गर्भारपण

गरोदरपणात पोटात वायू होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे

गरोदरपणाच्या टप्प्यावर शरीरात मोठे बदल होतात. तुम्हाला शक्य तितकी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतली नाही तर, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशीच एक समस्या म्हणजे पोटात वायू होणे किंवा पोट फुगणे. बऱ्याच लोकांसाठी हे अगदी सामान्य आहे, परंतु गरोदरपणात गॅसच्या समस्येमुळे निर्माण होणारी अस्वस्थता टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

गरोदरपणात गॅस होणे आणि पोट फुगणे सामान्य आहे का?

दिवसातून १२ वेळा गॅस पास होणे सामान्य आहे. परंतु गरोदरपणात जास्त गॅस होऊ शकतो. पोट फुगण्यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही तुमची पँट थोडी सैल करू शकता. तुमच्या पोटाचा आकार वाढण्यास सुरुवात होण्याची आधी काही आठवडे असे होऊ शकते.

नंतर जस जसे तुमचे बाळ वाढते तसतसे गर्भाशयाने उदरपोकळीचा बहुतांश भाग व्यापलेला असतो, तुमचे पोट आणि इतर अवयवांना धक्का बसतो. त्यामुळे पचन मंदावते आणि गरोदरपणात गॅसची समस्या वाढू शकते.

गरोदरपणात गॅसचा त्रास होणे हे पूर्णपणे सामान्य आहे. त्याची कारणे खाली दिलेली आहेत.

कारणे

गरोदरपणात गॅसचा त्रास होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे तुमच्यामध्ये होणारे शारीरिक आणि संप्रेरकांमधील बदल होय. तुमच्या रक्तातील प्रोजेस्टेरॉनची वाढलेली पातळी तुमच्या संपूर्ण शरीरातील स्नायूंना आराम देते आणि ह्यामध्ये तुमच्या पचनसंस्थेचाही समावेश होतो. त्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि त्याचे गॅस होणे, ढेकर येणे, पोट फुगणे, पोटात अस्वस्थता वाटणे इत्यादी परिणाम होतात. विशेषत: खूप खाल्ल्यानंतर.पचन मंदावते आणि बद्धकोष्ठता व छातीत जळजळ होणे ह्यासारख्या इतर समस्या देखील उद्भवतात.

गरोदरपणात वायू निर्माण करणारे आणि पोट फुगवणारे पदार्थ

वायू तोंडातून शरीरात प्रवेश करतो आणि ढेकर दिल्यावर बाहेर पडतो. पचनक्रियेमुळे तुमचे आतडे देखील गॅस तयार करतात. जिवाणू न पचलेल्या अन्नाचे विघटन करतात तेव्हा असे होते.

गॅस होण्यास आणि पोट फुगण्यास कारणीभूत असणारे पदार्थ

गरोदरपणात गॅसची समस्या निर्माण करणारे इतर काही घटक आहेत:

लक्षणे

गॅसची बहुतेक लक्षणे अत्यंत स्पष्ट असतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

कधीकधी वायूमुळे होणारी वेदना इतकी गंभीर असते आणि ही वेदना सतत होत असते त्यामुळे तुम्हाला कदाचित मोठी समस्या झालेली असल्याचा सुद्धा संशय येईल.

गरोदर असताना गॅस आणि पोट फुगण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही उपाय

जसजसे तुमचे बाळ मोठे होते तसे तुमच्या गर्भाशयाचा विस्तार होतो आणि गॅस होणे ही एक मोठी समस्या बनू शकते. परंतु गरोदरपणात गॅस होण्याच्या समस्येवर अनेक घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला त्यापासून आराम मिळू शकतो. या पद्धतींमुळे तुमच्या न जन्मलेल्या बाळाचे कोणतेही नुकसान होत नाही. आराम मिळण्यासाठी हे उपाय नियमितपणे करा.

. भरपूर पाणी प्या

दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. तुम्ही पाण्यासोबत इतर द्रवपदार्थांचाही समावेश करू शकता, परंतु तुमच्या शरीरासाठी तुम्हाला पुरेसे द्रवपदार्थ मिळाले पाहिजेत ह्याची काळजी घ्या.

तुम्हाला इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) असल्यास, तुम्ही कमी प्रमाणात FODMAP (नैसर्गिक शॉर्ट-चेन कार्बोहायड्रेट आणि साखरयुक्त अल्कोहोल उदा: ग्लुकोज किंवा फ्रक्टोज) असलेले ज्यूस प्यावेत. तुम्ही क्रॅनबेरी, अननस, द्राक्ष किंवा संत्र्याचा रस घेऊन पाहू शकता, कारण यामध्ये FODMAP ची पातळी कमी असते.

. शारीरिक क्रियाकलाप

व्यायाम आणि शारीरिक हालचाली हा तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग असावा. दररोज किमान अर्धा तास चालण्याचा प्रयत्न करा

ह्यामुळे तुमचे पचन गतिमान करू शकते आणि बद्धकोष्ठता टाळू शकते. गॅस आणि पोट फुगण्याची लक्षणे कमी होऊ शकतात. आपण कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. आपल्या आहाराची चाचणी घ्या

कोणते पदार्थ तुमच्यावर सर्वात जास्त परिणाम करतात हे शोधण्यासाठी अन्न बदलण्याचा प्रयत्न करा. तुमचे पोट फुगण्याची लक्षणे कोणत्या अन्नामुळे उद्भवली हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक डायरी देखील ठेवू शकता. कोबी, बटाटे, मोड आलेली कडधान्ये इत्यादींमुळे गॅस होऊ शकतो.

तुम्हाला आयबीएसचा त्रास होत असल्यास, कोणताही आहार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. कमी FODMAP आहार अत्यंत प्रतिबंधात्मक आहे आणि पुरेसे पोषण न मिळाल्यास तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून पूरक आहार घेण्याचा विचार करा.

. भरपूर तंतुमय पदार्थ वापरा

कधीकधी वायूची लक्षणे वाढवणारे पदार्थ प्रत्यक्षात बद्धकोष्ठतेची लक्षणे बरे करू शकतात. तंतुमय पदार्थ हा असाच एक पदार्थ आहे: तो तुमच्या आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढवतो आणि मल मऊ करतो जेणेकरून ते सहजतेने बाहेर पडण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आणि गॅसची समस्या कमी करण्यासाठी आपल्या आहारात किमान २५ ते ३० ग्रॅम तंतुमय पदार्थांचा समावेश करा. गरोदर असताना गॅसमुळे होणाऱ्या तीव्र वेदना कमी होण्यासाठी सुद्धा हा उपाय लागू होतो.

. तुमचे पाय उंच करा

जर तुमचे पोट फुगलेले दिसत असेल तर तुम्ही पाय उंच करून बसा. त्यामुळे तुमच्या बाळाचा तुमच्या पोटावरील दबाव कमी होईल आणि तुमच्या आतड्यातील अन्न अधिक योग्य रित्या पचू शकेल. अन्नाचे नीट पचन होण्यासाठी गरोदरपणात घट्ट कपडे घालणे टाळा.

. थोडे थोडे खा

वाढणारे बाळ तुमच्या ओटीपोटातील बरीचशी जागा घेते. तुमच्या आतड्याला अन्नपचनासाठी कमी जागा मिळते आणि जास्त प्रमाणात जेवण केल्याने तुम्हाला अन्न पचणे कठीण होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटू शकते.

त्याऐवजी, दिवसभरात थोडे थोडे खा. त्यामुळे तुमचा अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

. योग

काही योगासनांमुळे तुम्हाला गॅसपासून मुक्ती मिळू शकते. गरोदरपणात गॅस पासून आराम मिळविण्यासाठी हे वापरून पहा

परंतु,योग करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आणि जन्मपूर्व योग प्रशिक्षकाशी संपर्क साधण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. तणाव टाळा

कधीकधी तणावामुळे देखील पोट फुगल्याची भावना होऊ शकते. ह्याचे कारण म्हणजे, जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुम्ही भरपूर हवा घेण्यास प्रवृत्त होता. त्यामुळे गरोदरपणात तुम्हाला खूप ढेकर येतात.

याशिवाय, तणावाचा तुमच्या मुलावर इतरही परिणाम होऊ शकतो. शक्य तितके आरामशीर राहा आणि स्वतःला आणि तुमच्या बाळाला आनंदी ठेवा.

. आरामदायक कपडे घाला

गरोदरपणात घट्ट कपडे टाळा जेणेकरून अन्नाचे नीट पचन होऊ शकेल.

गरदोरपणात मॅटर्निटी जीन्स घातल्यावर तुमच्या बाळाला पुरेशी जागा मिळत असली तरी पोटातील अन्नपचन नीट होण्यासाठी त्यामुळे अडथळा येऊ शकतो.

१०. मेथी दाणे

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तसेच नंतरच्या अवस्थेत वायू होणे आणि पोट फुगण्यावर हा एक उत्तम उपाय आहे

फक्त एक चमचा मेथीचे दाणे ६-७ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. बिया काढून हे पाणी प्यायल्यास तुम्हाला बरे वाटू शकेल.

गरोदरपणात गॅस होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे हे चिंतेचे लक्षण आहे का?

बहुतेक वेळा गॅस ही गरोदरपणातील अयोग्य आहाराची किंवा प्रोजेस्टेरॉनच्या वाढलेल्या पातळीचा परिणाम म्हणून साधी प्रतिक्रिया असते. परंतु जर तुम्हाला सतत पोट फुगल्यासारखे वाटत असेल आणि गरोदरपणात पोट फुगणे किंवा ढेकर येणे असा त्रास होत असेल तर ते काहीतरी चुकीचे असल्याचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल किंवा ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ तीव्र वेदना होत असतील तर ते गंभीर लक्षण असू शकते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार घ्या.

गॅस होणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे हे गरोदरपणाचे लक्षण आहे का?’असे अनेक स्त्रिया त्यांच्या डॉक्टरांना विचारतात. परंतु गॅस होत असेल तर तुम्ही गर्भवती आहात असा त्याचा अर्थ होत नाही. गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी गर्भधारणा चाचणी हा सर्वोत्तम मार्ग आहे. गरोदरपणात गॅस होणे आणि पोट फुगणे यामुळे अस्वस्थता निर्माण होते. परंतु त्यामुळे बाळाला कोणताही धोका निर्माण होत नाही. आहार आणि जीवनशैलीत बदल करून त्यावर सहज उपचार करता येतात.

आणखी वाचा:

गरोदरपणातील पिवळा स्त्राव गरोदरपणातील थायरॉइडची समस्या

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved