Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य रक्षाबंधन २०२२: मेसेजेस, कोट्स आणि शुभेच्छासंदेश

रक्षाबंधन २०२२: मेसेजेस, कोट्स आणि शुभेच्छासंदेश

रक्षाबंधन २०२२: मेसेजेस, कोट्स आणि शुभेच्छासंदेश

भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन! हा रक्षाबंधनाचा सण भारतात सगळीकडे अगदी उत्साहात साजरा केला जातो. ह्या दिवशी बहीण भावाला ओवाळून राखी बांधते आणि भावाप्रती आपले प्रेम व्यक्त करते. भाऊ सुद्धा बहिणीला छानशी भेटवस्तू देतो आणि तिच्या रक्षणाचे वचन देतो. परंतु सध्या शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने सगळेच भाऊ बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र येऊ शकत नाहीत. सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला छानसे शुभेच्छा संदेश पाठवू शकता. ह्या लेखामध्ये आम्ही रक्षाबंधनानिमित्त काही शुभेच्छा संदेश दिलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडतील!

रक्षाबंधनसाठी मेसेजेस, कोट्स आणि शुभेच्छासंदेश

रक्षाबंधनासाठी कोट्स

1. प्रेमाचे बंधन, रक्षणाचे वचन
    श्रावण मास घेऊन येई रक्षाबंधनाचा सण
   रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

2. राखी म्हणजे प्रेम
    राखी म्हणजे विश्वास
    राखी म्हणजे जिव्हाळा
    राखी म्हणजे रक्षण
    राखी एक अनमोल बंधन
    मी तुझ्यासोबत कायम आहे
    जपून ठेवूयात हे सुखाचे क्षण
    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

3. तुला यश, आरोग्य, ऐश्वर्य लाभो रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

4. भावाबहिणीचे अतूट बंधन
    आला सण रक्षाबंधन
    लाभो तुला सुख, आनंद
    ह्या इच्छेसह करितो
    ईश्वरास वंदन
    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

5. नितळ, निर्मल, प्रेमळ आपुले नाते
     व्यक्त नाही केले प्रेम तरी मनात असते
    रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

6. हाती बांधून राखी
    ओवाळीते भाऊराया
     रक्षण माझे करशील
     अशीच राहूदे माया
     रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

7. जसजसा काळ पुढे सरकतो तसे भाऊ बहिणीचे नाते आणखी बहरते रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

8. अतूट बंध प्रेमाचा
    सण हा रक्षाबंधनाचा
    माया, प्रेम असेच मिळो
    परमेश्वराचा आशीर्वाद असाच राहो
     रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

9. राखीचा धागा म्हणजे अतूट विश्वास, प्रेम आणि जिव्हाळा असतो रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

10. पवित्र प्रेमाची साक्ष देणारा क्षण म्हणजे रक्षाबंधन! – रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

11. रक्षाबंधनाचा सण आला, सारा आसमंत आनंदी झाला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

1. मला माहिती आहे तू माझ्यासाठी नेहमीच असशील. तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस आणि तू परमेश्वराकडून मला मिळालेली सर्वात मौल्यवान अशी भेट आहेस रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

2. आपण कितीही भांडलो तरी सुद्धा आपल्यातील प्रेम कमी होत नाही, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दादा!

3. आपण ह्या रक्षाबंधनाला एकत्र नाही तरी सुद्धा आपल्यातले प्रेम कमी होणार नाही. रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

4. तू माझा सर्वात जवळचा मित्र, मार्गदर्शक आणि भाऊ आहेस! राखीच्या खूप शुभेच्छा!

5. रक्षाबंधनाच्या ह्या विशेष दिवशी मी तुला सांगू इच्छिते की मी तुझ्या सोबत कायम आहे. तू माझ्या आयुष्यात असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. मी सदैव तुझ्यावर असेच प्रेम करीत राहीन. रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

6. मी नक्कीच काहीतरी पुण्य केलेले असणार म्हणून देवाने मला तुझ्यासारखा भाऊ दिला. रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा दादा!

7. मी नेहमी तुझ्याशी भांडते आणि माझं तुझ्यावर असलेले प्रेम मी कधीच व्यक्त केलेले नाही परंतु आज रक्षाबंधनाच्या दिवशी मला सांगावेसे वाटते कि माझं तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे! रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

8. प्रिय दादा! माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम! हा रक्षाबंधनाचा सण तुझ्यासाठी खूप भाग्य आणि प्रेम घेऊन येवो. तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होवोत. परमेश्वराची कृपा तुझ्यावर सतत राहूदेत. तुला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

9. मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला. प्रिय दादा! तुला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा! तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

10. नेहमी माझी चेष्टा, मस्करी करणारा तू माझ्यावर खूप प्रेम करतोस हे मला माहिती आहे! रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

11. भावाच्या प्रेमासारखे जगात कुठलेही प्रेम नाही रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

1. आपल्या दोघांमधील अतूट प्रेमाचा बंध आणखी मजबूत होऊ दे! रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा

2. रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी तुला खूप प्रेम आणि शुभेच्छा! तू नेहमीच माझी एक चांगली मैत्रीण आहेस! रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा

3. तू माझ्यासोबत असताना मला दुसऱ्या कुणाचीही गरज नाही. तू माझी सर्वोत्तम बहीण आहेस रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

4. तू माझ्या आयुष्यात असण्याने माझे आयुष्य सुंदर झालेले आहे. मी तुझे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तू कुठलाही निर्णय घेतलास तरी माझी तुला साथ असेल. आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा!

5. तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस, आणि मला जेव्हा गरज असते तेव्हा तू सतत माझ्यासोबत असतेस! तुझे प्रेम, काळजी आणि आधार ह्यासाठी खूप धन्यवाद! रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

6. रक्षाबंधनाच्या ह्या दिवशी मी तुला वचन देतो की तुला जेव्हा गरज असेल तेव्हा मी नक्की तुझ्या सोबत असेन! रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

7. तू माझ्यासाठी काय आहेस हे मी शब्दात मांडू शकत नाही. तुझासोबतच्या आठवणी मी कायम जपून ठेवीन! रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

8.मी परमेश्वराकडे तुझ्यासाठी असीम आनंद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. – रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा

9. तू मला आईसारखी आहेस. तुझ्यासारखं प्रेम, माया, लाड कुणीच करत नाही आणि करणार नाही. माझ्या सर्वात प्रिय बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

10. तुझ्यासोबतच्या आठवणी सतत माझ्या स्मरणात राहतील! मला माहिती नाही मी तुझ्याशिवाय कसा राहू शकेन! रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

11. तुझ्यासारखा भाऊ दिला त्याबद्दल मी परमेश्वराची खूप आभारी आहे. तुझ्यामुळे मला ह्या जगात सुरक्षित वाटते. तुला प्रेम, आरोग्य, समृद्धी मिळावी ह्यासाठी मी नेहमी प्रार्थना करते. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

रक्षाबंधनाच्या दिवशी जे भाऊ बहीण दूर असल्यामुळे एकत्र येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ह्या लेखाद्वारे रक्षाबंधन शुभेच्छासंदेश दिलेले आहेत. हे शुभेच्छासंदेश सुंदर हस्ताक्षरात कार्ड्समध्ये लिहून पाठवा. हा रक्षाबंधनाचा दिवस लक्षात ठेवल्याबद्दल तुमची भावंडे तुमच्यावर आणखी प्रेम करतील! रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

आणखी वाचा: मुलांसाठी “रक्षाबंधन” ह्या विषयावर निबंध

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article