Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात पिझ्झा खाणे हानिकारक आहे का?

गरोदरपणात पिझ्झा खाणे हानिकारक आहे का?

गरोदरपणात पिझ्झा खाणे हानिकारक आहे का?

पिझ्झा हे एक लोकप्रिय स्नॅक आहे. पिझ्झा खाण्याचा आनंद सर्व वयोगटातील लोक घेतात – परंतु, गरोदरपणात पिझ्झा खाणे सुरक्षित आहे का?. गरोदरपणाच्या महत्त्वाच्या काळात गर्भवती स्त्रियांना वेगवेगळ्या अन्नपदार्थांची लालसा निर्माण होते, त्यामुळे हा प्रश्न अर्थपूर्ण ठरतो. स्वादिष्ट, गरम, झणझणीत पिझ्झा नेहमीच मोहक असू शकतो, परंतु त्याचा तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आता फक्त तुमचेच नाही तर – तुमच्या बाळाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे.

गर्भवती स्त्रिया पिझ्झा खाऊ शकतात का?

पिझ्झा आवडणाऱ्या गर्भवती स्त्रीला खऱ्या अर्थाने त्रास देऊ शकणारा प्रश्न म्हणजे – “गरोदरपणात पिझ्झा खाणे सुरक्षित आहे का?”.  पिझ्झा जंक फूडच्या श्रेणीत येतो. गर्भवती स्त्रियांना जंक फूड टाळण्यास सांगितले जाते कारण पिझ्झ्यामध्ये खूप जास्त कॅलरीज आणि रिफाइंड गव्हाचे पीठ वापरले जाते. गर्भवती स्त्री आणि गर्भाच्या शरीरावर होणारे हानिकारक परिणाम अश्या वेळी लक्षात घेतले जातात. परंतु, जर पिझ्झा घरी बनवलेला असेल किंवा दर्जेदार मानक घटक आणि सेवा असलेल्या चांगल्या ब्रँडचा असेल तर असा पिझ्झा कधीतरी खाणे सामान्य आहे.

जर तुम्ही गरोदरपणात पिझ्झा खात असाल तर, भाज्या आणि चीज यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही दोन्हीपैकी एकाचे जास्त सेवन करणार नाही. असे केल्याने तुम्हाला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यासाठी मदत होईल. तसेच, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत पिझ्झा खाणे चांगले आहे कारण त्यानंतरच्या काळात आपल्याला पौष्टिक आणि अधिक समृद्ध आहार घेणे अधिक आवश्यक असेल.

गर्भवती स्त्रिया पिझ्झा खाऊ शकतात का

गरोदरपणात पिझ्झा खाण्याचे काही फायदे आहेत का?

गरोदरपणात पिझ्झाच्या फायद्यांबद्दल बोलत असताना, आम्ही विचारात घेतलेल्या काही गोष्टींची यादी केली आहे

 • पिझ्झा हे आरामदायी स्नॅक आहे. पिझ्झा खाल्ल्याने तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आनंद मिळू शकतो.
 • जेव्हा तुम्ही काही ताजे आणि पौष्टिक घटक पिझ्झावर टाकता तेव्हा तुम्हाला काही आवश्यक पोषक आणि जीवनसत्त्वे मिळू शकतात.
 • पिझ्झा खाल्ल्याने लालसा कमी करण्यात मदत होऊ शकते आणि पिझ्झा ताजा बनवल्यास तुमचे नुकसानही होणार नाही.
 • अ आणि क जीवनसत्त्वे असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या सॉसने पिझ्झा टॉपिंग केल्यास तुम्हाला  गरोदरपणातखूप मदत होऊ शकते. सॉसमध्ये असलेल्या टोमॅटोमध्ये लाइकोपीन हे अँटीऑक्सिडेंट असते. ह्या अँटिऑक्सिडंट मुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
 • पिझ्झा बेस निवडताना पातळ निवडावा. कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्तअसते.
 • तुमच्या पिझ्झ्यासाठी पार्ट-स्किम मोझझेरेला चीजचे टॉपिंग निवडा.  कारण त्यामधून कॅल्शियम आणि प्रथिने मिळू शकतात.

गरोदर असताना पिझ्झा खाण्याचे हानिकारक परिणाम काय आहेत?

पिझ्झाच्या फायद्यांपेक्षा त्याचे हानिकारक प्रभाव जास्त आहेत. पिझ्झा खाण्याचे काही हानिकारक परिणाम येथे दिलेले आहेत:

 • डॅनिश ब्लू, कॅमेम्बर्ट आणि ब्री सारख्या काही चीजमध्ये लिस्टरिया सारखे जिवाणू असण्याची शक्यता असते. या जीवाणूंमुळे फ्लूसारखीच लक्षणे असलेला दुर्मिळ आजार होऊ शकतो.
 • तुमच्या पिझ्झामध्ये भरपूर चीज टाकल्याने कॅलरींचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे वजन वाढू शकते.
 • पिझ्झा खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात.
 • पेपरोनीचे टॉपिंग हानिकारक असू शकते कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. अशी चरबी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली नसते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास गर्भावस्थेतील मधुमेह देखील होऊ शकतो.
 • जर तुमच्या पिझ्झ्यावर कच्च्या मांसाचे उदा:  सलामी, कोरिझो किंवा पेपरोनीचे टॉपिंग असेल आणि जर पिझ्झा कच्चा असेल, नीट शिजवलेला नसेल किंवा गरम केला नसेल, तर त्यामुळे टोक्सोप्लाज्मोसिस नावाचा संसर्गजन्य रोग होऊ शकतो.

2017 मध्ये उंदीरांवर केलेल्या अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की गरोदरपणात जंक फूड खाणाऱ्या उंदरांनी खूप जास्त वजनाच्या उंदरांना जन्म दिला आणि दूध सोडल्यानंतर अश्या उंदरांना थेट चरबीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा झालेली होती. त्यांना संतुलित आहार दिल्यानंतर लगेचच त्यांची चरबीयुक्त अन्नाची लालसा कमी होण्यास मदत झाली, परंतु उंदरांच्या मेंदूची क्रिया प्रौढत्वात चरबीयुक्त अन्न मिळविण्यासाठी तशीच राहिली. तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या बाळावर परिणाम होतो त्यामुळे तुम्ही जितके चांगले खाऊ शकता तितके खाणे शहाणपणाचे आहे.

गरोदर असताना पिझ्झा सुरक्षितपणे कसा खावा?

गरोदर असताना पिझ्झा सुरक्षितपणे खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

 • फक्त पूर्णपणे शिजवलेला आणि गरम केलेला पिझ्झा खा कारण उष्णतेमुळे काही विशिष्ट जिवाणू  नष्ट करण्यास मदत होईल.
 • केवळ नामांकित ब्रँडकडून पिझ्झा ऑर्डर करा कारण ते चांगल्या दर्जाचे अन्न देतात.
 • ताजा पिझ्झा खा कारण बराच काळ ठेवलेला पिझ्झा खाल्ल्यास त्यावर जिवाणूंची वाढ झालेली असू शकते.
 • जर तुम्हाला तुमचा पिझ्झा मांस किंवा शेलफिशने भरलेला आवडत असेल तर ते मांस चांगले शिजले आहे याची खात्री करा.
 • पिझ्झावर भाज्यांचे टॉपिंग टाका कारण त्यामध्ये गर्भवती महिलेला आवश्यक पोषक घटक असतात.
 • पिझ्झाचे फक्त एक किंवा दोन स्लाइस खा. कारण संपूर्ण पिझ्झा खाण्याच्या तुलनेत हा एक संतुलित पर्याय आहे.
 • थंड साठवलेले मांस ज्यामध्ये असते असा पिझ्झा खाण्यापासून स्वतःला परावृत्त करा.
 • ब्री, कॅमबर्ट किंवा डॅनिश ब्लू सारख्या चीजचे टॉपिंग असलेला  पिझ्झा खाणे टाळा कारण त्यात लिस्टरिया बॅक्टेरिया असतात.
 • पिझ्झा वर परमेसन किंवा चेडर चीज टाकणे उत्तम. हे हार्ड चीज पर्याय आहेत. अश्या चीज मध्ये पाणी कमी असते, त्यामुळे सूक्ष्मजंतू तयार होण्याची शक्यता कमी होते.

गरोदर असताना पिझ्झा सुरक्षितपणे कसा खावा

पिझ्झा हा एक मोहक खाद्यपदार्थ आहे हे आपल्या लक्षात आले आहे. परंतु गरोदरपणात पिझ्झा खाणे काही प्रमाणात टाळले पाहिजे. परंतु, जर तुम्ही पिझ्झा प्रेमी असाल आणि तुमची लालसा नियंत्रित करू शकत नसाल, तर अधूनमधून गरम गरम पिझ्झा खाणे ठीक आहे. वर नमूद केलेल्या टिप्स लक्षात घेऊन तुम्ही पिझ्झा खाण्याचा आनंद घेऊ शकता!

संसाधने आणि संदर्भ:  The Bump

आणखी वाचा:

गरोदरपणात आईस्क्रीम खाणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article