आरोग्य

मुलांच्या पावलांमध्ये वेदना होणे – कारणे आणि घरगुती उपाय

जर तुमच्या मुलाची पावले नेहमी दुखत असेल तर, त्याच्या वेदनांमध्ये वाढ  होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, काहीवेळा बाळाला फक्त वेदनांमुळे अस्वस्थता येत नाही तर त्यामागे काही वैद्यकीय समस्या सुद्धा असू शकतात.  जर तुम्ही लहान मुलांची पावले दुखण्याची कारणे आणि उपाय ह्याविषयीची माहिती शोधत असाल तर हा लेख संपूर्ण वाचा.

मुलांचे पाय कशामुळे दुखतात?

लहान मुले खूप सक्रिय असतात आणि त्यांचा बहुतेक वेळ घरामध्ये तसेच बाहेर धावण्यात जातो आणि त्यामुळे त्यांचे पाय दुखू शकतात. परंतु, याव्यतिरिक्त मुलांची पावले दुखण्यामागे अनेक कारणे आहेत.

1. दुखापत

पाय मुरगळणे, फ्रॅक्चर किंवा इतर अशा कोणत्याही दुखापतीमुळे तुमच्या मुलाच्या पावलांमध्ये वेदना होऊ शकतात. जर अशा प्रकारच्या दुखापतींमुळे तुमच्या मुलाची पावले दुखत असतील, तर तुम्ही त्यासाठी तत्काळ वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

2. ऍथलेटिक्स फूट

बोटांच्या दरम्यान तीव्र खाज सुटते. पायाची त्वचा कोरडी पडून खवले निघू शकतात. हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे,  स्विमिंग पूल मधून हा संसर्ग होऊ शकतो किंवा अस्वच्छ मोजे घातल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.

3. सिव्हर्स डिसीज

मुलाची वेगाने वाढ होत असताना ही समस्या उद्भवू शकते. वाढीच्या वेगामुळे मुलाच्या पावलांमध्ये खूप वेदना होऊ शकतात. त्याला टाचांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. मैदानी खेळ खेळणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या अधिक सामान्य आहे.

4. सपाट पाऊल

जर तुमच्या मुलाची पावले दुखण्याची तक्रार असेल तर वेदना घोट्यापासून पोटरीपर्यंत जातात. अश्या प्रकारच्या वेदना जर होत असतील तर तुमच्या मुलाला सपाट पायांची समस्या असण्याची शक्यता असते.

5. अयोग्य शूज

काही वेळा मुले योग्य शूज घालत नाहीत किंवा खूप घट्ट शूज घालतात. त्यामुळे त्यांची पावले दुखू शकतात. घट्ट शूजमुळे तुमच्या मुलाच्या पावलांवर फोड येतात आणि पायाच्या त्वचेवर सुद्धा परिणाम होतात. त्यामुळे जास्त वेदना होऊ शकतात.

6. गाठ

जर तुमचे मूल त्याच्या पायाच्या कमानदार भागाचा अधिक वापर करत असेल, तर पायाच्या अंगठ्याजवळ एक मोठा उंचावटा दिसू शकतो. हा उंचावटा पायाच्या एका बाजूने बाहेर येऊ शकतो. ही स्थिती जन्माच्या वेळी किंवा अनुवांशिक कारणांमुळे कोणत्याही प्रकारच्या पायाच्या विकृतीमुळे उद्भवू शकते आणि त्यामुळे वेदना होऊ शकतात.

7. आतल्या बाजूला नखांची वाढ होत असल्यास

काहीवेळा पायाची नखे नीट कापली जात नाहीत. अश्या वेळी नखांची वाढ आतील दिशेने होते आणि ही नखे त्वचेत रुततात.  यामुळे आजूबाजूची त्वचा लाल आणि खरखरीत होते. तसेच त्या भागात वेदना होतात.

8. प्लांटर वॉर्ट्स

ह्यांना अनेकदा चुकून कुरूप समजले जाते. प्लांटार वॉर्ट्स विषाणूजन्य संसर्गामुळे होतात आणि ते अत्यंत संसर्गजन्य असतात. या चामखीळांची मुळे त्वचेत खोलवर असतात आणि चालताना खूप वेदना होऊ शकतात आणि अस्वस्थता येऊ शकते.

9. प्लांटर फॅसिटायटिस

प्लांटर फॅसिटायटिसला सूज आल्यामुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते. प्लांटर फॅसिटायटिस संयोजी ऊतकांची जाड पट्टी आहे. चालताना अडचण निर्माण होणे, पाय दुखणे आणि तीव्र टाचदुखी इत्यादींचा समावेश होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सकाळी जास्त दिसून येतात.

10. ऍचिलीस टेंडोनिटिस

शारीरिक हालचाल वाढलेल्या मुलांमध्ये ही स्थिती दिसून येते. वाढलेल्या कामांमुळे टाचेवर आणि पायाच्या मागील भागावर दाब येऊ शकतो. त्यामुळे वेदना होऊन अस्वस्थता निर्माण होते. मुलांची पावले दुखण्याची काही कारणे वरती सांगितलेली आहेत. तुम्हाला तुमच्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतीही परिस्थिती आढळल्यास, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही विविध उपायांचा अवलंब करू शकता.

मुलांची पावले दुखत असतील तर त्यावर घरगुती उपचार

जर तुम्ही तुमच्या मुलाच्या पावलांचे दुखणे बरे करण्यासाठी काही घरगुती उपाय शोधत असाल तर खालील गोष्टी उपयुक्त ठरू शकतात काही दिवसांनंतरही पाय दुखणे कमी होत नसेल तर त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. केस अधिक क्लिष्ट वाटत असल्यास, तुमचे डॉक्टर पोडियाट्रिस्टला भेटण्यास सांगू शकतात.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

काहीवेळा घरगुती उपचार करून फायदा होत नाही. अशा वेळी  तुमच्या मुलाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते. खालील परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला वर नमूद केलेल्या अटी लक्षात आल्यास, आम्ही तुम्हाला वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला देतो. मुलांचे पाय दुखणे खूप सामान्य आहे  आणि ते विविध कारणांमुळे होऊ शकते. वेदनांचे खरे कारण कळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. आणखी वाचा: मुलांमधील टाईप २ मधुमेह मुलांना होणाऱ्या डोकेदुखीचा सामना कसा करावा?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved