मुलांना पोटदुखीचा त्रास अधूनमधून सारखाच होत असतो. त्याचे कारण म्हणजे मुले कोणत्याही वेळी आणि काहीही खातात. परंतु ह्यासोबत इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे लहान मुलांना पोटदुखी होऊ शकते. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की यावर काही सोपे घरगुती उपचार आहेत. पोटदुखीवर असे अनेक प्रभावी उपाय आहेत ज्यामुळे मुलांची पोटदुखीपासून सुटका होऊ शकते.
मुलांच्या पोटदुखीवर नैसर्गिक उपाय
मुलांच्या पोटदुखीमुळे तुमची रात्रीची झोप उडाली असेल, तर काळजी करू नका. लहान मुलांच्या पोटदुखीवर इथे काही उपाय येथे आहेत. हे उपाय केल्याने लहान मुलांना होणारी पोटदुखी बरी होईल आणि त्यांना बरे वाटेल.
१. तुमच्या मुलाला सजलीत ठेवा
आपल्या मुलाला सजलीत ठेवण्यासाठी पुदीना किंवा आल्याच्या चहासारखा कोणताही चहा साखर न घालता द्या. ह्यामुळे त्याच्या पोटात दुखत असलेल्या नसा शांत होतील आणि त्याच्या पोटातील वेदना कमी होण्यास मदत होईल. त्याला बरे वाटेपर्यंत त्याला दुग्ध उत्पादने किंवा तळलेले/तेलकट पदार्थ देणे टाळा. जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा आपण त्याला टोस्ट किंवा दलिया देऊ शकता. जर त्याच्या पोटात वेदना होऊन उलट्या झाल्यास, त्याला कोणत्याही प्रकारचे खाद्य देऊ नका. वेदना कमी होईपर्यंत त्याला द्रव आहार द्या.
२. कोमट कॉम्प्रेसचा वापरून पहा
पोटदुखीचा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय म्हणजे कोमट कॉम्प्रेसचा वापर करा. कोमट कॉम्प्रेसबद्दल चांगली गोष्ट म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि यामुळे लवकर आराम मिळतो. तुम्ही हीटिंग पॅड वापरत असल्यास, उष्णतेची सर्वात निम्न पातळी निवडा आणि ते तुमच्या मुलाच्या पोटावर ठेवा. परंतु ते थेट ठेवू नका. तुमच्याकडे हीटिंग पॅड नसल्यास गरम पाण्याने भरलेली बाटली वापरा ती एका कपड्यात लपेटून घ्या आणि तुमचे कोमट कॉम्प्रेस तयार आहे. आपण वापरत असलेले हीटिंग पॅड किंवा पाण्याची बाटली खूप गरम नसल्याचे सुनिश्चित करा. उबदार कॉम्प्रेस खूप प्रभावी आहे. उष्णतेमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि तुमच्या बाळाची पोटदुखीपासून सुटका होते.
3. हिंगाची पेस्ट लावा
लहान मुलामध्ये पोटदुखीसाठी हिंग देखील एक प्रभावी उपाय आहे. हिंगामुळे शरीरातून वायू मुक्त होतो आणि पोटाच्या वेदना कमी होतात. पेस्ट तयार करण्यासाठी पाण्यात हिंग पावडर मिसळा आणि बाळाच्या बेंबीवर लावा. पेस्ट बेंबीमध्ये जाणार नाही ह्याची खात्री करा. ऑलिव्ह ऑईलमध्ये हिंग पावडर मिसळून बाळाच्या पोटावर काही काळ त्याने मसाज केल्याने त्याला त्वरित आराम मिळू शकेल.
४. बाळाला दही आणि इतर प्रोबियोटिक पदार्थ खाण्यास प्रवृत्त करा
पोटदुखी शांत करण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थ देखील उपयोगी आहेत. उदाहरणार्थ, दह्यामध्ये प्रोबायोटेक्स असतात आणि त्यामुळे अतिसार आणि पेटक्यांपासून मुक्तता होऊ शकते. दह्यामध्ये चांगले जिवाणू देखील असतात त्यामुळे आतड्यांमधील सूक्ष्मजीवाणूंची नुकसान भरपाई होते. मेथीचे दाणे लहान मुलांमधील पोटदुखीवर उपचार करण्यास मदत करतात. मूठभर मेथीचे दाणे बारीक करा, दही घाला आणि तुमच्या मुलाच्या पोटात दुखत असेल तर द्या. कोणतेही जड पदार्थ देण्याऐवजी त्याला खिचडी किंवा साधा भात द्या. खिचडी पोटासाठी हलकी आहे आणि त्यामुळे तुमच्या मुलाचे बिघडलेले पोट शांत होईल.
५. हर्बल टी द्या
लहान मुलांमधील पोटदुखी कमी करण्यासाठी हर्बल टी हा चांगला उपाय आहे. थोडेसे आले किसून घ्या आणि थोडावेळ गरम पाण्यात भिजवा. तुमचे मूल दोन वर्षे किंवा त्यापेक्षा मोठे असेल तर गाळून हा चहा त्याला द्या. जर तुमच्या मुलाचे वय दोन वर्षांपेक्षा कमी असेल तर बाळाच्या नाभीला आल्याचा रस लावू शकता. तुम्ही त्याला पुदिन्याची पाने आणि त्यात थोडा थेंब लिंबाचा रस घालून चहा देऊ शकता, कारण त्यामुळे पोटदुखी कमी होण्यास मदत होते. पुदीना आतड्यातून हानिकारक जीवाणू काढून टाकण्यास मदत करतो तर लिंबू बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. तथापि, तुमच्या मुलास हर्बल टी देण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
६. मध द्या
मध हा कर्बोदके, साखर आणि अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. मध हर्बल टीमध्ये किंवा कोमट पाण्यात घालून मुलांना दिले जाऊ शकते. मुलांना मध खायला सुद्धा आवडतो. तथापि, तुमच्या मुलाचे वय २ वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला मध देऊ नका.
७. मुलांना हळूवारपणे मालिश करा
पोटाकडील भागात दुखत असलेल्या नसा आणि स्नायूंना आजूबाजूच्या रक्त परिसंचरणात वाढ करून लहान मुलाला बरे वाटू शकते आणि हळूवारपणे मालिश केल्यास हे सहज करता येते. आपल्या तळवे आणि बोटांचा वापर करून, मुलाच्या नाभीच्या भागाभोवती घड्याळाच्या दिशेने वर्तुळाकार हालचालींमध्ये हळूवारपणे मालिश करा. हनुवटीपासून खाली ओटीपोटापर्यंत मालिश केल्यास आराम मिळतो.
८. फूट रीफ्लेक्सोलॉजी करून पहा
आपल्या हात आणि पायात अशा अनेक नसा आहेत ज्या हलकेच दाबल्यास शरीराच्या विशिष्ट भागावर उपचारात्मक प्रभाव पडतो. आपल्या मुलाच्या डाव्या पायाला आपल्या उजव्या हाताच्या तळहाताने धरून ठेवा. त्याचा घोटा पकडून अंगठ्याने हळूच दाब द्या. त्याच्या डाव्या पायाच्या मध्य कमानावर एक मिनिटासाठी दाब द्या आणि हे ४–५ वेळा पुन्हा करा. तात्काळ परिणामासाठी जेवणाच्या वेळेपूर्वी हे करा.
९. तुमच्या लहान मुलाला हालचाल करण्यास सांगा
जरी हा घरगुती उपाय नसला तरी तो मदत करू शकतो. जर आपल्या मुलाला पोटदुखीची तक्रार असेल तर त्याच्या पचनसंस्थेला उत्तेजन देण्यास मदत करणारी कोणतीही कृती करण्याची शिफारस केली जाते.
चालणे आणि धावणे यासारख्या मध्यम क्रिया तुमच्या लहान मुलाच्या पोटाला आराम देऊ शकतात.
१०. बीआरएटी आहार
तुम्ही लहान मुलाचे पालक असल्यास, तुम्हाला बीआरएटी आहाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तथापि, तुम्हा ते माहिती नसल्यास ते काय आहे ते शोधा. ह्या आहारामुळे अस्वस्थ पोटास आराम मिळू शकतो. केळी, तांदूळ, सफरचंद आणि टोस्ट (बीआरएटी) ह्या आहारामुळे अतिसार झालेला असल्यास आराम मिळू शकतो. ह्या पदार्थांमध्ये कोणतेही मसाले नसतात, म्हणूनच पोटदुखीची समस्या आणखी वाढत नाही. याउलट, मुले आजारी असताना त्यांना काहीतरी चवदार खाण्याची इच्छा असते.
लहान मुलांमधील पोटदुखी कशी टाळाल?
जर तुमचे लहान मूल सतत पोटदुखीची तक्रार करत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याच्या आहारात काहीतरी गडबड असण्याची शक्यता असते आणि तुम्ही त्यावर उपाय करणे गरजेचे असते. या समस्येस प्रतिबंध करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतील अशा काही टिप्स येथे आहेत.
- तुमच्या मुलाचे पोट बद्धकोष्ठतेमुळे दुखत असेल तर त्याच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा.
- आपल्या मुलाला जास्त प्रमाणात खाऊ घालू नका. त्याला तीन वेळेला जास्त जेवण देण्याऐवजी देण्याऐवजी वारंवार वारंवार थोडे थोडे खायला द्या.
- लहान मुलांना लहान पणापासूनच खाण्यापूर्वी हात धुण्याची सवय लावा कारण त्यामुळे तुमच्या मुलाचा जिवाणूंच्या संसर्गापासून बचाव होईल.
- झोपण्यापूर्वी त्याला खाऊ नका कारण यामुळे अपचन होऊ शकते.
पोटदुखी ही मुलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. जर तुमच्या लहान मुलाला पोटदुखी असेल तर त्याला आरामदायक स्थितीत पलंगावर झोपवा. त्याच्या बाजूला झोपा आणि त्याचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी त्याच्या आवडत्या कथा वाचा. पोटदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही वर नमूद केलेल्या उपाय सुद्धा करु शकता. तथापि, जर हे उपाय अपयशी ठरले आणि तुमच्या मुलास हालचाल करणे अशक्य होत असेल किंवा तापासोबत वेदना सुद्धा होत असतील तर, त्याला डॉक्टरकडे घेऊन जा आणि लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या.
आणखी वाचा:
मुलांना होणाऱ्या उलट्या – प्रकार, कारणे आणि उपचार
लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय