अन्य

गणेश चतुर्थी २०२३: तुमच्या घराची सजावट कशी कराल?

    In this Article

असं म्हणतात आपला गणपती बाप्पा खूप साधा आणि आनंदी आहे. त्याला संतुष्ट करण्यासाठी फारसे काही लागत नाही (विशेषत: जेव्हा लाडवांचे ताट जवळच असेल!). गणेश चतुर्थीसाठी घर कसे सजवायचे हे ठरविताना आपण आपली सर्जनशीलता वापरून एखादी रंगीबेरंगी आणि राजेशाही मखर बनवू शकता. घरी श्रीगणेशासाठी मखर कशी तयार करावी ह्यासाठी तपशीलवार मार्गदर्शिका इथे दिलेली आहे. ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये घरात सजावट हवीच ना!

घरासाठी १० गणेशोत्सव सजावट कल्पना

इथे तुमच्या घराच्या सजावटीसाठी १० सुंदर कल्पना दिलेल्या आहेत. चला तर मग मखर दिव्यांनी उजळू द्या आणि तुमच्या गणपती बाप्पाचे जोरदार गाजरासह स्वागत करा.

. खोली स्वच्छ करा

आपण खरोखरच फुले, दिवे इत्यादींनी खोली सजवण्याआधी खोली स्वच्छ करणे आणि छान ठेवणे महत्वाचे आहे. घरातील अनावश्यक वस्तू काढून टाका आणि सभोवतालचे फर्निचर सरकवून, खोलीची (तसेच घराची) स्वच्छता करा. जर घरातल्या भिंतींवरील रंग गेला असेल किंवा फिकट झाला असेल तर आपण त्वरीत रंगाचा एक थर देऊ शकता आणि ते कोरडे करायला ठेवू शकता. खोलीतील धूळ झटकून खोली स्वच्छ धुवा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट चमकदार आणि नवीन दिसेल.

. घरातील गणेश मंडप सजावट

एकदा तुम्ही मूलभूत धूळ आणि साफसफाई पूर्ण केल्यावर आपली मुख्य चिंता मंडप सेटअप करण्याची असते. बाजारात सहज उपलब्ध होणारी मखर विकत आणणे हा एक पर्याय आहे. तुम्ही सुद्धा साधी सजावट मखर आणि सिंहासन तयार करण्यासाठी कल्पनांचा वापर करुन स्वतः मखर करू शकता. उदाहरणार्थ, छोटी मखर तयार करण्यासाठी थर्माकोल शीट्स वापरा आणि नंतर आपल्या आवडीच्या रंगाने त्या रंगवा. घरी गणेश चतुर्थीसाठी मखर तयार करताना थर्माकोल डिझाइन आणि सजावटीच्या कल्पनांसाठी मंडपाच्या सीमारेषा म्हणून रंगीत फिती जोडा. आपल्या पूजा कक्षात किंवा घरात मध्यभागी ही मखर ठेवा.

. मखर आणि आजूबाजूचा भाग सजवा

गणपती बाप्पांचा विचार केला की फुले, मग ती नैसर्गिक असो की कृत्रिम, कधीही चुकत नाहीत. लाल हा त्याचा आवडता रंग आहे, म्हणून गणेश उत्सवासाठी फुलांची सजावट तयार करताना तुम्ही लाल जासवंद आणि कण्हेर वापरू शकता. मंडप तसेच मागील भिंती हारांनी सजवा. खोलीच्या उर्वरित भागासाठी रंगीबेरंगी ओढण्या, झिरमिळ्या आणि अगदी फुग्यांचा सुद्धा वापर करू शकता.

. सजावट करताना तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरा

मखर आणि आजूबाजूच्या जागेची सजावट करीत असताना बाहेर जाऊन त्यासाठी खरेदी केली पाहिजे असे नाही. आपल्या घरात आधीपासून उपलब्ध असलेल्या गोष्टी, उदा: रंगीत साड्या, फुलदाण्या आणि बरेच काही तुम्ही सहज वापरु शकता. कोणताही अतिरिक्त खर्च न करता एखादा छानसा देखावा तयार करता येईल.

. गणेश चतुर्थीसाठी थीमवर आधारित सजावट

तुमचे मूलभूत काम बरेचसे पूर्ण झाले आहे. परंतु तुम्ही खरोखर गणेश मूर्ती सजावट कल्पना शोधत असाल तर तुम्ही गणपती बाप्पा मोरयासाठी थीम-आधारित सजावट करू शकता. मंडपाच्या मागे धबधबा (कॅनव्हासच्या शीटवर किंवा भिंतीवर रंगवलेला) जोडा. हे हिमालयचे प्रतिनिधित्व करू शकते - आपल्या देवांसाठी परम आध्यात्मिक निवासस्थान असल्यासारखे ते वाटेल. आपल्या लहान बाळाचा सर्वात चांगला मित्र बाळ गणेशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी छोटासा गोंडस पाळणा सजावटीमध्ये का ठेवू नये? आपल्या बाळाला सुद्धा ते आवडेल!

. दिवे आणा

मंडप प्रकाशित करण्यासाठी, शक्य असल्यास दिवे, तसेच काही हँगिंग दिव्यांची व्यवस्था करा. आपण काही फ्लोटिंग मेणबत्त्या देखील ठेवू शकता. आपण यावर्षी इको-फ्रेंडली गणेश सजावटीच्या कल्पनांसाठी प्रतिनिधित्व करत असल्यास, नैसर्गिक राहण्यासाठी लायटिंग न करणे आपल्यासाठी सर्वोत्तम आहे! पूजा कक्षात आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर मातीचे दिवे सुरक्षितपणे ठेवण्याची व्यवस्था करा. घरी गणेश मुर्ती कशी सजवायची याबद्दल ही पर्यावरणपूरक कल्पना आहे. आपण आपल्या मुलांना आग धोकादायक ठरू शकते हे शिकवा आणि दिवे लावलेले असताना मुले सुरक्षित असल्याची खात्री करा.

. रांगोळीने आणखी रंगीबेरंगी बनवा

रांगोळी हा उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण तिथे तुम्ही तुमची सर्जनशीलता वापरू शकता आणि घराभोवती एक सुंदर कलाकृती तयार करू शकता. तुम्ही नवशिक्या आहात की अनुभवी आहात यावर अवलंबून वेगवेगळ्या रांगोळी डिझाइन पहा आणि दररोज वेगवेगळ्या रांगोळ्या काढा. आपण वेगवेगळ्या रंगांची रांगोळी खरेदी करू शकता आणि रांगोळी सजवण्यासाठी दिवे आणि फुले ह्यांची जोड देऊ शकता.

. मखरेत गणपतीची स्थापना करा

जेव्हा शुभ मुहूर्त येईल तेव्हा बाप्पांना धूमधाम आणि ढोलताशांसहित आणा आणि सुंदर मखरेत मूर्तीची स्थापना करा. घरात प्रकाश असुद्या आणि संपूर्ण उत्सवात खोली स्वच्छ आणि धूळ विरहीत असल्याचे सुनिश्चित करा. आता आपण गणपतीसमोरच्या भागाला फुलांच्या पाकळ्या, दिवे, धूप आणि आणि हो विसरू नका, मिठाईने सजवू शकता!

घरी गणपतीची सजावट कशी करावी हे ठरविणे हा कुटुंबासाठी एक आनंददायी अनुभव असू शकतो, बऱ्याच पर्यायांमधून तुम्ही सर्वोत्कृष्ट कल्पनेची निवड करता. उत्सवाची सजावट करताना, तुम्ही तुमच्या घराच्या उर्वरित भागात देखील थोडी सजावट करा. दाराच्या बाजूची रांगोळी, गणेश वॉल हँगिंग्स आणि पडद्यावर फुलांच्या माळा सोडल्यास ते खरोखर चांगले दिसते. तुमचा हा सणासुदीचा काळ आनंदात जावो!

. पर्यावरणास अनुकूल अशी इको फ्रेंडली गणपती सजावट

आत्ताच्या काळात इको फ्रेंडली गणपती सजावट करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे. पानाफुलांची सजावट खूप आकर्षक आणि मोहक वाटू शकते. कागदाच्या वेगवेगळ्या कलाकृती करून सजावट केल्यास छान दिसते आणि ते पर्यावरण पूरक देखील असते. त्या कलाकृती आकर्षक दिसण्यासाठी, तुम्ही त्यांच्यावर छोटे आरसे चिकटवू शकता किंवा रंगानी रंगवू सुद्धा शकता.

१०. पांढऱ्या गुलाबांनी सजावट:

पवित्रता, शुद्धता यांचे प्रतीक म्हणजे पांढरी फुले! ह्या गणेशोत्सवात पांढऱ्या गुलाबानी  सजावट करा कारण पांढऱ्या फुलांना विशेष महत्व आहे. जिथे सजावट करायची आहे ती जागा ठरवून घ्या. तुम्हाला हवी तशी म्हणजे गोल अथवा चौकोनी फ्रेम करून घ्या. आणि त्यावर पांढऱ्या गुलाबांचे  डेकोरेशन तयार करून घ्या. थोडी हिरवी पाने आजूबाजूला लावा. आजूबाजूला तुम्ही दिव्याची माळ देखील लावू शकता.

घरी गणपतीची सजावट कशी करावी हे ठरविणे हा कुटुंबासाठी एक आनंददायी अनुभव असू शकतो, बऱ्याच पर्यायांमधून तुम्ही सर्वोत्कृष्ट कल्पनेची निवड करता. उत्सवाची सजावट करताना, तुम्ही तुमच्या घराच्या उर्वरित भागात देखील थोडी सजावट करा. दाराच्या बाजूची रांगोळी, गणेश वॉल हँगिंग्स आणि पडद्यावर फुलांच्या माळा सोडल्यास ते खरोखर चांगले दिसते. तुमचा हा सणासुदीचा काळ आनंदात जावो!

आणखी वाचा:

गणेश चतुर्थी - शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस ह्या गणेश चतुर्थीला तुम्ही करून पहिले पाहिजेत असे मोदकांचे वेगवेगळे प्रकार

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved