टॉडलर (१-३ वर्षे)

तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे लहान मूल आता इकडे तिकडे धावत असेल आणि त्याच्या आजूबाजूच्या जगातील गोष्टी एक्सप्लोर करत असेल त्यामुळे तुमची धावपळ होत असेल आणि तुम्ही आता जास्त व्यस्त असाल. चला तर मग तुम्हाला पुढच्या अद्भुत प्रवासाविषयी माहिती करून घेऊया आणि १६ महिन्यांच्या बाळाकडून काय अपेक्षा ठेवली पाहिजे हे पाहूया.

व्हिडिओ: तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

https://youtu.be/R6vPhQcPw7U

१६ महिन्यांच्या लहान मुलाचा विकास

आपल्या छोट्याश्या बाळाचे एका लहान मुलामध्ये रूपांतर झालेले आहे. ही एक अत्यंत मोहक प्रक्रिया आहे. १६-महिन्याच्या बाळाच्या विकासाचे काही टप्पे पाहू या. हे टप्पे तुमच्या लहान मुलाने गाठणे सुरू केले आहे किंवा कदाचित आधीच गाठलेले असतील.

. शारीरिक विकास

आता तुमचे बाळ १६ महिन्यांच्या टप्प्यात आहे, तुमचे डॉक्टर दर २ महिन्यांनी त्याचा विकास तपासतील. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या बाळाच्या विकासाचा वेग पहिल्या महिन्याइतका नाही. प्रत्येक लहान मुलाचे वजन वैयक्तिकरित्या बदलते. आदर्शपणे, तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाचे वजन ८.५ किलो - १२. ९ किलो दरम्यान असले पाहिजे.

. सामाजिक आणि भावनिक विकास

. संज्ञानात्मक आणि भाषा विकास

वागणूक

१६ व्या महिन्यात, तुमचे लहान मूल वागणुकीची वेगळी चिन्हे दाखवू शकतो. तो चिडचिड करू शकतो किंवा वेगळे होण्याची चिंता दाखवू शकतो. त्याचे वागणे काही वेळेला विचित्र वाटू शकते. अगदी उत्तम वागणूक असलेल्या मुलाला सुद्धा कधी कधी राग येऊ शकतो. जेव्हा मूल २ वर्षांचे असते तेव्हा हे सहसा अशी वर्तणूक जास्त प्रमाणात आढळते. मुलांना जसे आवडते तसे ते वागू लागतात आणि त्यामुळे येणारी आव्हाने त्यांना सहजपणे अस्वस्थ करू शकतात. जर तुम्हाला बाळाला राग कशामुळे येतो हे माहिती असेल तर तुम्ही ते जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकता.

सुपरमार्केटमधील खेळण्यांच्या गल्लीत बहुतेक मुलांचे हाल होतात. तिथे जाणे टाळल्यास तुमच्या बाळाचा चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. तुमच्या लहान बाळामध्ये भूक आणि झोपेची चिन्हे पहा. अनेकदा बाळ चिडण्याची ही कारणे असू शकतात. त्यांना शांत होण्यास मदत करण्यासाठी टाइम-आउट दिल्यास त्यांच्या रागाचे व्यवस्थापन करण्यात आणि त्यांना त्यांच्या भावनांवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

अन्न आणि पोषण

तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाला तुमच्यासारखेच जेवण हवे असेल. म्हणूनच त्यांच्या आवडी निवडी खूप लवकर ठरतात. त्यामुळे पोषक आहाराची चव आणि प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी मार्गदर्शन करणे खूप महत्वाचे आहे. लहान मुलांचे पोट लहान असते. त्यामुळे दिवसातून ३-४ वेळा जेवण देण्यापेक्षा दिवसातून थोडे थोडे खायला देणे चांगले असते. त्याच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे असलेल्या अन्नपदार्थांची निवड तुम्ही त्याच्यासाठी करत आहात ह्याची खात्री करा. मिठाई, साखरयुक्त अन्न आणि नको असलेल्या कॅलरी टाळा. तुमचे छोटे मूल स्वतःच्या हाताने किंवा चमच्याने खाण्याचा प्रयत्न करेल. ह्या कौशल्यांचा सराव करण्यासाठी त्याला जागा द्या, परंतु जेव्हा तो निराश होतो तेव्हा त्याला मदतीचा हात द्या. तो हळूहळू कौशल्ये विकसित करत असताना, तुम्ही एक पाऊल मागे घ्या आणि त्याला त्याच्या नवीन सापडलेल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या . तुमच्या मुलाला योग्य निवड करण्यात मदत करण्यासाठी धैर्य ही गुरुकिल्ली आहे.

जेव्हा तुम्ही जेवणाच्या टेबलावर एक कुटुंब म्हणून बसता, तेव्हा तुमच्या मुलाला त्याचे अन्न निवडण्याचे थोडे स्वातंत्र्य द्या. त्याला वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे पर्याय द्या आणि त्याला त्याची स्वतःची निवड करू द्या. त्याला कदाचित नवीन अन्न आवडेल किंवा तो काही अन्नपदार्थांना अजिबात स्पर्श करणार नाही. एखाद्या पदार्थाची आवड निर्माण होण्यासाठी लहान मुलाला २० ते ३० पदार्थांची ओळख करून द्यावी लागते. एका वेळी फक्त एकच नवीन पदार्थ सादर करा. तुमच्या चिमुकलीला एखाद्या गोष्टीची ऍलर्जी आहे की नाही हे जाणून घेण्यात तुम्हाला मदत होईल. पॉपकॉर्न, द्राक्षे, हार्ड कँडी, नट आणि मनुका यांसारखे गुदमरण्याचा धोका निर्माण करणारे पदार्थ टाळणे चांगले. जेवणाच्या वेळी नेहमी तुमच्या मुलावर लक्ष ठेवा.

झोप

तुमच्या लहानग्यांची झोप कमी झालेली आहे हे तुमच्या लगेच लक्षात येईल. तो आता सकाळी आणि दुपारी झोपणार नाही फक्त दुपारनंतर थोडा वेळ झोपू लागेल. सुरुवातीला, तो त्याच्या नवीन दिनचर्याशी हळूहळू जुळवून घेत असल्याने मध्यान्हाच्या झोपेच्या वेळा थोड्या जास्त असू शकतात. त्याला दुपारी उशिरा झोपू देणे टाळा कारण त्यामुळे त्याला रात्री झोप येणार नाही. लहान मुलांना दररोज एकच रुटीन आवडते, म्हणून त्यांची झोपेची वेळ ठरवून घ्या. सोफ्यावर झोपण्यापेक्षा त्याला बिछान्यावर झोपवा.

एक्सप्लोर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असल्याने तुमचे लहान मूल थकून जाईल परंतु खूप ऊर्जा आणि उत्साह असल्याने तो झोपण्यास नकार देईल.अशा वेळी तुम्हाला खंबीर राहणे आवश्यक आहे. दुसरे कुठलेही साहस करण्याआधी त्याची झोप होणे आवश्यक आहे. त्याच्या खोलीत काही पुस्तके आणि खेळणी ठेवणे शहाणपणाचे ठरेल. त्याला आरामात झोपू द्या.

खेळ आणि उपक्रम

काहीवेळा, तुम्ही एक पाऊल मागे घेऊन बाळाच्या वाढीला चालना देऊ शकता. त्यांचे त्यांना आजूबाजूच्या गोष्टी एक्सप्लोर करू द्या. नवीन प्रयोग करून बघण्यासाठी तुमचे मूल नेहमीच उत्साही असेल. त्यामुळे त्याला त्याचे मनोरंजन करून मन रमावता येईल आणि एक्सप्लोर करता येईल. तो खेळत असताना, त्याच्या समस्या सोडवायला शिकेल. ह्या वयात, तुमच्या १६ महिन्यांच्या मुलाला त्याच्या गोष्टी स्वतंत्रपणे करायला आवडतील. गोष्टी शिकण्यासाठी त्याला मदत करा. तुम्ही त्याचे मोजे त्याला सापडतील असे एका ड्रॉवरमध्ये ठेवू शकता किंवा त्याचे शूज समोरच्या दाराजवळ असलेल्या प्लास्टिक ऑर्गनायझरमध्ये ठेवा जेणेकरून बाहेर जाताना त्याचे तो घालू शकेल.

तुम्ही त्याच्यासाठी वयानुसार अ‍ॅक्टिव्हिटी बनवू शकता, उदा: त्याची स्वतःची प्लेट घेऊन जाणे आणि सिंकमध्ये ठेवणे इत्यादी. ही कामे तुमचे मूल अगदी चोख करेल अशी अपेक्षा ठेवू नका आणि तो चुकला तरी सुद्धा त्याच्याशी प्रेमाने वागा. अशा प्रकारे तुम्ही त्याला त्याच्या सभोवतालचा परिसर एक्सप्लोर करण्यासाठी आणि स्वतंत्र राहण्यासाठी अधिक तयार कराल. तुमच्या लहान मुलासाठी एक पुस्तक वाचा. त्याचे ऐकण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी त्याला पुस्तके वाचून दाखवा. लक्ष वेधण्याचा कालावधी आणि स्मरणशक्ती विकसित होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते. जेव्हा तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी एखादे पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही त्याच्यासोबतचा तुमचा बंध वाढवता आणि त्याला वाचनाची आवड निर्माण करण्यास मदत करता.

पालकांसाठी टिप्स

तुमचे लहान मूल कदाचित त्याच्या आजूबाजूचे जग एक्सप्लोर करण्यास उत्सुक असेल. तो सतत हालचाल करत राहील. तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत.

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

प्रत्येक मूल अद्वितीय आहे आणि ते सर्व एकाच वेळी त्यांचे टप्पे गाठू शकत नाहीत. तुमचे बाळ योग्य वेळेला विकासाचे टप्पे गाठण्यात कमी पडत आहे असे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सतत धावणाऱ्या १६ महिन्यांच्या लहान मुलाचे पालक होणे सोपे नाही. पण शेवटी, तो एक आनंददायी प्रवास आहे.

मागील आठवडा: १५ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास पुढील आठवडा: १७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved