अन्य

तुमचे घर कोरोनाविषाणू मुक्त कसे ठेवाल?

    In this Article

कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करू देत आहेत, दुकाने व मॉल बंद आहेत आणि शाळा सुट्यांची घोषणा करत आहेत. कोविड -१९ चा प्रसार कमी होण्यासाठी आणि थांबवण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हा आता नियम झाला आहे. परंतु, संसर्गजन्य जंतू आपल्या घरातही राहू शकतात, खासकरून जर आपल्याकडे बाहेरून येणारे लोक, कुटूंबातील सदस्य, घरातील मदतनीस किंवा इतर कुणी बाहेरून घरात येत असतील तर त्यांच्यासोबत हे जंतू घरात येण्याची शक्यता असते. तर, आपले घर कोरोनाव्हायरस मुक्त ठेवण्यासाठी इथे काही टिप्स आहेत, जेणेकरून या काळात आपण आणि आपले कुटुंब संरक्षित राहू शकाल!

आपले घर कोरोनाव्हायरसपासून कसे मुक्त ठेवावे?

काही नियम, साफसफाईच्या सूचना आणि इतर काही हॅक्स वापरल्यास आपले घर ह्या विलगीकरणाच्या काळात स्वच्छ आणि कोरोनाव्हायरस मुक्त राहील. येथे अनुसरण करण्यासाठी १० सोप्या सूचना आहेत.

. नियमितपणे हात स्वच्छ धुवा

आपल्या हातावर सर्वात जास्त प्रमाणात जंतू असतात, आणि आपण जेव्हा आपल्या सभोवतालच्या पृष्ठभागांना स्पर्श करतो तेव्हा आपण ते हस्तांतरित करतो. आपल्या घरास कोरोनाविषाणूंपासून मुक्त ठेवण्यासाठी आपले हात नियमितपणे धुवा, खासकरुन जेव्हा आपण बाहेरील कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करता तेव्हा हे अगदी प्रकर्षाने पाळा. म्हणजेच एखादे पार्सल घेण्यासाठी तुम्ही दार उघडणे, कचऱ्याचा डबा बाहेर ठेवणे किंवा काही किराणा सामान खरेदी करण्यासाठी किंवा मिटिंगसाठी बाहेर पडणे इत्यादी कामे केल्यानंतर हात धुतले पाहिजेत. हा नियम घरात प्रवेश करणाऱ्या कुणालाही लागू आहे, मग तो कुटूंबाचा सदस्य असो किंवा घरातील मदतनीस असो. घरातील कुठल्याही पृष्ठभागाला हात लावण्याआधी प्रत्येकाने हात धुतले आहेत ह्याची खात्री करा.

. घरात अव्यवस्थितपणा टाळा

कोणत्याही प्रकारच्या संसर्गामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होईल आणि त्यामुळे कोरोनाविषाणुचा संसर्ग होण्याचा धोका आणखी वाढेल. जितक्या जास्त गोष्टी आपण अस्ताव्यस्त ठेवू तेवढे संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता असते. खाण्याच्या डिश वापरून झाल्यावर लगेच धुवून टाका. आपल्या मुलाशी खेळल्यानंतर त्याची खेळणी जागेवर ठेवा. धुवायचे कपडे साठवून ठेवू नका. कित्येक महिन्यांपासून तुम्हाला तुमचे घर स्वच्छ आणि नीट लावलेले हवे होते ना? तर तुम्हाला जे हवे होते ते करण्यासाठी ही प्रेरणा आहे.

. नियमितपणे घरातील पृष्ठभाग निर्जंतुक करा

आपल्या घराच्या सर्वात जास्त स्पर्श होणाऱ्या भागाचे प्रत्येक ५-६ तासांनी मजबूत जंतुनाशकासह निर्जंतुकीकरण करा. ह्यामध्ये डोअरनॉब, रिमोट्स, विजेची बटणे, खुर्च्या, काउंटर, सिंक जवळील भाग, टेबल्स आणि आपल्या घराच्या इतर कोणत्याही भागाचा समावेश होऊ शकतो. लक्षात ठेवा पृष्ठभाग साफ करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आणि जंतुनाशक ह्यामध्ये फरक आहे. पृष्ठभाग साफ करणारे पदार्थ केवळ जंतूंची संख्या कमी करतात, परंतु जंतुनाशकांमध्ये रसायने असतात ज्यामुळे पृष्ठभागावरील सर्व जंतू नष्ट होण्यास मदत होते. म्हणूनच, घर आपले स्वच्छ करण्यासाठी जंतूनाशकांचा स्टॉक ठेवा.

. घर स्वच्छ करताना हातमोजे घाला

डिस्पोजेबल हातमोजे सफाई करणार्‍या व्यक्तीसाठी तसेच घरातील लोकांसाठी तारणहार आहेत. तुम्ही किंवा तुमची मदतनीस कुणीही घराची सफाई करीत असले तर हातमोजे घातले आहेत ना ह्याची खात्री करा तसेच ते नीट टाकून दिले आहेत ना हे पहा. सुरक्षिततेचा मार्ग म्हणून हातमोजे घातल्यानंतर लगेच हात धुवा.

. घरात हवा खेळती ठेवा

सूर्यप्रकाश आणि ताजी हवा किती शक्तिशाली आहे हे आपण अनेकदा विसरतो. अतिनील किरण बहुतेक विषाणू मारण्यासाठी पुरेसे मजबूत आहेत याचा पुरावा आहे; जरी हे कोविड -१९ च्या बाबतीत खरे नसले तरी हे इतर विषाणूं साठी लागू आहे जे आपल्या घरात संसर्ग पसरवू शकतात आणि प्रतिकारशक्ती कमी करतात. सूर्यप्रकाश आणि ताजी हवा ह्यामुळे आपल्याला उत्साही वाटेल आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. सामाजिक विलगीकरणाच्या काळात हे महत्वाचे आहे.

. तुमचा फोन निर्जंतुक करा

हे आश्चर्यकारक आहे ना की आपण आपला फोन इतका वापरतो की आपल्या हातात जितके जंतू असतात तितकेच फोनवर असतात. अभ्यासाद्वारे असेही लक्षात आले आहे की सेलफोनमध्ये टॉयलेट सीटपेक्षा १० पट जास्त बॅक्टेरिया असतात. तर, आपण आपला फोन निर्जंतुकीकरण कसा करता? आपण अल्कोहोल वाइप वापरू शकता किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरमध्ये टिश्यू पेपर बुडवू शकता आणि आपला फोन पुसू शकता. होय, फोनचा पुढचा आणि मागचा भाग चांगला पुसून घ्या तसेच त्याचे कव्हर सुद्धा पुसून घ्या.

. गरम पाण्याने कपडे आणि चादरी धुवून घ्या

आपल्या वॉशिंग मशीनवरील सर्वात गरम पाण्याच्या सेटिंगवर कपडे धुवा. कपडे धुण्यासंबंधी आणखी एक टीप म्हणजे आपल्या नेहमीच्या कपडे धुण्याच्या पावडर मध्ये थोडेसे ब्लीच मिसळा (कलर-सेफ ब्लीच वापरा). ब्लीच केवळ डाग काढून टाकत नाही तर जंतुनाशक म्हणून कार्य करते आणि आपल्या कपड्यांवरील कोणतेही जंतू नष्ट करते. हे सुनिश्चित करते की आपले कपडे पूर्णपणे धुवून निघालेले आहेत आणि त्यावर आता कुठलेही जंतू नाहीत.

. सूर्यप्रकाशात आपले कपडे वाळवा

आपले कपडे उन्हात चांगले वाळवा आणि रॅकवरून काढताना ते ओलसर नाहीत ना ह्याची खात्री करा. असे केल्याने कोणत्याही संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो. तसेच, ओलसर कपडे घालण्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता आणि प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि ते ह्या कालावधीत कदापि परवडणारे नाही.

. टॉवेल शेअर करू नका

घरातील प्रत्येक सदस्याला वेगळा टॉवेल द्या, त्यामुळे जंतूंची देवाणघेवाण होत नाही. टॉवेल्स नियमितपणे धुवा आणि कोरडे करा, कारण त्यांच्यावर किती जंतू असतात हे माहिती झाल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. तागे आणि कपड्यांसाठी देखील हेच आहे, विशेषत: जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अद्याप कामासाठी बाहेर जावे लागले असेल तर हे लागू होते. गंभीर स्वच्छतेसाठी आणखी एक टीप म्हणजे प्रत्येक सदस्याचे कपडे स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी धुवावेत. आपण याबद्दल खरोखर वचनबद्ध असले पाहिजे, म्हणून असे करण्याचे धैर्य किंवा वेळ नसेल तर काळजी करू नका

१०. ह्युमिडीफायर विकत घ्या

आपल्या घरात आर्द्रता पातळी ४०% आणि ६०% राहिल्यास रोगास कारणीभूत जंतूंचा प्रसार कमी होण्यास मदत होते. आर्द्रतेची ही पातळी आपल्या शरीरास रोगजनकांपासून बचावासाठी मदत करते, कारण घरातील हवा श्लेष्मल त्वचेला कोरडी करते आणि आपल्या शरीरास विषाणूंचा संसर्ग संवेदनशील बनवते. ह्युमिडीफायर वापरल्यास ह्यास प्रतिबंध होतो.आपण आपले घर स्वच्छ करण्याची पद्धती किंवा कपडे धुण्याच्या पद्धतीत बदल करणे म्हणजे अगदी लहान कार्य वाटू शकते. परंतु त्यामुळे कोरोना विषाणू आपल्या घरापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळा आणि ह्या साध्या सोप्या १० टिप्स वापरून तुमचे घर कोविड -१९ मुक्त ठेवा.आणखी वाचा: कोरोनाविषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे, टिप्स, प्रतिबंध आणि बरेच काही
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved