आहार आणि पोषण

गरोदरपणात बडीशेप खाणे – फायदे, दुष्परिणाम आणि बरंच काही

हॅलो, न्यू मॉम टू बी! तुमच्या शरीरात होणारे आश्चर्यकारक बदल तुम्ही अनुभवत असाल – तसेच तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांचा सामना तुम्ही करत असाल. अश्यावेळी घरगुती उपचार आणि नैसर्गिक उपाय आपल्या बचावासाठी येतात, बरोबर? आपल्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा वापर करतो आणि ते खूप सामान्य आहे. अशीच एक सामान्य औषधी वनस्पती म्हणजे बडीशेप होय. पण गरोदरपणात बडीशेप खाणे सुरक्षित आहे का? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा!

बडीशेप म्हणजे काय आहे?

बडीशेप ही सुगंधी आणि चविष्ट औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती ताजी असताना तपकिरी किंवा हिरवी दिसते आणि जुनी झाल्यावर राखाडी रंगाची होते. ह्या बिया मूळतः युरोपमध्ये सापडलेल्या वनस्पतीपासून मिळवल्या जातात. बडीशेप ही वनस्पती अजमोदा (ओवा) कुटूंबातील आहे. ह्या वनस्पतीची पाने औषधी  आहेत. ही औषधी वनस्पती सामान्यतः आपल्या स्वयंपाकघरात आढळते आणि तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. बडीशेप 'सौंफ' म्हणून प्रसिद्ध आहे आणि आपल्यापैकी बहुतेकजण बडीशेप  स्वयंपाकात वापरण्याव्यतिरिक्त माऊथ फ्रेशनर म्हणून वापरतात. दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्यांसाठी बडीशेप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे, तसेच पचनास मदत करण्यासारखे बडीशेपचे इतर अनेक आरोग्य फायदे आहेत.

गरोदरपणात बडीशेप खाणे आरोग्यदायी आहे का?

गरोदरपणात. बडीशेप कमी प्रमाणात खाण्यास सांगितली जाते कारण बडीशेपमुळे मासिक पाळीला चालना मिळते आणि रक्तस्रावात वाढ होते. तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांमध्ये थोडी (साधारणपणे एक चमचा) बडीशेप घालू शकता. तुमच्या आरोग्यानुसार तुम्ही किती प्रमाणात बडीशेपचे सेवन केले पाहिजे हे समजून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतात.

गर्भवती स्त्रियांसाठी बडीशेपचे फायदे

गर्भवती महिलांसाठी बडीशेप खाण्याचे काही फायदे आणि दुष्परिणाम खाली दिलेले आहेत:

गरोदर असताना बडीशेप खाण्याचे दुष्परिणाम

तुम्हाला बडीशेपच्या फायद्यांविषयी माहिती मिळालेली आहे आता बडीशेपचे दुष्परिणाम जाणून घेऊयात तर, गरोदरपणात बडीशेप खाणे चांगले असते का ? गरोदरपणात बडीशेप खाणे असुरक्षित असल्याचे  पुरेसे पुरावे नाहीत. बडीशेप पूर्णपणे सुरक्षित असल्याचे देखील पुरेसे पुरावे नाहीत. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार अन्नपदार्थाचे वेगवेगळे परिणाम होतात. म्हणूनच, त्या अन्नपदार्थांचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डोस देखील तपासून घ्या.

गरोदरपणात बडीशेपचे सेवन कसे करावे?

जर तुम्हाला गरोदरपणात बडीशेप खाण्याची परवानगी असेल, तर तुम्ही बडीशेपचा आहारात समावेश करण्यासाठी काही मार्ग आहेत. बडीशेपला किंचित सुगंध असतो तसेच ती थोडी गोड असते. जर स्वयंपाक करताना पदार्थांमध्ये बडीशेप घातल्यास ती फ्लेवरिंग एजंट म्हणून काम करते आणि डिशला छान स्वाद येतो. तुम्ही बडीशेप चहाच्या स्वरूपातही घेऊ शकता किंवा जेवणानंतर बडीशेप कच्ची चावून खाऊ  शकता. तुमच्या गरोदरपणाच्या आहारात बडीशेपचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

गरोदरपणात होणाऱ्या मळमळीवर उपाय म्हणून बडीशेपचा चहा

युनायटेड स्टेट्सच्या अन्न आणि औषध प्रशासनाने, गरोदरपणात बडीशेपच्या चहासह इतर हर्बल चहाच्या वापरावर कोणतेही निर्बंध लागू केलेले नाहीत. जेव्हा आपण म्हणतो की औषधी वनस्पती आणि हर्बल चहाचे मिश्रण यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे नियंत्रित केले जात नाही, तेव्हा याचा अर्थ असा होतो की औषधी वनस्पतींची ओव्हर-द-काउंटर आणि प्रिस्क्रिप्शन औषधांसारखीच तपासणी होत नाही. लक्षात घ्या की याचा अर्थ असा नाही की एफडीए हर्बल टीच्या वापराविरुद्ध सल्ला देते. तुम्ही गरोदर असल्यापवर तुम्ही बडीशेप चहा घेऊ शकता. परंतु, त्यापूर्वी आपल्या स्त्रीरोगतज्ञांकडून त्याची खात्री करून घेऊ शकता.

गर्भवती स्त्रियांसाठी बडीशेपचा चहा तयार करणे

तुम्ही तुमच्या आहारात बडीशेपचा समावेश करण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही बडीशेपचा चहा बनवू शकता. बडीशेपचा एक कप चहा तुम्ही कसा करू शकता ह्याची कृती खाली देत आहोत:

गरोदरपणात बडीशेप खाल्ल्याने गर्भपात होतो का?

अनेक लोक जेवणानंतर बडीशेप खातात कारण त्यामुळे पचन चांगले होते. परंतु बडीशेप खाल्ल्याने पाळीला चालना मिळते आणि योनीतुन रक्तस्त्राव होऊ शकतो. आणि गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे बडीशेपचे सेवन कमी प्रमाणात करणे महत्वाचे आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी बडीशेप न खाण्याचा सल्ला दिलेला असेल तर बडीशेप खाणे पूर्णपणे टाळा. आता तुम्हाला बडीशेप खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम माहित आहेत, तुम्ही गरोदर असताना बडीशेप खाणे योग्य आहेत का ते तपासा. वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतरच पुढे जा. आणखी वाचा: गरोदरपणात आल्याचा चहा घेणे गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved