बाळ

बाळासाठी निलगिरी तेलाचा वापर करणे सुरक्षित आहे का?

पूर्वीपासून विविध आजारांवर उपचार करण्यासाठी इसेन्शिअल ऑईल्स वापरली जात आहेत. ह्या तेलांमध्ये विविध औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. श्वसनाच्या समस्यांवर घरगुती उपाय म्हणून वापरले जाणारे असेच एक तेल म्हणजे निलगिरीचे तेल होय. ह्या तेलामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म आहेत. ह्या तेलाचे विविध फायदे आहेत. जर तुमच्या बाळाला सर्दी किंवा कफ होत असेल तर तुम्हाला ते वापरण्याचा मोह होईल, परंतु तुम्ही हे निलगिरीचे तेल बाळासाठी वापरावे का? बऱ्याच पालकांना बाळासाठी हे निलगिरीचे तेल वापरावे कीं नाही ह्याबद्दल शंका आहे. हे तेल तुमच्या लहान बाळासाठी सुरक्षित आहे की नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

निलगिरी तेलविषयी माहिती?

निलगिरीचे तेल निलगिरीच्या झाडांच्या पानांपासून मिळते. निलगिरीचे तेल औषधांमध्ये सुगंधी द्रव्य म्हणून वापरले जाते आणि त्याचे काही इतर फायदे देखील आहेत. हे तेल म्हणजे एक रंगहीन द्रव आहे आणि त्याला एक गोड आणि लाकडाचा तीव्र वास आहे. जगात निलगिरीच्या 700 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात, त्यापैकी फक्त 500 विषम प्रजाती तेल तयार करण्यासाठी वापरल्या जातात.

निलगिरी तेलाचे घटक आणि तपशील

घटक श्रेणी
सिनेओल >70%
कापूर <0.1%
सबिनेन <0.3%
(अल्फा) पिनेन 9%
(बीटा) पिनेन <1.5%
(अल्फा)- फेलँड्रीन <1.5%
(डेल्टा) - लिमोनिन 12%

निलगिरी तेल वापरण्याचे काही फायदे आहेत का?

निमोनिया, ब्राँकायटिस, खोकला, सर्दी आणि इतर श्वसन रोगांवर उपचार करण्यासाठी निलगिरीचे तेल नैसर्गिक उपचार म्हणून वापरले जाते. हे तेल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते. हे तेल श्वसनासंबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. ह्या तेलामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. निलगिरी तेलामध्ये असलेले सिनेओल हे एक सेंद्रिय संयुग आहे. ह्या तेलामुळे वेदना आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. निलगिरीच्या तेलाचा खालील समस्यांवर उपचार करण्यास मदत होते:

निलगिरीचे तेल लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का?

म्हणून, सहा वर्षांखालील मुलांसाठी निलगिरीचे तेल वापरू नये.

सर्दीसाठी निलगिरी तेल वापरणे

जर तुम्हाला निलगिरीचे तेल बाळाच्या बंद नाकावर वापरायचे असेल तर ते वापरण्याचा, योग्य आणि सुरक्षित मार्ग जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, तुमच्या लहान बाळासाठी कोणत्या प्रकारचे निलगिरीचे तेल सुरक्षित आहे हे सुद्धा तुम्ही माहिती करून घेतले पाहिजे. तुम्ही मुलांसाठी युकॅलिप्टस ग्लोब्युलस वापरणे टाळावे, कारण ते 2 वर्षांखालील मुलांसाठी सुरक्षित नाही. युकॅलिप्टस रेडिएटा वापरले जाऊ शकते, (कृपया या माहितीची पडताळणी करा) पण तरीही हे बालरोगतज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतरच ते वापरावे. कोणत्याही तेलाच्या फायद्यांविषयीचे वैज्ञानिक पुरावे किंवा अभ्यास फारच कमी आहेत.

लहान मुलांसाठी निलगिरीचे तेल कसे वापरावे?

तुम्ही खबरदारी घेतल्यास तुमच्या बाळाच्या नाकपुड्यातील वायुमार्ग शांत करण्यासाठी आणि उघडण्यासाठी तुम्ही निलगिरी तेल वापरू शकता. जरी निलगिरीचे तेल काही सावधगिरीने वापरले जाऊ शकते, तरीही त्याच्या साइड इफेक्ट्समुळे बाळासाठी याची शिफारस केली जात नाही. म्हणून येथे काही पर्यायी पद्धती आहेत ज्या तुम्ही निलगिरी तेल वापरण्याऐवजी वापरून पाहू शकता.

बाळाच्या सर्दीवर उपचार करण्यासाठी निलगिरी तेलाचे पर्याय

बाळाच्या सर्दीवर उपचार करण्यासाठी कोणतेही तेल वापरण्याऐवजी, तुम्ही तुमच्या बाळाला बरे वाटण्यासाठी खालील पद्धती वापरून बघू शकता. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

1. नेझल ऍस्पिरेटर

बाळाच्या नाकातील श्लेष्मा साफ करण्यासाठी नेझल ऍस्पिरेटरचा वापर केला जाऊ शकतो. हे उपकरण वायुमार्ग साफ करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते जेणेकरुन मूल श्वास घेऊ शकेल.

2. हॉट वॉटर कॉम्प्रेस

गरम पाण्याच्या कॉम्प्रेसचा वापर केल्याने तुमच्या बाळाचे नाक, घसा किंवा त्याच्या छातीत अडथळा आणणारा घट्ट श्लेष्मा मोकळा होऊ शकतो. गरम पाण्यात बुडवलेले छोटे सूती कापड घ्या आणि जास्तीचे पाणी पिळून काढा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी प्रभावित भागावर गरम पाण्याचा कॉम्प्रेस लावा. लक्षात ठेवा की तुम्ही गरम कापड थेट तुमच्या बाळाच्या छातीवर लावू नये. शिवाय, कापड उबदार असावे अन्यथा तुमच्या बाळाला दुखापत होऊ शकते.

3. बेबी रब

सर्दीसाठी हर्बल बेबी रब वापरल्याने बाळाला कफ झाल्यास तो दूर होण्यास मदत होते आणि तुमच्या बाळाला आराम मिळू शकतो. ते वापरणे सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही घटक तपासले आहेत का हे पहा. तुमच्या बाळासाठी बेबी रब चा चांगला ब्रँड वापरा. वापरण्याआधी पॅकेजिंग वरील माहिती जरूर वाचा.

तुमच्या बाळासाठी निलगिरीचे तेल वापरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा

निलगिरीच्या तेलाचे अनेक फायदे आहेत ह्यात काही शंका नाहीत परंतु हे तेल मुलांसाठी, विशेषतः 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी योग्य नाही. लहान मुलांसाठी निलगिरीचे तेल वापरल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम सौम्य ते गंभीर स्वरूपाचे असू शकतात. जर तुम्ही तुमच्या बाळाला निलगिरीचे तेल वापरत असाल आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. निलगिरीचे तेल पातळ करून वापरल्यास बाळाला इजा होणार नाही असे काही लोकांना वाटते परंतु ते योग्य नाही. अगदी पातळ केलेले निलगिरीचे तेल देखील बाळाला हानी पोहोचवू शकते. लक्षात ठेवा: नीलगिरीचे तेल लहान मुलांसाठी सुरक्षित नाही. म्हणूनच, तुम्ही हे निलगिरीचे तेल लहान मुलांसाठी वापरणे टाळले पाहिजे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. बाळाच्या आंघोळीत निलगिरीचे तेल घालणे सुरक्षित आहे का?

तुमच्या लहान मुलाच्या आंघोळीच्या पाण्यात निलगिरीचे तेल टाकल्यास अपघातीपणे ते बाळाच्या नाकातोंडात जाऊ शकते आणि ते बाळासाठी हानिकारक आहे. म्हणून, हे तेल न वापरण्याचा सल्ला दिला जातो.

2. नीलगिरीचे तेल लहान मुलांची त्वचा उजळ करते का?

नाही, नीलगिरीचे तेल लहान मुलांची त्वचा उजळ करीत नाही. खरं तर, हे तेल तुमच्या बाळाच्या त्वचेला लावल्याने ऍलर्जी आणि पुरळ उठू शकतात.  त्यामुळे लहान मुलांसाठी निलगिरीचे तेल वापरणे टाळले पाहिजे.

3. बाळाचे वाहणारे नाक कमी करण्यासाठी निलगिरीचे तेल प्रभावी आहे का?

निलगिरी तेलामुळे सर्दी आणि कफ कमी होतो, परंतु हे तेल तुमच्या बाळासाठी वापरणे सुरक्षित नाही. ह्या तेलामुळे त्वचेची जळजळ होण्यापासून ते श्वासोच्छवासाच्या समस्यांपर्यंत अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून, तुमच्या बाळाच्या सर्दीसाठी दुसरे उपाय करून पहा. निलगिरीचे तेल अगदी कमी प्रमाणात किंवा पातळ करून वापरल्याने सुद्धा लहान मुलांमध्ये गंभीर प्रतिक्रिया येऊ शकतात,  त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या बाळाची सर्दी दूर करण्यासाठी शिफारस केलेल्या पर्यायी उपायांपैकी एक वापरून पहा. तुमचे बाळ अस्वस्थ असल्यास तुम्हाला तुमच्या बाळाकडे बघून वेदना तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही मदतीसाठी सर्व संभाव्य मार्ग शोधू शकता. परंतु तुम्हाला वाटते तितके निलगिरी तेल तुमच्या बाळासाठी सुरक्षित नाही. जर तुमचे बाळ अस्वस्थ असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. आणखी वाचा: बाळाच्या मालिशसाठी ऑलिव्ह ऑईल वापरण्याचे फायदे तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी नारळाच्या तेलाचे सर्वोत्तम फायदे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved