गर्भारपण

गरोदरपणात होणारा हिरवा स्त्राव

गरोदरपणात योनीमार्गातून होणारा हिरव्या रंगाचा स्त्राव ही एक वैद्यकीय समस्या आहे. हा त्रास जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो. गरोदरपणात, जर तुमच्या योनीतून होणारा स्त्राव हिरव्या रंगाचा असेल आणि त्याला विचित्र वास येत असेल तर ते काळजीचे कारण असू शकते. गरोदर असताना हिरव्या रंगाचा स्त्राव झाल्यास कुणालाही भीती वाटू शकते. निरोगी आणि सुदृढ बाळासाठी ज्या स्त्रिया स्वतःच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घेतात, अश्या स्त्रियांना ही भीती जास्त वाटू शकते. गरोदरपणात योनीतून हिरवा स्त्राव होण्याची अनेक कारणे आहेत, त्या कारणांची चर्चा खाली केलेली आहे.

हिरवा स्त्राव म्हणजे काय?

स्त्रीच्या आयुष्याच्या, तिच्या प्रजननक्षम काळात, योनीतून स्त्राव होणे खूप सामान्य आहे. हा स्त्राव पांढऱ्या रंगाचा असतो. परंतु, संसर्ग झाल्यावर योनीतून होणाऱ्या स्त्रावाचा रंग बदलतो. हिरवा स्त्राव हा योनीतून होणाऱ्या स्त्रावाचा एक प्रकार आहे. हा स्त्राव प्रामुख्याने गरोदरपणात दिसून येतो. 'ट्रायकोमोनियासिस' म्हणून ओळखल्या जाणार्‍या लैंगिक संसर्गामुळे हा स्त्राव होतो. गरोदरपणात हा हिरवा स्त्राव नेहमीच्या पांढर्‍या स्त्रावापेक्षा वेगळा असतो आणि हे संसर्गाचे लक्षण आहे. नेहमीच्या स्त्रावापेक्षा ह्या हिरव्या स्त्रावाचा पोत जाड असतो आणि त्यास तीव्र गंध असतो. त्यामुळे वेदना होऊन खाज सुटते. व्हरडोपेरॉक्सीडेस नावाच्या संप्रेरकांमुळे देखील असे होऊ शकते. योनीमार्गात मस (व्हजायनल वॉट) झाल्यावर सुद्धा हिरवा स्त्राव होण्याची शक्यता असते. लैंगिक संक्रमित रोग योनीमध्ये विषाणूजन्य संसर्गास कारणीभूत ठरू शकतो, आणि त्यामुळे योनिमार्गात मस्से (व्हजायनल वॉट) होऊ शकतात.

गरोदरपणात योनीतून हिरवा स्त्राव होणे सामान्य आहे का?

नाही, गरोदरपणात योनीतून हिरवा स्त्राव होणे सामान्य नाही. गरोदर स्त्रियांच्या योनीमार्गातून बहुतेकदा  पातळ आणि दुधासारखा स्त्राव होतो. त्याला सौम्य गंध येतो. हा स्त्राव ल्युकोरिया म्हणून ओळखला जातो.  गरोदरपणात सामान्य असतो.

गरोदरपणात  योनीतून हिरव्या रंगाचा स्त्राव होण्याची कारणे

बहुतेक प्रकरणांमध्ये, योनीतून हिरवा स्त्राव ट्रायकोमोनास योनिनालिस नावाच्या परजीवीमुळे होतो. त्याला  काहीवेळा "ट्रायच" म्हणून ओळखले  जाते. परंतु त्यामागे इतर लैंगिक संक्रमित रोग किंवा कारणे देखील आहेत. त्यामुळे हिरव्या स्रावाची समस्या उद्भवू शकते. गरोदरपणात योनीतून हिरवा स्त्राव होण्याची काही इतर कारणे खालीलप्रमाणे आहेत.

1. पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज

पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज (PID) हा एक जुनाट आजार आहे. स्त्रीच्या प्रजनन प्रणालीवर ह्याचा परिणाम होतो. हा डिसीज गोनोरिया आणि क्लॅमिडीया मुळे होतो. जेव्हा एखादी स्त्री गोनोरिया किंवा क्लॅमिडीयाने संक्रमित व्यक्तीशी संभोग करते तेव्हा हा आजार होतो.

2. बॅक्टेरियल व्हजायनॉसिस

एक प्रकारचा जिवाणू आहे. योनीमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंच्या अति वाढीमुळे अश्या प्रकारचा संसर्ग होतो. या संसर्गामुळे योनीतल्या स्त्रावाचा रंग बदलू शकतो आणि त्याला तीव्र वास येतो.

3. क्लॅमिडीया

क्लॅमिडीया हा क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा अल्पकालीन लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. हा संसर्ग असलेल्या स्त्रीला योनीतून असामान्य स्त्राव होतो. आणि त्यास तीव्र गंध असू शकतो

4. परदेशी वस्तू

योनिमार्गात टॅम्पन किंवा टिश्यू पेपरचे तुकडेही जास्त काळ घातल्याने योनीतून हिरवा स्त्राव होऊ शकतो.

5. गोनोरिया

हा लैंगिक संक्रमित रोग निसेरिया गोनोरिया या जिवाणूपासून होतो. स्त्रीला कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संपर्कामुळे गोनोरिया होऊ शकतो: ओरल सेक्स किंवा गुदद्वारासंबंधीचा संभोग ह्यामुळे असा त्रास होऊ शकतो.

6. ग्रीवाचा संसर्ग

गर्भाशय ग्रीवाचा संसर्ग हे आणखी एक कारण आहे. त्यामुळे योनीमार्गातून असामान्य स्राव होऊ शकतो. योग्य चाचण्या वापरून तो ओळखला जाऊ शकतो.

हिरवा स्त्राव झाल्याने गर्भपात होऊ शकतो का?

गरोदरपणात हिरवा स्त्राव होण्याचे एक कारण गोनोरिया हे असू शकते. हा जिवाणू लैंगिक संक्रमित संसर्ग असल्याने, गरोदरपणात तसेच प्रसूतीदरम्यान बाळासाठी आणि आईसाठी ते जीवघेणे ठरू शकते. गरोदरपणात नीट उपचार केले नाहीत तर गर्भपात, अकाली जन्म आणि जन्मतः बाळाचे कमी वजन भरणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

हिरवा स्त्राव काय दर्शवतो?

गरोदर असताना योनीतून हिरवा स्त्राव होणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे आणि ही नेहमीची घटना आहे. गरोदरपणात अनेक शारीरिक बदल होत असतात त्यामुळे असे होते. ते पूर्णपणे निरोगी आणि सामान्य आहे. परंतु, योनीतून होणारा सामान्य स्त्राव आणि असामान्य स्त्राव ह्यातील फरक समजणे महत्वाचे आहे. शिवाय, जर योनीतून होणाऱ्या स्त्रावाचा रंग पिवळसर हिरवा असेल, स्त्रावाचा पोत नेहमीपेक्षा घट्ट असेल,  त्यास तीव्र दुर्गंधी येत असेल,  वेदना होऊन खाज सुटत असेल किंवा जळजळ होणे ह्यासारखी अस्वस्थ करणारी लक्षणे असतील तर हिरवा स्त्राव होऊ शकतॊ. हिरव्या रंगाचा स्त्राव होणे हे संसर्गाचे लक्षण आहे. तसेच, जर हा स्त्राव जास्त प्रमाणात होत असेल तर, स्त्रीरोगतज्ञाशी चर्चा करणे गरजेचे आहे. हिरवा स्त्राव होणे हे खालील समस्यांचे लक्षण असू शकते.

1. मूत्रमार्गात संसर्ग

बहुतेकदा, योनीतून हिरवा स्त्राव होणे हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे लक्षण असते. गरोदरपणात गर्भाशयाची वाढ होत असते त्यामुळे मूत्राशयावर दबाव येतो. त्यामुळे मूत्राशयात मूत्र जमा होते आणि अनेकदा मूत्रमार्गात किंवा मूत्राशयाचा संसर्ग होतो. लघवी करताना जळजळ होणे हे मूत्राशयाच्या संसर्गाचे एक सामान्य लक्षण आहे.

2. लैंगिक संक्रमित रोग (STDs)

हिरवा स्त्राव होणे हे लैंगिक संक्रमित रोगांचा परिणाम असू शकतो. उदा: बॅक्टेरियल योनिओसिस (BV), व्हल्व्होव्हॅजिनल कॅंडिडिआसिस (VVC) किंवा ट्रायकोमोनियासिस इत्यादी. बॅक्टेरियल योनिओसिस (BV) ही एक वैद्यकीय स्थिती आहे आणि योनीची इकोसिस्टम जेव्हा बिघडते तेव्हा ही समस्या उद्भवते. परिणामी योनीमध्ये नैसर्गिकरित्या आढळलेल्या जीवाणूंची असामान्य वाढ होते. व्हल्व्होव्हॅजिनल कॅंडिडिआसिस ( यीस्ट इन्फेक्शन किंवा थ्रश) ही समस्या म्हणजे कॅन्डिडा नावाच्या यीस्ट सारख्या बुरशीचा परिणाम आहे. VVC स्त्रीला कोणत्याही वयात होऊ शकते परंतु हा त्रास गरोदरपणात होण्याची शक्यता जास्त असते. BV प्रमाणे, योनीचे संतुलन बिघडल्यावर व्हल्व्होव्हॅजिनल कॅंडिडिआसिसचा त्रास देखील सुरू होतो

3. अम्नीओटिक द्रवपदार्थ गळती

अम्नीओटिक द्रवपदार्थाला कॅमेरॉनचा द्रव देखील म्हणतात. वाढत्या गर्भाला आधार देण्यासाठी ते संरक्षणात्मक द्रव म्हणून काम करते. कधीकधी, गरोदरपणात, ह्या द्रवपदार्थामुळे योनीतून होणारा स्त्राव हा पिवळ्या-हिरव्या रंगाचा दिसू शकतो.

उपचार

बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणारा हिरवा स्त्राव बरा होण्यासारखा आहे आणि ती फक्त एक किरकोळ समस्या आहे. मेट्रोनिडाझोल, टिनिडाझोल आणि क्लियोसिन यांसारखी अनेक अँटी-फंगल आणि अँटीबायोटिक औषधे तुम्हाला या समस्येपासून आराम देऊ शकतात. ट्रायकोमोनासमुळे होणाऱ्या संसर्गावरही ही औषधे जादूचे काम करतात. टीप: हे औषध डॉक्टरांच्या संमतीनंतरच घ्यायचे आहेत.

योनीतून होणाऱ्या हिरव्या स्रावावर उपचार म्हणून काय करावे?

योनीतून हिरवा स्त्राव होत आहे असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञाशी नक्कीच बोलले पाहिजे. गरोदरपणात होणारा हिरवा स्त्राव हा जिवाणूंच्या संसर्गामुळे किंवा अम्नीओटिक द्रवपदार्थाच्या गळतीमुळे होत नाहीये असे तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले तर ह्या स्रावावर उपचार म्हणून तुम्ही फार काही करू शकत नाही. पण गरोदरपणात तुमचे आयुष्य थोडे आरामदायी बनवण्यासाठी तुम्ही पातळ पॅड किंवा पँटी लाइनर वापरू शकता. परंतु तुम्ही गरोदरपणात टॅम्पन्स वापरू नका कारण टॅम्पन्स स्त्राव शोषून घेतात. त्यामुळे कोणताही संसर्ग वाढू शकतो. या समस्येचा सामना करण्यासाठी आपण अनुसरण करू शकता अशा काही टिप्स येथे दिलेल्या आहेत:

1. योग्य स्वच्छता राखा

गरोदरपणात चांगली स्वच्छता राखणे खरोखर महत्वाचे आहे. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी तुमचे खाजगी भाग स्वच्छ आणि निरोगी ठेवा. प्रत्येक वेळी शौचालय वापरल्यानंतर तुमचे जननेंद्रिय आणि त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र स्वच्छ ठेवा. तुमचे जननेंद्रियाचे क्षेत्र स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग म्हणजे पुढून मागे पुसावे. तसेच, पॅड बदलण्याकडे लक्ष द्या. तुमचे पॅड पूर्णपणे भिजले आहे की नाही याची पर्वा न करता दर चार तासांनी तुमचे पॅड बदलणे हा योग्य मार्ग आहे.

2. डचिंग टाळा

वैद्यकीय तज्ञ गरोदरपणात डचिंग टाळण्यास सांगतात. कारण त्यामुळे योनिमार्गातील जीवाणूंचे नैसर्गिक संतुलन बिघडवते. ह्याला "व्हजायनल  फ्लोरा" देखील म्हणतात. योनिमार्गातील जीवाणूंच्या असंतुलनामुळे तसेच तुमच्या शरीरातील हानिकारक जीवाणूंच्या वाढीमुळे तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता असते. योनिमार्गातील संसर्ग किंवा बॅक्टेरियल व्हजायनोसिस ह्यामुळे मुदतपूर्व प्रसूती आणि लैंगिक संक्रमित संसर्गाचा धोका वाढवू शकतो.

3. कॉटन अंडरपँट्स घाला

शुद्ध कॉटन फॅब्रिकपासून बनवलेली अंडरपॅन्ट घाला. कॉटनचे कापड घाम चांगल्या प्रकारे शोषून घेते.  त्यामुळे इतर जिवाणू तेथे वाढणे कठीण होते.

4. बबल बाथ घेणे टाळा

बबल बाथमुळे तुमच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये जळजळ किंवा खाज येऊ शकते. त्यामुळे योनिमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून, गरोदरपणात बबल बाथ घेणे टाळा. तसेच, सुगंध नसलेले साबण आणि बॉडी वॉश वापरणे चांगले आहे, कारण त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे त्रास होऊ शकतो.

स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला कधी घ्यावा?

गरोदरपणात योनीतून स्त्राव अनुभवणे अगदी सामान्य असले तरी, काही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असू शकते. तुमच्या योनीतून स्त्राव वाढल्याचे दिसल्यास तुम्ही क्लिनिकमध्ये जावे. श्लेष्मासारख्या पोत असलेल्या जाड स्त्रावमुळे एक अप्रिय वास येतो. ह्या स्त्रावाचा  रंग पिवळसर-हिरवा असू शकतो. या लक्षणांकडे लक्ष द्या आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लघवी करताना किंवा तुमच्या जोडीदारासोबत लैंगिक संभोग करताना वेदना होत असताना अशा स्त्रावामुळे तुम्हाला वेदना होऊ शकतात. सामान्यतः, जिवाणूंच्या संसर्गावर योग्य काळजी घेऊन आणि तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिजैविकांच्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात.

खालील प्रश्न तुमचे डॉक्टर तुम्हाला विचारू शकतात

ह्या समस्येसाठी डॉक्टरांकडे केल्यानंतर, तुमची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला काही फॉलो-अप प्रश्न विचारू शकतात. तुमच्या डॉक्टरांकडून तुम्हाला अपेक्षित असलेले काही प्रश्न येथे दिलेले आहेत:

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. कोणत्या एसटीआयमुळे योनीतून हिरवा स्त्राव होतो?

गोनोरिया, ट्रायकोमोनियासिस आणि क्लॅमिडीया हे तीन ज्ञात एसटीआय आहेत ज्यामुळे तुम्हाला  गरोदरपणात हिरव्या स्त्रावाचा त्रास होऊ शकतो.

2. तुमच्या योनीतून हिरवा दुर्गंधीयुक्त स्त्राव का होतो?

हिरवा स्त्राव योनीमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला बॅक्टेरियल योनिओसिस नावाच्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. ह्या स्रावाला माशासारखी दुर्गंधी येते. हिरवा स्त्राव हे चिंतेचे कारण आहे. परंतु त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला कोणताही धोका नसतो. समस्या दीर्घकाळ राहिल्यास तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोला - तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम मार्गदर्शन करतील! आणखी वाचा: गरोदरपणातील पिवळा स्त्राव गरोदरपणातील तपकिरी रंगाचा स्त्राव
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved