Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात ताप येणे

गरोदरपणात ताप येणे

गरोदरपणात ताप येणे

गरोदरपणात आपले शरीर अत्यंत असुरक्षित असू शकते, कारण शरीरात संप्रेरकांचे असंतुलन होत असते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. गरोदरपणात स्त्रियांना तोंड द्यावी लागणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे ताप येणे. ताप आल्यावर शरीराचे तापमान वाढते त्यामुळे खूप अशक्तपणा येतो, थंडी वाजते, नाक वाहू लागते आणि सर्दी होते.

ताप असंख्य कारणांमुळे येऊ शकतो, जसे की:

  • विषाणूंचा संसर्ग
  • जिवाणूंचा संसर्ग
  • कमजोर रोगप्रतिकार प्रणाली
  • शरीरातील बाह्य गोष्टी
  • तीव्र वेदना
  • शरीर संरचनेत बदल

तापामुळे आधीच जास्त काम करणारी प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. परंतु, घाबरून जाण्याची गरज नाही, कारण तापाचा तुमच्या गर्भारपणाशी काही संबंध नसतो आणि गरोदरपणात त्याचा कुठलाही धोका नसतो.

ताप येणे हे गरोदरपणाचे लक्षण असू शकते का?

सांगायला आनंद होतो की ताप हे गरोदरपणाचे लक्षण असू शकते! परंतु, फक्त ताप येणे हे गरोदरपणाचे लक्षण असू शकत नाही. जर तापासोबत गरोदरपणाची इतर लक्षणे दिसत असतील तर ते गरोदरपणाचे लक्षण आहे. ही इतर लक्षणे खालीलप्रमाणे,

  • मॉर्निंग सिकनेस
  • भुकेमध्ये वेगाने वाढ
  • मूड स्विंग
  • थकवा
  • डोकेदुखी किंवा मायग्रेन
  • बद्धकोष्ठता
  • अतिसार
  • पेटके येणे

शरीराचे तापमान किती असल्यावर ताप आला आहे असे मानले जाते?

जेव्हा शरीराच्या तापमानात खूप बदल होतो आणि ते खूप जास्त असते, तेव्हा ताप आला आहे असे म्हंटले जाते. सरासरी प्रौढ व्यक्तीच्या शरीराचे तापमान ९५ ते ९७ अंश फॅरेनहाइट किंवा ३८ ते ३८.५ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते. या श्रेणीपेक्षा जर शरीराच्या तापमानात वाढ झाली तर ताप आला आहे असे समजले जाते.

गरोदरपणात ताप येण्याची कारणे

गरोदरपणात इतर बऱ्याच कारणांमुळे ताप येऊ शकतो. यापैकी काही कारणे खाली दिलेली आहेत.

  • मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय)
  • आतड्यांचा संसर्ग (पोटाचा फ्लू)
  • इन्फ्लुएंझा, त्यास फ्लू म्हणून सुद्धा ओळखले जाते
  • श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील संसर्ग, सामान्यतः संसर्ग सर्दी म्हणून ओळखला जातो
  • अन्नातून विषबाधा

ह्या सर्व समस्या सामान्य आहेत आणि त्यावर योग्य औषधोपचार व विश्रांतीद्वारे उपचार केले जाऊ शकतात. परंतु काही वेळेला ताप आल्यास ते गंभीर परिस्थितीचे सूचक असू शकते. आणि ते धोकादायक असू शकते. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

. गर्भपातानंतर होणारा संसर्ग

गर्भपातामुळे किंवा गर्भपाताची शस्त्रक्रिया झाल्यामुळे गर्भाशयाला पूर्णपणे संसर्ग होतो त्यास इंग्रजीमध्ये सेप्टिक ऍबॉर्शनअसे म्हणतात. कमी रक्तदाब, श्वास घेण्यास अडचण, मल किंवा मूत्र उत्सर्जित करण्यात अडचण, शरीराचे तापमान जास्त किंवा कमी असणे ही सगळी गर्भपातानंतरच्या संसर्गाची लक्षणे आहेत.

. लिस्टेरिया

दूषित किंवा कालबाह्य झालेल्या पदार्थांच्या सेवनामुळे सामान्यत: ही समस्या उद्भवते. गरोदर स्त्रियांमध्ये संप्रेरकांमधील असंतुलनामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे त्यांना हा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. जर त्यावर वेळीच उपाय केले नाहीत तर गर्भपाताची शक्यता असते, तसेच त्यामुळे गर्भाला किंवा नवजात बाळाला संसर्ग होऊ शकतो. बाळाचा पोटातच मृत्यू होणे किंवा अकाली प्रसूती होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. मळमळ, अतिसार, संभ्रमावस्था, डोकेदुखी, संतुलन गमावणे, मान ताठर राहणे, फिट्स येणे ही सगळी लिस्टेरियाची लक्षणे आहेत.

3. कोरिओअमॅनिओनाइटिस

कोरियन आणि ऍम्नीऑन ही गर्भाशयाभोवतीची आवरणे आहेत, गर्भाच्या आरोग्यासाठी ही आवरणे आणि गर्भजल अत्यंत महत्वाचे आहेत. कोरिओअमॅनिओनाइटिस एक प्रकारचा जिवाणूंचा संसर्ग आहे त्यामुळे त्याचा गर्भाशयावर परिणाम होतो. जर वेळीच उपचार केला नाही तर ह्या अवस्थेमुळे आईला ओटीपोटाचा संसर्ग होतो, तसेच रक्ताच्या गुठळ्या होणे आणि एंडोमेट्रायटिस सारखी मोठी गुंतागुंत होऊ शकते. शिवाय, बाळामध्ये श्वसनाचा संसर्ग, मेंदुज्वर आणि सेप्सिस सारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. या संसर्गामुळे त्रस्त असलेल्या मातांसाठी अ‍ॅम्निओसेन्टेसिस ही मोठी चिंता आहे. जर तापासोबत, असामान्य प्रमाणात घाम येणे, हृदयाचे ठोके वेगाने पडणे, योनीतून असामान्य स्त्राव होणे आणि गर्भाशय नाजूक झाले तर ते कोरिओअमॅनिओनिटिसचे लक्षण असू शकते.

गरोदरपणातील तापाची लक्षणे

गरोदरपणातील तापात खालीलप्रमाणे लक्षणे दिसून येतात

  • थकवा
  • मळमळ
  • डोकेदुखी
  • सांध्यातील वेदना
  • अस्पष्ट दृष्टी
  • धाप लागणे
  • जिभेला कडू चव येणे
  • घाम येणे
  • थंडी वाजून येणे

गरोदरपणातील तापाची लक्षणे

गरोदरपणात तुम्हाला ताप येत असेल तर तुम्ही संपूर्ण निदान करून आपल्या स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधावा.

अन्नाची विषबाधा हे त्यामागचे कारण आहे का?

तापाचे संभाव्य कारण म्हणजे अन्नची विषबाधा. बर्‍याच परिस्थितीत, अन्नाची विषबाधा झाल्यास ताप आणि इतर लक्षणे दिसून येतात

  • अतिसार
  • उलट्या होणे
  • मळमळ
  • डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • व्हर्टीगो
  • थकवा
  • पोट बिघडणे

गरोदरपणातील तापाचे परिणाम

गरोदरपणात ताप आल्यास सहसा त्याचा काही त्रास होत माही. परंतु शरीराचे उच्च तापमान किती आहे ह्यावर लक्ष ठेवणे जरुरीचे असते. गरोदरपणातील तीव्र तापावर नियंत्रण न ठेवल्यास किंवा योग्य उपचार न केल्यास गर्भपात होण्यासारखे विध्वंसक दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी प्राणघातक ठरू शकते. एक दोन दिवसात ताप कमी होत नसल्यास ते कुठल्या तरी स्वरूपाचे संक्रमण असल्याचे लक्षण असू शकते.

गरोदरपणात आलेल्या तापाचा तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो का?

बहुतेक वेळा, तापासोबत इतर काही लक्षणे नसल्यास तो ताप बाळासाठी हानिकारक नसतो. परंतु जर ताप खूपच जास्त असेल तर परिस्थिती बदलू शकते. खूप जास्त ताप असल्यास त्यामुळे बाळाची वाढ आणि विकास होताना दोष निर्माण होतात, तसेच गर्भपात, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते.

उपचार

बऱ्याचशा सामान्य उपचार पद्धतींमध्ये नुसती विश्रांती घेतल्याने सुद्धा बरे वाटते. तथापि, जर संसर्ग झाला असेल तर डॉक्टर प्रतिजैविकांचा एक कोर्स लिहून देऊ शकतात. उपरोक्त नमूद केलेल्या बर्‍याच गोष्टींवर औषोधोपचार केल्याने आणि सोबत विश्रांती घेतल्याने फरक पडू शकतो. गरोदरपणात तापाचे कारण जर गंभीर असले तर डॉक्टर खालील पद्धतीने उपचार करू शकतात.

. गर्भपातामुळे संसर्ग झाल्यामुळे येणाऱ्या तापावर उपचार

डॉक्टर गर्भाशय स्वच्छ करून अशा संसर्गामुळे येणाऱ्या तापावर उपचार करू शकतात. उपचार केले नाहीत तर संसर्ग वाढू शकतो. योग्य औषधांसोबतच विश्रांती घेण्यास सांगतिले जाऊ शकते.

