Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील दातदुखी आणि हिरडीतून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

गरोदरपणातील दातदुखी आणि हिरडीतून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

गरोदरपणातील दातदुखी आणि हिरडीतून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

गरोदरपणात संप्रेरकांमध्ये होणाऱ्या लक्षणीय बदलांमुळे तुमच्या हिरड्या खूप संवेदनशील बनतात. त्यामुळे दात घासताना आणि फ्लॉसिंग करताना त्रास होतो. दातांच्या ह्या समस्येमुळे तुमच्या परिपूर्ण गरोदरपणाला धोका पोहचू शकतो कारण दातांच्या ह्या त्रासामुळे रक्तस्त्राव, दातांना सूज येणे आणि हिरड्या मऊ पडणे इत्यादी परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला दातदुखी आणि हिरड्यांचा आजार असेल तर तुमची मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका जास्त असतो.

गरोदरपणातील दात आणि हिरड्यांच्या समस्यांसाठी ९ सर्वात प्रभावी उपाय

प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांमुळे तुमच्या हिरड्या मऊ होतात आणि हिरड्यांना होणारा रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही दात घासता किंवा फ्लॉस करता तेव्हा तुमच्या हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. काही काळ खाण्यापिण्यात व्यत्यय येऊ शकतो. शिवाय, गरोदरपणात वेदनाशामक औषधे घेणे तुमच्यासाठी योग्य नसते, त्यामुळे तात्काळ आराम मिळणे अशक्य वाटू शकते. सुदैवाने, गरोदरपणात हिरड्यांना सूज आल्यास त्यासाठी, काही घरगुती उपचार अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. ह्या उपायांमुळे हिरड्यांना आलेली सूज आणि पीरियडॉन्टायटिसपासून बचाव होऊ शकतो आणि हिरड्यांना आराम पडू शकतो.

गरोदरपणात तुम्हाला दातदुखी आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असल्यास खालील उपाय वापरा:

. लवंग

लवंग किंवा लवंग तेलाचा वापर, दात आणि हिरड्यांच्या समस्यांच्या बाबतीत चांगले काम करतो. कारण ते एक प्रभावी नैसर्गिक जंतुनाशक आहे. ह्यामुळे जिवाणूंच्या संसर्गापासून सुटका होऊ शकते तसेच दातांच्या समस्यांसाठी ते एक चांगले औषध आहे. जर तुम्हाला दातदुखी होत असेल तर लवंग चावा. लवंगाचे तेल दात आणि हिरड्यांवर चोळाल्याने लवकर आराम मिळेल. दातदुखीसाठी, तुम्ही लवंग तेलात कापसाचा गोळा भिजवून तुम्हाला दुखत असलेल्या भागावर ठेवू शकता.

. डाळिंब

डाळिंबात शक्तिशाली बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात. हे घटक तोंडाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि दातांना कीड लागलेली असल्यास त्यापासून आराम मिळण्यास मदत होते. तुम्ही एका कपामध्ये ३० मिली डाळिंबाचा रस घेऊ शकता. दररोज आपले तोंड स्वच्छ धुवा जेणेकरून दातांची कीड तयार करणारे जिवाणू ३२% ने कमी होतील . डाळिंबामुळे जिवाणूंचे संक्रमण देखील कमी होते. त्यामुळे नंतरच्या टप्प्यावर दातदुखी होऊ शकते. रस ताजा असल्याची खात्री करा आणि त्यात साखर घालू नका. गरोदरपणात दातांची कीड कमी होण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.

डाळिंब

. कोरफड

ही बहुगुणी वनस्पती दातदुखीच्या उपचारासाठी निश्चितपणे सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. ह्यामध्ये ९९% पाणी आहे . कोरफडीचे विविध उपचार गुणधर्म आहेत. ह्यामध्ये जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत. गरोदरपणात, हिरड्या अतिसंवेदनशील होतात तेव्हा हिरड्यांची जळजळ, सूज आणि रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. कोरफड ज्यूस, पूरक औषधे, जेल, माउथवॉश आणि टूथपेस्ट अशा विविध स्वरूपात उपलब्ध असल्याने तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य उत्पादन निवडू शकता आणि त्याचा वापर करू शकता.

. टी ट्री ऑइल

दातांच्या समस्यांसाठी सर्वात विश्वासार्ह उपचारांपैकी हा एक प्रसिद्ध उपचार आहे. टी ट्री ऑइल गरोदरपणात उद्भवणाऱ्या हिरड्या आणि दातांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यात दाहकविरोधी आणि जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आहेत त्यामुळे हा एक अत्यंत लोकप्रिय पर्याय आहे. जर तुमच्या हिरड्यांना सूज आलेली असेल, तर तुम्ही तुमचे तोंड पाण्याने आणि टी ट्री ऑइलने स्वच्छ धुवू शकता त्यामुळे संक्रमणास कारणीभूत जिवाणू नष्ट होतात. चांगल्या ब्रँडचे टी ट्री ऑइल विकत घ्या आणि ह्या तेलाचे चार थेंब सुमारे ९० मिली पाण्यात मिसळा. सर्वोत्तम परिणामांसाठी या द्रावणाने आपले तोंड स्वच्छ धुवा.

. बेकिंग सोडा

प्रत्येक स्वयंपाकघरात हा सामान्यतः वापरला जाणारा घटक विविध आम्लांचा एक अद्भुत न्यूट्रलायझर आहे. ह्या आम्लांमुळे तोंडात हिरड्यांचा संसर्ग होतो. त्याचा वापर अगदी सोपा आहे – तुम्हाला फक्त तुमचा ओला ब्रश थोड्याश्या बेकिंग सोडा पावडरमध्ये भिजवावा लागेल आणि त्याने दात घासावे लागतील. तसेच, तुम्ही तुमच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा देखील मिक्स करू शकता परंतु तुमचे तोंड बेकिंग सोडा व पाण्याने स्वच्छ धुवावे किंवा ब्रश करावे अशी शिफारस केली जाते. सर्वोत्तम परिणामांसाठी जेवणानंतर दिवसातून २३ वेळा हे करा.

बेकिंग सोडा

. कडुलिंबाची पाने

शतकानुशतके, कडुलिंबाच्या पानांचा उपयोग गर्भवती स्त्रियांच्या सूजलेल्या हिरड्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. कडुनिंबाच्या पानांचे प्रतिजैविक गुणधर्म दातांमध्ये कीड तयार होण्यास प्रतिबंध करतात. हिरड्यांमधील रक्तस्त्राव थांबविण्यास देखील मदत करतात. बुरशी आणि जिवाणूंच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी तुम्ही प्रत्येक जेवणानंतर दररोज एक किंवा दोन कडुलिंबाची पाने चावू शकता. कडुलिंबाच्या पानांमध्ये शक्तिशाली दाहकविरोधी गुणधर्म असतात त्यामुळे ते हिरड्यांशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी योग्य असतात. संप्रेरकांमधील बदलांमुळे हिरड्या संवेदनशील बनतात. तुम्ही घरच्या घरी कडुलिंबाचा माउथवॉश देखील बनवू शकता. हा माऊथवॉश औषधे घेण्यापेक्षा खूप चांगला आहे कारण त्यामुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही.

. हळद

हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. दातांच्या समस्येसाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. हा घटक दातांचा संसर्ग आणि जळजळ ह्यांच्या विरूद्ध अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही १ चमचा हळद आणि अर्धा चमचा मोहरीचे तेल आणि मीठ एकत्र मिसळून पेस्ट बनवू शकता. सर्वोत्तम परिणामांसाठी दिवसातून कमीत कमी दोनदा आपल्या हिरड्यांना हळूवारपणे मसाज करण्यासाठी या पेस्टचा वापर करा. कर्क्युमिनमुळे तोंडात कर्करोगाची वाढ कमी करण्यासाठी देखील हळद प्रभावी आहे.

. तेल

मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही एक पारंपारिक पद्धत आहे आणि विशेषतः गरोदरपणात ही पद्धत जास्त उपयुक्त आहे कारण तुम्हाला काहीही खावे लागणार नाही. ह्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापरू शकता. नारळ आणि तिळाचे तेल प्रतिजैविक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि म्हणूनच, दातांच्या समस्येसाठी त्याचा वापर केला जातो. ह्या तेलांमुळे निर्माण होणारे अँटिऑक्सिडंट तोंडात असलेल्या हानिकारक सूक्ष्मजंतूंचा नाश करू शकतात. कुठल्याही चांगल्या तेलाने गुळणा करा आणि तेल तोंडाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचेल याची खात्री करा. दररोज सुमारे १० मिनिटे हे करा. हिरड्यांना आलेली सूज आणि पीरियडॉन्टायटीस यांसारख्या संसर्गामुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो, या साध्या घरगुती उपायाने दातांच्या समस्येचा प्रभावीपणे सामना करता येतो.

. दूध

दुधामध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हिरड्या मजबूत होण्यास मदत होते आणि रक्तस्त्रावही थांबतो. दूध हिरड्यांची जळजळ शांत करते. रक्तस्त्रावामुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी दूध अत्यंत उपयुक्त आहे. जेव्हा तुमच्या हिरड्यांमधून रक्त येते तेव्हा दिवसातून एकदा किंवा दोनदा एक कप कोमट दूध प्या. दूध प्यायल्यानंतर दात घासा नाहीतर दातांना कीड लागण्याची शक्यता असते. शक्य असल्यास, दुधात थोडी हळद पावडर घाला.

दूध

गरोदरपणात मौखिक आरोग्य चांगले राखण्यासाठी घ्यायची खबरदारी

वर दिलेल्या घरगुती उपायांव्यतिरिक्त, तुम्ही गरोदर असताना तुमच्या तोंडाच्या मौखिक काळजी घेण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  1. तुम्ही गरोदर असल्याचे दातांच्या डॉक्टरांना सांगणे महत्वाचे आहे कारण दातांच्या प्रक्रिया पुढे ढकलल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, तुम्ही गरोदर असताना दातांचे एक्सरे घेतले जाऊ शकतात, परंतु तुमच्या दातांच्या डॉक्टरांना तुमच्या पोटाच्या आणि थायरॉईड ग्रंथींच्या सुरक्षेसाठी तुमची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. तुमच्या दातांच्या डॉक्टरांना तुमचे तपशील देण्याआधी तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधा
  2. न्याहारीपूर्वी आणि झोपण्यापूर्वी दिवसातून दोनदा ब्रश करून दातांना कीड लागू नये ह्याची काळजी घ्या
  3. फ्लोराईड टूथपेस्ट आणि सॉफ्टब्रिस्टल ब्रश किंवा इलेक्ट्रिक टूथब्रश वापरा. अल्कोहोल असलेले माउथवॉश टाळा. जर तुमच्या सध्याच्या टूथपेस्टमुळे तुमचा मॉर्निंग सिकनेस वाढत असेल, तर तुमच्या दातांच्या डॉक्टरांना कुठलीही चव नसलेल्या टूथपेस्टची शिफारस करण्यास सांगा
  4. निरोगी खा आणि संतुलित आहार ठेवा कारण ते बाळासाठी देखील चांगले असेल. ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमचे दात किडण्यापासून वाचवण्यासाठी तुमच्या आहारातून आम्लयुक्त पदार्थ आणि साखरयुक्त पदार्थ (खाणे आणि पेय दोन्ही) काढून टाका. नंतरही शक्यतो ते खाऊ नका. ह्यामध्ये तुम्ही दिवसभर घेत असलेल्या स्नॅक्ससह सर्व जेवणांचा समावेश आहे.

वर सांगितलेले सर्व घरगुती उपाय तात्काळ आराम मिळण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देखील वापरले जाऊ शकता. ह्या उपायांमुळे तुम्हाला गरोदरपणातील दातदुखी आणि हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव कमी होण्यासाठी मदत होईल . जर वेदना किंवा रक्तस्त्राव कमी होत नसेल तर, तुमच्या दातांच्या डॉक्टरांची भेट घ्या. त्यांचे व्यावसायिक मत लवकरात लवकर घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय दातदुखीसाठी ओव्हरकाउंटर औषधे घेऊ नका, कारण त्याचा तुमच्यावर आणि बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा:

गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांसाठी १५ सर्वोत्तम घरगुती उपाय
गरोदरपणातील बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी १० सर्वोत्तम घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article