गर्भारपण

गरोदरपणात अँटासिड घेणे

पचनाच्या समस्यांसाठी अँटासिड्सचा वापर केला जातो. अनेक स्त्रिया अँटासिड घेण्यासाठी औषधांच्या दुकानात जातात. गरोदरपणात छातीत जळजळ होणे आणि पचनाशी संबंधित इतर समस्या निर्माण होणे सामान्य आहे. गरोदरपणात जवळजवळ 80 टक्के गर्भवती स्त्रिया छातीत जळजळ होण्याची तकार करतात. शरीरात प्रोजेस्टेरॉन जास्त प्रमाणात निर्माण होते त्यामुळे पचन मंदावते. तसेच त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेमधील झडपेचे स्नायू देखील शिथिल होतात. त्यामुळे ऍसिड वरच्या दिशेने ढकलले जाते.  तसेच बाळामुळे ओटीपोटातील खूप जागा व्यापली जाते. त्यामुळे पोटासारख्या अंतर्गत अवयवांवर दबाव पडतो. म्हणून पोटातून वरच्या दिशेने आम्ल ढकलले जाते.

अँटासिड्स कसे कार्य करतात?

पोटामध्ये अन्नाचे पचनयोग्य पदार्थामध्ये विघटन होते आणि आतड्यांद्वारे हे पदार्थ शोषले जाऊ शकतात. परंतु ही प्रक्रिया होताना आम्ल असंतुलित प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे अस्वस्थता येते. हे असंतुलन झाल्यास त्याचे नियमन करण्यासाठी अँटासिड्सचा वापर केला जातो.

गर्भावस्थेत अँटासिड घेणे सुरक्षित आहे का?

अँटासिड सिरप घेतल्याने गरोदरपणात छातीत होणारी जळजळ  आणि ऍसिडिटीपासून त्वरित आराम मिळण्यासाठी मदत होऊ शकते. खरं तर, गरोदर असताना अँटासिडच्या गोळ्यांपेक्षा सिरपला प्राधान्य दिले जाते कारण सिरप सहज शरीरात विरघळले जाते आणि जलद कार्य करू शकते. उपलब्ध असलेले बहुतांश अँटासिड्स सेवन करण्यासाठी सुरक्षित आहेत. परंतु काही अँटासिड्स अत्यंत धोकादायक असू शकतात आणि त्यामुळे गर्भपात देखील होऊ शकतात. मुख्य म्हणजे अँटासिड्स कमी प्रमाणात घ्यावीत आणि अँटासिड्स घेण्यासाठी डॉक्टरांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

तुम्ही गरोदरपणात खूप अँटासिड्स खाल्ल्यास काय होईल?

मॅग्नेशियम, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि अॅल्युमिनियम यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांपासून अँटासिड्स तयार होतात. परंतु, त्यांचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात सेवन केलेली कोणतीही गोष्ट हानिकारक असू शकते आणि त्यास अँटासिड्स अपवाद नाहीत. अँटासिड्सच्या अतिसेवनामुळे निर्माण होणाऱ्या काही समस्यांमध्ये उलट्या, अशक्तपणा आणि किडनी स्टोन इत्यादी समस्यांचा समावेश होतो.

गर्भवती महिलांसाठी कोणते अँटासिड सुरक्षित आहेत?

गरोदरपणात घेण्यासाठी काही सुरक्षित अँटासिड्समध्ये खालील अँटासिड्सचा समावेश होतो.

1. मॅग्नेशियम-आधारित

हे गर्भवती महिलांसाठी सुरक्षित मानले जाते आणि अपचनाचा सामना करण्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होतो.

2. कॅल्शियम कार्बोनेट आधारित

अँटासिड्सचे गर्भवती महिलांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ह्या प्रकारची अँटासिड्स कार्य करतात आणि आराम मिळतो तेव्हा प्रभावी असतात.

गर्भवती महिलांसाठी कोणते अँटासिड्स असुरक्षित आहेत?

1. अल्युमिनियम आधारित

या प्रकारच्या अँटासिड्समुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. अश्या प्रकारची अँटासिड्स वापरल्यास फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होते. याव्यतिरिक्त, अल्युमिनियमच्या सतत वापर होणे विषारी आहे आणि गर्भपातासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू  शकते.

2. सोडियम बायकार्बोनेट आधारित

अश्या प्रकारचे अँटासिड्स पाणी धरून घेवण्यास कारणीभूत ठरू शकतात. कारण ते सोडियमचे वैशिष्ट्य आहे. गरोदरपणात, स्त्रियांना नेहमी अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी धरून ठेवल्यामुळे मनगट आणि घोट्यावर सूज येते. अँटासिडमधील सोडियमचे प्रमाण ही समस्या वाढवते.

गर्भवती असताना अँटासिड्स टाळण्याची कारणे

थोडीशी अस्वस्थता आल्यास अँटासिड्स घेणे सोयीचे असले तरी, अँटासिड्स घेण्यापूर्वी तुम्ही विचार करणे गरजेचे आहे.

1. ऍसिडचे उत्पादन कमी करते

अँटासिड्स पोटात आम्ल निर्मितीचे नियमन करण्यास मदत करतात असे मानले जाते, परंतु जास्त वापरामुळे आम्ल कमी प्रमाणात तयार होते आणि पचन सुलभ होत नाही.

2. शेवटच्या तिमाहीत गुंतागुंत

शेवटच्या तिमाहीत अँटासिड्स टाळणे चांगले आहे. ह्या काळात शरीरावर कोणतेही दुष्परिणाम सहज होऊ शकतात. मॅग्नेशियम सारखी तुलनेने सुरक्षित अँटासिड्स देखील पचनामध्ये अडथळा आणतात.

3. दुष्परिणाम

प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते आणि त्यामुळे प्रत्येकाला अँटासिड्स वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतात. काहींना चक्कर येणे, पोटात पेटके येणे आणि उलट्या होणे ह्यासारख्या दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

4. अशक्तपणा

बहुतेक अँटासिड्स मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते.  त्यामुळे शरीरात लोहाचे शोषण कमी होते. गर्भवती स्त्रियांना आधीच ऍनिमियाचा धोका असतो आणि अँटासिड्समुळे परिस्थिती आणखी बिघडते.

5. किडनी स्टोन

आधी सांगितल्याप्रमाणे, बहुतेक अँटासिड्समध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. ह्याचा आणखी एक नकारात्मक परिणाम म्हणजे कॅल्शिअम शरीरात योग्यरित्या शोषले जात नाही. नंतर हे कॅल्शिअम मूत्रपिंडातून मूत्राशयात जाते, जिथे ते एकत्र येऊन मुतखडा तयार होतो.

6. पोटातील अल्कधर्मी आम्ल

अँटासिड्सचे नियमित सेवन केल्याने पोटातील आम्ल अल्कधर्मी बनू शकते. त्यामुळे योग्यरीत्या पचन होण्यासाठी अन्नाचे आम्लांकडून चांगले विघटन होत नाही.

7. ऍसिडचे प्रमाण वाढणे

अँटासिड्सच्या वारंवार वापरामुळे पोट प्रतिक्रिया देऊ लागते अशी अनेक उदाहरणे आहेत. अँटासिड्सच्या अतिवापरामुळे पोटात आम्लाचे प्रमाण वाढते. परिणामी, ज्या दिवशी तुम्ही अँटासिड घेणार नाही त्या दिवशी ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

8. बद्धकोष्ठता

जास्त कॅल्शियममुळे आतड्याचे स्नायू शिथिल होतात. यामुळे शरीरात अन्नाचे पचन होण्यास विलंब होऊ शकतो. अन्नाला गुदाशयापर्यंत पोहोचण्यास जास्त वेळ लागत असल्याने, ते कालांतराने घट्ट होऊ लागते, आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो.

अँटासिड्ससाठी नैसर्गिक पर्याय

तर, अँटासिड्स घेणे वाईट आहे का? नाही! नक्कीच नाही! वेळोवेळी अँटासिड्स घेणे चांगले आहे. परंतु, गरोदरपणात केळी आणि दह्यासारखे नैसर्गिक अँटासिड्स घ्यावेत. तसेच जीवनशैली मध्ये बदल केल्यास आम्लपित्त टाळण्यास मदत होईल. जीवनशैलीतील बदलांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होऊ शकतो. शेवटी, ऍसिडिटी होऊ नये म्हणून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता. काहीजण अँटासिड्स पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करू शकतात, तर काहींसाठी, अँटासिड्स खरोखर जीवन सुलभ करण्यासाठी मदत करू शकतात. तुम्हाला अँटासिड्स विषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर आहारतज्ञांशी संपर्क साधू शकता. अन्नपदार्थांचे पचन आणि कार्य ह्याविषयी त्यांना अधिक माहिती असते आणि ते तुम्हाला ऍसिडिटी  कमी करण्यासाठी योग्य वेळापत्रक आणि तक्ता देखील देऊ शकतात. आणखी वाचा: गरोदरपणातील औषधे: काय सुरक्षित आहे, पर्यायी उपचारपद्धती आणि बरंच काही धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved