योग्य पोषण ही निरोगी गर्भारपणाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच, जर तुम्हाला बाळ हवे असेल तर तुमचे शरीर उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्ही आवश्यक असापूरक आहार घेणे गरजेचे आहे.
गर्भधारणेचा प्रयत्न करणार्या स्त्रियांना फॉलिक ऍसिड घेण्यास सांगितले जाते. फॉलिक ऍसिड हे लाल रक्तपेशी तसेच डीएनएच्या निर्मितीमध्ये मदत करते. फॉलिक अॅसिड घेतल्याने गरोदर स्त्रियांना फायदे होतात. गरोदरपणाचा प्रयत्न करणाऱ्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठीही ते तितकेच फायदेशीर आहे.
फॉलिक ऍसिड म्हणजे काय?
फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन बी 9 चे कृत्रिम रूप आहे. फॉलिक ऍसिड हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि ते चयापचयच्या मूलभूत क्रियांना मदत करते. फॉलिक ऍसिड हे आठ जीवनसत्त्वांपैकी एक आहे आणि ते त्याच्या नैसर्गिक स्वरूपात पाण्यात विरघळते. व्हिटॅमिन बी 9 ला फोलेट म्हणतात. पालक, भोपळा, ऑयस्टर, गाजर, भेंडी, शतावरी आणि ब्रोकोली ह्यासारख्या सामान्यतः सेवन केल्या जाणार्या अनेक पदार्थांमध्ये फॉलिक ऍसिड आढळते. चिकन, तांदूळ, सोयाबीन, अंडी, नट्स, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांसह इतर अश्या बऱ्याच पदार्थांपासून फॉलिक ऍसिड मिळते.
आवश्यक असल्यास, जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढण्यासाठी फॉलीक ऍसिड इतर पदार्थांमध्ये जोडले जाऊ शकते. ब्रेड, पास्ता, तृणधान्ये, तांदूळ आणि इतर अनेक धान्य-आधारित पदार्थांमध्ये सुद्धा फॉलिक ऍसिड आढळते.
फॉलिक ऍसिड प्रजनन क्षमता वाढवण्यास कशी मदत करते?
फॉलिक ऍसिड हे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उत्तम आहे. प्रजनन क्षमता वाढवण्याचे काही मार्ग येथे दिलेले आहेत.
पुरुष प्रजनन क्षमता
फॉलिक ऍसिड पुरुषांची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी मदत करते आणि शुक्राणूंना अंड्याचे फलन करण्यास मदत करते. फॉलिक ऍसिड कसे उपयुक्त ठरते हे खाली दिलेले आहे.
फॉलिक ऍसिड शुक्राणूंची संख्या वाढवते आणि त्यामुळे पुरुषांना त्यांच्या जोडीदार स्त्रीला गर्भवती करण्यासाठी आवश्यक पूरक आहार मिळू शकतो. स्त्रियांना सामान्यतः त्यांच्या मासिक पाळीवर लक्ष ठेवणे आवश्यक असते आणि ओव्यूलेशन कधी होते हे जाणून घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा समस्या पुरुषांमध्ये असू शकतात. जेव्हा पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या कमी असते, तेव्हा प्रवास करण्यासाठी आणि अंड्याला फलित करण्यासाठी पुरेसे शुक्राणू नसतात कारण प्रवास मोठा असतो.
शुक्राणूंचा हा प्रवास गर्भाशयाच्या मुखापासून बीजवाहिन्यांद्वारे अंड्यापर्यंत असतो आणि शुक्राणू सामान्यतः या मार्गावरून जातात. जर पुरुषाने 700 एमसीजी फॉलिक ऍसिड घेतले आणि गर्भधारणा झाली, तर त्याचे श्रेय फॉलिक ऍसिडला दिले जाऊ शकते.
- शुक्राणूंच्या विकृतींचा कमी धोका
जेव्हा पुरुष फॉलिक ऍसिडचे सेवन करतात तेव्हा ते केवळ त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करत नाही तर त्यांच्या विकृतीची शक्यता 20 ते 30% ने कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जनुकीय विकृतींचा धोका कमी होतो आणि म्हणूनच डाउन सिंड्रोम सारखे जन्मजात दोष कमी होऊ शकतात.
अंड्यातील दोषांमुळे जनुकीय विकारांसह बाळांचा जन्म होतो असे मानले जाते. शुक्राणूंच्या विकृतींमुळे देखील समस्या उद्भवू शकतात. नियमितपणे फॉलिक ऍसिडचे सेवन केल्याने या समस्या कमी होण्यास मदत होते तसेच पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.
- इतर पूरक आहार घेतल्यास प्रजनन क्षमता वाढते
पुरुषांनी फॉलीक ऍसिड घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्हिटॅमिन सी आणि झिंक सारख्या इतर पुरुष प्रजनन पूरक आहारांसह ते घेणे. शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी फॉलिक ऍसिड मदत करते. फॉलिक ऍसिड घेतल्यास ते शुक्राणूंची एकूण गतिशीलता आणि उपयुक्तता वाढविण्यात मदत करू शकते. नेदरलँड-आधारित मेडिकल युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात फॉलिक ऍसिड पुरुषांची प्रजनन क्षमता सुमारे 74% ने वाढवते.
स्त्रियांची प्रजनन क्षमता
स्त्रियांची प्रजननक्षमतेची स्थिती सुधारून गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी फॉलिक ऍसिड महत्त्वपूर्ण आहे. खालीलप्रकारे स्त्रियांसाठी फॉलिक ऍसिड फायदेशीर ठरू शकते.
इतर जीवनसत्त्वे आणि खनिजांसह कार्य करून, फॉलिक ऍसिड शुक्राणूंच्या गर्भाधानासाठी परिस्थिती सुधारून महिलांना जलद गर्भवती होण्यास मदत करते. केवळ फॉलिक ऍसिड नाही तर इतर अनेक जीवनसत्त्वे ह्या प्रक्रियेस मदत करतात. स्त्रियांना सामान्यतः फॉलिक ऍसिड सप्लिमेंट सोबत प्रसवपूर्व जीवनसत्वे घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये साधारणतः 400 एमसीजी पोषक तत्वे असतात.
गर्भधारणा होण्यास मदत करण्यासाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, झिंक, लोह आणि नियासिन यांच्याबरोबर थोडेसे अतिरिक्त फॉलिक ऍसिड घेण्याची शिफारस केली जाते.
फॉलिक
ऍसिडमुळे पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते, त्याचप्रमाणे स्त्रियांमधील अंड्याची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होते. जर स्त्रियांना गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वी काही महिने आधी फॉलीक ऍसिड दिले, तर जनुकीय दोष असलेल्या बाळाचा जन्म होण्याची शक्यता खूप कमी होते. फॉलिक ऍसिड अंड्याला निरोगी ठेवण्यास आणि कोणत्याही रोगास कारणीभूत असलेल्या घटकांपासून दूर ठेवण्यास मदत करेल.
- गर्भाशयाच्या मुखाजवळील श्लेष्माची गुणवत्ता सुधारा
स्त्रियांना गर्भधारणा होण्यासाठी ग्रीवाच्या श्लेष्माचा पोत खूप महत्वाचा आहे. बर्याच स्त्रिया ग्रीवाच्या श्लेष्माची रचना आणि रंग तपासून त्यांचे चक्र तयार करतात परंतु जेव्हा ओव्हुलेशन जवळ येते, तेव्हा तेथे भरपूर प्रमाणात श्लेष्मा असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. हा श्लेष्मा शुक्राणूंना प्रवास करण्यास आणि अंड्याशी संयुग पावण्यास मदत करतो.
ज्या स्त्रियांना अशक्तपणाचा थोडासा त्रास होतो त्यांना ओव्हुलेशन करणे कठीण जाते कारण लोहाच्या कमतरतेमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. गर्भधारणेच्या किमान 3 महिने आधी 400 mcg फॉलिक ऍसिड इतर खनिज पूरकांसोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. लोह संप्रेरके नियंत्रित करण्यास मदत करते आणि त्यामुळे ओव्यूलेशन नीट होते. फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळेच ऍनिमिया होतो आणि योग्य औषधोपचाराने तो टाळता येतो.
पुरुष आणि स्त्रियांसाठी फॉलिक ऍसिडचे शिफारस केलेले प्रमाण
पुरुष आणि स्त्रियांसाठी फॉलीक ऍसिडचे प्रमाण खालीलप्रमाणे:
- 14वर्षे आणि त्यावरील महिलांसाठी, तसेच पुरुषांसाठी, 400 mcg फॉलिक ऍसिडची शिफारस केली जाते
- स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी, 500एमसीजी
- गर्भवती महिलांसाठी, 600एमसीजी
ब्रेड आणि तृणधान्ये हे फोलेट आणि फॉलिक ऍसिडचा डोस मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. बहुतेक पदार्थ अतिरिक्त फॉलिक ऍसिडसह जोडले जातात, म्हणून त्यांच्या नियमित सेवनाने प्रजनन पातळी सुधारली पाहिजे.
फॉलिक ऍसिड समृध्द अन्न
खालील खाद्यपदार्थांमध्ये फॉलिक ऍसिडचे प्रमाण भरपूर आहे. तुमच्या शरीराला आवश्यक पोषण मिळण्यासाठी तुम्ही त्यांचे नियमित सेवन करू शकता:
अन्नपदार्थ |
प्रमाण |
बीफ लिव्हर |
215 एमसीजी |
पालक |
131 एमसीजी |
शतावरी |
89 एमसीजी |
काळ्या डोळ्यांचे वाटाणे |
105 एमसीजी |
पांढरा तांदूळ |
90 एमसीजी |
रोमेन लेट्यूस |
64 एमसीजी |
ब्रुसेल्स स्प्राउट्स |
78 एमसीजी |
एवोकॅडो |
59 एमसीजी |
ब्रोकोली |
52 एमसीजी |
पालक |
58 एमसीजी |
Source: https://www.verywellfamily.com/folic-acid-for-female-and-male-fertility-1959878
महिलांसाठी फॉलिक ऍसिड सप्लिमेंट घेणे सुरक्षित आहे का?
फॉलिक ऍसिड ही स्त्रियांची महत्त्वाची गरज आहे. ब्रेड आणि तृणधान्यांमधून फॉलिक ऍसिड मिळत असले तरीसुद्धा बऱ्याच स्त्रियांना फॉलिक ऍसिड पुरेसे मिळत नाही. ज्या स्त्रियांना गर्भधारणा हवी आहे अश्या स्त्रियांना दररोज 400 mcg फॉलीक ऍसिडचा डोस देण्याची शिफारस केली जाते. गरोदरपणात, सुमारे 600 mcg चा सल्ला दिला जातो
अनेक डॉक्टर स्त्रियांना गर्भधारणा होण्यासाठी जन्मपूर्व जीवनसत्त्वे किंवा दररोज फक्त मल्टीविटामिन घेण्यास सांगतात. मल्टीविटामिनमध्ये 400 mcg फॉलिक ऍसिड असणे गरजेचे आहे. फॉलिक ऍसिड हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व देखील आहे म्हणून ते दररोज बदलणे आवश्यक आहे.
फॉलिक ऍसिडचा उच्च डोस घेण्याचे धोके काय आहेत?
तुमच्या शरीरात फॉलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असणे सुद्धा धोकादायक आहे. तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केलेला डोस तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. फॉलिक ऍसिडचे दैनिक सेवन 1000 एमसीजी पेक्षा जास्त नसावे. जास्त डोसमुळे व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दूर होऊ शकते. परंतु फॉलीक ऍसिड घेण्यापूर्वी B-12 ची पातळी तपासून पाहणे महत्वाचे आहे.
तसेच, जास्त प्रमाणात फॉलिक ऍसिड घेतल्यास शुक्राणूंच्या संश्लेषणास हानी पोहोचू शकते आणि ते इतर औषधांशी देखील प्रक्रिया करू शकते. फॉलिक ऍसिड फेनिटोइनची प्रभावीता कमी करू शकते, आणि ते ऍंटीसिझर औषध आहे.
अशाप्रकारे, फॉलिक ऍसिड स्त्री आणि पुरुष अश्या दोघांचीही प्रजननक्षमता वाढवू शकते. फॉलिक ऍसिड बहुतेक सामान्य पदार्थांमध्ये आढळून येत असले तरी, नियमितपणे फॉलिक ऍसिडचा अतिरिक्त डोस घेतल्यास गर्भधारणेला मदत होऊ शकते. फॉलिक ऍसिडचा कोणताही जास्तीचा डोस घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण जास्त प्रमाणात फॉलिक ऍसिड घेतल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.
आणखी वाचा:
तुमची प्रजनन क्षमता वाढवणारे उत्तम अन्नपदार्थ
प्रजननक्षमता वाढवण्यासाठी सर्वोत्तम औषधी वनस्पती