश्वर हिंदू
वाचस्पती बृहस्पती हिंदू
वामन विष्णूचा अवतार हिंदू
व्यास महाभारतकार हिंदू
वासव इंद्र हिंदू
विक्रमादित्य एक थोर सम्राट हिंदू
विकास प्रगती हिंदू
विक्रांत अजिंक्य हिंदू
विजय यश हिंदू
विद्याचंद्र विद्वान व्यक्ती हिंदू
विद्याधर श्रीगणेश हिंदू
विद्यासागर एका राजाचे नाव हिंदू
विनम्र अतिशय नम्र हिंदू
विनायक गणपती हिंदू
विनीत विनम्र हिंदू
विनोद गम्मत हिंदू
विभास पहिला प्रहर हिंदू
विमलेन्दु निर्मल चंद्र हिंदू
विराज शोभिवंत हिंदू
वीरभद्र शंकराच्या जटेपासून निर्मिलेला हिंदू
विलास प्रेम सौंदर्य हिंदू
विलोचन शंकर हिंदू
विवेक संयम हिंदू
विवेकानंद एक नक्षत्र हिंदू
विश्वनाथ जगाचा नाथ हिंदू
विश्वम्भर जगाचा पालनकर्ता हिंदू
विश्वामित्र महर्षी हिंदू
विश्वमूर्ती जगाची प्रतिमा हिंदू
विश्राम विश्रांती, आराम हिंदू
विश्वात्मा जगाची चेतना हिंदू
विश्वामित्र एक सुप्रसिद्ध ऋषी हिंदू
विश्वास भरवसा हिंदू
विश्वेश जगाचा मालक हिंदू
विशाल जगाची शोभा हिंदू
विष्णू लक्ष्मीपती हिंदू
विहंग पक्षी हिंदू
वेद ज्ञान हिंदू
वेदप्रकाश वेदांचा प्रकाश हिंदू
वेणुगोपाल श्रीकृष्ण हिंदू
वैकुंठनाथ श्रीकृष्ण हिंदू
वैजनाथ शंकर हिंदू
वैनतेय गरुड हिंदू
वैभव दौलत हिंदू
व्योम आकाश हिंदू
व्योमकेश शिव हिंदू
व्योमेश आकाशाचा स्वामी हिंदू
वाल्मिकी ऋषी हिंदू
वासव इंद्र हिंदू
वृन्दावन कृष्ण हिंदू
वृंदावन कृष्ण, कृष्णाची नगरी हिंदू
वायू वारा हिंदू
वादीश शरीराचा ईश्वर हिंदू
वेदांत ज्ञानी हिंदू
वैद्यनाथ औषधांचा राजा हिंदू
वैद्युन्त हुशार हिंदू
वैजनाथ श्रीविष्णू हिंदू
वैखन श्रीविष्णू हिंदू
विजेंद्र इंद्रदेवता हिंदू
वज्रबाहू मजबूत हात असलेला हिंदू
वज्राधर इंद्रदेवता हिंदू
वज्रहस्त श्रीशंकर हिंदू
वज्रकाय श्रीहनुमान हिंदू
वज्रपांनी इंद्रदेवता हिंदू
वाक्पती महान वक्ता हिंदू
वाकुल श्रीशंकराचे एक नाव हिंदू
वामदेव श्रीशंकर हिंदू
वामन विष्णूअवतार हिंदू
वनराज जंगलाचा राजा हिंदू
वनद ढग हिंदू
वनन तीव्र इच्छा हिंदू
वंदन कौतुक, नमन हिंदू
वनीज श्रीशंकर हिंदू
वंशज चांगल्या कुटुंबात जन्मलेला हिंदू
वरद गणपती हिंदू
वरदराज श्रीविष्णूचे एक नाव हिंदू
वरदान आशीर्वाद हिंदू
वर्धन आशीर्वाद हिंदू
वरेंद्र समुद्र हिंदू
वरेण्यं महान नेता हिंदू
वरेश श्रीशंकर हिंदू
वारिज कमळ हिंदू
वर्षाल पाऊस हिंदू
वर्षित पाऊस हिंदू
वरुणसाई जलदेवता हिंदू
वसंत वसंत ऋतू, आनंदी हिंदू
वैष्णव विष्णूची आराधना हिंदू
वासुकी प्रसिद्ध साप हिंदू
वसुमल श्रीकृष्ण हिंदू
वसूश कर्णाचे एक नाव हिंदू
वत्स मुलगा हिंदू
वत्सल प्रेमळ हिंदू
वात्सल्य आईला बाळाबद्दल वाटणारे प्रेम हिंदू
वायु वारा हिंदू
वेद प्रकाश ज्ञानाचा प्रकाश हिंदू
वेदमोहन श्रीकृष्ण हिंदू
वेदांश वेदांचा एक भाग हिंदू
वेदांशु ज्ञानाचा भाग हिंदू
वेदिक भारतातील नदीचे नाव हिंदू
वीर धैर्यवान हिंदू
वेहन्त हुशार, बुद्धिमान हिंदू
विक्रांत शक्तिमान हिंदू
व्यंकट श्रीविष्णू हिंदू
व्यंकटेश श्रीविष्णू हिंदू
वंशूल बासरी हिंदू
वयन देव हिंदू
वायुनंद श्री हनुमान हिंदू
विहान खूप ऊर्जा असलेला हिंदू
विद्युत वीज हिंदू
विदित इंद्र हिंदू
विद्यांश ज्ञानाचा एक भाग हिंदू
विग्नेश श्रीगणेशाचे नाव हिंदू
विग्रह श्रीशंकर हिंदू
विहान सकाळ हिंदू
विहास हास्य हिंदू
विहक श्रीशंकराचे एक नाव हिंदू
विहंग पक्षी हिंदू
विजयन विजय हिंदू
विजयेश श्रीशंकर हिंदू
विकास प्रगती हिंदू
विकट भव्यदिव्य हिंदू
विलास बुद्धिमान हिंदू
विमलेश पवित्र देवता हिंदू
विनीश विनम्र हिंदू
विनोद आनंदाने भरलेला हिंदू
विप्रित वेगळा हिंदू
विपुल भरपूर प्रमाणात हिंदू
विराज बुद्धिमान, पवित्र हिंदू
वीरोम ईश्वरी शक्ती हिंदू
विशांक भीती नसलेला हिंदू
विष्णुपद कमळ हिंदू
विशोक आनंदी, दुःख नसलेला हिंदू
विशू श्रीविष्णुदेवता हिंदू
विश्व संपूर्ण जग,पृथ्वी हिंदू
विश्वजीत जगज्जेता हिंदू
विश्वास विश्वास हिंदू
विश्वदीप भव्य प्रकाश हिंदू
विस्मय आश्चर्य हिंदू
विठ्ठल श्रीविष्णू हिंदू
विवेक ज्ञान, बुद्धी हिंदू
विविक्षु श्रीशंकराचे एक नाव हिंदू
व्रतेश श्रीशंकर हिंदू
वज्रान्ग वज्रासारखा हिंदू
वासुषेण कर्णाचे मूळ नाव हिंदू

जर तुम्ही तुमच्या बाळाचे नाव ठेऊ इच्छित असाल आणि नाव ठेवण्याआधी तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असेल तर तुम्हाला तुमच्या बाळाचे नाव ठेवणे सोपे जाईल. तुम्ही वर दिलेल्या यादीमधील अक्षरावरून तुमच्या बाळासाठी, छान अर्थ असलेलं एखादे नाव निवडू शकता.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article