. लिस्टेरियामुळे होणाऱ्या तापावर उपचार

अशा परिस्थितीत येणाऱ्या तापावर उपचार करण्यासाठी डॉक्टर विश्रांती आणि प्रतिजैविकांची शिफारस करतात. योग्य तापमानाला नीट न शिजवलेले मांस, सुशी, न शिजवलेले किंवा अर्धवट शिजवलेले किंवा स्मोक्ड सीफूड, मऊ चीज़ इ. सारखे काही खाद्यपदार्थ टाळण्यास डॉक्टर सांगू सांगतील.

. कोरिओअमॅनिओनाइटिसच्या बाबतीत तापाचा उपचार

एखाद्या गर्भवती स्त्रीमध्ये ही समस्या असल्याचा संशय आल्यास , डॉक्टर, आई आणि बाळासाठी औषधे लिहून देतात आणि लवकर प्रसूतीच्या निर्णय घेऊ शकतात. आई आणि बाळ दोघांनाही काही कालावधीसाठी निरीक्षणाखाली ठेवले जाऊ शकते. रुग्णालयातून एकदा घरी सोडल्यावर डॉक्टर एक किंवा दोन आठवड्यांची विश्रांती घेण्यास सांगू शकतील.

औषधे

बर्‍याच वेळा, डॉक्टर तापासाठी कमी डोसची औषधे घेण्यास सांगतात. पॅरासिटामॉल ह्या गोळ्या तापासाठी सामान्यपणे लिहून दिल्या जातात आणि त्या कोणत्याही औषधांच्या दुकानात मिळतात. गरोदरपणात तापाची औषधे घेतल्यास त्याचा तुमच्यावर आणि बाळावर दुष्परिणाम होऊ शकतो. कुठलीही औषधे घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले असते.

घरगुती उपचार

आपला ताप कमी करण्यास मदत करण्यासाठी येथे काही नैसर्गिक उपाय दिलेले आहेत.

. स्वतःला सजलीत ठेवा

भरपूर द्रव प्या. कार्बनयुक्त आणि इलेक्ट्रोलाइट पेये त्यासाठी सर्वोत्तम आहेत. ही पेये आपल्याला सजलीत ठेवतात आणि शरीराचे तापमान खाली आणतात आणि त्यामुळे शरीराची शक्ती वाढते.

. हर्बल चहा

वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात. तसेच, एक कप गरम चहा प्यायल्याने घसा आणि छातीला आराम मिळू शकतो. छातीत कफ असल्यास तो कमी होण्यास त्यामुळे मदत होते.

. विश्रांती घ्या

भरपूर विश्रांती घेतल्यास नक्कीच फरक पडेल. तुमच्या शरीराला पुन्हा कार्यरत होण्यास थोडा वेळ द्या. आराम केल्याने थोडी शक्ती येण्यास मदत होईल आणि कुठलीही समस्या वाढण्यापासून रोखता येईल.

. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

फ्लूच्या इतर लक्षणांसोबत तुम्हाला ताप सुद्धा आलेला असतो तेव्हा हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. मीठ हा एक अत्यंत प्रक्षोभक विरोधी दाहक घटक आहे आणि त्यामध्ये ताप व जिवाणू विषाणूच्या संसर्गाचा प्रतिकार करणारे असंख्य गुणधर्म आहेत. कोमट पाण्यात एक चमचा मीठ घालून त्याने गुळण्या केल्यास घशाला आराम पडण्यास मदत होते आणि त्यामुळे कफ आणि श्लेष्मा कमी होण्यास मदत होते.

. वाफ

ताप कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वाफ घेणे. त्यासाठी उकळत्या पाण्यात मेंथॉल साल्व्ह घालून आपले डोके टॉवेलने झाका आणि वाफेला तुमच्या अनुनासिक पोकळीत आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये प्रवेश करू द्या. असे केल्याने त्वचेवरील छिद्रे उघडून ताप कमी करण्यासाठी मदत होते. तसेच श्वासोच्छवास सुलभ होतो आणि घशातील कफ सुद्धा कमी होतो.

वाफ

गरोदरपणातील ताप हाताळण्यासाठी टिप्स

गर्भवती असताना तापाशी लढण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:

  • मोकळ्या आणि थंड जागी रहा
  • पुरेशी विश्रांती घ्या
  • घरातच रहा
  • सैल आणि आरामदायक कपडे घाला
  • पंख्याखाली बसा
  • एसी टाळा
  • थंडी पडल्यास ब्लँकेट वापरा

ताप कसा रोखायचा?

प्रतिबंध हा एक चांगला उपचार असतो! कधीकधी आपण, गरोदरपणात होणारे संप्रेरकांचे असंतुलन तसेच कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे तापाचा प्रतिबंध करू शकत नाही. तापाची शक्यता कमी करण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत:

  • आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन सी घ्या.
  • साबणाने नियमितपणे आपले हात धुवा.
  • लस घ्या, लस घेतलेली असल्यास एच१एन१ सारखे फ्लू टाळण्यास मदत होते.
  • पाश्चराईझ न केलेले दूध टाळा.
  • ऍलर्जी वाढवणारे किंवा ऍलर्जी होऊ शकते असे पदार्थ टाळा.

ताप कसा रोखायचा?

सामान्य प्रश्न

येथे गरोदरपणातील तापाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न दिलेले आहेत.

. गरोदरपणात मी पराग ज्वर (हे फिव्हर) वर उपचार कसा करू शकते ?

गरोदरपणातील हे फिव्हरवर उपचारासाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. बहुतेकवेळा ह्या समस्येचा उपचार करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला अँटीहिस्टामाइन्स आणि पॅरासिटामोल टॅब्लेट लिहून देतील. तुम्हाला ऍलर्जी होऊ शकणारी उत्पादने आणि पदार्थ टाळावेत.

. गरोदरपणातील लोहितांग ताप (स्कार्लेट फिव्हर) हानिकारक आहे का?

गरोदरपणात ह्या तापामुळे बाळाला हानी पोहोचते हे एक मिथक आहे. तुमच्या प्रसूतीदरम्यान जर तुम्हाला स्कार्लेट फिव्हर असेल तर बाळालाही होण्याची शक्यता असते. बाळाला स्कार्लेट फिव्हरने नुकसान पोहोचल्याचा कुठलाही पुरावा नाही.

. गरोदरपणात डेंग्यू तापाचे धोकादायक घटक काय आहेत?

खासकरून तुम्ही गर्भवती असल्यास, डेंग्यू तापामुळे असंख्य धोके उद्भवू शकतात. डेंग्यूचा ताप तुमच्या प्लेटलेट संख्येवर परिणाम करतो. गरोदरपणात डेंग्यू तापाची जोखीम जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

. ग्रंथीचा ताप हानिकारक आहे का?

ग्रंथीचा ताप हा फ्लू आहे. हा ताप सामान्यतः किसिंग फ्लूम्हणून ओळखला जातो. सामान्य परिस्थितीत ह्या फ्लूमुळे बाळाला कुठलाही धोका नसतो. औषधोपचार आणि विश्रांती घेऊन ह्यावर उपचार केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. पहिल्या तिमाहीत मला ताप येऊ शकतो?

पहिल्या त्रैमासिकात ताप येणे खूप सामान्य आहे कारण यावेळीच तुमचे शरीर गर्भाच्या विकासासाठी अनुकूल होत असते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे देखील ताप येऊ शकतो. यावेळी तापाच्या सुरक्षिततेचे मापदंड अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

गरोदरपणात ह्या परिस्थतीतला सामोरे जाताना तुम्हाला आणि तुमच्या पतीला चिंता वाटणे साहजिक आहे. परंतु घाबरून न जाता शांत राहणे आवश्यक आहे. तुम्हाला जाणवणारी लक्षणे आणि चिंता तुमच्या डॉक्टरांशी शेअर करा. त्यामुळे त्यांना समस्येचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे सोपे जाईल. बऱ्याचवेळा ताप येतो आणि तुम्ही त्यातून बरे सुद्धा होता! आणि त्यामुळे तुम्हाला गरोदरपणात कुठल्याही प्रकारची हानी पोहचत नाही.

२०१७ मध्ये प्राण्यांच्या भ्रुणांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात येणाया तापाचा विकसनशील गर्भावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, तापामुळे गरोदरपणाच्या तिसऱ्या आणि आठव्या आठवड्यात जबडा आणि हृदयाच्या क्षमतेमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की आईला ताप आला आहे ह्याबाबतचा संशय निर्माण झाल्याबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली पाहिजेत. त्यामुळे जन्मतःच बाळाला व्यंग निर्माण होण्याचा धोका टाळता येतो. परंतु, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ह्याविषयीचा अभ्यास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे आणि हे निष्कर्ष बळकट करण्यासाठी आणखी अभ्यासाची आवश्यकता आहे.

स्रोत अणि सन्दर्भ:
स्रोत १

आणखी वाचा:

गरोदरपणात घाम येणे
गरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article