तुम्ही गरोदर असल्याचे कळणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. गर्भधारणेच्या दिवसापासून गर्भधारणेची अनेक लक्षणे असू शकतात, परंतु ती तुमच्या लक्षात येणार नाहीत. गरोदर चाचणी करणे हा जरी योग्य पर्याय असला तरीसुद्धा तुम्ही गरोदर असल्याचे जाणून घेण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. गरोदर चाचणी न करता तुम्ही गर्भवती आहात हे कसे जाणून घ्यायचे ह्याविषयीची सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.
मासिक पाळी चुकणे आणि मळमळ होणे ही गरोदरपणाची प्राथमिक लक्षणे आहेत. ह्या व्यतिरिक्त, तुमचे स्तन दुखत असतील तर त्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता, तुम्ही लघवीचा वारंवारता तक्ता करू शकता. तुम्ही जास्त वेळा बाथरूमला जात आहात का, याचे विश्लेषण करू शकता. ही सर्व गर्भधारणेची चिन्हे आणि लक्षणे असली तरी, रक्त तपासणी किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर तुम्ही गरोदर असल्याची खात्री करू शकता. आत्ता आपण ह्या या लेखात चाचणीशिवाय गर्भधारणेची पुष्टी कशी करावी ते पाहू.
व्हिडिओ: चाचणी न करता गर्भधारणेची पुष्टी कशी करावी?
https://youtu.be/2udu8YSY6bM
चाचणी न करता गर्भधारणेची पुष्टी करण्याचे 22 सोपे मार्ग
चाचण्यांशिवाय गर्भधारणेची पुष्टी करण्याचे बरेच मार्ग आहेत - त्यासाठी शरीराच्या कार्यांचे निरीक्षण करणे आणि आईला कसे वाटते हे समजून घेणे गरजेचे आहे. गर्भधारणेची काही ‘लक्षणे’ पाहू
1. मासिक पाळी चुकणे
मासिक पाळी चुकल्यास स्त्रियांना त्या गर्भवती असल्याची शंका येते. जेव्हा गर्भाशयात भ्रूणाचे रोपण होते तेव्हा बीजवाहिनीतून अंडी सोडणे थांबवले जाते, परिणामी स्त्रीला मासिक पाळी येणे थांबते. जास्त खाणे, ताणतणाव आणि वजनात अचानक बदल यांमुळे सुद्धा मासिक पाळी काही वेळा येत नाही. तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असल्यास मासिक पाळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
2. हलके डाग
स्पॉटिंग म्हणजे स्त्रीच्या मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव होण्याची घटना. जेव्हा फलित बीजाचे गर्भाशयाच्या भित्तिकांवर रोपण होते तेव्हा योनीतून हलका रक्तस्त्राव होतो. हे सहसा स्त्रीच्या शेवटच्या मासिक पाळीच्या दोन आठवड्यांनंतर होते. स्पॉटिंग हे सामान्यतः गर्भधारणेचे ठोस लक्षण असते, त्यामुळे अपेक्षेपेक्षा वेगळ्या वेळी रक्त दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
स्पॉटिंग झाल्यावर कधीकधी सौम्य पेटके देखील येऊ शकतात. फलित अंड्याचे गर्भाशयाच्या अस्तरावर रोपण झाले आहे असा त्याचा अर्थ होतो. हलके डाग आणि पेटके येणे ही मासिक पाळीची लक्षणे आहेत असा गैरसमज काही वेळा होऊ शकतो.
तुमच्या गर्भाशयात रोपण झाल्यामुळे तुम्हाला पेटके येतात की नाही हे तुम्हाला कसे कळेल ते येथे दिलेले आहे
- पेटके टोचल्यासारखे वाटू शकतात
- पेटके ओढल्यासारखे वाटू शकतात
- पेटके आल्यावर तुम्हाला मुंग्या आल्यासारखे वाटू शकते
तुमची ओव्हुलेशन झाल्यानंतर 6-12 दिवसांनी इम्प्लांटेशन क्रॅम्प्स येऊ शकतात. मासिक पाळी सुरू झाल्यावर देखील असे होते, त्यामुळे तुम्हाला पेटके येत असतील तर त्यावर लक्ष ठेवा लक्षात ठेवा. पेटके तीव्र नाहीत ना ते पहा. तुमच्या ओटीपोटात तीव्र दुखत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना फोन करा.
3. उलट्या होणे
स्त्री गर्भवती असल्याचे आणखी एक सामान्य लक्षण म्हणजे मॉर्निंग सिकनेस . जेव्हा एखाद्या स्त्रीला सकाळी उठल्यावर क्षुल्लक कारणावरून उलट्या होतात त्यास मॉर्निंग सिकनेस म्हणतात. स्त्रीच्या शरीरातील वाढत्या संप्रेरकांच्या पातळीमुळे असे होते आणि गर्भधारणा झाल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनंतर हा त्रास उद्भवतो.
4. पोट फुगल्यासारखे वाटणे
गरोदरपणात सुरवातीच्या काळात, स्त्रियांना थोडेसे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटू शकते. जास्त ढेकर येणे, पोट फुगणे आणि पेटके येणे अशी लक्षणे सुद्धा दिसू शकतात. शरीरात प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढले की, त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे सूज येते.
5. संवेदनशील स्तन
गर्भधारणेचे आणखी एक प्रारंभिक लक्षण म्हणजे स्तन दुखणे. गरोदरपणात स्तन कोमल होतात आणि त्यांना सूज येते. स्तनाग्रांना अगदी हलका स्पर्श झाला तरी वेदना होतात. स्तनाग्रांचा रंग देखील गडद होऊ शकतो आणि त्या भागाच्या आजूबाजूला लहान ठिपके असू शकतात. हे डाग सहसा पांढरे असतात.
6. लघवी
जेव्हा स्त्री गर्भवती असते तेव्हा तिच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होतात. त्यामुळे गरोदर स्त्रियांना वारंवार लघवीला जाण्याची गरज भासते. रक्ताभिसरण वाढल्यामुळे आणि शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे गर्भवती स्त्रीला दर अर्ध्या तासाने बाथरूमला जावे लागते.
7. पाठदुखी
मासिक पाळीत पाठीत वेदना होतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात देखील ह्या वेदना होतात. या वेदनांचे कारण तणाव आणि संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे असू शकते त्यामुळे विश्रांती घेऊन आणि मालिश करूनही ह्या वेदना दूर होत नाहीत. परंतु,गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात तुम्ही हलके व्यायाम आणि योगासने करून ह्या वेदना कमी करू शकता.
8. डोकेदुखी
डोकेदुखी हे गर्भारपणाचे लक्षण नाही, परंतु जर ते येथे नमूद केलेल्या इतर लक्षणांसह जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. पहिल्या तिमाहीत बाळाची वाढ होत असताना डोकेदुखी सामान्य असते आणि दुसऱ्या तिमाहीत ती सुरू राहते. डोकेदुखीचे प्रमुख कारण हे ताण तणाव हे असू शकते त्यामुळे डोकेदुखीसाठी विश्रांती घेणे हा उपाय आहे.
9. मनःस्थितीतील बदल
जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा मूड स्विंग्स होणे सामान्य आहे. गरोदरपणात तुमच्या मनःस्थितीतील बदल हा अचानक आणि झटपट असतो- तुम्हाला एका क्षणी खूप आनंदी वाटते आणि दुसऱ्या क्षणी चिडचिड होत असते. हे संप्रेरकांच्या वाढत्या पातळीमुळे होते. जाणीवपूर्वक आनंदी राहण्याचा प्रयत्न करून मूड स्विंग्स कमी केले जाऊ शकतात.
10. जेवणात बदल
तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या अन्नाची लालसा वाटते आणि इतर अन्नपदार्थांबद्दल तिरस्कार वाटू शकतो. रक्तातील इस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे असे होते. संपूर्ण गरोदरपणात असे कधीही होऊ शकते. पदार्थ सुरक्षित असतील आणि तुम्ही जास्त खात नसाल तर अन्नाची लालसा पूर्ण केली जाऊ शकते.
11. थकवा
गरोदर स्त्रियांच्या शारीरिक कार्यात अनेक बदल होतात आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे झोप कमी होते आणि थकवा येऊ लागतो. रक्तातील प्रोजेस्टेरॉनमुळे असे होते आणि सतत मळमळ होते. साधारणपणे दुसऱ्या तिमाहीत थकवा कमी होतो, परंतु तिसऱ्या तिमाहीत पुन्हा थकवा येऊ लागतो.
12. संवेदनशील हिरड्या
हिरड्या अधिक संवेदनशील होणे हे सुद्धा गर्भारपणाचे लक्षण असू शकते. हिरड्या दुखू शकतात आणि अगदी हळूवार ब्रश करत असतानाही रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
13. तळवे लालसर होणे
ह्यास वैद्यकीय भाषेत पाल्मर एरिथेमा असे म्हणतात. गरोदरपणात गरोदर स्त्रीच्या तळहातांना लवकर लालसर रंग येतो. आईच्या शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढल्यामुळे ही स्थिती उद्भवते.
14. अनुनासिक रक्तसंचय
रक्तप्रवाहात हार्मोन्सचे प्रमाण वाढले की नाकाचा पडदा सुजतो आणि कोरडा होतो. यामुळे गर्भवती स्त्रियांचे नाक बंद होते - तुमचे नाक चोंदलेले राहू शकते किंवा नाक वाहायला सुरुवात होते.
15. शरीराचे सामान्य तापमान
तुमचे ओव्हुलेशन होत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी शरीराच्या सामान्य तापमानावर लक्ष ठेवणे हा एक उत्तम मार्ग आहे. गर्भधारणेचा प्रयत्न करणारी बहुतेक जोडपी स्त्रीच्या शरीराच्या तापमानाचा तक्ता करतात जेणेकरुन त्या स्त्रीचे ओव्हुलेशन कधी होते हे जाणून घेता येते. परंतु , ओव्हुलेशननंतर सुमारे दोन आठवडे तापमान जास्त राहिल्यास, ती स्त्री गर्भवती आहे असा त्याचा अर्थ होतो.
16. लैंगिक इच्छा
स्त्रीच्या शरीरात मोठ्या प्रमाणात संप्रेरक असल्यामुळे, ती गर्भवती झाल्यानंतर, कमीतकमी सुरुवातीच्या टप्प्यात, तिला जास्त प्रमाणात लैंगिक इच्छा होऊ शकत नाही. थकवा, गर्भधारणेचा ताण किंवा औषधोपचार यांमुळेही स्त्रीमध्ये लैंगिक आवड कमी होऊ शकते.
17. रंग बदल
गर्भधारणेमुळे तुमच्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या रंगद्रव्यात बदल होतात. तुमचे स्तनाग्र गडद होऊ शकतात आणि तुम्हाला कपाळावर, वरच्या ओठांवर आणि नाकाभोवती काळे डाग दिसू शकतात. ह्याला वैद्यकीय भाषेत मेलिस्मा असे म्हणतात. ह्याला इंग्रजी मध्ये 'मास्क ऑफ प्रेग्नन्सी' देखील म्हणतात. परंतु, रंगातील हा बदल प्रसूतीनंतर नाहीसा होतो.
18. गडद रेषा
गर्भवती स्त्रियांच्या पोटाच्या वरच्या भागापासून जांघेच्या हाडांपर्यंत केसांची गडद रेषा दिसते. जर स्त्री दुसऱ्यांदा गर्भवती झालेली असेल तर ही रेषा थोडी आधीपासून दिसण्यास सुरुवात होते.
19. मुरुमे
गरोदरपणात शरीरात होणारे संप्रेरकांमधील बदल हे तरुणपणात होणाऱ्या बदलांसारखेच असतात, त्यामुळे गरोदरपणात पुरळ पुन्हा दिसू लागल्यास त्यात काही आश्चर्य नाही. स्त्रीची त्वचा तेलकट आणि नाजूक होते. चेहऱ्यावर मुरुम दिसू लागतात. संवेदनशील त्वचेची उत्पादने वापरल्याने परिस्थिती आणखी बिघडल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला.
20. खाज सुटणे
जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिच्या त्वचेच्या काही भागांवर खाज सुटू शकते. ह्याचे कारण म्हणजे गरोदरपणात त्वचेला पुरवल्या जाणार्या रक्ताचे प्रमाण वाढते, आणि त्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. ह्याचा सामना करण्यासाठी, तुम्ही आरामदायक कपडे घालू शकता आणि क्रीम वापरू शकता. जर खूप असह्य झाले, तर तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या.
21. स्पायडर व्हेन्स
गर्भधारणेमुळे रक्तप्रवाहात जास्त प्रमाणात इस्ट्रोजेन सोडले जाते आणि त्यामुळे संपूर्ण त्वचेवर स्पायडर व्हेन्स तयार होतात. बाळाच्या जन्मानंतर हे रक्तवाहिन्यांचे जाळे सहसा नाहीसे होते. ही समस्या कमी झाली नाही तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या.
22. कोरडी त्वचा
संप्रेरकांमधील बदल, थकवा आणि गरोदरपणाच्या कालावधीत झोपेची कमतरता यासारख्या घटकांमुळे त्वचा कोरडी होते. परिस्थिती आणखी बिघडल्यास त्यावर उपचार कसे करता येतील याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. नेहमी सजलीत रहा जेणेकरून तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहील आणि त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.
सावधानता
गरोदरपणाची चिन्हे आणि लक्षणे ह्यांच्यावर लक्ष ठेवताना, सावधगिरी केव्हा बाळगली पाहिजे हे सुद्धा पहा. सावधानता बाळगण्यासाठी खाली काही चिन्हे आणि लक्षणे दिलेली आहेत.
- गर्भधारणेची लक्षणे वेगळ्या प्रकारे कार्य करतात. सर्व स्त्रियांना समान किंवा सर्व लक्षणे अनुभवणे शक्य होणार नाही. काहीवेळा, गरोदरपणाच्या सुरुवातीला, अनेक स्त्रियांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे ‘मला गर्भारपणाची कोणतीही लक्षणे का दिसत नाहीत’ ह्याची चिंता करणे आरोग्यासाठी चांगले नाही कारण ते अगदी सामान्य आहे. तुमच्या गर्भधारणेची पुष्टी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गर्भधारणा चाचणी करून घेणे.
- गर्भधारणेचे कोणतेही लक्षण असह्य झाल्यास किंवा जास्त प्रमाणात आढळल्यास, त्यामागचे मूळ कारण आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- स्तन दुखणे किंवा पोटात पेटके येणे ह्यासारखी अनेक लक्षणे वैद्यकीय समस्या देखील दर्शवू शकतात. हे कशामुळे होते आणि त्याचा गर्भधारणेवर काही परिणाम होतो का हे माहिती करून घेण्यासाठी वैद्यकीय मदत घ्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. गर्भधारणेची पुष्टी कधी केली जाऊ शकते?
तुमची मासिक पाळी चुकल्यानंतर सुमारे दहा दिवसांनी तुम्ही तुमच्या गर्भधारणेची पुष्टी करू शकता. गर्भधारणा चाचणीमध्ये लघवीतील एचसीजी संप्रेरकाची पातळी तपासली जाते कारण गरोदर राहिल्यावर ती लक्षणीयरीत्या वाढते.
2. गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे कधी गेले पाहिजे?
गर्भवती असल्याची शंका असल्यास, तुम्ही गर्भधारणा चाचणी खरेदी करू शकता आणि गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे स्वतः तपासून पाहू शकता. शंकांची पुष्टी झाल्यानंतर, आपण डॉक्टरांना भेट देऊ शकता. परंतु, जर तुम्हाला तुमच्या आधीच्या गरोदरपणात समस्या आलेल्या असतील तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जा.
3. तुम्ही गरोदर असल्याची पुष्टी करण्यासाठी तुम्ही गैर-वैद्यकीय मार्ग वापरू शकता का?
साबण, व्हिनेगर, टूथपेस्ट, ब्लीच इ.च्या मदतीने काही घरगुती गर्भधारणा चाचण्या केल्या जाऊ शकतात. परंतु, यापैकी कोणतीही चाचणी 100% अचूक नसल्याने तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल.
4. गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे जाणून घेण्याची नैसर्गिक चिन्हे किती अचूक असतात?
जर वरीलपैकी फक्त एखादे लक्षण आढळले तर तुम्ही गर्भवती नसल्याची शक्यता जास्त असते. परंतु, वरीलपैकी बहुतेक लक्षणे तुमच्यामध्ये आढळल्यास, तुम्ही गर्भवती असण्याची शक्यता असते.
5. अचानक वर्तणुकीतील बदल गर्भधारणा दर्शवतात का?
जर स्त्रीच्या मनःस्थिती मध्ये खूप बदल होत असतील आणि मासिक पाळी येत नसेल, तर ती स्त्री गर्भवती असल्याची शक्यता असू शकते. परंतु, हे गर्भधारणेची पुष्टी करणारे लक्षण नाही - त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
6. झोपेच्या पॅटर्नमधील बदलांमुळे तुम्ही गर्भधारणेची पुष्टी करू शकता?
गर्भवती स्त्रीच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनच्या वाढलेल्या पातळीमुळे झोपेचे चक्र बदलते. परंतु, इतर अनेक कारणांमुळे एखाद्या स्त्रीची झोप कमी होऊ शकते, त्यामुळे एखाद्या स्त्रीला नीट झोप लागत नसल्यास ती गर्भवती आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
वर नमूद केलेल्या लक्षणांपैकी जास्त लक्षणे तुमच्या मध्ये आढळली तर तुम्ही गर्भवती असण्याची शक्यता असते - जर फक्त एक किंवा दोन लक्षणे आढळली, तर तुम्ही बहुधा गर्भवती नसाल. परंतु, तुम्हाला यापैकी काही लक्षणे आढळल्यास तुम्हाला बाळ होणार असल्याची पुष्टी करण्यासाठी डॉक्टरांना भेटा.
संसाधने आणि संदर्भ: मेडिकल न्यूज टूडे
आणखी वाचा:
घरगुती गरोदर चाचण्या
सोप्या आणि विश्वसनीय घरगुती गर्भधारणा चाचण्या