Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता तुमची प्रजनन क्षमता वाढवणारे १० उत्तम अन्नपदार्थ

तुमची प्रजनन क्षमता वाढवणारे १० उत्तम अन्नपदार्थ

तुमची प्रजनन क्षमता वाढवणारे १० उत्तम अन्नपदार्थ

योग्य अन्नपदार्थ खाल्ल्यास तुमची प्रजननक्षमता वाढण्यास नक्की मदत होते. जर तुम्ही तुमच्या कुटुंबाची सुरुवात करू इच्छित असाल तर कुठले अन्न निवडले पाहिजे ह्याविषयी जाणून घ्या त्याची तुम्हाला तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात मदत होईल.

योग्य अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या प्रतिकार यंत्रणेला चालना मिळेल आणि तुमची गर्भधारणेची शक्यता वाढेल. म्हणून जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल आणि यश मिळाले नसेल तर गर्भधारणेसाठी कुठले अन्नपदार्थ खायला हवेत ते तपासून बघू शकता. इथे काही अन्नपदार्थांची यादी दिली आहे ज्याचा उपयोग तुम्हाला बाळासाठी प्रयत्न करत असाल तर होऊ शकतो.

गर्भधारणेसाठी १० आरोग्यपूर्ण अन्नपदार्थ

काही स्त्रियांना गर्भधारणेसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. जर तुम्ही सुद्धा बाळासाठी असेच प्रयत्न करत असाल आणि गर्भधारणा होत नसेल तर त्यासाठी सर्वात आधी चांगले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. ह्या पदार्थांमध्ये संप्रेरकांचे असंतुलन ठीक करण्याची ताकद असते. तसेच हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषणमूल्ये पुरवतात आणि प्रजननक्षमता वाढवतात.

प्रजननक्षमता वाढवणारे सर्वोत्तम अन्नपदार्थ:

१. हिरव्या पालेभाज्या

जेव्हा प्रजनन क्षमता वाढवण्याचा विषय निघतो, तेव्हा आहारात समाविष्ट करण्याजोग्या पदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या ह्या सर्वात वरच्या क्रमांकावर असतात. त्यांच्या मध्ये खूप जास्त प्रमाणात लोह, फॉलीक ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्याची गरज आहे त्यामुळे गर्भाशयाचे आवरण मजबूत होण्यास मदत होते आणि त्यामुळे भ्रूण गर्भाशयास चिकटण्यास मदत होते.

२. कोबी

कोबीमधून शरीरास आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये मिळतात तसेच त्यातील डाय इंडॉल मिथेन ह्या रसायनामुळे इस्ट्रोजेनचे विघटन नियंत्रित होते. कोबीमुळे फायब्रॉइड्स एन्डोमेट्रिओसिस (गर्भाशयाच्या आवरणाचा विकार) होत नाही.

३. ब्रोकोली

प्रजननक्षमता वाढवण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये ब्रोकोलीचा नंबर सर्वात वरती लागतो कारण ब्रोकोली व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते तसेच ब्रोकोली ओव्यूलेशन प्रक्रियेत आणि अंडे परिपक्व करण्यास मदत करते. ब्रोकोली हे सुपरफूड आहे कारण ब्रोकोली लोह, फॉलीक ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्स ने समृद्ध असते. ब्रोकोलीमुळे शरीरास वनस्पती प्रथिनांचा पुरवठा होतो. ह्याव्यतिरिक्त ब्रोकोली खाल्ल्याने तुमच्या शरीरातील लोहाची पातळी वाढते आणि त्यामुळे प्रसूतीनंतर ऍनिमिया होत नाही.

ब्रोकोली

४. बटाटे

आपल्या साध्या बटाट्याचा सुद्धा प्रजनन क्षमता वाढवणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये समावेश आहे. शरीरातील पेशींच्या विभाजनास ते मदत करतात तसेच निरोगी स्त्रीबीजांसाठी सुद्धा ते मदत करतात. ह्याव्यतिरिक्त, बटाटे नियमितपणे आहारात घेतल्याने तुमच्या शरीरास आवश्यक पोषणमूल्यांचा तसेच व्हिटॅमिन बी आणि ई चा पुरवठा होतो.

५. लिंबूवर्गीय फळे

जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही लिंबूवर्गीय फळे खाल्ली पाहिजेत कारण व्हिटॅमिन सी मुळे अंडाशयातून स्त्रीबीज सोडण्याची प्रक्रिया प्रेरित केली जाते. जेव्हा गर्भधारणेसाठी प्रयन्त करत असता तेव्हा तुम्ही दररोज मोसंबीचा रस करून पिण्याचा पर्याय सुद्धा निवडू शकता.

६. केळी

नियमित मासिकपाळी मुळे प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते आणि तसेच गर्भधारणेची शक्यता वाढते. कारण त्यामुळे शारीरिक संबंध केव्हा ठेवायला हवेत तो काळ निश्चित होतो. केळी व्हिटॅमिन बी ६ ने समृद्ध असतात आणि त्यामुळे मासिक पाळी नियमित होते. तसेच ह्याव्यतिरिक्त केळ्यांमुळे तुमच्या शरीरास लागणारी पोषणमूल्ये आणि व्हिटॅमिन्स मिळतात, तसेच केळ्यामध्ये चरबी कमी असल्याने आरोग्यपूर्ण नाश्ता म्हणून तुम्ही निवडू शकता. केळ्यापासून तुम्ही वेगवेगळे अन्नपदार्थ बनवू शकता जसे की मिल्क शेक्स,आईस्क्रीम्स, पीनट बटर सँडविचेस इत्यादी.

७. अननस

तुम्हाला गर्भधारणेसाठी तयार करणारे आणखी एक फळ म्हणजे अननस कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मँगेनिज असते जे प्रजननास मदत करते. तसेच अननसामुळे प्रजननाशी संबंधित संप्रेरके प्रेरित होतात. तुम्ही अननसाचे छोटे तुकडे करून खाऊ शकता किंवा मिक्सर मधून काढून त्याचा ज्यूस करून पिऊ शकता.

अननस

८. मासे

सहज उपलब्ध असणारा आणि प्रसिद्ध असा सॅलमोन हा मासा आहे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही गर्भधारणेसाठी नियमितपणे हा मासा खाऊ शकता. सॅलमोनमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ऍसिड असते आणि शरीरातील प्रजननाशी निवडीत संप्रेरके प्रेरित होण्यास मदत होते. इस्ट्रोजेनचे असंतुलन तसेच प्रजननाशी संबंधित अवयवांकडे रक्तपुरवठा वाढवण्यासाठी सॅलमोन जातीच्या माशाला प्राधान्य दिले जाते.

९. कर्बोदके

कर्बोदके हे महत्वाचे पोषक घटक आहेत आणि ते शरीरास लागणारी चरबी, व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्यांनी समृद्ध असतात. व्हीट ब्रेड आणि ओटमील हे प्रजननक्षमता वाढवणारे अन्नपदार्थ आहेत आणि त्यामुळे रक्तातील साखर नियमित राहण्यास खूप परिणामकरीत्या मदत करतात. जटिल कर्बोदके नियमितपणे घेतल्याने इन्सुलिनची पातळी वाढत नाही. इन्सुलिन हे प्रजननसंस्थेच्या कार्यात अडथळा आणते. त्यामुळे जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात जटिल कर्बोदकांच्या समावेश केला पाहिजे. वजन कमी होण्यासाठी सुद्धा ते खाण्याचा सल्ला दिला जातो. लवकर गर्भधारणा होण्यासाठी तुमचे वजन नियंत्रित जरुरी आहे कारण लठ्ठपणा प्रजनक्षमतेशी निगडित आहे.

१०. रंगीबेरंगी फळे आणि भाज्या

जेव्हा तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असता तेव्हा तुम्ही पुढील भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करू शकता उदा: लाल आणि पिवळी भोपळी मिरची, भोपळा इत्यादींचा समावेश तुमच्या आहारात करू शकता. ह्या भाज्या फायटोनुट्रीएंट आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध असतात त्यामुळे तुमची प्रजननक्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला फळे आणि भाज्यांचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात केला पाहिजे. लक्षात असुद्या की फळे आणि भाज्यांचा रंग जितका गडद  तितकी फायटोनुट्रिएंट्सची पातळी जास्त असते. तुम्ही पास्त्यामध्ये भाज्या घालू शकता, स्मूदीस करू शकता, ऑलिव्ह ऑइल मध्ये टॉस करून खाऊ शकता किंवा तळून खाऊ  शकता.

रंगीबेरंगी फळे आणि भाज्या

काही अन्नपदार्थांमुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. हे लक्षात असुद्या की आरोग्यपूर्ण आहारामुळे गर्भधारणेची शक्यता तर वाढतेच तसेच निरोगी बाळाची वाढ आणि विकास सुद्धा चांगला होतो. म्हणून जर तुम्ही आणि तुमचा साथीदार कुटुंबाची सुरुवात करू इच्छित असाल तर तुमच्या आहारावर बारीक लक्ष देण्याची ही वेळ आहे आणि त्यामध्ये योग्य त्या अन्नपदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे प्रजननाशी संबंधित संप्रेरके तयार होऊ लागतील आणि तुमच्या आरोग्यात सुद्धा सुधारणा होईल. सर्वोत्तम आहार आणि तुमच्या तज्ञांचा सल्ला ह्यामुळे तुमची गर्भधारणेची शक्यता नक्कीच वाढेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article