Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य मकर संक्रात २०२३: मुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती

मकर संक्रात २०२३: मुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती

मकर संक्रात २०२३: मुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती

मकर संक्रांतीच्या सणाचे भौगोलिकदृष्टया खूप महत्व आहे. या दिवशी सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो (म्हणून मकरहे नाव मकरराशीशी संबंधित आहे). मकर संक्रांती ह्या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते.

मकर संक्रांतीचा सण म्हटले की पतंगाची आठवण होते. हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे. हा सण भारताच्या सर्व भागांमध्ये साजरा केला जातो. तर, उत्तरायण किंवा मकर संक्रांती म्हणजे काय? ह्याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये एकत्र येऊन हा सण आपण साजरा करतो परंतु ह्या सणाची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

मकर संक्रांतीचे महत्व आणि इतिहास

मकर संक्रांती पासून वसंत ऋतूची सुरुवात होते. ह्याच कालावधीत कापणी चा हंगाम सुरु होतो. हा सण भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उत्तर भारतात हा सण लोहरी आणि दक्षिणेकडे पोंगल म्हणून ओळखला जातो. पूर्वी आर्य लोक हा दिवस सणांसाठी शुभ दिवस म्हणून साजरा करू लागले. महाभारतासारख्या महाकाव्यात सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे. भीष्म पितामहांनी युद्धात जखमी झाल्यानंतर, उत्तरायण सुरू होईपर्यंत आपल्या जीवनाशी खूप संघर्ष केला. ह्या शुभ मुहूर्तावर त्यांना देवाज्ञा झाली. ह्या दिवशी ज्या लोकांचा मृत्यू होतो त्यांना मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते.

मकर संक्रांत का साजरी केली जाते?

मकर संक्रांतीच्या दिवशी कापणीचा हंगाम सुरु होते आणि वसंतऋतूची सुरुवात होते. ह्या शुभ दिवशी, श्रीविष्णू आणि देवी महालक्ष्मीसह सूर्यदेवाची देशभरात पूजा केली जाते. सूर्य मकर राशीत (मकर) प्रवेश करतो. ‘संक्रांतीया शब्दाचा अर्थ म्हणजे सूर्याचे भ्रमण एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होते. चंद्र दिनदर्शिकेनुसार, जेव्हा सूर्य दक्षिणायनापासून उत्तरायण (कर्कवृत्त ते मकर राशीच्या उष्णकटिबंधीय) पर्यंत जातो, तेव्हा वसंत ऋतूस सुरुवात होते. हा सण डिसेंबरच्या मध्यात सुरू होणाऱ्या अशुभ काळाची समाप्ती दर्शवतो असे मानले जाते. बहुतेक हिंदू कुटुंबे मकर संक्रांतीच्या उत्सवानंतरच कोणतेही धार्मिक विधी करतात.

तारखेचे महत्त्व

मकर संक्रांतीचे काय महत्व आहे असा प्रश्न तुम्हाला पडतो आहे का?. हा सण एका निश्चित तारखेला म्हणजे दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. तो सौर दिनदर्शिकेनुसार दरवर्षी त्याच दिवशी येतो. मकर संक्रांतीचा सण कसा साजरा करायचा? देशभरातील लोक हा सण कसा साजरा करतात? ते पाहूया!

मकर संक्रांतीच्या प्रथा आणि परंपरा

. हलव्याची देवाणघेवाण

संक्रांतीच्या दिवशी, लोक रंगीबेरंगी गोड पदार्थांची देवाणघेवाण करतात ज्याला मराठीत हलवाम्हणतात. हलवा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते साधे साखरेचे दाणे आहेत. तिळगुळाची देवाणघेवाण करताना, लोक एकमेकांना मराठीत तिळगुळ घ्या गोड बोलाम्हणत शुभेच्छा देतात. हे वाक्य सद्भावनेचे प्रतीक म्हणून बोलले जाते आणि त्याचा मूळ अर्थ चला भूतकाळातील वाईट भावना आणि राग विसरू, मतभेद सोडवू आणि मैत्रीपूर्ण वातावरणात राहूअसा आहे.

. गुळापासून बनवलेल्या मिठाईची देवाणघेवाण

मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ घालून मिठाई तयार करणे आणि त्यांची देवाणघेवाण करणे ही आणखी एक प्रथा आहे. उसाची कापणी, हंगामातील पहिले पीक म्हणून केली जाते आणि नंतर त्याचे रूपांतर गुळात केले जाते. ह्या गुळाचा वापर करून गोड पदार्थ तयार केले जातात आणि देवाला त्या पदार्थांचा नेवेद्य दाखवला जातो. असे करून, शेतकरी त्यांना मिळालेल्या भरपूर पिकासाठी देव आणि निसर्गाचे आभार मानतात.

. तिळाचा वापर (तीळ)

या प्रथेचे आध्यात्मिक स्पष्टीकरण आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नानापूर्वी अंगाला तिळाचे तेल लावतात. तसेच अंघोळीच्या पाण्यात मूठभर तीळ घालतात. ह्या पाण्याने स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. तसेच, तीळ घातलेले पाणी प्यायले जाते. देवाला तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नेवेद्य अपर्ण केल्यास त्या व्यक्तीची अध्यात्मिक प्रवृत्ती सुधारण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार तीळ नकारात्मक ऊर्जा (तामसिक) शोषून घेतात आणि सकारात्मक ऊर्जा (सात्विक) उत्सर्जित करतात.

तिळाचा वापर (तीळ)

. काळ्या रंगाचे कपडे घालणे

ह्या दिवशी महाराष्ट्रीयन लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात. महिलांनी या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसून हळदी कुंकूसोहळा करणे शुभ मानले जाते. काळे कपडे घालण्याची परवानगी असलेला हा खरं तर एकमेव सण आहे. अन्यथा, इतर कुठल्याही हिंदू सणाच्या दिवशी काळे कपडे घालण्यास परवानगी नसते. मकर संक्रांतीला काळे परिधान करण्याचे कारण म्हणजे हिवाळा ऋतू शिगेला असताना हा सण येतो. काळा रंग उष्णता टिकवून ठेवतो आणि शोषून घेतो, त्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यास मदत होते.

. पतंग उडवणे

मकर संक्रांती म्हणजे सूर्य उत्तरेकडे म्हणजेच उत्तरायणाकडे सरकू लागतो. आयुर्वेदानुसार जेव्हा सूर्य उत्तरायणात असतो तेव्हा त्याच्या किरणांचा शरीरावर औषधी प्रभाव पडतो. त्यामुळे, हिवाळ्याच्या दीर्घ महिन्यांनंतर, जेव्हा लोक पतंग उडवण्यासाठी मोकळ्या वातावरणात येतात, तेव्हा त्यांना नकळत सूर्यप्रकाशाचे फायदे मिळतात. त्यांचे शरीर सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येते आणि थंडीच्या हंगामात त्यांना होणारे सर्व संसर्ग जसे की , सर्दी, खोकला आणि कोरडी त्वचा ह्यापासून मुक्ती मिळते. या शुभ दिवशी, आपण, आकाशात सजवलेल्या पतंगांचे विविध रंग आणि आकार पाहू शकतो. विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये पतंग उडवणे लोकप्रिय आहे. पतंग सामान्यतः हलक्या वजनाचे कागद आणि काड्यांचे बनलेले असतात आणि समभुज चौकोनाच्या आकाराचे असतात.

वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त आणखी काही गोष्टींची सुरुवात ह्या दिवशी केली जाते. स्त्रिया दिवसाची सुरुवात आपली घरे आणि अंगण झाडून आणि पुसून करतात. त्यानंतर दारात रांगोळी काढली जाते. उटण्याने आंघोळ केल्यावर, स्त्रिया देवी सरस्वतीची पूजा करण्यासाठी नवीन कपडे घालतात. तसेच, कुटुंबातील दिवंगत पूर्वजांची प्रार्थना केली जाते. थोडक्यात, मकर संक्रांती हा ज्ञान, शांती, समृद्धी, सद्भावना आणि आनंद ह्यांची स्थापना करणारा दिवस आहे. ह्या दिवशी वसंत ऋतूचे आगमन होते आणि थंडी कमी होऊ लागते.

मकर संक्रांतीचा सण, शेतकरी समाजामध्ये आनंद आणि समृद्धी घेऊन येतो असे म्हटले जाते. यंदा, ह्या सणाचे महत्त्व तुमच्या मुलांसोबत शेअर करा. ह्या सणाचे महत्व माहिती झाल्यास ते अधिक उत्साहाने ह्या सणाचा आनंद घेऊ शकतील. तसेच आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाची माहिती देखील ते मिळवू शकतील.

आणखी वाचा:

मकर संक्रांतीसाठी विशेष पदार्थ आणि रेसिपी
मकरसंक्रांत: तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article