Close
App logo

ऍप युजर्स साठी शॉपिंग ऑफर्स आणि पेरेंटिंग बदद्ल माहिती

Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य कोरोना विषाणू आणि सामान्य फ्लू – डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून तुम्हाला हे माहित असावे

कोरोना विषाणू आणि सामान्य फ्लू – डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून तुम्हाला हे माहित असावे

कोरोना विषाणू आणि सामान्य फ्लू – डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून  तुम्हाला हे माहित असावे

कोरोना विषाणू (नॉव्हेल कोरोनोव्हायरस/२०१९एनकोव्ही), ह्यावर अजून कुठलाही इलाज नाही. त्याच्या नुकत्याच झालेल्या उद्रेकामुळे सगळ्या जगाला चिंता लागून राहिली आहे, तसेच आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषकरून ही भीती, चीनमधील वूहान ह्या शहरात जिथे हा विषाणू सर्वात आधी सापडला तिथे जास्त आहे.

चीन हा देश भारताच्या जवळ असल्याने हे भीतीचे सावट भारतावर सुद्धा पसरते आहे.

लोकांमध्ये घबराट पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे या कोरोनाव्हायरसची लक्षणे सामान्य फ्लूसारखीच असतात, ज्यामुळे त्या दोघांना ओळखणे किंवा फरक करणे कठीण होते

वुहान मध्ये उद्रेक झाल्यापासून, अनेक वैद्यकीय तज्ञांनी पुढे येऊन अनेक अस्वस्थ मनांना दिलासा देण्यासाठी कोरोनाव्हायरसविषयीचे तथ्य खालीलप्रमाणे मांडले आहे

चला तर बघुयात तज्ञ काय सांगत आहेत!

स्रोत: The Wholesome Doctor

व्हिडीओ: कोरोना विषाणू लक्षणे, प्रतिबंध आणि बरेच काही

कोरोनाविषाणू म्हणजे काय?

कोरोनाव्हायरस रोगजनकांच्या गटातील असल्यामुळे सस्तन प्राणी, पक्षी आणि मानवांवर सुद्धा ह्याचा परिणाम होतो. या गटाशी संबंधित बहुतेक व्हायरस धोकादायक नाहीत. त्यांच्यामुळे माणसांच्या श्वसनप्रणालीवर परिणाम होतो आणि सामान्य फ्लू, सिव्हिअर ऍक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एसएआरएस) आणि मिडलईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस) असे आजार होतात.

वैद्यकीय शास्त्रात कोरोना विषाणूविषयी काही संपूर्णतः अज्ञान आहे असे नाही. किंबहुना, तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतका तो सामान्य आहे. माणसांवर परिणाम करणाऱ्या विषाणूंमध्ये एनएल ६३, २२९ ई, एचकेयु १ आणि ओसी ४३ इत्यादींचा समावेश होतो आणि सहसा, श्वसनसंस्थेच्या वरच्या भागातील (सौम्य ते मध्यम प्रमाणात) आजार होतात आणि सर्दीप्रमाणेच काही प्रमाणात ते संसर्गजन्य आहेत.

ज्यांची प्रतिकार प्रणाली कमी आहे त्यांच्यावर ह्याचा जास्त परिणाम झालेला आढळतो. म्हणून ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, लहान मुले तसेच ज्यांना हृदयरोग किंवा कर्करोगांसारखे आजार आहे त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

चला तर मग, कोरोना विषाणूची लागण झाल्यास कुठली लक्षणे दिसतात ते पटकन बघूयात

कोरोना विषाणूच्या ह्या लक्षणांवर लक्ष ठेवूयात

आधी सांगितल्याप्रमाणे कोरोना विषाणूची लक्षणे सामान्य फ्लू सारखीच असतात. इथे चिन्हे आणि लक्षणांची यादी दिली आहे जी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून ती आढळ्यास उपाय करता येतील

  • सतत वाहणारे नाक
  • ताप
  • खोकला
  • डोकेदुखी
  • घसा दुखी
  • बरे नाही असे वाटत राहणे
  • श्वास घेण्यास त्रास
  • फुप्फुसांना सूज येणे/न्यूमोनिया

सामान्य माणसाला कोरोनाचा संसर्ग आणि सामान्य फ्लू ह्यातील फरक कळणे अवघड असते आणि त्यामुळे हा आजार ओळखणे तसे सोपे नाही. तसेच, कोरोना विषाणूचा उष्म्यान कालावधी (इन्क्युबेशन पिरिएड) हा १४ दिवसांपर्यंत असतो, जर लक्षणे ७१० दिवसांपर्यंत तशीच राहिली आणि त्रास वाढला तर तुम्ही तात्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

आम्हाला खात्री आहे कि तुम्हाला ह्या बातमीने सतत चिंता वाटत राहते, परंतु तो आजार होऊ नये आणि तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहावे म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा आहेत.

इथे दिलेल्या काही गोष्टी तुम्ही करू शकता

ह्या विषाणूचा संसर्ग होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रतिकार शक्ती कमी असणे होय. त्यामुळे हा आजार दूर ठेवण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवणे हा अगदी स्पष्ट उपाय आहे.

खालीलप्रकारे तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता

. सजलीत रहा

. भरपूर विश्रांती घ्या

. डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापावर औषधे घ्या

. मजबूत प्रतिकार प्रणालीसाठी पोषक आणि आरोग्यपूर्ण आहार घ्या

. वैयक्तिक स्वच्छता

  • साबणाने हात स्वच्छ धुवा
  • अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा
  • तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा
  • शिंकताना आणि खोकताना तुमचे नाक आणि तोंड झाका
  • एकदा वापरलेल्या टिश्यूची नीट विल्हेवाट लावा
  • तुमच्या नाकाला आणि डोळ्यांना स्पर्श करू नका
  • वापरलेल्या वस्तू वारंवार निर्जंतुक करा

. वसंत ऋतू संपेपर्यंत गर्दीमध्ये जाण्याचे टाळा

. ज्यांना सर्दी, खोकला झालेला आहे लोकांशी संपर्क टाळा

, प्राण्यांशी संपर्क टाळा

. कच्चे मांस खाणे टाळा, आणि दूध नीट तापवल्याशिवाय पिऊ नका

१०. कच्चे मांस हाताळताना ग्लोव्हज घाला आणि पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून वेगळे ठेवा

ह्या आजाराचा एकाकडून दुसऱ्याला संसर्ग होऊ नये म्हणून तुम्हाला काही मार्गदर्शक सूचना माहिती असल्या पाहिजेत.

तुम्ही स्वतःला कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्य मार्गदर्शक सूचना

  • परदेश प्रवास करताना, विशेषकरून ज्या देशांमध्ये ह्या विषाणूचा उद्रेक झाला आहे तिथे जाताना तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती खूप वाढवली पाहिजे आणि सर्दी, खोकला आणि ताप ह्यासाठी लागणारी औषधे जवळ ठेवली पाहिजे
  • बऱ्याचशा विमानतळांवर, रेल्वे स्टेशन, बस स्टेशनवर ह्या विषाणूचा संसर्ग झालेल्या प्रवाशांना आरोग्य तपासणीनंतर परत पाठवले जाते किंवा परवानगी दिली जाते त्यामुळे, जर तुम्हाला ताप, सर्दी आणि खोकला असेल तर प्रवास करणे टाळा
  • जे लोक कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या अगदी जवळून सानिध्यात असतात त्यांनी तात्काळ स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे
  • जर तुम्हाला ताप, सर्दी, खोकला झाला असेल आणि तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तात्कळ वैद्यकीय मदत घ्या
  • बाहेर खाताना, हॉटेल्स मध्ये अन्न सुरक्षा, अन्नाची हाताळणी आणि स्वच्छता ह्यांची नीट काळजी घेतली जात आहे ना ह्याची खात्री करा

तसेच इथे एक बोनस टीप देत आहोत, ह्या रेसिपी मुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढून तुम्ही सुरक्षित रहाल

मसाला चहा रेसिपी

हा चहा स्वाद तसेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि बी जीवनसत्त्वे यासारख्या पोषक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. ह्यामध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी फंगल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे मानवी शरीर दुरुस्त करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

टीपः ज्यांना स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग किंवा जास्त एस्ट्रोजेनमुळे झालेला कोणताही रोग आहे त्यांच्यासाठी ही कृती करण्याची शिफारस केली जात नाही.

घटक:

  • १ ते २ बादलफूल
  • २५० मिली (१ भांडे) पाणी

कृती:

  • भांड्यात पाणी उकळून घेणे
  • त्यामध्ये बादलफूल टाकून गॅस बंद करा
  • भांड्यावर झाकण ठेवा आणि १० ते १५ दिवस तसेच राहूद्या. नंतर प्या

स्रोत: https://www.youtube.com/watch?v=PBVvV8A7iSI

थंडीच्या काळात आणि वसंत ऋतूमध्ये कोरोना विषाणू सक्रिय असल्याचे अहवाल आहेत म्हणून सावधानतेने प्रवास करा. तुम्हाला विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दीची ठिकाणे टाळा. जर तुम्हाला कोरोनाविषाणू विषयी अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला हा आजार झाल्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही तात्काळ वैद्यकीय तज्ञां ची भेट घ्या

आणखी वाचा: लहान मुलांना होणारा विषाणूंचा संसर्ग

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article