प्रीस्कूलर (३-५ वर्षे)

तुमच्या मुलाच्या मनात करोनाविषाणूविषयी भीती निर्माण न करता त्याच्याशी कसे बोलाल?

    In this Article

कोरोनाविषाणूचा संसर्ग जगभर पसरत आहे, तसेच त्याच्याशी संबंधित बातम्या तर अधिक वेगाने पसरत आहेत - वृत्तपत्राच्या पहिल्या पानापासून ते सोसायटीतल्या प्लेएरिया पर्यंत सगळीकडे कोरोनाविषाणू विषयी चर्चा वाचायला आणि ऐकायला मिळते. आतापर्यंत तुमच्या मुलाला काहीतरी चुकीचे घडत आहे हे समजले असेल विशेषकरून तुम्ही आतापर्यंत ऑफिस मध्ये जात होतात आणि आता पूर्णवेळ तुम्ही घरी आहात हे त्याच्या लक्षात येईल. कोरोनाविषाणूविषयी चुकीची माहिती ऐकून त्याच्या मनात भीती निर्माण होऊ नये म्हणून तुमच्या मुलाला तुमच्याकडून खरी माहिती मिळणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मुलाशी कोरोनाविषाणूविषयी कसे बोलू शकता ते येथे आहे.

. प्रथम, आपल्या मुलास काय (आणि किती) माहित आहे ते शोधा.

आपल्या मुलाला कोरोनाविषाणूविषयी काय (आणि किती) माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी कोरोनाविषाणूचा विषय काढा. तुमच्या मुलाने कोरोनाविषाणू विषयी काय ऐकले आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. जर त्याने चुकीची माहिती ऐकलेली असेल तर बरोबर काय आहे हे त्याला समजावून सांगा. तुम्ही त्याला विश्वसनीय माहिती देत आहात. त्याला जितके अधिक तथ्य माहिती पडेल तितके त्याला आश्वासक वाटेल. त्याला तुम्ही दिलेल्या माहितीवर विचार करण्यास वेळ द्या. आणि त्याला तुम्हाला प्रश्न विचारू द्या. त्याच्या वयाच्या अनुषंगाने त्याला प्रामाणिक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.

. त्याला त्रास देणारा मुद्दा शोधून त्यावर चर्चा करा.

तुमचे मूल शाळेत जात असेल तर तो आपल्या मित्रमैत्रिणींना भेटू शकणार नाही आणि ती त्याची प्रमुख चिंता असेल. तसेच काही काळ तो घराच्या बाहेर जाऊ शकणार नाही. जर तुमचे मूल थोडे मोठे असेल तर त्याला संसर्ग होण्याची भीती वाटेल. प्रयेकजण मास्क घालून आहेत तसेच शाळा बंद आहेत तसेच प्लेग्राऊंड वर खेळता येत नाहीये हे सगळे पाहून तुमचे मूल थोडे घाबरू शकते. त्यामुळे तुमच्या मुलाशी कोविड-१९ विषयी बोला, त्याला लक्षणे समजावून सांगा आणि मुलांना त्याचा क्वचित संसर्ग होतो हे त्यांना सांगा. तुम्ही त्याच्यासाठी आहात आणि त्याला भीती वाटली तर तो केव्हाही तुमच्याजवळ येऊ शकतो, त्याला तुमच्याशी बोलायचे असेल तर तो कधीही तुमच्याशी बोलू शकतो हे त्याला सांगा आणि त्याच्या समस्या शांतपणे सोडवा!

. त्याच्या वयासाठी योग्य असलेली माहिती त्याला द्या.

जर आपल्या मुलाने अद्याप करोनाविषाणू विषयी ऐकले नसेल किंवा ते समजण्यास तो फारच लहान असेल तर तो विषय हा काढू नका. त्याला कोणतीही नवीन माहिती न देता चांगल्या स्वच्छतेचा सराव करण्यास सांगा. परंतु जर त्याला मित्रांकडून माहिती मिळाली तर त्याला बोलू द्या आणि प्रश्न विचारू द्या. आधी सांगितल्याप्रमाणे, आपल्या प्रतिसादामध्ये प्रामाणिक आणि स्पष्ट व्हा, परंतु जास्त माहिती सामायिक करू नका आणि आपल्या मुलाला भारावून टाकू नका.

. सुरक्षित राहण्यासाठी तुमचे मूल काय करू शकतो ते त्याला सांगा.

आपल्या मुलाचे सांत्वन करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्याच्या सुरक्षिततेबद्दल खबरदारी घेणे. तुमच्या मुलास हात स्वच्छ धुण्यास शिकवा. आपल्या मुलास हे कळू द्या की कोरोनाव्हायरस बहुतेक पृष्ठभागावर किंवा खोकल्यामुळे संक्रमित झाला होतो म्हणून त्याने आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुतले पाहिजेत. खोकला किंवा शिंक आली तर तोंडावर टिशू धरला पाहिजे किंवा हाताच्या कोपरात शिंकले पाहिजे. जेवायला बसण्यापूर्वी आणि नंतर, शिंकल्यावर किंवा खोकल्यावर, स्नानगृह वापरल्यानंतर किंवा बाहेरून आल्यावर, त्याला २० सेकंद हात धुण्यास सांगा.

. आपल्याला काही माहित नसल्यास ‘नाही’ म्हणा.

आपल्या मुलाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसली तरी ठीक आहे, आपण तसे त्याला सांगू शकता. कोरोनाविषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि डॉक्टर रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. ही अनिश्चिततेची वेळ आहे आणि कोणाकडेही त्याची उत्तरे नाहीत. आपल्या मुलास हे कळू द्या की आपल्याकडे त्याच्या प्रश्नाचे उत्तर नाही. खरं तर, एकत्रितपणे त्याविषयी माहिती जाणून घ्या आणि त्याबाबतचा वाईट तपशील त्याला सांगू नका!

. लोकांच्या सुरक्षिततेसाठी जे सकारात्मक कार्य केले जात आहेत त्याबद्दल बोला.

कोविड-१९ विषयी तुमच्या मुलाशी सकारात्मकतेने बोला. डॉक्टर्स आणि रुग्णालये संक्रमित लोकांवर उपचार करण्यास तयार आहेत हे त्यांना समजू द्या. जर तुमचे मूल थोडे मोठे असेल, तर शास्त्रज्ञांनी त्यावर लस विकसित केलेली आहे हे त्यांना सांगा.

. तुमच्या मुलाला सतत माहिती देत रहा

आपल्या मुलाला याची खात्री द्या की या विषयाबद्दल तुम्ही वेळोवेळी माहिती देणार आहात. असे केल्याने जर त्याला नवीन माहिती मिळाली तर तो तुमच्याकडे येऊन ती तुमच्याशी काहीही चिंता न करता शेअर करू शकतो हे त्यास कळेल. आई वडील प्रामाणिक आहेत या विचाराने आणि आपल्याबरोबर महत्त्वपूर्ण माहिती ते शेअर करण्याइतपत आपण मोठे आहोत ह्यामुळे तो आनंदित होईल.
आपत्कालीन परिस्थितीत आपल्या मुलास माहिती देऊन सुरक्षित ठेवा. त्याच्याशी योग्य आवाजात बोला आणि आवश्यक माहितीपेक्षा जास्त माहिती देणे टाळा. आपल्या छोट्या मुलास आरामदायक आणि आश्वासक वाटण्यासाठी त्याला जवळ घ्या. आणि लक्षात ठेवा, आपण एकत्र घालवणार असलेल्या सर्व वेळेचा चांगला उपयोग करा! आणखी वाचा: कोरोनाविषाणू विषयी असलेल्या ह्या ८ गैरसमजुतींवर विश्वास ठेवणे आणि ते पसरवणे तुम्ही थांबवले पाहिजे! कोरोनाविषाणू विषयी प्रत्येक पालकाला पडणारे १३ प्रश्न
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved