टॉडलर (१-३ वर्षे)

१७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

वयाच्या १७ व्या महिन्यात तुमचे बाळ बऱ्याचश्या गोष्टी करून पाहू लागते. त्याच्या शारीरिक, वर्तणूक विषयक आणि सामाजिक कौशल्यांमध्येही तुम्हाला लक्षणीय विकास झालेला दिसेल. तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा ठेवणे महत्वाचे आहे आणि हा मार्गदर्शक लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल.

व्हिडिओ: तुमच्या १७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

https://youtu.be/_J3XIfynONs

१७ महिन्यांच्या लहान मुलाची वाढ आणि विकास

ह्या टप्प्यावर तुमचे मूल अनेक गोष्टी करू लागेल. तुमच्या लहान बाळाच्या कौशल्यामध्ये झालेली वाढ बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काही वेळा, तुमचे मूल स्वतःहून काही गोष्टी करत आहे हे बघून तुम्ही अचंबित व्हाल. तुमचे मूल ऐकत नाही, तुमच्या सूचनांचे पालन करत नाही ह्यामुळे काही वेळा तुम्ही अस्वस्थही व्हाल. बरं, तुमच्या सूचना तुमच्या मुलावर लादू नका. त्याऐवजी त्याला थोडेसे निर्णय घेण्याची परवानगी द्या आणि जेव्हा त्याचे निर्णय बरोबर नाहीत असे तुम्हाला वाटेल तेव्हाच मध्यस्थी करा.

शारीरिक विकास

ह्या टप्प्यावर तुमच्या लहान मुलाच्या शारीरिक विकासात अचानक सुधारणा होते. तुमच्या लक्षात येतील अशा काही गोष्टी खाली दिलेल्या आहेत.

तुमच्या लहान मुलाला ह्या गोष्टींचा सराव करण्याची परवानगी देणे महत्त्वाचे आहे, परंतु त्याच वेळी, जोखमीकडे लक्ष द्या. अधिक सुरक्षित राहण्यासाठी, असुरक्षित ठिकाणे कोणती आहेत ते लक्षात घ्या. तुमच्या मुलाशी संवाद साधा. जरी तुमचे मूल तुमच्या सूचनांचे पालन करत नसले तरी कालांतराने, तुमचे मूल धोक्याच्या जागा ओळखू लागेल.

सामाजिक आणि भावनिक विकास

तुमच्या १७ महिन्यांच्या बाळाने मोठा टप्पा पार केल्याचा तुम्हाला आनंद होत असला तरी सुद्धा तुमचे लहान मूल नियंत्रणाबाहेर जात असल्याने तुम्हाला निराशा येऊ शकेल. तुमचे लहान मूल तुमचे ऐकणार नाही. बहुतेक पालक ह्यामधून जात असतात. त्यावर मात करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही थोडा धीर धरला पाहिजे. तुम्ही तुमची शांतता गमावू नका. तुम्ही रागावून किंवा ओरडून कदाचित गोष्टी आणखी अवघड होऊ शकतील.

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

वागणूक

तुमच्या लक्षात येईल की ह्या वयातील मुले छोटे छोटे निर्णय घेऊ लागतात. त्यांना तसे करू देणे सुद्धा महत्वाचे आहे आणि त्यांना त्रास होत असल्यास त्यांना मदत करणे देखील महत्वाचे आहे. जसजसे मूल मोठे होईल, तसतसे ते तुम्ही काय सांगत आहात ह्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे स्वतः निर्णय घेऊ लागेल. हे एकदम छान आहे. आता तुम्ही त्याला प्रत्येक मिनिटाला ऑर्डर देण्याऐवजी त्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याचा मार्ग त्याला शोधू द्या. तथापि, सुरक्षित नसलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आवश्यक असल्यास तो चुकत असल्यास सुधारा.

नेहमी लक्षात ठेवा की बाळ ह्या टप्प्यावर वेगवेगळे प्रयोग करत असेल आणि म्हणून त्याला धोकादायक गोष्टींपासून दूर ठेवणे चांगले आह. उदा: गरम चहाचा कप किंवा घरात असलेल्या इतर विषारी गोष्टींपासून तुमच्या लहान मुलाला दूर ठेवले पाहिजे.

अन्न आणि पोषण

जेव्हा खाण्याच्या सवयी आणि अन्नाचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही सजग व्हायला हवे ह्या टप्प्यावर तुमचे मूल वेगाने मोठे होत असते आणि पुढे सुद्धा त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्याला चांगल्या पोषणाची गरज आहे.

तथापि, जेव्हा आहाराचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या लहान मुलाला खायला घालण्यासाठी त्रास होऊ शकतो, तुमच्या लक्षात येईल की तुमचे मूल, लहान असताना चांगले खात असे. पण आता परिस्थिती अचानक बदललेली आहे. तुमच्या लहान मुलाला खायला घालण्यासाठी तुम्हाला घरभर धावपळ करावी लागते. काही वेळा, हे अत्यंत निराशाजनक देखील असू शकते.

ह्या टप्प्यावर तुम्ही एक गोष्ट करू शकता आणि ती म्हणजे तुम्ही दिवसभर बाळाला थोडे थोडे खायला देऊ शकता. तुमच्या १७ महिन्यांच्या बाळासाठी काही उत्तम अन्न पर्याय म्हणजे फळे, संपूर्ण दूध, चीज, भाज्या, दही, दलिया, मांस इ.होत.

आता तुम्हाला अन्नपदार्थांच्या पर्यायांवर मर्यादा घालण्याची गरज नाही कारण तुमचा लहान मुलगा सगळे खायला शिकला असेल आणि शरीर सुद्धा ते पचवू शकत असेल. तथापि, तुम्ही तुमच्या लहान मुलाला पौष्टिक अन्न द्या कारण त्याला जीवनाच्या ह्या टप्प्यावर भरपूर ऊर्जा आवश्यक आहे.

झोप

जेव्हा झोपेचा प्रश्न येतो,तेव्हा तुमच्या लहान मुलाला तो बाळ असताना जितकी झोप आवश्यक होती तितकीच आता सुद्धा आहे. ह्याचाच अर्थ त्याची सुमारे १४ तास झोप झाली पाहिजे. तुमच्या लहान मुलाच्या विकासात झोप अत्यंत महत्वाची आहे म्हणून तुमच्या लहान मुलाच्या झोपेकडे लक्ष द्या.

जेव्हा तुमचे लहान मूल वयाच्या ह्या टप्प्यावर असते, तेव्हा तुम्हाला त्याला झोपवायला तुम्हाला त्रास होऊ शकतो. आता पर्यंत तुमचे मूल शांतपणे झोपत होते परंतु आता झोपायला का त्रास देत आहे असे तुम्हाला वाटेल.

तुमच्या लहान मुलाचे झोपायला त्रास देणे तुम्हाला सहन करावे लागेल आणि त्याला इंग्रजीमध्ये '18 मन्थस स्लीप रिग्रेशन' म्हणतात. तुमचे मूल रात्रीचे जगात आहे, रडत आहे आणि कधी कधी त्याला झोपवणे तुम्हाला कठीण होऊन जाईल. तुमच्या मुलाच्या झोपण्याच्या पद्धतींवर नियंत्रण ठेवणे तुम्हाला खरोखर कठीण वाटू शकते. जर तुम्ही ह्यातून जात असाल तर त्यास इंग्रजीमध्ये स्लिप रिग्रेशन म्हणतात. साधारण १७ ते १८ महिन्यांच्या बाळांना स्लीप रिग्रेशनचा त्रास होतो.

बाळाची आधी असलेली शांत झोप विस्कळीत का होते ह्याची अनेक कारणे आहे. त्यापैकी काही कारणे खालीलप्रमाणे:

खेळ आणि उपक्रम

तुमचे लहान मूल आता खेळांमध्येच व्यस्त असल्याचे तुमच्या लक्षात येईल. खरं तर, हीच एक गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्या लहान मुलाची सर्जनशीलता वाढते. त्यामुळे तिला खेळण्यासाठी प्रोत्साहित करा.

तुमचे लहान मूल आता तुम्हाला नाचताना आणि खेळताना दिसेल. ह्या कालावधीमध्ये त्याची मोटार कौशल्ये विकसित होत आहेत. तुमचे मूल रंग आणि आकारानुसार ब्लॉक्स वेगवेगळे करेल. तसेच त्याला ब्लॉक्स सोबत खेळायला आवडेल.

तुमचे लहान मूल करत असलेल्या इतर गोष्टी तुमच्या लक्षात येतील त्या म्हणजे धावणे, लाथ मारणे आणि कधी कधी अगदी उडी मारणे इत्यादी.

पालकांसाठी टिप्स

जीवनातील हा एक टप्पा आहे जेव्हा पालक खूप बदलांचे साक्षीदार असतात. काही वेळा, तुम्हाला खूप दडपल्यासारखे वाटू शकते आणि तुमच्या मुलाचे काय करावे ह्याची तुम्हाला नक्की कल्पना नसते. ह्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्या कारण तुमचे मूल अधिक स्वतंत्र होण्यास शिकत आहे. काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.

खालील बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

जेव्हा मुले मोठी होतात, तेव्हा त्यांचे शरीर अजूनही बऱ्याच नवीन गोष्टींशी जुळवून घेत असते. यामुळे लहान मुले आजारी पडू शकतात. त्याची काही चिन्हे खालीलप्रमाणे आहेत:

वेगाने वाढणारे लहान मूल बघून आता त्याच्यासोबत आनंद घेण्याची ही वेळ आहे. मूल नियंत्रणाबाहेर जात असले तरीही नियंत्रणात ठेवण्याचा जास्त प्रयत्न करू नका. हा टप्पा खूप वेगाने संपेल. तुमचे लहान मूल लवकरच मोठे होईल आणि तुम्ही त्याच्याशी खूप चांगला संवाद साधू शकाल. धीर धरायला शिका आणि आपल्या लहान मुलासोबत चांगला वेळ घालवून आनंद घ्या.

नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या बाळाचे हे विकास होण्याचे आणि वाढीचे वय आहे. तुम्ही त्याच्यासोबत असणे आणि त्याला ह्या टप्प्यातून जाण्यास मदत करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

मागील आठवडा: तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved