गर्भारपण

गरोदरपणातील ‘मोशन सिकनेस’: कारणे आणि उपाय

मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ ही गरोदरपणाची काही सामान्य लक्षणे आहेत. परंतु, कधीकधी तुम्हाला प्रवासात मळमळ होऊन आजारी असल्यासारखे वाटू शकते. त्यास 'मोशन सिकनेस' असे म्हणतात. जर तुम्हाला हा मोशन सिकनेसचा त्रास आधीपासून असेल तर गरोदरपणात तो आणखी वाढू शकतो. गरोदरपणात ही समस्या सामान्यपणे आढळते. म्हणूनच ह्या लेखात, आपण गरोदरपणातील मोशन सिकनेस, त्याची कारणे आणि त्यावरील विविध उपाय याबद्दल चर्चा करणार आहोत. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत.

मोशन सिकनेस म्हणजे काय?

प्रवास करीत असताना मळमळ, उलट्या होणे, चक्कर येणे ही लक्षणे दिसल्यास त्यास 'मोशन सिकनेस' असे म्हणतात. काही स्त्रियांना केवळ गरोदरपणातच मोशन सिकनेसचा त्रास होऊ शकतो, तर काहींसाठी गरोदरपणात लक्षणे आणखी तीव्र होऊ शकतात. मोशन सिकनेसला ट्रॅव्हल सिकनेस, सी सिकनेस किंवा कार सिकनेस इ.सुद्धा म्हणतात.

गरोदरपणात मोशन सिकनेस कशामुळे होतो?

जेव्हा तुम्ही विविध प्रकारच्या वाहतुकीच्या माध्यमांद्वारे, लांब पल्ल्याचा प्रवास करता तेव्हा मोशन सिकनेस होतो. तथापि, गरोदरपणात मोशन सिकनेस होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

 1. तुम्ही जड जेवण घेतल्यानंतर जेव्हा प्रवास करता तेव्हा तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास होऊ शकतो
 2. जेव्हा तुम्ही सतत मंद गतीने प्रवास करता तेव्हा तुमच्या कानाचा, आतील समतोल बिघडतो.
 3. जेव्हा तुमच्या सभोवतालची हवा दूषित किंवा धूरयुक्त असते, तेव्हा तुम्हाला खूप मळमळ वाटू शकते.
 4. गरोदरपणात मोशन सिकनेसचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मेंदूला प्राप्त झालेले गोंधळलेले संकेत. हे वास्तविक गती आणि अपेक्षित गती यांच्यातील असमानतेमुळे होते.
 5. जर दोन न्यूरोट्रांसमीटर योग्यरित्या कार्य करत नसतील तर तुम्हाला गरोदरपणात मोशन सिकनेसचा अनुभव येऊ शकतो.

गरोदर असताना मोशन सिकनेसची लक्षणे

तुम्ही मोशन सिकनेसने ग्रस्त आहात हे तुम्हाला कसे कळेल असा विचार तुम्ही करत असाल. गरोदरपणात सामान्यपणे अनुभवलेली मोशन सिकनेसची लक्षणे खालीलप्रमाणे,

 1. तुम्हाला चक्कर येणे, थकवा आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवू शकतात.
 2. तुम्हाला सौम्य डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवू शकते तसेच मळमळ होऊ शकते.
 3. सतत उलट्या झाल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेट झाल्यासारखे वाटू शकते.
 4. काही वेळा, तुम्हाला अत्यंत चिंता वाटू शकते आणि जास्त घाम येणे किंवा लाळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
 5. हालचाल थांबल्यानंतरही तुम्हाला आजारी असल्यासारखे वाटू शकते, परंतु बहुतेक वेळा हालचाल थांबताच मोशन सिकनेस कमी होऊ शकतो.

मोशन सिकनेसचा उपचार कसा केला जातो?

गरोदरपणात मोशन सिकनेसच्या उपचारासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गरोदरपणात मोशन सिकनेससाठी काय घ्यावे ते खाली दिलेले आहे.

 1. मोशन सिकनेस दूर ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी ६ पूरक आहार घ्या.
 2. तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी अर्धा तास अँटीहिस्टामाइन्स घेऊ शकता.
 3. कारमध्ये पुढच्या सीटवर बसणे हा एक चांगला पर्याय आहे. कारण रस्ता खराब असल्यास तुमची लक्षणे वाढू शकतात.
 4. बाजारात काही एक्यूप्रेशर ब्रेसलेट उपलब्ध आहेत, ज्यामुळे मोशन सिकनेस कमी होण्यास मदत होऊ शकते.

गरोदरपणात होणाऱ्या मोशन सिकनेससाठी वर दिलेले उपाय जरी उपयुक्त असले तरीसुद्धा कोणतीही उपचारपद्धती स्वीकारण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घ्यावी.

गरोदर स्त्रियांनी मोशन सिकनेससाठी औषधे घेणे सुरक्षित आहे का?

तुम्ही गरोदरपणातील मोशन सिकनेसची लक्षणे दूर करण्यासाठी औषधे घेऊ शकता. तथापि, औषधाची निवड करण्यापूर्वी तुम्ही त्याविषयी सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे . औषधे घेणे सुरक्षित आहे परंतु तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या स्त्रीरोगतज्ञांची मंजुरी घेणे आवश्यक आहे.

गरोदर असताना मोशन सिकनेससाठी औषधे घेत असताना घ्यायची खबरदारी

गरोदरपणात मोशन सिकनेससाठी औषधे घेण्याआधी पुढील खबरदारी घेणे आवश्यक आहे -

 1. गरोदरपणात स्कोपोलामाइन घेणे टाळा. यामुळे तुमच्या पोटातील बाळाला हानी पोहोचत नाही परंतु आईला गंभीर मळमळ होऊ शकते किंवा चक्कर येऊ शकते.
 2. तुम्ही सुरक्षितपणे डायमहायड्रिनेट हा घटक असलेली ओव्हर--काउंटर औषधे घेऊ शकता.
 3. बऱ्याच तज्ञांच्या मते दीर्घकाळासाठी मोशन सिकनेसची लक्षणे दूर करण्यासाठी ड्रामामाइन सारख्या औषधांचा सुरक्षितपणे वापर केला जाऊ शकतो.

जरी ही औषधे सुरक्षितपणे घेतली जाऊ शकतात तरीही कोणतेही औषध घेण्याआधी आपल्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे हे तुमच्या डॉक्टरांना माहित असते.

आणखी वाचा: गरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार गरोदरपणात लाळेचे प्रमाण वाढणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved