गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीतील योगासने आणि खबरदारी

जेव्हा तुमच्या गरोदरपणाची दुसरी तिमाही सुरु होईल तेव्हा तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळाचा सामना केल्यामुळे ह्या कालावधीला गोल्डन पिरियड म्हटले जाते! दुसऱ्या तिमाहीत, बऱ्याच स्त्रिया आरामशीर असतात कारण मॉर्निंग सिकनेसचा त्रास बराच कमी झालेला असतो, पोटात वाढणाऱ्या एका जीवाची उपस्थिती आता जाणवू लागलेली असते. जर तुम्ही आत्तापर्यंत प्रसवपूर्व योगास सुरुवात केली नसेल, तर असे करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. ६ महिन्यांच्या गरोदर स्त्रीसाठी योगा केल्याने सुरुवातीच्या काही महिन्यांत गमावलेली ऊर्जा मिळवण्यास मदत होते आणि गरोदरपणाच्या उर्वरित प्रवासासाठी मदत होते.

व्हिडिओ: गर्भधारणेच्या दुस-या तिमाहीत योग - वेगवेगळ्या स्थिती आणि खबरदारी

https://youtu.be/qdCWbJRbli0

गर्भधारणेच्या दुस-या तिमाहीत योगाभ्यास करणे सुरक्षित आहे का?

अगदी सुरक्षित आहे! दुस-या तिमाहीच्या आसपास, स्त्रियांनी त्यांच्या गरोदरपणाशी आणि शारीरिक बदलांशी जुळवून घेतलेले असते. योगासने केल्याने, तुमच्या प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. रक्ताभिसरण होण्यास मदत होते आणि पचन सुधारते. बाळाच्या जन्माच्या वेळी आपले शरीर मजबूत राहण्यासाठी ते आवश्यक आहे. शिवाय, प्रसवपूर्व योगा वर्गात प्रवेश घेतल्यास तुम्हाला इतर गर्भवती महिलांशी बोलण्यास आणि त्यांची गरोदरपणाची प्रगती कशी होत आहे हे जाणून घेण्यास मदत होते.

दुसऱ्या तिमाहीमध्ये योगाभ्यास करताना तुम्ही घ्यावयाची खबरदारी

तुमच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये योगाभ्यास करताना घेतली पाहिजे अशी खबरदारी खालीलप्रमाणे,

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत तुम्ही करून पहिली पाहिजेत अशी योगासने:

खालील योगासने स्त्रियांसाठी त्यांच्या दुसऱ्या तिमाहीत योग्य मानली जातात:

. विष्णुआसन (साईड लेग पोझ)

हे आसन छान आणि आरामदायी आहे.

कसे करायचे?

फायदे

हा व्यायाम हॅमस्ट्रिंग स्नायू, ओटीपोट आणि मांडीच्या आतील भागांना आराम देतो, ह्या आसनामुळे स्नायूंवर चांगला ताण येतो आणि लवचिकता वाढते.

. वीरभद्रासन (वॉरिअर पोझ)

हे आसन आईला अधिक मजबूत करण्यासाठी आणि आत्मविश्वास देण्यासाठी योग्य आहे!

कसे करायचे?

फायदे

पाठ, घोटे, गुडघे आणि खांदे यासह संपूर्ण शरीरातील स्नायूंना बळकट करण्यासोबतच आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे.

. त्रिकोणासन (द ट्रायंग्युलर पोझ)

हे आसन त्रिकोण ह्या भौमितिक आकाराच्या स्थिर स्वरूपाचा संदर्भ देते.

कसे करायचे?

फायदे

ह्या आसनामध्ये स्ट्रेचिंगमुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढण्यास आणि वेदना होत असतील तर त्या कमी होण्यास मदत होते.

. कोनासन (द साईड अँगल पोझ)

हे आसन त्रिकोणासनाचाच एक प्रकार आहे. प्रक्रिया भिन्न आहे.

कसे करायचे?

फायदे

ह्या व्यायामाचा थेट मणक्यावर परिणाम होतो आणि पाठीवरचा ताण कमी होतो.

. ऊर्ध्व हस्तासन (स्टँडिंग अपवर्ड स्ट्रेच)

उर्ध्व हस्तासनामध्ये हात आणि खांद्याचे स्नायू ताणण्यावर मुख्य लक्ष केंद्रित केले जाते.

कसे करायचे?

फायदे

ह्या आसनामुळे पाठ आणि खांद्यावर आलेला कोणताही जडपणा लगेच दूर होतो. लयबद्ध श्वासोच्छवासामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढण्यास मदत होते.

. ताडासन (पाम ट्री पोझ)

उष्णकटिबंधीय झाडासारखी ही आसनस्थिती दिसत आहे ना? हे आहे ताडासन,

कसे करायचे?

फायदे

संपूर्ण मणक्याला ताण बसतो, कडकपणा कमी होतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत संतुलन साधण्यास मदत होते.

. अधोमुख श्वानासन (डाऊनवर्ड डॉग पोज)

कुत्र्याच्या स्थितीची नक्कल करून, अधो मुख श्वानासन हे तुम्हाला बरे वाटण्यासाठी एक छान आसन आहे.

कसे करायचे?

फायदे

ह्या आसनामुळे तुमचे पाय मजबूत होतात. पचन आणि श्वासोच्छवास सुधारते. मानसिक शांतता मिळते.

. कंठ संचलन (नेक रोल्स)

हे आसन एकाच वेळी अनेक स्नायूंवर परिणाम करू शकते.

कसे करायचे?

फायदे

मान, खांदा आणि डोके यातील कोणताही जडपणा काही वेळातच निघून जाईल!

योगाचे फायदे विविध लोकांनी अनेक प्रकारे सांगितले आहेत. दुस-या तिमाहीत केलेली योगासने आईला निरोगी ठेवण्यासाठी आणि बाळाच्या जन्मासाठी शरीराला तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात. योग्यरित्या योगासने पूर्ण केल्यावर, तुम्हाला शांत वाटू शकते. तुम्ही निरोगी गर्भारपणाचा आनंद घेऊ शकता. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की तुमचे गर्भारपण निरोगी असेल आणि कोणत्याही वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेतील विकृतींचे निदान झाले नसेल तरच करावे. तुम्ही गरोदरपणात योगासने सुरू करण्यापूर्वी तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा:

दुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत करता येतील असे सुरक्षित व्यायामप्रकार

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved