आहार आणि पोषण

गरोदरपणात गुळ (जागरी) खाणे

गर्भारपण सुरळीतपणे पार पडण्यासाठी, गर्भवती स्त्रीचा आहार निरोगी आणि पौष्टिक असणे गरजेचे असते. अन्नपदार्थांचा आहारात समावेश करण्यापूर्वी त्यांचे पौष्टिक मूल्य समजून घेणे महत्वाचे आहे. काही पदार्थ खाऊन , गरोदरपणात सामान्यपणे आढळणाऱ्या हार्मोनल असंतुलनाचे व्यवस्थापन तुम्ही करू शकता, तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती सुधारू शकता. तसेच जळजळ आणि वेदना सुद्धा कमी होण्यास त्यामुळे मदत होऊ शकते . गरोदर स्त्रीसाठी फायदेशीर ठरू शकणारा अन्नपदार्थ म्हणजे गूळ.

गरोदरपणात गूळ खाणे सुरक्षित आहे का?

अनेक लोक गुळाला ग्लुकोजचा एक चांगला स्रोत मानतात. गुळ म्हणजे साखरेचे नैसर्गिक आणि प्रक्रिया न केलेले रूप आहे असे मानले जाते. तुम्ही कुठल्या प्रकारच्या साखरेचे सेवन करत आहात हे लक्षात न घेता खूप जास्त प्रमाणात ग्लुकोजचे सेवन केल्यास तुमच्यासाठी ते हानिकारक ठरू शकते. तर, गरोदरपणात आपण गूळ खाऊ शकतो का? उत्तर होय आहे, परंतु तो प्रमाणात खाणे आवश्यक आहे. गुळामध्ये आवश्यक खनिजे आणि लोह असते.  ते तुमच्या गर्भारपणासाठी फायदेशीर ठरू शकते. मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास, गुळ तुमच्या गरोदरपणासाठी आरोग्यदायी असू शकतो कारण त्यामुळे तुमचे रक्त स्वच्छ होण्यास आणि ऍनिमियापासून बचाव होण्यास मदत होते.

गुळाचे पौष्टिक मूल्य

प्रत्येक पदार्थ खाताना त्यामधील पौष्टिक मूल्य जाणून घेणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, गूळ लोहाने समृद्ध आहे, त्यात भरपूर खनिजे आहेत, पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे. मर्यादित प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास गुळापासून योग्य प्रमाणात ग्लुकोज मिळते. 100ग्रॅम गुळातील पौष्टिक घटक खाली दिले आहेत. *RDI - शिफारस केलेले आहाराचे सेवन

गरोदर असताना गुळ खाण्याचे आरोग्यविषयक फायदे

गुळाचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत.  म्हणून, गरोदरपणात गुळ खाण्याची शिफारस केली जाते. खाली गुळाचे काही फायदे दिले आहेत.

1. ऍनिमिया प्रतिबंधित करते

लोहाच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होऊ शकतो.  गुळात लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ऍनिमिया टाळण्यासाठी मदत होते.

2. रक्त शुद्ध करते -गुळामध्ये असंख्य अँटी

बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि त्याची रक्त शुद्ध करण्यासाठी मदत होते. संक्रमण टाळण्यासाठी सुद्धा गुळाची मदत होते. कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या प्रत्येकासाठी गुळ पौष्टिक आहे. गरोदरपणात होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या गर्भवती महिलांसाठी गुळ विशेष फायदेशीर आहे.

3. हाडांचे आरोग्य

गुळातील काही गुणधर्मांमुळे हाडांची घनता सुधारण्यास मदत होते. गर्भवती स्त्रियांसाठी  गुळ खूप उपयुक्त ठरू शकते.

4. पाणी धारणा कमी करण्यास मदत करते

पाणी धारणा ही गरोदरपणातील समस्या आहे. गुळामध्ये भरपूर पोटॅशिअम असते. त्यामुळे ह्या समस्येचा सामना  करण्यास मदत होते.

5. जळजळ कमी करते

गुळात काही विशिष्ट दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. त्यामुळे तुमच्या गरोदरपणाच्या उत्तरार्धात होणारी जळजळ कमी करण्यासाठी गुळाची मदत होऊ शकते.

6. इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते

गुळामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते. पोटॅशियम तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन करण्यास मदत करते. गरोदरपणात गूळ कसा खावा आणि आरोग्यासाठी त्याचा किती प्रमाणात उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला. गरोदरपणात गुळाचे इतर कोणते फायदे आहेत हे समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

गरोदर स्त्रीने गुळ खाल्ल्यास बाळाचे वजन कमी भरते का?

गुळामुळे कमी वजनाची बाळे जन्माला येण्याची शक्यता कमी असते. गरोदरपणात जर तुमची जीवनशैली निरोगी नसेल आणि तुम्ही खूप जास्त प्रमाणात गुळाचे सेवन करत असाल तर बाळाचे वजन कमी होऊ शकते असा बऱ्याच डॉक्टरांचा विश्वास आहे. गुळाचे योग्य प्रमाणात सेवन करून निरोगी जीवनशैली अंगिकारल्यास ह्या समस्येचा सामना केला जाऊ शकतो. गरोदरपणात तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काय बदल करावे लागतील याविषयी अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गर्भवती स्त्रियांसाठी झटपट होणाऱ्या गुळाच्या स्वादिष्ट पाककृती

गुळाचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकते. येथे काही स्वादिष्ट आणि झटपट पाककृती आहेत. ह्या पाककृती गरोदर स्त्रिया करून पाहू शकतात आणि त्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

1. नाचणी आणि गुळाची बिस्किटे

साहित्य कृती
 1. नाचणीचे पीठ कोरड्या कढई मध्ये 10मिनिटे भाजून घ्या. नंतर एका भांड्यात थंड होण्यासाठी बाजूला ठेवा
 2. पीठ थंड होत असताना वेगळ्या भांड्यात गव्हाचे पीठ, गूळ, ओट्स, बेकिंग पावडर आणि बटर घाला. हे चांगले एकत्र करा आणि थंड झाल्यावर त्यामध्ये नाचणीचे पीठ घालून एकत्र करा
 3. त्यामध्ये 1चमचा दूध घाला आणि पीठ मळून घ्या. पीठ क्लिंग रॅपमध्ये गुंडाळा आणि अर्धा तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा
 4. दरम्यान, ओव्हन 160°C वर प्रीहीट करा
 5. आता पीठ बाहेर काढून आणि पिठाचे लहान गोळे करा. आपल्या हातांनी पिठाचा प्रत्येक गोळा सपाट करा आणि ट्रेवर ठेवा आणि 15-20 मिनिटे बेक करा
 6. थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. चहा किंवा कॉफी बरोबर सर्व्ह करा

2. प्लांटेन जागरी चिप्स

साहित्य कृती
 1. केळी सोलून त्यांना लांबीच्या दिशेने कापून घ्या आणि नंतर त्यांचे लहान तुकडे करा
 2. कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात केळ्याचे तुकडे घाला आणि आच मध्यम करा
 3. केळ्याचे काप कुरकुरीत आणि लाल रंगाचे होईपर्यंत तळून घ्या
 4. काप बाहेर काढा आणि 30ते 60 मिनिटे थंड होऊ द्या
 5. नंतर एका पातेल्यात गुळाचा रस आणि आले पावडर घालून हे मिश्रण उकळून घ्या. जिरेपूड घालून मिक्स करा
 6. या मिश्रणात तळलेल्या केळ्यांचे काप घाला आणि त्यावर गुळाचा पाक घाला
 7. पॅन बाहेर काढून घ्या आणि त्यात पिठीसाखर घाला
 8. केळ्यांचे चिप्स थंड होऊ द्या आणि नंतर या गोड पदार्थाचा आनंद घ्या

3. शेंगदाणा आणि तिळाची चिक्की

साहित्य कृती
 1. शेंगदाणे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर शेंगदाण्याचे साल काढा. सर्व शेंगदाणे दोन भागांमध्ये विभाजित करा
 2. पांढरे तीळ सोनेरी-तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या
 3. एक भांडे गरम करून त्यात गूळ आणि तूप घालून गूळ वितळेपर्यंत शिजवा. पाण्याच्या संपर्कात आल्यावर गूळ घट्ट होतो की नाही हे तपासण्यासाठी पाण्याचा थेंब घाला. तसे झाल्यास, पुढची स्टेप करा
 4. गॅस बंद करा,  भांड्यात शेंगदाणे आणि तेल घाला आणि चांगले एकत्र करून घ्या
 5. एक थालीपीठ घेऊन त्यावर तूप लावा. त्यावर गूळ, शेंगदाणे, तिळ यांचे मिश्रण ओता
 6. मिश्रण प्लेटमध्ये एक सारखे पसरवा
 7. गूळ मऊ असतानाच चिक्कीचे तुकडे करा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या
 8. चिक्कीचे तुकडे काढून घ्या आणि या आरोग्यदायी स्नॅकचा आनंद घ्या!
कुठल्याही अन्नपदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तुमच्या आहारात कोणताही अन्नपदार्थ समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी आणि पोषणतज्ञांशी बोला. कोणताही अन्नपदार्थ कसा आणि किती प्रमाणात खाल्ला पाहिजे ह्याविषयी तुम्हाला सर्व माहिती असल्याची खात्री करा. आणखी वाचा: गरोदरपणात अंजीर खाणे गरोदरपणात तूप खाणे – फायदे, धोके आणि गैरसमज
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved