In this Article
तुम्ही गरोदर आहात हे ज्या क्षणी तुम्हाला कळते त्या क्षणापासून, बाळाच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही सर्व काही कराल. परंतु, बाह्य पर्यावरणीय घटकांची काळजी घेतली जात असली तरी, शरीराच्या प्रतिकारशक्तीसारख्या अंतर्गत घटकांकडे दुर्लक्ष केले जाते.
गरोदरपणात तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यामुळे गरोदरपणात आईकडून बाळाला अँटीबॉडीज दिल्या जातात. जरी ह्या अँटीबॉडीज काही प्रमाणात संक्रमणांपासून संरक्षण प्रदान करीत असल्या तरीसुद्धा, काही संसर्ग गर्भावर परिणाम करतात. गरोदरपणातील लसीकरणाबद्दल तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे ते ह्या लेखामध्ये दिलेले आहे.
गरोदरपणात लसीकरण का आवश्यक आहे?
जेव्हा तुमचे बाळ गर्भाशयात असते, तेव्हा ते लसीकरणासाठी खूप लहान असते. म्हणून, गर्भाला लस–प्रतिबंधित संक्रमणांपासून वाचवण्यासाठी गरोदर स्त्रियांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरण केल्यास संपूर्ण समुदाय/परिसरात संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखला जातो आणि गर्भातील विविध जन्म दोष आणि वाढीच्या विकृतींची शक्यता कमी होते. तसेच तुमची लवकर प्रसूतीची शक्यता कमी होते आणि तुमचे बाळ संपूर्ण गरोदरपणात सुरक्षित राहते.
लसीतील घटक सुरक्षित आहेत का?
प्रत्येक लसीची एफडीए च्या सुरक्षा आणि देखरेखीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चाचणी केली जाते. ह्या लशी वापरण्यासाठी सक्षम करण्यापूर्वी शुद्धता, डोस आणि सामर्थ्य तपासले जाते. काही लसींमध्ये इन्फ्लूएंझा लसीसारखे घटक असतात, काही गर्भवती स्त्रियांना लशींची ऍलर्जी होऊ शकते, म्हणूनच लस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले जाते.
तुमच्या पोटातील गर्भासाठी लस हानिकारक असू शकते का?
काही लसी तुमच्या बाळासाठी हानिकारक असू शकतात. काही लसी गरोदर मातेला गरोदरपणाच्या दुस–या आणि तिसर्या तिमाहीत दिल्या जातात तर बाकीच्या बाळाच्या जन्मानंतर लगेच दिल्या जातात.
गर्भवती असताना कोणत्या लसींची शिफारस केली जाते?
तुम्ही अजून गरोदर नसाल तर खालील लसी घेण्याचा विचार करा–
१. रुबेला
रुबेला लस गरोदरपणात घेणे असुरक्षित आहे. तुमच्या शरीरात हा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी गर्भधारणेपूर्वी रुबेला चाचणी घ्या. रुबेला लसीकरण करा आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वी किमान एक महिना प्रतीक्षा करा.
२. हिपॅटायटीस बी लस
हिपॅटायटीस बी हा विषाणूमुळे होणारा एक गंभीर संसर्ग आहे आणि त्यामुळे तीव्र यकृत रोग, थकवा, मळमळ आणि अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होतो. ज्या मातांना हिपॅटायटीस बी विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनी त्यांच्या बाळांना संरक्षित आणि सुरक्षित ठेवण्यासाठी, गर्भधारणेपूर्वी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. या लसीकरणाची पुष्टी करण्यासाठी आणि लस निवडण्यासाठी तुमच्या गरोदरपणापूर्वी ह्या विषाणूची चाचणी करून घ्या कारण तुमच्या शरीरात आधीच विषाणू आहेत हे लक्षात येत नाही. जर तुम्ही हिपॅटायटीस बी ची लागण झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या जवळ रहात असाल तर, ह्या विषाणूचा तुम्हाला संसर्ग होऊ नये म्हणून लसीकरण करून घेण्याचा विचार करा.
गरोदरपणात स्त्रियांनी कुठल्या लशी घेणे अपेक्षित आहे त्याची यादी खाली दिलेली आहे –
३. फ्लूची लस
फ्लूमुळे गर्भधारणेनंतर न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात आणि अनेक स्त्रियांची लवकर प्रसूती होते त्यामुळे बाळाचे जन्मतः वजन कमी असते आणि बाळाची सामान्य वाढ होत नाही. सुरक्षित राहण्यासाठी फ्लूची लस घ्या आणि तुमच्या गर्भारपणात काही महिन्यांनंतरही तुमच्या बाळाला फ्लूचा त्रास होणार नाही याची खात्री करा.
फ्लूची लस गरोदरपणाच्या कुठल्याही महिन्यात घेतली जाऊ शकते.
४. डांग्या खोकला
डांग्या खोकल्याचे रूपांतर जीवघेण्या समस्येमध्ये होते तेव्हा तुमच्या बाळाला जन्मानंतर रुग्णालयात दाखल करावे लागते. डांग्या खोकल्यासाठी गरोदरपणात लसीकरणाचा कालावधी २७ ते ३६ आठवडे किंवा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या तिसऱ्या तिमाही दरम्यान असावा असे डॉक्टर सांगतात. डांग्या खोकल्याची लस स्वतः घेण्याइतके तुमच्या बाळाचे वय नसल्यामुळे, तुमच्या गरोदरपणात शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घेण्याची शिफारस केली जाते. याव्यतिरिक्त, बाळाची काळजी घेणाऱ्या कोणत्याही प्रौढ किंवा वृद्ध लोकांना सुरक्षित राहण्यासाठी ही लसीकरण करण्याची शिफारस केली जाते.
गरोदरपणात कोणत्या लसी टाळल्या पाहिजेत?
गर्भवती महिलांनी खालील लसी टाळल्या पाहिजेत–
१. हिपॅटायटीस ए
या लसीकरणाची सुरक्षितता आणि सामर्थ्य पूर्णपणे तपासले गेले नाही. या विषाणूच्या संसर्गाचा उच्च धोका असलेल्या मातांनी ही लस निवडण्यापूर्वी जोखीम आणि फायद्यांसाठी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. एमएमआर (गोवर, गालगुंड, रुबेला)
हे एक लाइव्ह–व्हायरस वॅक्सीन आहे. सुरुवातीच्या रुबेला चाचण्यांमधून तुमची रुबेला विषाणूंसाठीची प्रतिकारशक्ती आहे की नाही हे उघड होईल. जर तुमची त्या विषाणूप्रती प्रतिकारशक्ती नसेल, तर तुम्हाला हा विषाणू प्रसूतीनंतरच दिला जाईल.
३. व्हॅरिसेला
व्हॅरिसेला ही एक लस आहे आणि ती गरोदरपणाच्या एक महिना आधी दिली जाण्यासाठी डिझाइन केलेली आहे. लहान मुलांमध्ये कांजिण्या टाळण्यासाठी ही लस दिली जाते आणि गरोदरपणात घेण्यासाठी ही लस योग्य नाही.
४. एचपीव्ही लस
मानवी पॅपिलोमाव्हायरस विषाणू लसीकरण गरोदरपणात घेण्यासाठी अयोग्य आहे.
५. न्यूमोकोकल
या लसीच्या सुरक्षिततेच्या अज्ञात स्वरूपामुळे, ती गर्भवती महिलांसाठी आदर्श नाही. ज्या स्त्रियांना जुनाट आजाराचा धोका आहे त्यांनी ह्या लसीची निवड करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
६. ओरल पोलिओ लस (पीओव्ही) आणि निष्क्रिय पोलिओ लस (आयपीव्ही)
पोलिओ लसीच्या दोन्ही आवृत्त्या (थेट आणि निष्क्रिय) गर्भवती महिलांना देण्याची शिफारस केलेली नाही.
वरीलपैकी कोणतेही नको असलेले लसीकरण केल्याने बाळाला जन्मजात दोष निर्माण होऊ शकतो, तसेच गर्भपात किंवा अकाली जन्म होऊ शकतो. गरोदरपणात विविध गुंतागुंत निर्माण होऊ शकतात.
लसीकरण घेतल्यानंतर होणारे दुष्परिणाम
फायद्यांपेक्षा जोखीम जास्त असली तरी, गरोदरपणात वरीलपैकी कोणतेही लसीकरण घेतल्यानंतर तुम्हाला खालील दुष्परिणाम जाणवू शकतात–
- लालसरपणा
- सूज येणे
- लसीकरण केलेल्या भागात वेदना
- थकवा
- अंगदुखी
- पुरळ (असामान्य)
- उलट्या होणे
- अतिसार
- पोटदुखी
- ताप
तुम्ही लस–प्रतिबंधक संसर्ग असलेल्या ठिकाणी परदेशात प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या गर्भधारणेपूर्वी तुम्हाला आवश्यक असलेल्या इतर लसींबद्दल माहिती घ्या.
तुमच्या गर्भाची रोगप्रतिकारक प्रणाली कमकुवत असते. गर्भधारणा होण्यापूर्वी स्वतःचे लसीकरण करून घेणे चांगले असते. सुरक्षित आणि तणावमुक्त प्रसूती होण्यासाठी तुम्ही गर्भधारणेपूर्वी आणि गरोदरपणात आवश्यक लस घेतल्याची खात्री करा. जरी जगभरातील सर्व संसर्गांसाठी लसीकरण सुरक्षित नसले, तरी तुमचे लहान बाळ तेथील सामान्य संसर्गांपासून सुरक्षित राहील हे गृहीत धरले पाहिजे. आम्ही आशा करतो की तुमचा गरोदरपणाचा काळ सुरक्षित जाईल, विश्रांती घ्या आणि मातृत्वाचा आनंद घ्या!
आणखी वाचा:
धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते?
गरोदर असताना किंवा बाळाला स्तनपान देत असताना कोविड – प्रतिबंधात्मक लस घेणे सुरक्षित आहे का?