गर्भारपण

गरोदरपणातील हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर कमी होणे)

आपण जे अन्न खातो त्याचे ग्लुकोज मध्ये म्हणजे साखरेमध्ये विघटन होते. ही साखर नंतर शरीराच्या विविध पेशींमध्ये प्रवेश करते आणि चयापचय प्रक्रियांसाठी ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहते. जर रक्तामध्ये पुरेशी साखर नसेल, तर त्यामुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. म्हणजेच शरीरात विरघळलेल्या साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप कमी होते. त्यामुळे हायपोग्लाय सेमियाच्या स्वरूपानुसार सौम्य ते गंभीर गुंतागुंत होऊ शकते. साखर कमी होण्याचे प्रमाण कमी असेल तर आळस आणि थकवा येऊ शकतो, परंतु जर हे प्रमाण जास्त असेल तर मूर्च्छा येऊ शकते किंवा कोमामध्ये जाण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. हायपोग्लायसेमिक असणं ही एक समस्या आहे आणि ही समस्या गरोदरपणात उद्भवली तर ती नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला अत्यंत काळजी घ्यावी लागेल. ह्या स्थितीची कारणे आणि गरोदरपणात त्याचा कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणातील हायपोग्लायसेमिया म्हणजे काय?

जेव्हा गरोदरपणात रक्तातील सामान्य साखरेची श्रेणी 700 मायक्रोग्राम प्रति मिलीलीटरच्या खाली येते तेव्हा हायपोग्लायसेमिया होतो. याउलट, रक्तातील साखरेची सामान्य श्रेणी 700 ते 1000 मायक्रोग्राम प्रति मिलीलीटर दरम्यान असावी.

हायपोग्लायसेमियाचे प्रकार

जर तुम्हाला हायपोग्लायसेमियाची कोणतीही लक्षणे दिसली तर कृपया शक्य तितक्या लवकर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून वेळेत निदान होऊन तुम्हाला उपचार मिळतील. गरोदरपणात हायपोग्लायसेमियाचे दोन सामान्य प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.

. प्रतिक्रियाशील हायपोग्लायसेमिया

प्रतिक्रियाशील हायपोग्लायसेमियामध्ये, तुम्ही जेवल्यानंतर पहिल्या दोन तासांत रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी होते. या प्रकारचा हायपोग्लायसेमिया मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अधिक सामान्य आहे, परंतु ज्यांना मधुमेह नाही अश्या लोकांमध्ये सुद्धा ही स्थिती आढळून येते.

. फास्टिंग हायपोग्लायसेमिया

फास्टिंग हायपोग्लायसेमियामध्ये, तुमच्या जेवणाच्या दरम्यान रक्तातील साखर धोकादायक पातळीपर्यंत घसरते. हा प्रकार मधुमेह नसलेल्या लोकांमध्ये अधिक सामान्य आहे.

हायपोग्लायसेमियाचा धोका कोणाला जास्त आहे?

गर्भवती महिलांना खालील परिस्थितींमध्ये हायपोग्लायसेमिया होण्याची सर्वाधिक शक्यता असते.

गरोदरपणात रक्तातील साखर कमी होण्याचे कारण काय?

गरोदरपणात हायपोग्लायसेमिया होण्याची अनेक संभाव्य कारणे आहेत. त्यापैकी काही करणे

. मॉर्निंग सिकनेस

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ आणि उलट्यांमुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते. ह्याचे कारण म्हणजे तुम्ही कमी खात आहात. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात उष्मांकाची कमतरता निर्माण होते. तुम्हाला वारंवार उलट्या होऊन वजन कमी होते. अशक्तपणा येऊन किंवा चक्कर येत असल्याचे आढळल्यास, कृपया सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

. जीवनशैली

शरीरातील साखरेच्या पातळीवर परिणाम करणारे विविध जीवनशैलीविषयक घटक आहेत. उदाहरणार्थ, अतिव्यायाम केल्याने आवश्यक ऊर्जेसाठी जास्त साखरेचे विघटन होते. आणखी एक घटक म्हणजे पुरेसे अन्न न घेणे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमे 1800, 2200 आणि 2400 कॅलरीजची आपल्याला दररोज गरज असते. अल्कोहोलचे सेवन केल्याने हायपोग्लायसेमिया देखील होऊ शकतो कारण ते यकृतातून रक्तातील साखरेचे उत्सर्जन होण्यास अडथळा आणते.

. मधुमेह

हायपरग्लायसेमिया, किंवा रक्तातील साखरेची पातळी वाढणे, गरोदरपणात सामान्य आहे. हा मधुमेहाचा परिणाम आहे, मधुमेह झाल्यावर इन्सुलिन हार्मोन कार्यक्षमतेने रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवत नाही. त्यामुळे रक्तप्रवाहात जास्त साखर येते. परंतु, मधुमेहावरील औषधे, जसे की इन्सुलिन इंजेक्शन्समुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. ही इन्सुलिन इंजेक्शन्स शरीरातील रक्तातील साखरेची पातळी आवश्यकतेपेक्षा कमी करू शकतात, त्यामुळे हायपोग्लाइसेमिया होतो. काही वेळा, तुमच्या गरोदरपणातील हार्मोनल बदलांमुळे मधुमेह असलेल्या स्त्रियांमध्ये हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. त्या इन्सुलिन घेत नसल्या तरीही असे होते. गरोदरपणात संतुलित आहार घेत आहात ना ह्याकडे लक्ष ठेवा. तसेच तुम्ही गर्भवती असून तुम्हाला मधुमेह असल्यास तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवा.

. गरोदरपणातील मधुमेह

गर्भावस्थेतील मधुमेह ही गरोदरपणातील एक स्थिती आहे. संप्रेरकांचा प्रभाव, गरोदरपणाचा ताण आणि इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे ही समस्या उद्भवते. ह्या कारणांमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. गर्भावस्थेतील मधुमेह हा मधुमेह असलेल्या आणि औषधोपचार घेत असलेल्या स्त्रियांमध्ये होण्याची शक्यता असते. अंदाजे 9% महिलांना त्यांच्या गरोदरपणात गर्भावस्थेतील मधुमेहाचा त्रास होतो, परंतु जन्म दिल्यानंतर ही स्थिती आपोआप दूर होते.

. वैद्यकीय परिस्थिती

मधुमेहाशिवाय गरोदरपणात अनेक वैद्यकीय समस्यांमुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. त्यांच्यापैकी काही समस्या तुमच्या गरोदरपणात आणि गर्भाच्या विकासामध्ये गुंतागुंत निर्माण करू शकतात, त्यामुळे योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. ह्या समस्यांमध्ये ग्लुकागन आणि कॉर्टिसॉल ह्या संप्रेरकांचे असंतुलन, तीव्र हिपॅटायटीस, अवयव निकामी होणे, एन्झाइमची कमतरता, स्वादुपिंडाच्या गाठी इत्यादींचा समावेश होतो.

. औषधोपचार

इन्सुलिन व्यतिरिक्त, मधुमेहावरील इतर औषधे रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. सल्फोनील्युरिया आणि मेग्लिटिनाइड्स यांसारखी तोंडातून घेता येण्यासारखी औषधे मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरली जातात आणि त्यामुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी इतर अनेक औषधे देखील वापरली जातात, उदा: सल्फोनामाइड्स, पेंटामिडीन, क्विनाइन आणि सॅलिसिलेट्स.

पण, गरोदरपणात हायपोग्लायसेमिया आहे हे कसे कळेल? काही चिन्हे आणि लक्षणे वाचण्यासाठी तुम्हाला त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे

गरोदरपणात रक्तातील साखर कमी झाल्याची चिन्हे आणि लक्षणे

साखर शरीरातील अनेक चयापचय प्रक्रियांसाठी ऊर्जेचा स्त्रोत असल्याने, रक्तातील कमी साखरेमुळे अनेक लक्षणे दिसून येतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

    1. थंड रात्री घाम येतो
    2. वारंवार भयानक स्वप्ने
    3. रात्री चांगली झोप घेऊनही थकवा
    4. सकाळी उठण्यास त्रास होतो

गर्भवती महिलांमध्ये रक्तातील कमी साखरेचे निदान

गर्भावस्थेतील मधुमेहाची सामान्यत: दुसऱ्या तिमाहीत चाचणी केली जाते, परंतु जर स्त्रियांना मधुमेहाची लक्षणे दिसून आली, तर आणखी चाचण्या आवश्यक असू शकतात. तुम्हाला मधुमेह नसल्यास, तुमचे डॉक्टर तुमच्या हायपोग्लायसेमियाचे कारण ओळखण्यासाठी अधिक रक्त चाचण्या करून घेण्यास सांगू शकतात. पुढे, डॉक्टर तुम्हाला तुमचा वैद्यकीय इतिहास, आहार, व्यायाम दिनचर्या, आणि याविषयी तपशीलवार वर्णन सादर करण्यास सांगू शकतात.

गरोदरपणावर हायपोग्लायसेमियाचे होणारे परिणाम

गरोदरपणातील हायपोग्लायसेमियाचा परिणाम आई आणि बाळ दोघांवर होऊ शकतो.

. आईवर होणारे परिणाम

हायपोग्लाइसेमियाच्या गंभीर प्रकरणांमध्ये हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असू शकते. पुढे, गरोदरपणात मधुमेह झाल्यास प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे बाळाला जन्म देताना संभाव्य जखमा होतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी हायपोग्लायसेमिक हल्ला होऊ शकतो. ह्या स्थितीमध्ये रक्तातील साखरेची पातळी प्रति मिलीलीटर 300 मायक्रोग्रामपर्यंत खाली येऊ शकते. यामुळे झटके येऊ शकतात आणि अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, स्त्री कोमामध्ये जाऊ शकते.

. बाळावर होणारे परिणाम

गरोदरपणात रक्तातील कमी साखरेचा बाळाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो - बाळामध्ये शारीरिक आणि मानसिक विकृती, जन्मतः कमी वजन आणि अश्याच काही समस्या उद्भवू शकतात. गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या गर्भवती स्त्रियांमध्ये कावीळ झालेल्या बाळांना जन्म देण्याचा धोका वाढतो. ह्या बाळांमध्ये अनेकदा रक्तातील साखरेची पातळी खूपच कमी असते आणि त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज भासू शकते.

हायपोग्लायसेमियाची तीव्रता कमी करण्यासाठी उपचार

जर हायपोग्लायसेमिया गंभीर असेल तर उपचाराच्या काही पद्धती वापरल्या जाऊ शकतात:

गरोदरपणात हायपोग्लायसेमियाचा त्रास होत असताना घ्यावयाची खबरदारी

हायपोग्लायसेमिया असलेल्या गर्भवती महिला या स्थितीचे नियमन करण्यासाठी काही खबरदारी घेऊ शकतात:

तुमच्या गरोदरपणात हायपोग्लायसेमिया वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. एक वेळचे जेवण चुकवले तरी सुद्धा गरोदरपणात हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. ह्या लेखात वर्णन केल्यानुसार तुम्हाला हायपोग्लायसेमियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास, कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून ते ह्या स्थितीचे अचूक निदान करू शकतील आणि उपचार करू शकतील. तुम्‍हाला हायपरग्लायसेमिया असल्‍यास गरोदरपणात रक्‍तातील साखर कशी कमी करायची हे जाणून घेण्यासाठी तुम्‍ही तुमच्‍या डॉक्‍टरांचा सल्ला घेऊ शकता.

आणखी वाचा:

गरोदरपणात उच्चरक्तदाबाचे नियमन करण्यासाठी नैसर्गिक उपाय गरोदरपणातील रक्ताची सीबीसी (संपूर्ण रक्ताची गणना) चाचणी

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved