गर्भारपण

गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव – कारणे आणि लक्षणे

स्त्रियांमध्ये योनीमार्गातून पांढरा पाणीदार स्त्राव होतो त्याला व्हजायनल ल्युकोरिया असेही म्हणतात, हा स्त्राव अगदी सामान्य आहे. तारुण्यात प्रवेश केल्यापासून ह्या स्रावास सुरुवात होते आणि रजोनिवृत्ती संपेपर्यंत हा स्त्राव राहतो. ह्या स्रावाचे प्रमाण प्रत्येक स्त्रीमध्ये बदलत असते आणि सामान्यतः मासिक पाळीच्या दरम्यान हे प्रमाण वाढते. पाण्यासारखा स्त्राव हे निरोगी योनीचे प्रतीक आहे कारण त्यामधून जीवाणू बाहेर पडण्यास मदत होते, योनीकडील भागास संसर्गापासून मुक्त ठेवते.

दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त, जर गरोदरपणात योनीतून स्त्राव येत असेल, तर गरोदरपणात सगळे ठीक आहे की नाही याबद्दल प्रश्न निर्माण होतो. शिवाय, जर तुमची ही पहिली गर्भधारणा असेल आणि तुमच्या मैत्रिणींना तसेच कुटुंबातील सदस्यांना ह्याचा अनुभव आलेला नसेल तर तुमची चिंता दुप्पट होईल.

तुम्हाला त्या चिंतेपासून मुक्त करण्यासाठी, गरोदरपणात योनीमार्गातून येणाऱ्या ह्या स्रावाविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तुम्ही कोणत्या चिन्हांवर आणि लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि डॉक्टरांकडे कधी जावे ह्याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

गरोदरपणात योनीमार्गातून येणारा पाण्यासारखा स्त्राव

योनीतून बाहेर पडणाऱ्या द्रवाला योनीतून येणारा स्त्राव म्हणतात. योनीतून येणारा हा स्त्राव सहसा पांढरा किंवा स्पष्ट असतो. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्हाला हा पाण्यासारखा स्त्राव दिसू शकतो, पण काळजी करण्यासारखे काही नाही. गरोदरपणातील हा पाण्यासारखा स्त्राव सहसा गरोदरपणाच्या टप्प्यावर अवलंबून असतो. तुमच्या गरोदरपणाच्या टप्प्यावर आधारित, ह्या पाण्यासारखा स्त्रावची वैशिष्ट्ये आणि परिणाम भिन्न असू शकतात. येथे समान वर्गीकृत सूची आहे:

. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील पाण्यासारखा स्त्राव

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात किंवा पहिल्या तिमाहीत स्वच्छ स्त्रावाला किंचित तीक्ष्ण वास येतो. हा स्त्राव मासिक पाळीच्या पातळ स्रावासारखा दिसतो आणि त्याचा तुमच्या कपड्यांवर डाग पडू शकते. हा पाणचट स्त्राव इस्ट्रोजेनच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे दिसून येतो. त्यामुळे योनिमार्गात रक्त प्रवाह वाढतो आणि म्हणून इतर स्रावांमध्ये वाढ होते.

. दुसऱ्या तिमाहीत पाण्यासारखा स्त्राव

दुस-या तिमाहीत, योनीतून येणाऱ्या स्त्रावाचा रंग आणि सुसंगता अंड्यांच्या पांढऱ्या रंगाच्या बालकासारखी असते. पहिल्या तिमाहीपेक्षा दुसऱ्या तिमाहीमध्ये होणाऱ्या स्रावाचे प्रमाण जास्त असते स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या संप्रेरकांच्या बदलांमुळे असे होते आणि ते पूर्णपणे सामान्य आहे. परंतु, जर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या तिमाहीत रक्तरंजित स्त्राव किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव दिसला तर तसे होण्यामागे एखादी समस्या असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

. तिसऱ्या तिमाहीतील पाण्यासारखा स्त्राव

या टप्प्यावर, रंग, गंध, वारंवारता, प्रमाण आणि रक्ताच्या उपस्थिती ह्या नुसार स्रावाचे वेगवेगळे स्वरूप असते. तुमच्‍या प्रसूती तारखेच्या जवळ ह्या स्त्रावामुळे अकाली प्रसूती होऊ शकते किंवा गर्भजल पिशवी फुटू शकते.

गरोदरपणात पाण्यासारखा स्त्राव होणे सामान्य आहे का?

गर्भवती महिलेला योनीतून पाण्यासारखा स्त्राव होणे हे अगदी सामान्य आहे.गरोदरपणाचे दिवस जसे भरतील तसे ह्या स्रावाचे प्रमाण वाढेल. सामान्य आणि असामान्य पाणचट स्त्राव बद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी वाचा.

. पाण्यासारखा सामान्य स्त्राव

पाण्यासारखा स्त्रावाची बहुतेक उदाहरणे अगदी सामान्य आहेत. तुम्हाला खालील गोष्टींचा अनुभव येत असल्यास तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही:

1) ल्युकोरिया

नमूद केल्याप्रमाणे, योनीमार्गातून होणारा स्त्राव हा एक सामान्य स्त्राव आहे. हा स्त्राव पातळ, स्पष्ट असतो आणि त्याची सुसंगता पाण्यासारखी असते. गरोदरपणाच्या पहिल्या लक्षणांपैकी हे एक लक्षण मानले जाऊ शकते कारण ते गर्भधारणेनंतर अगदी सुरुवातीस दिसून येते.

2) रक्तरंजित स्त्राव

तुमच्या शेवटच्या आठवड्यात, स्त्रावमध्ये रक्त आणि श्लेष्माचा समावेश असू शकतो, म्हणजेच तुम्ही काही दिवसांत प्रसूतीसाठी तयार आहात असा त्याचा अर्थ होतो. श्लेष्मा हा प्लगचा भाग आहे आणि त्यामुळे गर्भाशयाचे मुख झाकले जाते आणि संसर्ग होत नाही. संक्रमणास प्रतिबंध करतो.म्हणून ह्यास इंग्रजीमध्ये ब्लडी शो असे म्हणतात.

3) गर्भजल गळती

जेव्हा तुम्हाला गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत पाण्यासारखा लघवीसारखा स्त्राव दिसतो आणि त्यात फ्लेक्स असतात, तेव्हा ती गर्भजल गळती असू शकते. ही अगदी सामान्य घटना आहे; तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. परंतु, जर तुम्हाला भरपूर प्रमाणात हिरवट पाणचट स्त्राव दिसला, तर तुमची गर्भजल पिशवी फुटली असल्याचे ते लक्षण आहे आणि बाळाचे मेकोनियम पास झाले आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा वेळी, तुम्ही रुग्णालयात धाव घेतली पाहिजे.

. पाण्यासारखा असामान्य स्त्राव

कधीकधी, पाण्यासारखा स्त्राव इतर अनेक लक्षणांशी संबंधित असतो त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत, पाण्यासारखा स्त्राव असामान्य असतो आणि त्याचे खालीलपैकी एक लक्षण असू शकतो

1) अकाली प्रसूती

गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यात रक्ताची थोडीशी मात्रा दिसणे सामान्य आहे परंतु जर ते प्रमाण जास्त असेल तर ते मुदतपूर्व प्रसूतीचे कारण असू शकते. असे आढळल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

2) यीस्ट संक्रमण

यीस्टचा संसर्ग कधीही होऊ शकतो, परंतु गरोदरपणात त्यामुळे खूप जास्त अस्वस्थता येऊ शकते. हिरवा-पिवळा पाणचट स्त्राव किंवा दह्यासारखा घट्ट पांढरा स्त्राव येतो. तसेच तुम्हाला लघवी करताना वेदना होऊ शकतात. यीस्ट इन्फेक्शनमुळे योनिमार्गात जळजळ किंवा लालसरपणा देखील होऊ शकतो.

3) एसटीआय

गरोदरपणात लैंगिक संक्रमित रोग झाल्यास देखील पाणचट स्त्राव होऊ शकतो. कोणताही रोग तुमच्या आरोग्यावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करू शकतो. ह्याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, जर तुम्हाला वारंवार पाण्यासारखा स्त्राव दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम पर्याय असेल.

4) व्हजायनोसिस

जिवाणूमुळे, लघवी करताना स्त्राव येणे, खाज सुटणे आणि जळजळ होणे इत्यादी लक्षणे जाणवतात. याव्यतिरिक्त, स्रावाला दुर्गंधी येते. ह्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे कारण त्यामुळे अकाली प्रसूती किंवा गर्भपात होऊ शकतो.

गरोदरपणात स्वच्छ, पाण्यासारखा किंवा जेलीसारखा स्त्राव कशामुळे येतो?

इस्ट्रोजेन हार्मोनची वाढ आणि ओटीपोटात रक्ताचा प्रवाह वाढल्यामुळे गर्भाशयाच्या मुखाजवळ श्लेष्मल ग्रंथी अतिरिक्त श्लेष्मा तयार होतात. याव्यतिरिक्त, गर्भाशयाच्या मुखातून आणि योनीतून मृत पेशी देखील बाहेर पडू शकतात, त्यामुळे पांढरा जेलीसारखा स्त्राव होऊ शकतो.

पाण्यासारखा स्त्राव हे चिंतेचे लक्षण कधी असते? सारखा स्त्राव कशामुळे होतो?

जर गरोदरपणात पाण्यासारख्या स्रावासोबत पेटके येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. जर हा स्त्राव हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा असेल आणि त्यास तीव्र दुर्गंधी येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला योनीच्या भागात लालसरपणा, खाज सुटणे किंवा सूज येणे देखील जाणवू शकते.

गरोदरपणातील पाण्यासारखा स्रावाबद्दलचे महत्व

गरोदरपणात पाण्यासारख्या स्त्रावशी संबंधित अनेक चिन्हे आणि लक्षणे आहेत. त्यापैकी काही खाली नमूद केलेली आहेत:

योनीतून पाण्यासारखा स्त्राव कधी संसर्ग दर्शवतो?

गरोदरपणात पाण्यासारखा स्त्राव सामान्य असल्याने, बहुतेक स्त्रिया सामान्य स्त्राव आणि असामान्य स्त्राव यांच्यातील फरक सांगू शकत नाहीत. पाण्यासारखा स्त्राव एखाद्या संसर्गामुळे होत आहे का हे सांगणे कठीण असते. परंतु आपण खाली नमूद केलेल्या कोणत्याही गोष्टींचे निरीक्षण केल्यास, आपल्याला स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेण्यास मदत होईल.

स्त्राव दुर्गंधीयुक्त असल्यास किंवा रंग बदलल्यास काय?

पाण्यासारखा स्त्राव सामान्यतः पांढरा असतो आणि त्याला सौम्य वास असतो. जर ही वैशिष्ट्ये तीव्रपणे बदलली तर, ते अकाली प्रसूती किंवा संसर्गासारख्या समस्यांमुळे असू शकते. कोणत्याही बदलांसाठी आपल्या योनीमार्गातील स्रावाची काळजीपूर्वक तपासणी करण्याचे लक्षात ठेवा.

हा स्त्राव सर्वात जास्त कधी असतो?

मासिक पाळी दरम्यान आणि गरोदरपणाचे दिवस जसे पुढे सरकतात तसे ह्या स्रावाचे प्रमाण वाढते. गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी स्रावाचे प्रमाण जास्त असते

गरोदरपणाच्या सुरुवातीस पाण्यासारखा स्त्राव होणे म्हणजे ते गर्भपाताचे लक्षण आहे का?

जर तुमच्या पहिल्या तिमाहीत योनीतून पाण्यासारखा स्त्राव होत असेल आणि तो गुलाबी रंगाचा असेल तर ते गर्भपाताचे लक्षण असू शकते. हा रंग रक्त, गुठळ्या किंवा प्लेसेंटा, गर्भाशय किंवा गर्भजल पिशवीतील उतीच्या तुकड्यांमुळे असेल.

पाण्यासारख्या स्रावावर कसे उपचार करावेत?

समस्येचा उपचार मूलभूत स्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून पाण्यासारखा स्त्राव होण्याच्या समस्येवर घरच्या घरी सहज उपचार करता येऊ शकतात. परंतु काहीवेळा, त्याला वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असू शकते. पाण्यासारखा स्रावाची काळजी कशी घेतली जाऊ शकते ते येथे दिलेले आहे.

. वैद्यकीय उपचार

आधी सांगितल्याप्रमाणे, तुमच्या गरोदरपणात तुम्हाला योनीमधून येणाऱ्या स्रावामध्ये काही बदल आढळल्यास किंवा तुम्हाला काही संबंधित लक्षणे आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमचे डॉक्टर मूल्यांकनासाठी योनीतून स्वॅब घेऊ शकतात आणि तुमच्यावर उपचार करून योनी निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय सुचवू शकतात.

. घरी करून पाहण्यासाठी उपाय

योग्य स्वच्छता राखल्याने तुमची योनी स्वच्छ आणि निरोगी राहू शकते. योनीचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते येथे दिलेले आहे:

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

सावधगिरी बाळगल्यास तुम्हाला पाण्यासारख्या स्रावासह निर्माण होऊ शकणारी गुंतागुंत टाळण्यास मदत होईल.

1) नियमितपणे चाचणी करून घ्या

संसर्गाची लक्षणे असताना जर पाण्यासारखा स्त्राव येत असेल तर तुम्हाला वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. याव्यतिरिक्त, यीस्ट संसर्ग टाळण्यासाठी प्रोबायोटिक्स समृद्ध पदार्थांचे सेवन करा.

2) स्वच्छता राखा

तुमचा योनीमार्ग स्वच्छ ठेवा. योनिमार्ग स्वच्छ करण्यासाठी सुगंधित साबण किंवा स्प्रे वापरणे टाळा. जर योनीतून दुर्गंधीयुक्त स्त्राव होत असेल तर, स्प्रे वापरल्याने काही फायदा होणार नाही. तुमच्या योनीकडे भाग कोमट पाण्याने धुवा. स्वच्छ आणि आरामदायक अंडरवेअर घाला.

3) आपले अंडरवेअर नियमितपणे बदला

तुमच्या पँटीजला लाइनर लावल्यास किंवा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला डिस्चार्ज होतो तेव्हा फक्त अंडरवेअर बदलल्याने तुमचा योनीमार्ग स्वच्छ राहतो आणि कोणताही संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

4) तुमच्या योनिमार्गातून येणाऱ्या स्त्रावाचा मागोवा ठेवा

नेहमी तुमच्या योनिमार्गातून येणाऱ्या स्रावाचा मागोवा ठेवा. योनीतुन येणाऱ्या स्त्रावाचा रंग, सुसंगतता, प्रमाण आणि गंध याकडे लक्ष द्या, जेणेकरून तो अचानक बदलेल कि नाही हे तुम्ही सांगू शकता. तसेच, लैंगिक संभोगानंतर योनिमार्गाचा भाग व्यवस्थित धुवा आणि वारंवार लघवी करा.

5) तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा

तुमच्या डॉक्टरांचे काळजीपूर्वक ऐका, कारण तुमचे डॉक्टर तुमच्या गरोदरपणाच्या प्रवासात तुम्हाला सर्वोत्तम मार्गदर्शन करू शकतील. डॉक्टरांनी दिलेल्या सूचना आणि टिप्स लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी गमावणार नाही.

तुम्ही योनीमार्गातून होणारा पाण्यासारखा स्त्राव रोखू शकता?

जर तुमचा स्त्राव सामान्य असेल तर कोणत्याही उपचाराची गरज नाही. परंतु, वर नमूद केलेली खबरदारी घेतल्यास कोणत्याही असामान्य स्त्रावावर उपचार करण्यासाठी किंवा टाळण्यास त्याची मदत होईल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

काही परिस्थितींमध्ये, कोणत्याही अंतर्निहित समस्येवर उपचार करण्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा आवश्यक असते. कोणत्याही परिस्थितीत, तिसऱ्या तिमाहीत जास्त स्त्राव होऊन तुम्हाला वेदना जाणवत असतील तर ती एक गंभीर बाब आहे. तुम्हाला परिस्थितीबद्दल पूर्ण खात्री नसली तरीही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका.

कोणत्याही प्रकारचे पाण्यासारखे स्त्राव चांगले नसतात. परंतु बहुतेक वेळा योनीमार्गातून पाण्यासारखा स्त्राव होणे हे पूर्णपणे नैसर्गिक असते. आतापर्यंत तुम्हाला सामान्य आणि असामान्य अश्या पाण्यासारख्या स्रावामधील फरक समजला असेल. तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या. शिवाय, तुमच्या योनीमार्गातून होणारा स्त्राव सामान्य असल्याची खात्री करण्यासाठी ह्या लेखात नमूद केलेल्या टिप्सचे अनुसरण करा परंतु , जर तुम्हाला असामान्य स्त्राव आढळला तर, डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका.

आणखी वाचा:

गरोदरपणातील पिवळा स्त्राव गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved