In this Article
लहान बाळांची वाढ खूप वेगाने होते, गोंडस चिमुकल्या बाळापासून ते शिशुवस्था, त्यानंतर येणारी किशोरावस्था आणि तुमच्या काही लक्षात येण्याआधीच मुले कॉलेजला सुद्धा जायला सुरुवात करू लागतील. तुमच्या लहान बाळाचा पहिला वाढदिवस यायला अजून तीन महिने बाकी आहेत. त्याचा योग्य विकास होतो आहे किंवा नाही हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या बाळाने विकासाचे महत्वाचे टप्पे गाठण्यास मदत व्हावी म्हणून तुम्ही काय करू शकता? ३७ आठवड्यांच्या बाळाचा विकास कसा होतो ते पहा.
३७ आठवड्यांच्या बाळाचा विकास
बाळाची पहिल्या वर्षात प्रचंड वाढ होते. ३६ आठवड्यांच्या आसपास बाळाच्या वाढीचा वेग खूप जास्त असतो. ह्या वयाच्या आसपास लहान मुलग्यांचे वय १९ पौंड असते असते आणि लहान मुलीचे वजन सुमारे १८ पौंड असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ३७ आठवड्यांच्या बाळाची उंची अंदाजे २८ इंच असू शकते आणि त्याच वयाच्या मुलीची उंची साधारणपणे २७ इंच असू शकते. सरासरी, बाळांचे त्यांच्या जन्माच्या नवव्या महिन्यात अंदाजे वजन ३ ते ५ औंस वाढते आणि उंची अंदाजे ०.५ इंच वाढू शकते. प्रत्येक बाळाची वाढ वेगळ्या गतीने होते. जर तुमचे बाळ या पॅरामीटर्सच्या काहीसे जवळ असेल, तर कदाचित तो अगदी ठीक आहे.
३७–आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे
तुमच्या ३७ –आठवड्याच्या बाळाचा विकास होताना खालील गोष्टी अपेक्षित आहेत
- तुमचे बाळ कदाचित ओळखीचे आवाज ओळखण्यास आणि समजण्यास सक्षम असेल.
- तुमच्या बाळाला वस्तू समजू लागतील. म्हणजेच त्याला एखादे खेळणे किंवा एखादी वस्तू आठवेल आणि तो ती शोधून काढू शकेल.
- तुमचे बाळ नेहमी पाहत असलेल्या लोकांना ओळखू लागेल.
- तुमच्या बाळाची दृष्टी सुधारेल आणि आता तो लक्ष केंद्रित करू लागेल आणि बर्याच दूरवरच्या गोष्टी पाहू शकेल.
- ह्या वयात तुमचे बाळ रांगणे सुरू करू शकते. तथापि, काही बाळांना रांगण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो किंवा काही बाळे अजिबात रंगात नाहीत. काही बाळे या वयातही चालायला लागतात.
- तुमचे बाळ खुर्ची, पलंग किंवा इतर कोणताही आधार घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकेल .
- तुमचे बाळ पिन्सर ग्रास्प वापरण्यास सुरुवात करू शकते. म्हणजेच आपली तर्जनी आणि अंगठा ह्यांच्या साहाय्याने तो वस्तू पकडू शकेल. बाळासाठी हे आकलन महत्वाचे आहे कारण ते तुमच्या बाळाला त्याचा सिप्पी कप किंवा खेळणी ह्यासारख्या गोष्टी धरून ठेवण्यास मदत करेल.
- आता तुमचे बाळ जास्त काळ बसू लागेल.
- तुमच्या बाळाचा शब्दसंग्रह वाढतो आणि तो आता दादा, मामा, पापा इत्यादी शब्द बोलू शकतो.
बाळाला आहार देणे
तुमच्या बाळाच्या खाण्याच्या वेळापत्रकात आणि सवयींमध्ये तुम्हाला मोठा बदल दिसेल. ह्या वयात तो अधिक स्वतंत्र होऊ शकतो. आता त्याला त्याची दुधाची बाटली किंवा सिप्पी कप स्वतःची स्वतः पकडायची असेल. तुमच्या बाळाला एका दिवसात सरासरी सुमारे ७०० ते ९०० कॅलरीजची आवश्यकता असू शकते. ह्यापैकी अर्ध्या कॅलरी त्याला स्तनपानातून मिळायला हव्यात, म्हणजेच तुमच्या बाळाला दररोज अंदाजे ७०० मिलीलीटर दुधाची आवश्यकता असू शकते. तुमच्या बाळाची बाटलीची सवय मोडून त्याला सीपी कप देण्यास सुरुवात करण्यासाठी हे अगदी योग्य वय असू शकते. लहान मुलांनी प्रतिकार करणे सामान्य असले तरी, तुम्ही एका कपमध्ये पाणी देऊन सुरुवात करू शकता आणि हळूहळू त्यातून दूध देऊ शकता. तसेच, ह्या टप्प्यावर तुम्ही प्रथम अन्न द्यावे, त्यानंतर आईचे दूध किंवा फॉर्मुला द्यावा. त्याला दिवसातून तीनदा जेवण आणि दोन लहान स्नॅक्स द्यावेत. तुम्ही त्याला रताळे, केळी, सफरचंद, एवोकॅडो, टोफू इत्यादी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यास सुरुवात करू शकता. तुमचे बाळ नीट जेवत आहे की नाही ह्याची खात्री करण्यासाठी, त्याच्या ओल्या डायपरवर लक्ष ठेवा. तसेच, त्याला योग्य पोषण मिळत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच्या वजनावर लक्ष ठेवा.
बाळाची झोप
बाळाच्या झोपण्याच्या रुटीनची पालकांना सर्वात जास्त काळजी वाटत असते. चांगली बातमी अशी आहे की ह्या वयापर्यंत तुमचे बाळ दिवसातून १४ ते १५ तास झोपू शकते. बाळाची झोप दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे, रात्रीची झोप अंदाजे १० ते १२ तास आणि दिवसाची झोप एक किंवा दोन तासांची असू शकते. असे दिसून आले आहे की ह्या वयात बहुतेक बाळे (अंदाजे ७०%) रात्री ८ ते १२ तासांपर्यंत सलग झोपतात. बाळाची वाढ वेगाने होत असल्यामुळे किंवा दात येण्याच्या त्रासामुळे तो अस्वस्थ असल्यास शांतपणे झोपू शकत नाही. परंतु, जर तुमचे बाळ रात्री झोपत नसेल किंवा तुम्हाला त्याच्या झोपेचा प्रश्न असेल तर तुम्ही बाळाला विशिष्ट वेळेला झोपण्याची सवय लावू शकता. कारण ह्या वयात तुमचे बाळ विशिष्ट वेळेला झोपायला प्रशिक्षित होऊ शकते. तुमच्या बाळाला झोपण्याची वेळ झाली आहे हे सांगण्यासाठी तुम्ही त्याला मसाज करणे, आंघोळ घालणे, अंगाई गीत गाणे इत्यादी गोष्टी करू शकता. जर तुमच्या बाळाला झोपेच्या तात्पुरत्या समस्या येत असतील तर ते ठीक आहे, कारण तो लवकरच त्यावर मात करेल.
३७–आठवड्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्यासाठी टिप्स
तुमच्या ३७ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स फॉलो करू शकता.
- फ्लोराईड टूथपेस्ट वापरून तुमच्या बाळाचे दात घासून घ्या. तुम्ही त्याला चूळ भरण्यास शिकवू शकता.
- तुम्ही तुमच्या बाळासाठी कार सीट खरेदी करू शकता. कार्व्हर्टिबल कार सीटची निवड करणे चांगले कारण ते नंतर सुद्धा वापरले जाऊ शकते.
- तुम्ही तुमच्या अपार्टमेंटला बेबी–प्रूफ करावे कारण तुमचे बाळ आता रांगू शकते आणि बाळ आता त्याच्यासाठी सुरक्षित नसलेल्या सर्व ठिकाणी पोहोचू शकतो.
- लहान वस्तू आवाक्याबाहेर ठेवा कारण लहान बाळांना सर्व काही तोंडात घालण्याची विचित्र सवय असते.
- सर्व प्रकारची औषधे दूर ठेवा.
- तुमच्या घरी पायऱ्या असल्यास, गेट लावून तो भाग सुरक्षित करा.
- तुम्ही तुमच्या बाळाला त्याच्या मोटर, संप्रेषण, संज्ञानात्मक आणि इतर कौशल्ये वाढवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये सामील करू शकता.
चाचण्या आणि लसीकरण
निरोगी बाळ हे आनंदी बाळ असते आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांची भेट कधीही चुकवू नये. डॉक्टरांकडे गेल्यावर , तुमचे डॉक्टर बाळाचे वजन आणि उंची तपासतात. तुमच्या बाळाची अपेक्षित शारीरिक प्रगती होते आहे कि नाही हे सांगण्यासाठी डॉक्टर बाळाची शारीरिक तपासणी करतील. खाली काही चाचण्या आणि लसीकरण दिलेले आहे. तुमचे डॉक्टर ह्या तपासण्या करून घेण्यास सांगतील.
१. रक्त चाचण्या
तुमच्या बाळामध्ये अॅनिमियाची कोणतीही लक्षणे असल्यास ती ओळखण्यासाठी डॉक्टर रक्ताची तपासणी करण्यास सांगू शकतात. कारण ह्या वयाच्या आसपास बाळांना अशक्तपणा येणे खूप सामान्य आहे कारण आईच्या दुधात लोहाची कमतरता असते आणि त्यामुळे ही गरज पूर्ण करण्यासाठी बाळाला अन्नाच्या इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. जर तुमचे बाळ नीट जेवत नसेल, तर त्याच्या रक्तात लोहाची पातळी कमी असण्याची शक्यता असते. तसेच, शिश्याच्या विषबाधेची कोणतीही लक्षणे आहेत का हे तपासण्यासाठी विविध चाचण्या केल्या जाऊ शकतात.
२. लसीकरण
जर तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी चा तिसरा शॉट ६ व्या महिन्यात देण्यात आला असेल, तर हीच शॉट देण्याची योग्य वेळ असू शकते.
खेळ आणि उपक्रम
येथे काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत. ह्या क्रियाकलापांमध्ये तुमचे बाळ तल्लीन होईल आणि त्याची कौशल्ये विकसित करण्यात मदत करतील:
- तुम्ही पांघरुणाखाली किंवा तुमच्या मागे एखादे आवाज करणारे खेळणे लपवू शकता आणि तुमच्या बाळाला ते पाहू द्या. ह्या मुळे बाळ वस्तू ओळखू लागते.
- तुम्ही तुमच्या बाळासोबत पीक–ए–बू खेळू शकता. पडद्यामागे किंवा दरवाजाच्या मागे तुम्ही लपा आणि तुमच्या बाळाला तुम्हाला शोधू द्या.
- विविध आकार आणि पोत असलेल्या खेळण्यांनी भरलेला बॉक्स द्या. तुमच्या बाळाला बॉक्समधील सामग्री एक्सप्लोर करू द्या.
- एक मोठा बॉल घ्या, तो तुमच्या बाळाच्या दिशेने सरकवा आणि तुमच्या बाळाला तो तुमच्याकडे परत फिरवायला सांगा.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
येथे काही समस्या आहेत ज्यामुळे पालकांमध्ये चिंता निर्माण होऊ शकते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता असू शकते.
- जर तुमचे बाळ इतर प्रॉप्स वापरून बसू शकत नसेल तर
- जेव्हा तुम्ही बाळाला उभे करता तेव्हा तो पायावर दाब देऊ शकत नसेल तर
- जर तुमचे बाळ पापा, दादा, मामा इत्यादी शब्द बडबडत नसेल तर
- तुम्ही बाळाला त्याच्या नावाने हाक मारल्यावर तुमचे बाळ प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देत नसेल तर
- जर तुमचे बाळ परिचित वस्तू किंवा लोक ओळखत नसेल तर
- जर तुमचे बाळ कोणतीही वस्तू धरू शकत नसेल किंवा पास करू शकत नसेल तर
असा कोणताही विकासात्मक विलंब आढळल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ह्या वयात तुमचे बाळ अनेक गोष्टी एक्स्प्लोर करू लागेल. अशावेळी तुम्ही बाळावर बारीक लक्ष ठेवून त्याला एक्सप्लोर करू द्यावे. कायम त्याच्या सोबत रहा परंतु त्याला स्वतंत्र आणि आत्मविश्वास असलेले मूल होऊ द्या.