भाऊबीज हा सण दरवर्षी दिवाळीनंतर दोन दिवसांनी साजरा केला जातो. भावा बहिणीच्या नात्यातील अतूट बंधन ह्या दिवशी साजरे केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. यावर्षी भाऊबीज १५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.
जर तुम्हाला तुमच्या भावाला एक विशेष संदेश पाठवायचा असेल किंवा तुमच्या दोघांच्या फोटोसाठी एक मजेदार कॅप्शन हवे असेल, आणि ते तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर पोस्ट करण्याचा विचार करत असाल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही छान छान भाऊबीजेच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही त्यातून तुमच्या आवडीच्या शुभेच्छा निवडा!
भावांसाठी काही अर्थपूर्ण आणि छान अशा भाऊबीजेच्या शुभेच्छा तुम्हाला हव्या आहेत का? प्रेमळ ते अगदी हलक्या फुलक्या अशा शुभेच्छा आम्ही तुमच्या साठी खाली सूचिबद्ध केलेल्या आहेत.
1. प्रिय दादा, तुझ्यावर प्रेम करण्यापासून (आणि तुला त्रास देण्यापासून) मला कोणीही रोखू शकत नाही. भाऊबीजेच्या तुला खूप शुभेच्छा!
2. तुझ्यासारखा भाऊ मला मिळाला म्हणजे मी किती भाग्यवान आहे, परंतु त्याही पेक्षा तू सर्वात भाग्यवान आहेस - तुला माझ्यासारखी एक बहीण आहे! भाऊबीजेच्या शुभेच्छा!
3. तुझ्यासोबत मी सगळी सिक्रेट शेअर करते आणि तुझ्यासोबत मला सर्वात जास्त सुरक्षित वाटते. इतका समजूतदार आणि संरक्षक भाऊ असल्याबद्दल धन्यवाद. भाऊबीजेच्या शुभेच्छा!
4. तू माझ्यापेक्षा उंच आहेस, पण लक्षात ठेव, मी नेहमीच तुझ्यापेक्षा हुशार आहे. माझ्या लहान भावास भाऊबीजेच्या शुभेच्छा!
5. तुझ्याकडून मिळणाऱ्या भाऊबीजेच्या भेटीची मला खूप उत्सुकता आहे आणि मला माहितीच आहे कि तू माझ्यासाठी छानशी भेट आणली असणार आहेस! भाऊबीजेच्या शुभेच्छा!
6. भाऊबीज म्हणजे भेटवस्तू मिळण्याचा क्षण!. तुझ्यासारखा मोठा भाऊ मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा!
7. तुझ्यामुळे माझे बालपण खूप मजेत गेले. माझ्यासाठी कायम खंबीरपणे सोबत असल्याबद्दल धन्यवाद! भाऊबीजेच्या शुभेच्छा!
8. माझ्यासोबत कायम असल्याबद्दल तसेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल खूप धन्यवाद. मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मिळाला नसता. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
9. प्रिय दादा, माझ्यासारखी गोड बहीण असल्याबद्दल नक्कीच तू परमेश्वराचे आभार मानत असशील. भाऊबीजेच्या शुभेच्छा!
10. जेव्हा तुम्हाला एखादा भाऊ असतो तेव्हा त्याला त्रास देण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही. भाऊबीजेच्या शुभेच्छा!
11. तू सोबत आहेस म्हणून मी आयुष्यातले अनेक अडथळे सहज पार करू शकले - भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा दादा!
12. दीप मायेचे असेच लखलखूदे, बहीण-भावाचे नाते आपुले असेच अखंड राहूदेह्या भाऊबीजेला तुमच्या मोठ्या अथवा छोट्या बहिणीसाठी भाऊबीजेच्या शुभेच्छा आणि मेसेजेस इथे आम्ही देत आहोत!
1. येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपला बंध अधिक दृढ होत जातील आणि आपण कुठेही गेलो तरीही आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू. भाऊबीजेच्या शुभेच्छा!
2. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला वचन देतो कि मी आयुष्यभर तुला त्रास देत राहील! भाऊबीजेच्या शुभेच्छा!
3. देवाने मला तुझा भाऊ म्हणून पाठवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा!
4. मी हे रोज सांगत नाही परंतु तुझ्यासारखी बहीण मिळाल्याचे समाधान आहे - भाऊबीजेच्या शुभेच्छा!
5. तू म्हणजे परमेश्वराने मला पाठवलेली एक सुंदर आणि मौल्यवान भेट आहे, जी मी आयुष्यभर जपून ठेवीन आणि संरक्षण करीन. माझ्या छोट्या बहिणीस भाऊबीजेच्या शुभेच्छा!
6. प्रिय ताई, मला जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा तू माझ्या सोबत असतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, भाऊबीजेच्या शुभेच्छा!
7. तू माझ्या आयुष्यात असतीस तर ह्या माझ्या बालपणीच्या सर्वोत्तम आणि मजेदार आठवणी माझ्याकडे नसत्या. भाऊबीजेच्या शुभेच्छा!
8. तू माझ्यासाठी आतापर्यंत जे काही केलं आहेस त्यासाठी तसेच आईसारखी माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. तू जगातील सर्वोत्तम बहिण आहेस! भाऊबीजेच्या शुभेच्छा!
9. माझ्यासारखा मोठा भाऊ मिळाल्याबद्दल स्वतःला खूप भाग्यवान समजा! भाऊबीजेच्या शुभेच्छा!
10. प्रेमाचा, मायेचा आणि जिव्हाळ्याचा सुगंध सगळीकडे दरवळला, भाऊबीजेचा सण आला - भाऊबीजेच्या शुभेच्छा!
11. तू माझ्यासाठी एक आधारस्तंभ आहेस, तू म्हणजे परमेश्वराकडून मिळालेला आशीर्वाद आहे - भाऊबीजेच्या उदंड शुभेच्छा ताई!
12. सण जिव्हाळ्याचा, सण आनंदाचा, सण आहे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा 13. फुलोंका तारोका सबका केहना है एक हजारोमे मेरी बेहना हैभावाबहिणीच्या अतूट नात्यावर खाली काही कोट्स दिलेले आहेत. तुमच्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी हे कोट्स तुम्ही वापरू शकता.
वर दिलेले सर्व शुभेच्छा संदेश अगदी तुमच्या मनात असलेल्या शब्दांमध्ये मांडले आहेत आणि तुम्हाला ते आवडतील अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही तुमच्या भावंडांना शुभेच्छा पाठवल्याबद्दल तुम्हाला त्यांच्याकडून एक अद्भुत भेट देखील मिळेल! हा सण आपल्या भावा-बहिणींसोबत साजरा करा. तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
आणखी वाचा:
तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेजेस आणि कोट्स तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमत्रिणींना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी शुभेच्छासंदेश, मेसेजस आणि कोट्स