In this Article
आपले दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र असावेत आणि चमकत राहावेत असे आपल्या सगळ्यांना वाटते. परंतु जर तुम्ही गरोदर असाल आणि दात ब्लिच करण्याची प्रक्रिया करून घेण्याचा विचार करत असाल तर ते सुरक्षित आहे की नाही हे आधी तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. काही स्त्रियांना गरोदरपणात, हिरड्यांची समस्या येते. दातांवर डाग पडतात किंवा दातांचा रंग बदलतो. कोणत्याही परिस्थितीत, गर्भवती महिलेने दातांच्या उपचारांबाबत डॉक्टरांशी संपर्क साधावा. हा लेख तुम्हाला दात ब्लीच करण्याबद्दल आणि गरोदरपणात त्याबाबतची सुरक्षा आणि धोके इत्यादी बाबतची माहिती देईल.
दातांचे ब्लीचिंग म्हणजे काय?
दातांचे ब्लीचिंग म्हणजे दातांना मुलामा चढवणे. दात पांढरेशुभ्र करण्यासाठी वापरले जाणारे ते एक तंत्र आहे. त्यामुळे दात चमकदार होतात. दात पांढरे करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला पर्याय म्हणजे व्हाईटनिंग टूथपेस्ट वापरणे आणि दुसरा म्हणजे त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे. तुम्ही टूथपेस्ट वापरत असाल किंवा एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेत असाल तरी सुद्धा, दात ब्लीच करण्यासाठी पेरोक्साइडचा वापर वेगवेगळ्या प्रमाणात केला जाईल.
गरोदर असताना तुम्ही तुमचे दात ब्लीच करू शकता का?
गरोदरपणात दात ब्लीच करणे किंवा पांढरे करणे ह्यामुळे आई किंवा बाळासाठी कोणतेही धोके आहेत याची पुष्टी करण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, परंतु गरोदर असताना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून, हे टाळणे चांगले असते. गरोदरपणात दात ब्लीच करण्याच्या धोकादायक परिणामांची पुष्टी करणारे पुरेसे पुरावे नाहीत. परंतु शरीरातील विशिष्ट एकाग्रतेपेक्षा जास्त पेरोक्साईड्समुळे ऊतींना दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. पेरोक्साइड टूथपेस्ट वापरताना हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण ते गिळले जाण्याचीही शक्यता जास्त असते. प्रसूतीपर्यंत ब्लीचिंग उपचार करणे थांबवणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे.
गरोदरपणात हिरड्यांना सूज येणे आणि दात स्वच्छ करणे
जर गरोदरपणात तुमच्या हिरड्यांना सूज आलेली असेल तर तुम्हाला तुमच्या गरोदरपणानंतर तुमचे दात ब्लिच करावे लागतील. गरोदरपणात संप्रेरकांमधील बदलांमुळे हिरड्या सूजतात. हे हार्मोन्स हिरड्यांमधील रक्ताभिसरण वाढवतात, त्यामुळे हिरड्यांची जळजळ होते आणि रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. दातांची स्वच्छता राखून तुम्ही हे टाळू शकता. जर तुम्हाला तुमचे दात स्वच्छ करायचे असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण दात स्वच्छ करणारे ब्लीचमधील पेरोक्साइड तुमच्या आधीच संवेदनशील असलेल्या हिरड्या खराब करू शकते.
गरोदरपणात वापरण्यास सुरक्षित असतील असे नैसर्गिक घटक
गरोदर असताना तुमचे दात रंगलेले किंवा डाग पडले असतील आणि तुम्हाला ते पांढरे स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही ते नैसर्गिक रित्या करू शकता. गरोदरपणात सुरक्षित अशी टीथ व्हाइटनर्सची यादी आहे. तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून तुम्ही ते वापरू शकता.
१. स्ट्रॉबेरी
एक ताजी स्ट्रॉबेरी घ्या आणि टूथपेस्टसह एका भांड्यात मॅश करा. तुमचे बोट किंवा टूथब्रश वापरून हे मिश्रण तुमच्या दातांवर लावा. पाच ते दहा मिनिटांनंतर, मिश्रण धुवा, नंतर दातांमध्ये अडकलेले कोणतेही स्ट्रॉबेरीचे तुकडे काढण्यासाठी ब्रश आणि फ्लॉस व्यवस्थित करा. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक ऍसिड असते, हे ऍसिड दातांचे डाग विरघळण्यास मदत करते. परंतु आपण ते जास्त काळ तसेच ठेवू नये, कारण मॅलिक ऍसिडचा दातांना मुलामा चढू शकतो.
२. संत्र्याची साल
तुम्ही संत्र्याची साल दातावर घासू शकता. दातांचे पुढचे आणि मागचे असे दोन्ही पृष्ठभाग तुम्ही संत्र्याच्या सालीने घासू शकता. काही वेळा याची पुनरावृत्ती केल्यानंतर, आपले तोंड स्वच्छ धुवा. संत्र्यामध्ये असलेले सौम्य फळ आम्ल आणि व्हिटॅमिन सी दातांसाठी उत्तम आहेत आणि दातांचा रंग कमी करण्यास मदत करतात.
३. लिंबाचा रस आणि मीठ
एका वाडग्यात लिंबाचा रस घ्या. ह्या रसात अर्धा चमचा मीठ आणि थोडे पाणी घाला आणि चांगले एकत्र करा. हे मिश्रण दातांवर चोळा. जर तुमच्या हिरड्या संवेदनशील असतील किंवा तुम्ही कमी मीठयुक्त आहार घेत असाल तर हे तंत्र वापरू नका.
४. हळद
तुमच्या ओल्या टूथब्रशवर थोडी हळद पावडर टाका आणि नंतर गोलाकार हालचालींनी दात घासून घ्या. नंतर स्वच्छ धुवा.
५. ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर (एसीव्ही) मध्ये स्ट्रॉबेरीप्रमाणेच मॅलिक ऍसिड असते आणि ते पातळ करून दातांचे डाग काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. ऍपल सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी, एक कप पाण्यात अर्धा चमचा ऍपल सायडर व्हिनेगर घाला. दात घासण्यापूर्वी या द्रावणाने चांगल्या गुळण्या करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीनदा करून पाहू शकता.
वरीलपैकी कोणतेही नैसर्गिक उपाय वापरून तुमचे दात पांढरे करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतर गरोदरपणात करता येणाऱ्या दातांच्या ब्लिचिंगच्या वेगवेगळ्या पर्यायांबद्दल तुम्ही तुमच्या दंतवैद्यांशी चर्चा करू शकता. कोणत्याही प्रकारे, आपल्या दंतवैद्यांच्या भेटी नियमित ठेवण्याचे लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचे पिवळसर झालेले दात स्वच्छ केले जाऊ शकतात. दंतचिकित्सक पीरियडॉन्टल डिसीज वर लक्ष ठेवत आहेत ना ह्याची खात्री करा. ह्या रोगांमुळे अकाली प्रसूती आणि नवजात बाळ कमी वजनाचे असण्याची शक्यता असते.
आणखी वाचा:
गरोदरपणात सोडा (शीतपेये) पिणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणात मांडी घालून बसणे (भारतीय पद्धत) सुरक्षित आहे का?