गर्भारपण

ओटी भरण (भारतीय बेबी शॉवर) समारंभ

स्त्रीचे गरोदरपण आणि बाळंतपण खूप आनंदाने साजरे केले जाते. प्राचीन काळी गरोदर स्त्रीचे डोहाळे जेवण केले जायचे. आज काल त्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. प्राचीन भारतात, आईला फळे आणि इतर खाद्यपदार्थ भेटीच्या स्वरूपात दिले जात होते. त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी त्याची मदत होत होती. कालांतराने स्वरूप बदलत गेले. सध्या त्या समारंभास डोहाळे जेवण किंवा ओटी भरण असे म्हणतात.

ओटी भरण म्हणजे काय?

ओटीभरणाची प्राचीन भारतीय परंपरा म्हणजे बेबी शॉवरच्या पाश्चात्य संकल्पनेसारखीच आहे. मातृत्वाचा तो एक उत्सव आहे. गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या महिलांसाठी हा सोहळा म्हणजे एक आधार यंत्रणा म्हणून कार्य करते. हिंदीमध्ये ह्या सोहळ्यास गोध भराईअसे म्हणतात.

देशाच्या विविध भागात हा समारंभ साजरा होतो:

. बंगाल

बंगालमध्ये ह्या सोहळ्यास 'शाद' असे म्हणतात. स्वादिष्ट अन्नपदार्थांवर भर दिला जातो. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यामध्ये हा कार्यक्रम केला जातो. या उत्सवाचा एक अनोखा पैलू म्हणजे बाळासाठी भेटवस्तू देऊ नयेत असे म्हटले जाते, कारण त्यामुळे दुर्दैव येते असे मानले जाते.

. केरळ

सीमाधाम म्हणून हा विधी ओळखला जातो. बाळाच्या बुद्धिमत्तेला सर्वोतोपरी महत्त्व दिले जाते, जप आणि प्रार्थना या ध्येयासाठी समर्पित असतात, जवळजवळ ९० मिनिटे जप आणि प्रार्थना केली जाते.

. तामिळनाडू

तामिळनाडू मध्ये ह्या सोहळ्यास "वालई कप्पू' म्हणून ओळखले जाते. अपवित्र घटकांपासून बचाव करण्यासाठी आईला लाल आणि हिरव्या बांगड्यांनी तसेच काळी साडी नेसून जाते. ह्या सोहळ्यादरम्यान किमान चार वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देणे हा समारंभाचा एक महत्त्वाचा भाग असतो.

. पंजाब

गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात जवळच्या कुटुंबीयांसह 'गोध भराई' चा विधी केला जातो. सासूची मध्यवर्ती भूमिका असते. प्रार्थनेनंतर ती सुनेच्या मांडीवर फळे आणि नारळ असलेला दुपट्टा ठेवते.

. गुजरात

गुजरात मध्ये हा समारंभ 'गोध भरणा' म्हणून ओळखला जातो. पंजाब प्रमाणेच गुजरातमध्ये सुद्धा सासूची भूमिका मध्यवर्ती असते. आईला बाजोत्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वस्तूवर पाय रोवून बसलेले असते. मग, सासू तिच्या मांडीवर दागिने आणि इतर भेटवस्तू ठेवते.

. महाराष्ट्र

महाराष्ट्रात हा समारंभ 'डोहाळे जेवण' म्हणून ओळखला जातो. ह्या मराठी शब्दाचा अनुवाद "अन्नाची लालसा पूर्ण करणे" असा होतो. नावावरूनच स्पष्ट होते की, ह्या समारंभामध्ये खाद्यपदार्थावर भर दिला जातो. भात आणि पुरणपोळी यांसारखे पदार्थ मेनूमध्ये असतात. या समारंभाचा एक रोमांचक पैलू म्हणजे मुलगा होणार की मुलगी हा खेळ खेळला जातो.

ओटीभरण कधी केली जाते?

भारत हा एक विशाल देश आहे आणि मातृत्वाचा हा उत्सव अगदी विशिष्ट पद्धतीनेच साजरा केला पाहिजे असे नाही. उदाहरणार्थ केरळमधील नायर समुदाय, गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात हा सोहळा साजरा करतो. शेजारच्या तामिळनाडूमध्ये, कधीकधी गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात डोहाळेजेवण केले जाते. सातव्या किंवा अगदी नवव्या महिन्यात सुद्धा ते केले जाऊ शकते.

भारतीय बेबी शॉवरचे महत्त्व

भारतीय बेबी शॉवर एक सांस्कृतिक कल्पना आहे आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ पाहणे आवश्यक आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आणि विशेष काळजीमुळे, गरोदरपण तुलनेने सुरक्षित आहे. एका शतकापूर्वी अशी परिस्थिती नव्हती तेव्हा मृत्यू दर जास्त होता, अनेक स्त्रिया विविध वैद्यकीय गुंतागुंतांना बळी पडत होत्या. रक्तस्त्राव जास्त होत होता. ओटीभरण, कधीकधी, त्या स्त्रीसाठी शेवटचा उत्सव ठरत असे, म्हणूनच प्रार्थना हा समारंभाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ओटीभरण कसे केले जाते?

ओटीभरण सोहळा अधिक आनंददायी करण्यासाठी काही टिप्स

. योग्य नियोजन

तुमच्या बाळाला कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ नये म्हणून तुम्ही आधीच नियोजन करणे चांगले. विशेषतः ह्या टप्प्यावर मदत घेण्यास अजिबात संकोच बाळगू नका. सगळे नियोजन मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांवर सोपवा. तुम्ही त्यासाठी इव्हेंट प्लॅनरची देखील मदत घेऊ शकता.

. विश्रांती

ह्या समारंभांमुळे गरोदर स्त्रीवर ताण येऊ शकतो. समारंभाच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेत असल्याची खात्री करा. समारंभाच्या ठिकाणी तुमच्यासाठी जागा राखून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच बसता येईल.

. कपडे

समारंभावर हवामानाचा अनपेक्षितरित्या परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यात, कडक सिल्क किंवा भरपूर भरतकाम असलेल्या साड्या घालणे टाळा, कारण त्यामुळे घाम येऊ शकतो. हिवाळ्यात, जर तुम्हाला खूप थंड वाटत असेल तर सोबत कोट घेण्यास अजिबात संकोच करू नका.

. प्रतिबंधित खाणे

समारंभात आजूबाजूला खूप चांगले खाद्यपदार्थ असल्यामुळे, ते पदार्थ खाण्याचा मोह होऊ शकतो. लक्षात ठेवा की तुमचा आहार महत्त्वाचा आहे. हे पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ आणि रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होणे ह्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

. पाहुण्यांचे मनोरंजन

आपल्या पाहुण्यांना समाधानी आणि आनंदी ठेवणे हे चांगला समारंभ होण्यासाठी महत्वाचे आहे. चांगल्या जेवणाव्यतिरिक्त, तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी स्त्रियांच्या हातावर मेंदी काढण्यासाठी मेंदी कलाकार ठेवू शकता.

. भेटवस्तू

तुमच्याकडे मोठे बजेट असल्यास किंवा सर्व पाहुण्यांचे आभार मानायचे असल्यास, तुम्ही त्यांना भेट वस्तू देऊ शकता. पारंपरिक दुपट्टे किंवा एखादे आभार प्रदर्शन करणारे कार्ड सुद्धा तुम्ही देऊ शकता

भारतीय बेबी शॉवरसाठी कल्पना

भारतात ओटीभरण हा एक पारंपरिक समारंभ आहे, परंतु त्या समारंभामध्ये काही बदल करावयाचे असल्यास त्यावर काहीही निर्बंध नाहीत. खाली काही कल्पना आहेत ज्या तुम्ही वापरू शकता:

. बेबी थीम

ओटी भरणाच्या समारंभासाठी तुम्ही एखादी थीम ठरवू शकता. सर्वात लोकप्रिय विषयांपैकी एक म्हणजे बेबी थीम. ह्या थीम मध्ये पेपर प्लेट्सपासून नॅपकिन्सपर्यंत प्रत्येक गोष्टीवर बाळाचे चित्र असते.

. पॉटलक

केटरिंगसाठी खूप पैसे खर्च होऊ शकतात आणि अन्न वाया जाऊ शकते. मेनूमध्ये काय आहे हे तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणी ठरवू शकता आणि प्रत्येक व्यक्ती एखादा पदार्थ तयार करून घेऊन येऊ शकते.

. होणाऱ्या आईचे लाड करणे

ओटी भरणाच्या सोहळ्याचा मूळ उद्धेश म्हणजे तुमचे लाड करून घेणे. म्हणजेच समारंभाच्या दिखाव्याला कमी महत्व देऊन तुम्हाला कशामुळे बरे वाटते आहे ह्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. गरोदर स्त्रीला स्पा आणि सलूनची कुपन्स सुद्धा तुम्ही देऊ शकता.

. अनुकूल आहार

जर तुमचेच डोहाळे जेवण असेल तर तुम्हालाच ते जेवण खाण्यावर निर्बंध का? येथे तुम्ही काही गोष्टी बदलू शकता. फक्त पौष्टिक स्नॅक्स आणि गरोदर स्त्रियांसाठी अनुकूल असे पदार्थ तयार केले पाहिजेत.

. डू इट फॉर युअर सेल्फ (डीआयवाय) बेबी शॉवर

बेबी शॉवर साठी नेहमीच फॅन्सी ठिकाणे आणि स्टेज इव्हेंट्स असायला हवेत असे नाही. एक डीआयवाय बेबी शॉवर केल्यास त्यामध्ये तुमच्या कौशल्यांचा वापर केला जाऊ शकतो. पाहुण्यांना हाताने बनवलेल्या रिबन्स दिल्या जाऊ शकतात, चार्ट पेपरपासून सजावट करता येते आणि भेटवस्तू देखील हाताने तयार केल्या जाऊ शकतात.

. पर्यावरणास अनुकूल थीम

तुम्ही निसर्ग प्रेमी आहात का? हवामान आल्हाददायक असल्यास, ओटी भरणाचा समारंभ घराबाहेर आयोजित केला जाऊ शकतो. परंतु तिथे प्लास्टिकचा वापर करू नये, त्याऐवजी पेपर प्लेट्स आणि कप तुम्ही वापरू शकता. प्लास्टिकचे चमचे टाळण्यासाठी हाताने खाण्यास प्रोत्साहन द्या आणि कमीतकमी सजावट करा.

जेव्हा तुम्ही मातृत्वाच्या प्रवासात असता तेव्हा तुमच्या सभोवतालच्या सर्वांच्या पाठिंब्याची तुम्हाला गरज असते. अशा वेळी ओटीभरणाचा समारंभ केला जातो. चिंता, निद्रानाश आणि पचनाच्या समस्या तुम्हाला येत असतात तेव्हा, आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहण्याचा हा उत्सव तुमच्यासाठी एक उत्तम ब्रेक ठरू शकतो!

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved