गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

साधारणपणे केळ्याच्या आकाराचे असलेले बाळ वाढताना बघून अनेक पालक आश्चर्यचकित होतात. अल्ट्रासाऊंड (किंवा विसंगती) स्कॅन गर्भाचा विकास कसा होत आहे ह्याबद्दल माहिती देते.

आता तुमचे पोट अधिक स्पष्टपणे दिसू लागेल आणि तुमच्या गर्भाशयात नवीन जीवाची हालचाल दिसून येईल. २० व्या आठवड्याच्या ऍनोमली स्कॅन मध्ये तुम्हाला आवश्यक असणारी सर्व माहिती इथे दिलेली आहे.

तुमच्या पुढच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन विषयी तुम्ही चिंताग्रस्त आहात का? काळजी करू नका, आम्ही त्याविषयी सर्व माहिती इथे दिलेली आहे! गर्भाचा विकास, गुंतागुंत आणि गरोदरपणात तुम्ही अल्ट्रासाऊंड स्कॅन का करावे याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे अशी प्रत्येक गोष्ट येथे दिलेली आहे.

तुम्हाला २० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का आहे?

गरोदरपणाच्या २०व्या आठवड्यात तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज नाही. हा स्कॅन करणे न करणे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे आणि ऐच्छिक आहे. परंतु ह्या स्कॅन बद्दल जाणून घ्यायचे असल्यास तुम्हाला दिलेली माहित असणे आवश्यक आहे.

कृपया लक्षात घ्या की अल्ट्रासाऊंडमध्ये बाळाचे लिंग ओळखण्याची क्षमता असली तरी, लिंग निश्चित करणे भारतात बेकायदेशीर आहे आणि कायद्याने दंडनीय आहे.

या स्कॅनसाठी कोणती तयारी करावी?

तुम्ही दोन ते तीन ग्लास (-औंस) पाणी प्यावे आणि मूत्राशय संपूर्ण भरलेले असताना अल्ट्रासाऊंड चाचणीसाठी रुग्णालयात जावे. स्कॅन करण्यापूर्वी तुम्ही लघवीला जाऊन नका. कारण स्कॅनमध्ये गर्भाची प्रतिमा स्पष्ट दिसण्यास मदत होईल.

वीस आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी किती वेळ लागतो?

वीस आठवड्यांचे अल्ट्रासाऊंड स्कॅन साधारणपणे गरोदरपणाच्या १८ ते २४ आठवड्यांच्या दरम्यान केले जाते आणि संपूर्ण स्कॅनिंग प्रक्रियेस सुमारे ३० ते ४० मिनिटे लागतात.

गरोदरपणाच्या २० आठवड्यांचा स्कॅन कसा केला जातो?

तुम्हाला चाचणीसाठी टेबलावर झोपावे लागेल आणि तंत्रज्ञ तुमच्या पोटावर जेल लावतील. एक ट्रान्सड्यूसर हळूवारपणे तुमच्या पोटावर फिरवला जाईल आणि फिरत्या पद्धतीने प्रतिमा रिअल-टाइममध्ये स्क्रीनवर दिसू लागतील. ह्या तपासणीच्या प्रक्रियेदरम्यान बाळाची स्थिती, आकार आणि मापे देखील घेतली जातात.

अल्ट्रासाऊंड स्कॅनवर तुम्ही काय पाहू शकता?

अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये, गर्भाचा विकास पाहता येतो. हृदय आणि हाडे ह्यांच्यासह अवयवांचा विकास सुद्धा बघता येतो. बाळाची नाळ योग्य स्थितीत आहे की नाही आणि जन्म कालव्याला त्यामुळे अडथळा होत नाही ना हे देखील तुमच्या लक्षात येईल. तुमच्या गर्भाशयात जुळी अथवा एकाधिक बाळे आहेत का हे सुद्धा लक्षात येते.

अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये तुमच्या बाळाचा मूलभूत विकास दिसेल. स्कॅनमध्ये तुमच्या बाळाचा चेहरा आणि हात दिसतील. प्रतिमेमध्ये हाडे पांढऱ्या रंगांची दिसतील तर वाढणाऱ्या उती राखाडी रंगात दिसतील. गर्भजल काळ्या रंगात दिसेल.

२० आठवड्यांचा अल्ट्रासाऊंडमध्ये आपण सर्व विकृती शोधू शकतो का?

नाही. २० आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये सगळ्या विकृती दिसत नाहीत. गर्भधारणा एक्टोपिक आहे की नाही आणि गर्भामध्ये संरचनात्मक किंवा गुणसूत्र असामान्यता विकसित झाली आहे की नाही हे ह्या २० आठवड्यांच्या स्कॅन मध्ये समजते. तुमच्या बाळाला बाल्यावस्थेत नंतर गुंतागुंत आणि विकृती निर्माण होऊ शकतात आणि अल्ट्रासाऊंड चाचणी ही तुमच्या गरोदरपणाच्या टप्प्यात फक्त एक तपासणी आहे. तुमच्या बाळाच्या विकासाचा तो टप्पा आहे असा विचार करा.

विकृती आढळल्यास काय?

काही विकृती आढळल्यास, आपण त्याबद्दल ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे. साधारणपणे, गर्भवती मातांसाठी अल्ट्रासाऊंड चाचण्यांसाठी अचूकता दर ६०% असतो. सर्व संरचनात्मक विकृती किंवा क्रोमोसोमल विकृती शोधल्या जाऊ शकत नाहीत, परंतु, जर तुमच्या बाळाला डाऊन सिंड्रोम असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला त्याबद्दल सांगू शकतील.

याव्यतिरिक्त, तुम्हाला इतर कोणत्याही संशयित जन्मजात परिस्थितीची तपासणी करण्यासाठी दुसरी स्क्रीनिंग चाचणी आणि कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंगसाठी जाण्यास सांगितले जाऊ शकते. बाळाच्या बहुतेक समस्यांवर उपचार असतात आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनचे परिणाम समोर आल्यानंतर तुमचे डॉक्टर सर्वोत्तम उपचार आणि तपासणीची शिफारस करतील.

अल्ट्रासाऊंड स्कॅन हा अनेक पालकांसाठी एक रोमांचक आणि भयावह क्षण असतो. ह्या स्कॅन मध्ये पोटातील बाळाला पाहिल्यावर बाळाचे आई वडील वेगवेगळ्या भावनांमधून जात असतात. बाळाच्या जन्मानंतरचे आयुष्य आणि नवीन जीवनशैलीशी कसे जुळवून घ्यायचे ह्या बाबत चर्चा करायची असेल तर तुम्ही तुमच्या पतीशी ह्याबाबत बोलू शकता.

ह्या टप्प्यावर तुम्हाला सराव कळा किंवा वेदना जाणवणे सामान्य आहे. जर तुमच्या पोटात बाळाची जास्त हालचाल जाणवत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला. फक्त आराम करा, जास्त काळजी करू नका आणि लवकरच आईपणासाठी तयार व्हा कारण तुम्ही आता गर्भारपणाचा अर्धा टप्पा पार केलेला आहे.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved