In this Article
आता आपल्या बाळाचे वय १५ आठवडे इतके आहे, नवीन पालक म्हणून तुम्ही स्वत: चा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही तुमच्या लहान बाळाची चांगली काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही बाळाची अशीच काळजी इथून पुढेही घेणार आहात. गेल्या तीन महिन्यांत, तुम्ही बाळाला वाढवण्याबद्दल बरेच काही शिकला असाल आणि आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या लहान बाळाने तुमच्या प्रयत्नांचे नक्की कौतुक केले असेल.१५ व्या आठवड्यांत, कदाचित तुम्हाला तुमच्या बाळाचे मनमोहक हास्य दिसू शकेल (तुम्ही बाळासाठी जे काही करता त्याबद्दल त्याला त्याची जाणीव असते) आणि कदाचित तो कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकेल. ४थ्या महिन्यात वाढीचे आणि विकासाचे खूप टप्पे असतात आणि त्यामुळे बाळाला आकार येण्यास सुरुवात होईल. १५व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा कसा विकास होईल हे जाणून घेण्यासाठी वाचा!
तुमच्या १५ आठवड्यांच्या बाळाचा विकास
१५ व्या आठवड्यात सुद्धा तुमच्या बाळाची वाढ होईल. बाळाची निरोगी वाढ आणि विकासासाठी त्याला योग्य पोषण मिळावे म्हणून त्याला स्तनपान देत रहा. तुम्ही पुन्हा कामावर जाण्याचा किंवा घरातून काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर, आपल्याला आपल्या दिनक्रमात काही बदल करावे लागतील यात काही शंका नाही. जर आपल्याला कामावर जावे लागले असेल तर तुम्ही तुमचे दूध साठवून ठेवू शकता आणि कुटूंबामधील कुणाला तरी नंतर बाटलीने द्यायला सांगू शकता.
१५ आठवड्यांपर्यंत, तुमच्या बाळाचा संज्ञानात्मक विकास काही प्रमाणात झालेला असेल आणि त्याच्या मेंदूचा विकास होत राहील. ह्या कालावधीत, तुमच्या बाळाला पिकाबू किंवा तुम्ही मजेदार चेहरे बनवण्याचा खेळ आवडेल. तो कदाचित तुमच्याकडे पाहून किंवा हसण्याद्वारे कौतुक दर्शवेल. पिकाबू ह्या खेळात तुम्ही खरोखर अदृश्य होणार नाही आणि हा खेळ मजेसाठी चाललेला आहे हे त्याला समजू शकेल. (कदाचित असे नाही परंतु त्याला खेळाचा सारांश कळेल) जर तुम्ही त्याच्या खेळण्याशी खेळत असाल आणि त्याच्या खेळण्यास ब्लॅंकेटने झाकून ठेवलेत तर त्याला समजेल की ब्लँकेट उचलल्यावर खेळणी दिसणार आहेत. तुमच्याकडे बाळासाठी एखादे छान टोपणनाव असल्यास, बाळ कदाचित त्यास प्रतिसाद देणे देखील सुरू करेल. नाही, तो बोलणार नाही परंतु जेव्हा तुम्ही त्याला त्या नावाने हाक मारता किंवा एखादा आवाज काढता किंवा बडबड करता तेव्हा तो कदाचित आपल्या दिशेने पाहू शकेल. आपल्या आवाजाचे वेगवेगळे स्वर ऐकून, त्याला आपल्या भावनिक स्थितीची कल्पना येऊ शकेल. जेव्हा तुम्ही ‘नाही’ म्हणता तेव्हा कदाचित ह्याचा अर्थ काय हे त्याला समजू शकत नाही परंतु तुम्ही आनंदी नाही हे त्याला समजते आणि जे करत आहे ते थांबवले पाहिजे हे त्याला समजते. तो आता सर्व रंगांवर प्रक्रिया करण्यास सक्षम असेल आणि जग पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होईल.
तुमच्या १५ आठवड्यांच्या बाळाच्या वाढीचे टप्पे
आपल्या लहान बाळाने तुमच्याकडे पाहून हसण्याव्यतिरिक्त इतर काय करावे ? शोधा! तुमचे लहान बाळ तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
- आपले बाळ कदाचित आपल्या शरीराचे वजन पेलण्यास सक्षम असेल आणि तो कुशीवर किंवा पोटावर झोपू शकेल. काही बाळांना अद्याप थोडासा धक्का देण्याची गरज भासू शकते, परंतु त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे
- तुमचे १५ आठवड्यांचे बाळ आपल्या आवडीचे अनुसरण करण्यासाठी किंवा एखाद्या आवाजाला प्रतिसाद देण्यासाठी किंवा काहीतरी मनोरंजक पाहण्यासाठी मान फिरवू शकते. मुळात त्याची हालचाल मानेच्या मजबूत आणि विकसित स्नायूंमुळे होईल
- यावेळेपर्यंत आपल्या बाळाची दृष्टी देखील विकसित होईल आणि त्याच्या इतर इंद्रियांसह एकत्रितपणे संवेदनाक्षम नेटवर्क तयार होईल. हे त्याला एक फूल ओळखण्यात मदत करेल तसेच त्या फुलाचा कसा वास येईल हे समजण्यास सुद्धा मदत होईल
- तुमच्या बाळाला कदाचित भिन्न रंग समजतील. त्याला हळूहळू आकारातील फरक समजण्यास सुरवात होईल. हे मेंदूच्या विकासाचे लक्षण आहे
- आपले हात वेगवेगळ्या परिस्थितीत उपयुक्त आहेत हे बाळाला समजेल आणि कदाचित आपले बाळ खेळण्याला हाताने हलविण्याचा प्रयत्न करेल. तथापि, ज्या वातावरणाची त्यांना सवय आहे अशा वातावरणात ते अधिक प्रमाणात आढळेल.
- यावेळी आरशात पहाणे हि त्याची एक आवडती क्रिया होऊ शकते. जेव्हा एखाद्या विशिष्ट पद्धतीने तो हालचाल करतो तेव्हा तो स्वत: चे अवलोकन करतो आणि त्याच्या हातापायांची हालचाल प्रत्यक्षात कशी होते हे कदाचित त्याला समजू शकते. त्याच्या शरीर–डोळ्यांच्या समन्वयाला चालना मिळेल.
दूध देणे
जेव्हा तुमच्या बाळाचे वय १५ आठवडे होते, तेव्हा कदाचित तुमच्या बाळाला तुम्ही पुरेसे ओळखता असा विचार तुम्ही करू शकता. तथापि, जसजसे आपल्या बाळाची वाढ होईल तसतसे त्याचे वर्तनही बदलेले असेल. जसजसे त्याचा मेंदू विकसित होतो तशी संवाद साधण्याची क्षमता वाढत जाते, कदाचित आपल्या बाळाला अचानक खेळावेसे वाटेल आणि त्याच वेळेला दूध प्यावेसे वाटेल. बाळ थोडा वेळ स्तनपान घेईल आणि थोडावेळ झोपेल आणि जागे झाल्यावर दूध घेईल. त्याची उत्सुकता जागृत होईल आणि विलक्षणतेची जाणीव होईल आणि त्याला जितकी शक्य असेल तितकी माहिती वापरावी लागेल आणि डोळ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न बाळ करू लागेल.
ह्यामुळे बाळ सारखे थोडे थोडे दूध पीत राहील, कारण कशामुळे तरी त्याचे लक्ष विचलित होईल. इतर वेळेला, बाळ दूध पिण्यास नकार देईल किंवा तुम्ही जबरदस्तीने दूध पाजल्यास बाळ ते बाहेर थुंकून काढेल. तुमच्या लहान बाळाचे लक्ष एका मिनिटात विचलित होऊ शकते कारण त्याला पुरेसे असलेले अन्न घेईपर्यंत बाळ धीर धरणार नाही. आपल्या बाळाला अशा प्रकारे धरून ठेवा की त्याची दृष्टी केवळ तुमच्यापुरतीच मर्यादित राहील आणि वातावरण शांत असेल आणि बाळाचे लक्ष विचलित होणार नाही. बाळाला आवश्यक आहे तेवढा आहार त्याने घेतला आहे ना ह्याची खात्री करा. बाळाला दूध देताना तुम्ही हलक्या आवाजात गाणे गुणगुणू शकता जेणेकरून बाळाला कंटाळा येणार नाही. ज्या बाळाला अजिबात झोपायची इच्छा नसते आणि अधून मधून स्तनांना चोखत बसते अशा बाळाला स्तनपान देण्यासाठी तुम्हाला रात्रभर जागे राहावे लागू शकते. जर बाळाला तसे करू दिले नाही तर ते जोरात रडू लागते. हे बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांच्या बाबतीत सुद्धा लागू होते. बाटलीने दूध पिण्यास नकार देऊन बाळ पुन्हा काही वेळाने दूध मागू शकते.
बाळाची झोप
आपल्या बाळाची झोपेची वेळ या काळात अनियमित होऊ शकते परंतु बाळाला पुरेशी झोप मिळत आहे ना ह्याची खात्री करा. त्याने दिवसातून सुमारे १५ तास झोपावे. त्याला झोपवण्यासाठी त्याला आपल्या हातांमध्ये घ्या, त्याच्यासाठी अंगाईगीत गा आणि त्याला आपल्या पलंगावर झोपवा. रात्री, त्याच्याजवळच झोपा जेणेकरून मध्यरात्री उठून तुम्ही त्याला स्तनपान करू शकाल आणि रात्रीची उपासमार त्वरेने पूर्ण होईल. जर तुमच्या बाळाने त्याला पहिल्यांदा पाजल्यानंतर रात्री झोपायला नकार दिला तर तुम्ही वेळापत्रक थोडे बदलू शकता आणि त्याला अंघोळ घालून मसाज देऊ शकता. यामुळे त्याला आराम मिळण्यास आणि झोप येण्यास मदत होते. बाळाला झोपवताना त्याच्या आवडीचे गाणे गुणगुणू नका, कारण त्यामुळे तो उत्साहित होईल आणि झोपण्यास नकार देईल. अगदी सौम्य आणि आरामदायक संगीत लावा ज्यामुळे बाळ झोपी जाण्यास मदत होईल. तसेच काही वेळा, बाळाला त्याच्या बाबागाडीमध्ये बसवून रात्री थोडे फिरवल्यास बाळाला गुंगी येऊन बाळ झोपू शकते. परंतु, जर तुम्ही राहता त्या परिसरात खूप गोंगाट असेल तर किंवा बाळाचे लक्ष विचलित होण्यासारख्या काही गोष्टी असतील तर बाळाला बाहेर घेऊन जाऊ नका.
१५ व्या आठवड्यात आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
१५ व्या आठवड्यात, तुमच्या बाळामध्ये तुम्हाला काही बदल दिसतील आणि त्याचे वेळापत्रक बिघडू शकेल. आतापासून, तुम्ही त्याच्याबाबतीत जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे कारण तो आता इकडेतिकडे फिरत राहील. आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी तुमच्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत त्यांचे अनुसरण केले पाहिजे.
- आपले बाळ आता बर्याच गोष्टीभोवती फिरेल म्हणून बाळ एकटे नाही ना याची खात्री करुन घ्या. कठडे असलेल्या पलंगावर बाळाला मजा करण्यासाठी तुमच्या देखरेखीखाली अगदी थोडा वेळ तुम्ही एकटे सोडू शकता.
- मान धरत नाही तोपर्यंत बाळाला त्याच्या पोटावर झोपवू नका.
- तुमच्या बाळाच्या तोंडातून लाळ गळण्यास सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही बाळाचे तोंड वारंवार स्वच्छ करीत आहात ना हे पहा. बाळाला दात येण्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.
चाचण्या आणि लसीकरण
दोन आठवड्यांपूर्वी तुमच्या बाळाला काही लस दिल्या गेल्या असतील. जर त्या योग्य पद्धतीने आणि वेळेवर दिल्या गेल्या तर या आठवड्यात इतर कोणत्याही लसींची आवश्यकता नाही.
आपल्या बाळाला व्यस्त ठेवण्यासाठी खेळ आणि क्रियाकलाप
या वयातील बाळे बरेच निरीक्षण करतात आणि त्यांच्या सभोवतालच्या गोष्टींकडून शिकतात. तुम्ही फोनवर आपल्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींशी बोलत असाल तर आपले बाळ कदाचित आपल्याकडे पाहत असेल आणि आपल्याशीही संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही शक्य असल्यास टॉय टेलिफोन मिळविण्याचा प्रयत्न करा आणि त्याला द्या. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा बाळाला फोन देता तेव्हा जणू काही त्याच्याशी बोलत आहात असा आपल्या कानावर हात ठेवा आणि दीर्घ संभाषणे करा. जर आपल्या बाळाने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली तर! तुमच्या बाळासोबत तुमचे प्रथम यशस्वी बनावट टेलिफोन संभाषण होईल. मुख्यत: आपले छोटे बाळ छान आवाज काढू लागतो – संवाद साधण्याची ही पहिली पायरी असल्याने त्याला तसे करण्यास प्रोत्साहित करा.
आपले बाळ चमकदार वस्तूंकडे देखील पाहू शकते. त्याचे डोळे, चमकणारी टॉर्च किंवा प्रतिबिंब यासारख्या चमकदार वस्तूंचा बाळ मागोवा घेईल. त्याला व्यस्त ठेवण्यासाठी आणि त्याचे मनोरंजन करण्यासाठी, भिंतीवर टॉर्च दर्शवू शकता आणि आपल्या हातांनी विविध आकार बनवू शकता. त्यासोबत आवाज काढल्यास आपल्या बाळाच्या मेंदूत त्याची नोंदणी होण्यास सुरुवात होईल. आपण कुत्रा आणि मांजरीच्या आवाजाचे अनुकरण करू शकता आणि आपल्या हातांनी पक्ष्यांचे आकार बनवू शकता. जेव्हा आपण त्याला उद्यानात फिरायला जाता तेव्हा त्याला ह्याची मदत होईल. तुमचे लहान बाळ त्वरित त्यांना ओळखेल.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर तुमचे १५ आठवड्यांचे बाळ खूप चिडचिड करत असेल आणि रडत असेल आणि तुम्ही प्रयत्न करूनही तो शांत होत नसेल तर कदाचित त्यास काहीतरी त्रास होत असेल. तुम्ही त्याला डॉक्टरकडे न्यावे. बरीच बाळे ह्या वयापर्यंत पालथे पडण्याचा प्रयत्न करतात – हा एक शारीरिक वाढीचा महत्वाचा टप्पा आहे. आपल्या बाळामध्ये पालथे पडण्याची चिन्हे दिसत नसल्यास, आपल्या बाळाचा सामान्य विकास होत आहे ह्याची खात्री करण्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या काळात काही मुलांना दात येण्याची चिन्हे दिसू लागतात. आपल्या बाळाला मदत करण्यासाठी बाळांना दात येण्याबाबतच्या सुरुवातीच्या लक्षणांविषयी तुम्हाला माहिती असणे जरुरीचे आहे. जर तुमच्या बाळाची खूप जास्त लाळ गळत असेल, बाळ चिडचिड करत असेल, त्याला थोडा ताप असेल आणि जे दिसेल ते चावण्याचा बाळ प्रयत्न करत असेल तर बाळाला दात येत असल्याची शक्यता आहे. बाळाला दात येताना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. बाळाला दात येताना लागणारी खेळणी सुद्धा तुम्ही आणू शकता.
हे सामान्यतः असे वय आहे जेथे बहुतेक पालक आपल्या बाळाची वाढ कशी वेगाने होत आहे आणि विकासाची सर्व चिन्हे याबद्दल बोलणे सुरू करतात. जर तुमच्या बाळामध्ये खूप विकासाची लक्षणे दिसत नसली, तर त्रास करून घेऊ नका. त्याला स्वतःचे स्वतः फुलू द्या आणि आपल्या आयुष्यात एक अनोखी व्यक्ती होऊ द्या.
मागील आठवडा: तुमचे १४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे १६ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी