नवरात्री हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस असतो. संपूर्ण भारतात विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ थोडा व्यस्त जातो. ह्या काळात, स्त्रियांना धार्मिक विधी, पूजा, उपवास, तसेच समाजिक कार्यक्रम अशा असंख्य गोष्टी करायच्या असतात. नवरात्रीच्या उपवासासाठी अशा अनेक पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी करून बघू शकता.
नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही खाऊ शकता असे अन्नपदार्थ
नवरात्रीच्या उपवासासाठी अनेक पदार्थ आहेत! येथे काही उपवासाचे पदार्थ दिलेले आहेत जे तुम्ही करून पाहू शकता.
१. कुट्टूचे पीठ
कुट्टूचे पीठ शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात आणि त्यामुळे उपवास कारण्याऱ्या व्यक्तीला खूप वेळ भूक लागत नाही. ह्यामध्ये बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, प्रथिने आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त, लोह, मॅंगनीज आणि तांबे ह्यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाब, ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल कमी करून मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक फॅटी ऍसिड्स देखील त्यामध्ये असतात. उच्च रक्तदाबामुळे होणारा रक्तस्त्राव देखील कमी होतो.
२. साबुदाणा (टॅपिओका पर्ल)
हा कर्बोदकांचा आणखी एक स्रोत आहे. ह्यामुळे शरीर शांत होते आणि पचन सहज होते. जरी ह्यामध्ये प्रथिने आणि चरबी कमी असली, तरी ती डाळ आणि दूध ह्यासारख्या इतर घटकांसोबत पायसम आणि खीर ह्या सारखे विविध पदार्थ तयार करण्यासाठी ते वापरले जाऊ शकते.
३. वरई (बार्नयार्ड मिलेट)
तांदळाऐवजी वरई वापरली जाऊ शकते कारण तिची चव ही ब्राऊन राईस सारखीच असते. वरईमुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा मिळते कारण त्यामध्ये बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, फायबर आणि मॅग्नेशियम आणि लोह ह्या सारखी खनिजे उच्च प्रमाणात असतात. वरई कोलेस्टेरॉल देखील कमी करते कारण त्यात फायटोकेमिकल्स भरपूर असतात
४. शेंगा आणि डाळी
हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ यासारख्या डाळींचा वापर नवरात्रीदरम्यान केला जातो. डाळी फायबर आणि प्रथिनांचे स्त्रोत आहेत. डाळींमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात.
५. मखाना (फॉक्स नट्स)
उपवासाच्या काळात हे खूप लोकप्रिय अन्न आहे. मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात आणि सुरकुत्या, पांढरे केस आणि अकाली वृद्धत्व ह्या समस्या, त्यामुळे कमी करण्यास मदत होते. तंतुमय पदार्थांमुळे बद्धकोष्ठता कमी होते, विषारी पदार्थ साठून राहत नाहीत किंबहुना ते बाहेर टाकले जातात. मखान्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम उच्च प्रमाणात असतात आणि मधुमेह, धडधडणे, उच्च रक्तदाब आणि निद्रानाश नियंत्रित करण्यास मदत होते. सांधेदुखी आणि संधिवात दूर करण्यासाठी देखील मखाना चांगला आहे. मखाना शरीराला बळकट करण्यास मदत करतो , तहान शांत होते आणि जळजळ कमी होते.
६. फळे आणि भाज्या
उकडलेल्या भाज्या आणि ताज्या फळांमधून तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला उपवास काळात त्याची मदत होईल. बटाटा, टोमॅटो, भोपळा, रताळे, गाजर, पालक, आणि कच्ची पपई या भाज्या सामान्यपणे नवरात्री दरम्यान खाल्ल्या जातात.
७. सुकामेवा
ऊर्जा मिळवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सुक्या मेव्याचा वापर. पिस्ता, बदाम, किश्मिश, आणि काजू हे सर्व पदार्थ उपवासाला खाल्ले जातात. गोड पदार्थांमध्ये चवीसाठी, आणि खीर व शिरा ह्या सारख्या पदार्थांमध्ये देखील सुकामेवा घातला जातो.
८. औषधी वनस्पती आणि मसाले
नवरात्रीच्या वेळी मीठ खात नाहीत म्हणून तुमच्या जेवणाला थोडी चव येण्यासाठी तुम्ही चिंच, हिरवी वेलची, जिरे, मिरपूड, दालचिनी, हिरवी मिरची आणि शेंगदाणे वापरू शकता.
९. दुग्धजन्य पदार्थ
शुभ प्रसंगी दुग्धजन्य पदार्थ पवित्र मानले जातात. म्हणूनच तुम्ही दूध, पनीर, तूप, दही, लोणी, कंडेन्स्ड मिल्क आणि खवा यासारख्या नैसर्गिक दुग्धजन्य पदार्थांचे सेवन नक्कीच करू शकता.
१०. इतर खाद्यपदार्थ
उपवासाच्या काळात तुम्ही साखर, गूळ, मध, लिंबू, कढीपत्ता, साखर, कोथिंबीर, नारळ आणि आले यासारखे पदार्थ देखील खाऊ शकता.
तुम्हाला आवडतील अशा नवरात्रीच्या उपवासाच्या पाककृती
भारतीय नवरात्री व्रतांच्या पाककृती पहा
१. कुटूची खिचडी
ही डिश तिच्या चव आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे
[caption id="" align="aligncenter" width="768"]
स्रोत:पिंटरेस्ट[/caption]
साहित्य:
- कुटू - १ कप
- दही - १/२ कप
- तेल - १ टेस्पून
- जिरे - १ टीस्पून
- बटाट्याचे चौकोनी तुकडे - १/२ कप, कच्चे
- आले-हिरवी मिरची पेस्ट- १ टेस्पून
- खडेमीठ
- शेंगदाणे - २ चमचे कूट करून
- लिंबाचा रस - १/२ टीस्पून
सजवण्यासाठी:
- कोथिंबीर - १ टेबलस्पून चिरलेली
- तीळ - १ टीस्पून, भाजलेले
आवश्यक वेळ:
सर्व्हिंग्ज:
पद्धत:
- कुट्टू सुमारे २ तास पुरेशा पाण्यात स्वच्छ धुवून भिजवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून ते बाजूला ठेवा
- एका भांड्यात दह्यात १/२ कप पाणी घालून एकत्र करा आणि चांगले फेटून बाजूला ठेवा
- कढईत तेल गरम करून त्यात थोडे जिरे घाला
- जिरे तडतडल्यावर बटाटे घाला. चांगले मिक्स करून झाकून ठेवा. मध्यम आचेवर सुमारे ३ मिनिटे किंवा अर्धे शिजेपर्यंत राहू द्या. अधून मधून हलवत रहा
- ज्योत मंद ठेवा आणि त्यात कुटू, आले-हिरव्या मिरचीची पेस्ट, रॉक सॉल्ट आणि दही-पाणी घाला. झाकण ठेवून मंद आचेवर ६ मिनिटे शिजवून घ्या. अधून मधून हलवत रहा
- लिंबाचा रस आणि शेंगदाणे घाला. चांगले मिक्स करा आणि मध्यम आचेवर १ मिनिटे शिजवा.
- डिश कोथिंबीर आणि तीळांनी सजवा. लगेच सर्व्ह करा
२. दुध पाक
ही आणखी एक डिश आहे ज्याची चव एकदम शाही आहे
साहित्य:
- पूर्ण चरबीयुक्त दूध-५ कप
- केशर
- कोमट दूध - १ टेस्पून
- तांदूळ - १ टेस्पून
- तूप - १ टेस्पून
- साखर - १/२ कप
- वेलची पावडर - १/२ टीस्पून
सजवण्यासाठी:
- बदाम काप - १ टेस्पून
- पिस्ता - १ टेस्पून
आवश्यक वेळ:
सर्व्हिंग्ज:
पद्धत:
- एका भांड्यात १ टेस्पून कोमट दूध आणि केशर एकत्र करा आणि हे बाजूला ठेवा
- तांदूळ चांगले धुवून घ्या. त्यात थोडे तूप आणि दूध घाला. बाजूला ठेवा
- दुध एका कढईत मोठ्या आचेवर ठेवा आणि मध्ये मध्ये दोनदा हलवा. यास फक्त ५ मिनिटे लागतील
- तूप-तांदळाचे मिश्रण घालून पुन्हा चांगले मिक्स करावे. अधूनमधून ढवळत असताना मध्यम आचेवर सुमारे १५ मिनिटे शिजवा. कढईच्या बाजू खरडून घ्या
- केशर-दुधाचे मिश्रण, साखर आणि वेलची पूड घाला. हे सर्व साहित्य नीट एकत्र करा आणि मंद आचेवर सुमारे ७ मिनिटे शिजवा किंवा साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत शिजू द्या. अधून मधून हलवा
- ते थोडे थंड होऊ द्या
- पिस्ता आणि बदाम काप घालून सजवा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा
३. कलाकंद
कलाकंद हा सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे
[caption id="" align="aligncenter" width="748"]
स्रोत: पिंटरेस्ट[/caption]
साहित्य:
- ताजे पनीर - २ कप, किसलेले
- दुधाची पावडर - १/२ कप
- फ्रेश क्रीम - १ कप
- साखर - ३/४ कप
- वेलची पावडर - १/२ टीस्पून
सजवण्यासाठी:
- बदाम काप - १ टेस्पून
- पिस्ता - १ टेस्पून
आवश्यक वेळ:
सर्व्हिंग्स:
पद्धत:
- वेलची पूड वगळता, सर्व साहित्य एका पॅनमध्ये एकत्र करून चांगले मिक्स करावे
- मिश्रण घट्ट होईपर्यंत किंवा १५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. ढवळत राहा आणि बाजूंना स्क्रॅप करा
- मिश्रण गॅसवरून काढा आणि नंतर वेलची पूड घाला. चांगले मिक्स करा
- हे मिश्रण तूप लावलेल्या थाळीत घाला. मिश्रण समान पसरवा
- ते पिस्ता आणि बदाम घालून सजवा आणि हलकेच थापून घ्या जेणेकरून गार्निश मिश्रणाच्या पृष्ठभागावर चिकटून राहील. हे बाजूला ठेवा आणि ३ तास थंड होऊ द्या
- आता त्याचे तुकडे करू शकता आणि नंतर सर्व्ह करू शकता
४. वरई डोसा
हा स्वादिष्ट डोसा नवरात्रीच्या उपवासासाठी एक चांगला आहार आहे
[caption id="" align="aligncenter" width="747"]
स्रोत: पिंटरेस्ट[/caption]
साहित्य:
- वरई - १/२ कप
- राजगिरा पीठ - १/२ कप
- ताक - १/२ कप, आंबट
- आले-हिरवी मिरची पेस्ट-१ टेस्पून
- खडे मीठ
- तेल
- शेंगदाण्याची दही चटणी - सर्व्ह करण्यासाठी
आवश्यक वेळ:
सर्व्हिंग्स:
८ डोसे
पद्धत:
- वरई स्वच्छ धुवा आणि कमीतकमी २ तास पुरेशा पाण्यात भिजवून घ्या
- मिक्सरमध्ये वरई काढून घ्या आणि २ टेस्पून पाण्याचा वापर करून गुळगुळीत पेस्ट तयार करा
- मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात थोडे ताक, राजगिरा पीठ, आले-हिरव्या मिरचीची पेस्ट आणि रॉक सॉल्ट घाला. चांगले मिक्स करून घ्या. झाकणाने झाकून ठेवा जेणेकरून ते रात्रभर आंबेल
- तवा गरम करून तव्यावर हे पिठ घाला. १२५ मिमी व्यासाचा पातळ डोसा घाला
- डोस्याच्या कडेने तेल सोडा आणि तांबूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. अर्धवर्तुळाकार दुमडून घ्या.
- आणखी डोसे करण्यासाठी हीच पद्धत वापरा आणि चटणीसोबत खायला द्या
५. साबुदाणा खीर
ताज्या दुधापासून बनवलेली आणि साखर घालून गोड केलेली ही खीर सगळ्यांना आवडते
[caption id="" align="aligncenter" width="773"]
स्रोत: पिंटरेस्ट[/caption]
साहित्य:
- साबुदाणा (साबुदाणा) - १/२ कप
- पूर्ण चरबीयुक्त दूध - ४ कप
- साखर - १/२ कप
- केशर - एक चिमूटभर
- वेलची पावडर - १/२ टीस्पून
- तूप - १ टेस्पून
- काजू - २ चमचे, चिरलेला
- मनुका - २ टेस्पून, चिरलेला
आवश्यक वेळ:
सर्व्हिंग्ज:
६ सर्व्हिंग्ज
कृती:
- एका भांड्यात ३/४ कप पाणी आणि साबुदाणा एकत्र करा आणि एक तास बाजूला ठेवा
- कढईत दूध गरम करा आणि मध्यम आचेवर ४-५ मिनिटे उकळा
- भिजवलेला साबुदाणा घाला. चांगला मिक्स करा आणि मध्यम आचेवर १२ मिनिटे शिजवा आणि अधूनमधून हलवा
- थोडे केशर, साखर आणि वेलची पूड घाला. अधूनमधून ढवळत असताना मध्यम आचेवर २ मिनिटे चांगले मिक्स करा. गॅस बंद करा आणि बाजूला ठेवा
- एका छोट्या नॉन-स्टिक पॅनमध्ये, तूप गरम करा. काही मनुके आणि काजू घाला. हे मिश्रण मध्यम आचेवर १ ते २ मिनिटे परता. तयार झालेल्या साबुदाणा खिरीमध्ये हे मिश्रण घाला आणि चांगले मिक्स करा
- थंड किंवा कोमट झाल्यावर सर्व्ह करा
६. श्रीखंड
ही डिश खरोखरच सगळ्यांच्या आवडीची आहे
साहित्य:
- पूर्ण चरबीयुक्त दही - १ १/२ कप
- पिठी साखर - ५ टेस्पून
- वेलची पावडर - १/२ टीस्पून
- केशर - काही
- कोमट पाणी - १ टेस्पून
- बदाम आणि पिस्ता स्लिव्हर्स - १ टेस्पून, सजवण्यासाठी
आवश्यक वेळ:
२ मिनिटे
सर्व्हिंग्ज:
१.२५ कप
पद्धत:
- १ टेस्पून कोमट पाण्यात, केशराच्या काड्या विरघळवा. त्यांना बाजूला ठेवा
- मलमलच्या कपड्यात दही ठेवा. दही पिळून घ्या जेणेकरून सर्व अतिरिक्त पाणी काढून टाकून दिले जाईल
- हे दही एका भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये थोडी साखर घाला. हे मिश्रण चांगले एकत्र करा
- केशर-पाण्याचे मिश्रण आणि वेलची पावडर घाला आणि सामग्री पुन्हा मिक्स करा
- हे मिश्रण एका सर्व्हिंग बाऊलमध्ये घ्या. पिस्ता आणि बदामाच्या कापांनी सजवा. हे कमीतकमी १ तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा
- थंड झाल्यावर ही डिश सर्व्ह करा
७. रसमलाई
ह्या पाककृतींमध्ये पनीरचा समावेश आहे
साहित्य:
केशर दुधासाठी:
- पूर्ण चरबीयुक्त दूध -५ कप
- कोमट दूध - १ टेस्पून
- केशर - १/२ टीस्पून
- साखर - १/४ कप
- वेलची पावडर - १/२ टीस्पून
रसगुल्ला साठी:
- गायीचे दूध - ५ कप
- लिंबाचा रस - ११/२ टेस्पून
- साखर - १ कप
सजवण्यासाठी:
- पिस्त्याचे काप -१ टेस्पून
- बदाम काप - १ टेस्पून
आवश्यक वेळ:
सर्व्हिंग्ज:
पद्धत:
केशर दूध बनवण्यासाठी:
- मोठ्या आचेवर दूध उकळून घ्या आणि मध्ये ढवळत रहा. या प्रक्रियेस फक्त ४-५ मिनिटे लागतील
- ज्योत मध्यम करा. आता, १५ मिनिटे किंवा दुधाचे प्रमाण अर्धे होईपर्यंत उकळू द्या. कडेने स्क्रॅप करताना अधूनमधून हलवा
- कोमट दूध आणि केशर एका भांड्यात एकत्र करा आणि चांगले मिक्स करा. बाजूला ठेवा
- या दुधात साखर घाला. मिक्स करा आणि मध्यम आचेवर १ मिनिटे उकळवा
- गॅस बंद करा आणि केशर दुधाच्या मिश्रणात थोडी वेलची पावडर घाला. चांगले मिक्स करा
- सुमारे ३० मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. जवळजवळ १ तास फ्रिजमध्ये ठेवा
रसगुल्ल्यासाठी:
- एका खोल नॉन-स्टिक पॅनमध्ये मोठ्या गॅस वर दूध उकळवावे आणि ते उकळत असताना दोनदा हलवावे. यास सुमारे ५ मिनिटे लागतील
- गॅस बंद करा आणि हळूहळू थोडा लिंबाचा रस घाला. दूध नसेपर्यंत हलक्या हाताने ढवळत राहा जेव्हा पनीर आणि हिरवे पाणी (मट्ठा) वेगळे होते, तेव्हा ते पूर्णपणे नसलेले असते
- मऊ कापड वापरून हे गाळून घ्या. अतिरिक्त पाणी टाकून द्या
- हे पनीरने भरलेले मऊ कापड एका ताज्या पाण्याच्या भांड्यात ठेवा आणि सुमारे २ मिनिटे हळूवारपणे मॅश करा
- वर दिलेली ही कृती पुन्हा करा आणि पाणी दोन किंवा अधिक वेळा बदला
- बांधा आणि नंतर ३० मिनिटे लटकावून ठेवा जेणेकरून अतिरिक्त पाणी बाहेर जाईल
- कापड पिळून घ्या जेणेकरून पाणी बाहेर येईल. आता प्लेट मध्ये हे कापड ठेवा आणि उघडा. पनीर ३-४ मिनिटे चांगले मळून घ्या म्हणजे ते मऊ होईल
- ह्या पनीरचे सामान भाग करा आणि त्याचे लहान गोळे करा आणि नंतर हळूवारपणे सपाट करा आणि बाजूला ठेवा
- स्टीमर मध्ये ५ कप पाणी घाला आणि थोडी साखर घाला. अधूनमधून ढवळत असताना उकळी आणा जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळेल
- हे पनीर रोल साखरेच्या पाण्यात ७-८ मिनिटे ठेवा, वाफ येऊ द्या.
- ज्योत बंद करा आणि स्टीमरमध्ये ३० मिनिटे राहू द्या.
पुढील कृती:
- रसगुल्ला पाकातून एकावेळी एक असे काढून घ्या आणि आपल्या तळहातांनी हळूवार पिळून घ्या. आता ते केशराच्या दुधात घाला. त्यांना हलवा
- किमान ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा
- बदाम आणि पिस्त्यांनी सजवल्यानंतर थंडगार सर्व्ह करा
८. दुधी हलवा
ही डिश सगळ्यांना तिची चव आणि पोत ह्यामुळे आवडते
साहित्य:
- दुधी भोपळा - २ कप, किसलेला
- तूप - ३ टेस्पून
- चिरलेला मावा - १/२ कप
- साखर - ३/४ कप
- वेलची पावडर - १/२ टीस्पून
- कोमट दूध - २ टेस्पून
- बदाम आणि पिस्ता काप - १ टेस्पून
आवश्यक वेळ:
सर्व्हिंज:
४ सर्व्हिंग्ज
पद्धत:
- प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करा आणि किसलेला दुधीभोपळा आणि खवा घाला. मध्यम आचेवर २ मिनिटे परतून घ्या
- वेलची पावडर, साखर, २ चमचे कोमट दूध आणि २ चमचे गरम पाणी घाला. हे मिश्रण चांगले मिक्स करा आणि मोठ्या गॅसवर प्रेशर कुकर मध्ये २ शिट्ट्या करून घ्या
- वाफ बाहेर पडू द्या आणि नंतर झाकण उघडा
- मध्यम आचेवर ५ मिनिटे शिजवा. अधून मधून हलवा
- शिजल्यावर सर्व्ह करा
९. पियुष
पियुष हे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात अमृतासारखे आहे,.
[caption id="" align="aligncenter" width="759"]
स्रोत: पिंटरेस्ट[/caption]
साहित्य:
- केशर घातलेले श्रीखंड - २ कप
- ताक - ३ कप
- साखर - २ टेस्पून
- वेलची पावडर - एक चिमूटभर
- जायफळ पावडर - एक चिमूटभर
- पिस्ता काप - २ टेस्पून
- केशर
आवश्यक वेळ:
सर्व्हिंग्ज:
पद्धत:
- एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करा. मिक्स करा आणि २ तास थंड करा
- केशर आणि पिस्त्यांनी सजवा आणि नंतर सर्व्ह करा
१०. सुका मेवा भरलेले खजूर
नवरात्रीमध्ये उपवासासाठी हा आणखी एक सोपा पदार्थ आहे
साहित्य:
- खजूर - २२, बिया नसलेले
- सुका मेवा - १/४ कप, चिरलेला
- मावा - १/२ कप, किसलेला
- पिठी साखर - २ चमचे
- वेलची पावडर - १/४ टीस्पून
- केशर
आवश्यक वेळ:
सर्व्हिंग्ज:
२२ खजूर
पद्धत:
- सारण २२ समान भागांमध्ये विभाजित करा
- प्रत्येक खजुरामध्ये सारणाचा एक भाग भरा
- फ्रिजमध्ये ठेवा किंवा लगेच सर्व्ह करा.
११. साबुदाणा खिचडी
कमी तिखट असलेली ही हलकी डिश आहे
[caption id="" align="aligncenter" width="755"]
स्रोत: पिंटरेस्ट[/caption]
साहित्य:
- साबुदाणा - १ कप
- शेंगदाणे - १/२ कप
- जिरे - १ टीस्पून
- तूप - २ टेस्पून
- सुक्या लाल मिरच्या- ३-४
- कढीपत्ता - १ काडी
- मीठ - २ चमचे
- मिरची पावडर - १/२ टीस्पून
- लिंबाचा रस - १ टेस्पून
- हिरवी मिरची (चिरलेली) - १ टीस्पून
- कोथिंबीर - १ टेस्पून
आवश्यक वेळ:
सर्व्हिंज:
४ सर्व्हिंग्ज
पद्धत:
- साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या. आता हा साबुदाणा पाण्यात सुमारे एक तास भिजवा (सुमारे ३ सेमी पाण्याची पातळी वरती ठेवा)
- एका तासानंतर, चाळणीचा वापर करून साबुदाणा काढून घ्या आणि सुमारे एक तास जाड कापडावर पसरवा. पाणी काढून टाकण्यासाठी असे केले जाते. पाणी काढून टाकणे महत्वाचे आहे. जर साबुदाणा पूर्णपणे कोरडा नसेल तर साबुदाणा एकत्र चिकटून राहील आणि शिजवताना गुठळ्या तयार होतील
- एक भांडे घ्या आणि त्यामध्ये साबुदाणा, शेंगदाणे, मिरची पावडर आणि मीठ खूप चांगले एकत्र करा, जेणेकरून साबुदाण्याला हे मिश्रण चांगले लागेल
- कढईत तूप गरम करा. जिरे, वाळलेली लाल मिरची आणि कढीपत्ता घाला. मिरची भाजल्यावर त्यामध्ये , तुम्ही तयार केलेला साबुदाणा मिक्स घाला आणि मंद आचेवर चांगले परतून घ्या. या संपूर्ण प्रक्रियेस फक्त दोन मिनिटे लागतात
- शिजल्यावर गॅसवरून काढून घ्या, वरून लिंबू पिळा आणि चांगले मिक्स करा
- तुमची डिश आता तयार आहे! तुम्ही वरून चिरलेली कोथिंबीर घालून सजवू शकता
१२. मखाना खीर
ही एक पौष्टिक आणि चवदार डिश आहे
साहित्य:
- मखाना - १ कप
- काजू - १०-१२
- वेलची पूड - १/२ चमचा
- दूध - १/२ लिटर
- तूप - २ टेबल स्पून
सजवण्यासाठी:
- बदाम काप - १ टेस्पून
- काजू - १ टेस्पून
आवश्यक वेळ: ३० मिनिटे
सर्विंग्ज: ४ सर्विंग्ज
पद्धत:
- कढईत २ ते ३ चमचे तूप गरम करा
- त्यामध्ये १ कप मखाना आणि थोडे काजू घाला
- मखाना तुपात मंद ते मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. काजूही सोनेरी होतील. ते भाजताना अनेकदा ढवळावे
- नंतर एका प्लेटमध्ये काजू काढून बाजूला ठेवा
- आता २ कप दूध (५०० मिली) सॉसपॅनमध्ये किंवा जाड तळाच्या पॅनमध्ये मंद आचेवर गरम करा. थोड्या थोड्या वेळाने ढवळत रहा जेणेकरून तो तळाला करपणार नाही
- दुधाला उकळी येऊ द्या
- दूध गरम होत असताना, ⅓ कप मखाना बाजूला ठेवा आणि उरलेला भाजलेला मखाना ग्राइंडर किंवा ब्लेंडरच्या भांड्यात घाला आणि बारीक करून घ्या. भाजलेले काजू मखान्यासोबत घालायचे नाहीत हे लक्षात ठेवा
- वेलची पूड आणि चिमूटभर केशर स्ट्रँड बाजूला काढून ठेवा, तुम्ही खीर शिजल्यावर त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालू शकता
- दुधाला उकळी आल्यावर त्यात ३.५ ते ४ चमचे साखर घाला
- त्यामध्ये बारीक केलेला मखाना घाला
- ढवळून चांगले मिक्स करा
- मखाना मऊ होईपर्यंत आणि दूध थोडे घट्ट होईपर्यंत ९ ते १० मिनिटे मंद ते मध्यम आचेवर उकळवा. थोड्या थोड्या वेळाने ढवळत रहावे. भांड्याच्या कडांना लागलेले घट्ट झालेले दूध बाजूंनी खरवडून खीरमध्ये घाला.
- थंड झाल्यावर खीर जास्त घट्ट होईल हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये दूध घाला.
- खीर तयार झाल्यानंतर त्यामध्ये बदामाचे काप आणि काजू घालून सजवा.
१३. बीटरूट कोशिंबीर
बीटरूट कोशिंबीर ही आरोग्यासाठी चांगली अशी एक रेसिपी आहे. ही कोशिंबीर तुम्ही नवरात्रात दररोज करू शकता.
https://www.shutterstock.com/image-photo/beetroot-salad-wallnuts-garlic-bowl-on-1150681430
साहित्य:
- बीट - २
- पुदिन्याची पाने - ३
- फ्रेश क्रीम - ४० ग्रॅम
- मोहरीची पेस्ट - अर्धा चमचा
- बदाम २
- मीठ चवीनुसार
- चिमूटभर काळी मिरी पावडर
- कोथिंबीर
आवश्यक वेळ: २० मिनिटे
सर्विंग्ज: २
पद्धत:
- बीट उकडून घेऊन त्याचे माध्यम आकारात तुकडे करून घ्या. पुदिन्याची पाने देखील स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
- एका भांड्यात चिरलेले बीट, पुदिना, फ्रेश क्रीम, मोहरीची पेस्ट, आणि बदाम चांगले एकत्र करून घ्या.
- ह्या मिश्रणात मीठ आणि काळी मिरी पावडर घाला.
- वरून कोथिंबीर टाकून कोशिंबीर सर्व्ह करा.
आपल्या प्रियजनांसोबत नवरात्रीचा सण साजरा करताना भारतीय पदार्थांचा आनंद घेण्याचा हा काळ आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा करतो तसेच पूजा पाठ, जप जाप्य आणि गरबा, दांडिया नृत्य अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतो. नवरात्रीसाठी इथे दिलेल्या पाककृती तुम्हाला आणि तुमच्या पाहुण्यांना आनंदी आणि समाधानी करतील ह्याची खात्री आहे. तुम्ही ह्या पदार्थांचा आनंद घ्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रमत्रिणींना सुद्धा ह्या आनंदात सहभागी करून घ्या!
आणखी वाचा:
मुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती
तुमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेश