मोठी मुले (५-८ वर्षे)

लहान मुलांसाठी मकर संक्रांतीविषयी १० ओळी तसेच छोटे आणि मोठे निबंध

दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाते. ह्या सणाच्या नावात ‘मकर’ आणि 'संक्रांत' असे दोन शब्द आहेत. मकर म्हणजे मकर राशी आणि संक्रांती म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदू परंपरेनुसार, हा एक अतिशय शुभ सोहळा आहे. या दिवशी, देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर अनेक भक्त सूर्य देवाला प्रार्थना करतात. हा पवित्र सण असल्याने ह्या सणाविषयी जाणून घेऊयात! मकरसंक्रांतीवर मराठीत निबंध लिहून आपण हे ह्या सणाविषयी अधिक जाणून घेऊ शकतो. निबंध लेखन शिकणे सोपे आहे कारण त्याबाबतचे कोणतेही नियम बंधनकारक नाहीत. त्यामुळे मुलांसाठी निबंध लेखन सोपे होते. मुलांना लेखनाची ओळख करून देण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. चला सुरुवात करूया!

लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे: प्राथमिक वर्गांसाठी मकर संक्रांती विषयी निबंध

निबंध लेखनात कुठलेही नियम तितकेसे कठोर नसतात, काही मूलभूत तथ्ये आणि माहितीच्या आधारे शिकून तुम्ही निबंध लिहू शकता. निबंध सोपा ठेवण्यासाठी आणि तरीही छाप सोडण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

लहान मुलांसाठी मकर संक्रांतीच्या १० ओळी

आपण आधी दिलेल्या विषयाचे मुद्दे लिहायला शिकू. खालील उदाहरण इयत्ता १ ली आणि २ री साठी मकर संक्रांतीवर निबंधासाठी उपयोगी ठरू शकते: 1. मकर संक्रांत संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि दरवर्षी १४ जानेवारी रोजी साजरी केली जाते. 2. हा सण पतंग उडवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी तुम्ही सुंदर पतंगांनी रंगलेले आकाश पाहाल. 3. हा भव्य उत्सव साजरा करण्यासाठी दर १२ वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. लाखो लोक या विशाल मेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजला भेट देतात. 4. लोक या दिवशी तिळ आणि गुळापासून बनवलेले लाडू किंवा वड्या खातात. 5. कर्नाटकात, मकर संक्रांतीच्या दिवशी, स्वादिष्ट पदार्थांची देवाणघेवाण करण्याच्या परंपरेला इल्लू बिरोधू म्हणतात. 6. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोक मकर संक्रांत वेगवेगळ्या नावांनी साजरी करतात. दक्षिण भारतासाठी ‘पोंगल’, आसाममध्ये ‘माघ बिहू’ आणि बिहारमध्ये ‘खिचडी’ असे म्हणतात. 7. मकर संक्रांतीच्या दिवसापासून थंडीचा ऋतू ओसरू लागतो. तसेच, दिवस मोठा होऊ लागतो. 8. मकर संक्रांतीला भारतामध्ये कापणीच्या हंगामाची सुरूवात होते. 9. नेपाळमध्येही मकर संक्रांती माघे संक्रांती या नावाने साजरी केली जाते. हा सण हिंदू परंपरेतील अशुभ कालावधीची समाप्ती दर्शवतो. 10. जो परमेश्वर पृथ्वीवरील जीवनाला आधार देण्यासाठी उष्णता आणि प्रकाश पसरवतो त्या परमेश्वराला हा सण समर्पित केला जातो.

मुलांसाठी मकर संक्रांतीवर परिच्छेद

आता आपल्याला पॉइंट्समध्ये विषय कसा लिहायचा हे माहित आहे. ओघवते लिखाण येण्यासाठी आपण परिच्छेदांमध्ये लिहायला शिकले पाहिजे. सर्वात आधी आपण मकर संक्रांतीबद्दल एक परिचछेद लिहिण्याचा प्रयत्न करू. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रात उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी सूर्यदेवाचे मकर राशीत संक्रमण होते.पतंग उडवणे हि या उत्सवाची प्रमुख परंपरा आहे. अनेक ठिकाणी ह्या सणाची मजा वाढवण्यासाठी पतंग उडवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. लोक तिळगुळ वाटून आनंद लुटतात. लोक या दिवशी गजक आणि चिक्की खातात. जीवनात आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी लोक गरजू लोकांना मिठाई आणि गहू दान करतात. संपूर्ण देश हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा करतो. जरी विविध राज्ये वेगवेगळ्या नावांनी हा उत्सव साजरा करत असले तरी, या उत्सवामागील मुख्य उद्देश शांतता, सौहार्द, समृद्धी आणि आनंद पसरवणे हा आहे.

लहान मुलांसाठी इंग्रजीमध्ये मकर संक्रांती  विषयी छोटा निबंध

निबंध तयार करण्यासाठी परिच्छेद एकत्र कसे करायचे ते शिकूया. मकर संक्रांतीवरील हा छोटा निबंध इयत्ता १ली, २ री आणि ३ री साठी चांगला आहे. हिंदू परंपरेत मकर संक्रांतीला पौराणिक महत्त्व आहे. भारतीय पौराणिक कथेनुसार, एक शक्तिशाली देवी राहत होती: संक्रांती, आणि तिने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा पराभव केला. लोकांचा असा विश्वास आहे की मकर संक्रांत ह्या सणाच्या दिवशी विजय साजरा करतात. दुसर्‍या दिवशी, तिने किंकरांत नावाच्या दुसर्‍या राक्षसाचा वध केला आणि या घटनेचा उल्लेख तुम्हाला हिंदू पंचांगात सापडतो. याशिवाय मकर संक्रांतीचे ज्योतिषशास्त्रातही महत्त्व आहे. या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. या दिवसापासून, हिवाळा देखील कमी होतो, सूर्य उत्तरेकडे सरकतो आणि दिवस थोडा मोठा होतो. सूर्याच्या या हालचालीला उत्तरायण म्हणतात. लोक तिळ आणि गुळाची मिठाई बनवतात आणि हा दिवस साजरा करण्यासाठी पतंग उडवतात!

मुलांसाठी मकर संक्रांती विषयी दीर्घ निबंध

आता, दीर्घ निबंध लिहिण्यासाठी आपण आणखी काही कल्पना एकत्र करणार आहोत. लेख तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कल्पना एकत्र करू शकतो. वेगवेगळे विचार आपण उपशीर्षकांच्या खाली लिहू शकतो आणि जर तुम्ही ही उपशीर्षके एकत्र केली तर तो तिसरी साठी निबंध तयार होऊ शकतो.

मकर संक्रांतीचा अर्थ आणि महत्त्व

मकर म्हणजे मकर राशी आणि संक्रांती म्हणजे मकर राशीत सूर्याचे संक्रमण.  ह्या सणाच्या दिवशी सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण होते. ह्या सणापासून पौष महिन्याचा अशुभ कालावधी समाप्त होतो. ह्या सणाच्या दिवशी लोक हिंदू नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात, विशेषकरून सणाच्या दिवशी सकाळी गंगा नदीत स्नान केले जाते. मकर संक्रांतीनंतर हिवाळ्याच्या मोठ्या रात्री लहान होतात. १२ वर्षातून एकदा, मकर संक्रांती कुंभमेळा उत्तरप्रदेशात आयोजित केला जातो. यमुना, गंगा आणि सरस्वती ह्या नद्यांच्या त्रिवेणी संगमात लोक डुबकी मारतात.

भारतातील विविध भागात मकर संक्रांती कशी साजरी केली जाते?

मकर संक्रांती भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शैलीत साजरी केली जाते. परंतु उत्सवाचा मुख्य उद्धेश हा प्रेम, आनंद आणि समृद्धी पसरवणे हा आहे. बहुतेक हिंदू गंगेसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करून सूर्यदेवाची प्रार्थना करतात. पतंग उडवणे ही या उत्सवाची सर्वात सामान्यपणे पाळली जाणारी परंपरा आहे. या दिवशी सामान्यतः तयार केलेले खाद्यपदार्थ म्हणजे तीळ, गूळ,  सुके खोबरे आणि शेंगदाणे यापासून बनवलेली मिठाई होय. 1. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथे लोक मकर संक्रांत चार दिवस साजरी करतात. स्त्रिया मुग्गु नावाच्या रंगीत तांदळाच्या पिठाने भौमितिक नमुने रेखाटून त्यांच्या घराचे प्रवेशद्वार सजवतात. 2. बिहार पश्चिम बिहारमध्ये याला खिचडी किंवा सकरत म्हणतात. बिहारच्या उर्वरित भागात ह्या सणाला दही चुरा किंवा तिल सक्रत म्हणतात. या ठिकाणी लोक दही आणि पोहे मिसळून खातात. 3. गुजरात मकर संक्रांतीला गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात. येथे १४ आणि १५ जानेवारी असे दोन दिवस हा सण  साजरा केला जातो: 4. कर्नाटक शेतकऱ्यांसाठी हा कर्नाटकातील सुगी किंवा कापणीचा सण आहे. मुली या दिवशी नवीन कपडे घालतात आणि ताटात नैवेद्य घेऊन नातेवाईकांना देतात आणि या विधीला इल्लू बिरोधू असे नाव देण्यात आले आहे. 5. राजस्थान राजस्थानातील हा एक प्रमुख सण आहे. लोक फेणी, तिळ-पत्ती, घेवर, खीर, पुवा आणि तिळ-लाडू यांसारखे राजस्थानी पदार्थ बनवून हा सण साजरा करतात. 6. उत्तर प्रदेश मकर संक्रांतीला किचेरी म्हणतात आणि लोक या दिवशी विधीवत स्नान करतात. उत्तर प्रदेशातील वाराणसी किंवा प्रयागराज आणि उत्तराखंडमधील हरिद्वार येथे लाखो लोक पवित्र स्नानासाठी जमतात.

या निबंधातून तुमचे मूल काय शिकेल?

देशातील परंपरा हळूहळू नष्ट होत असताना, मुलांना या सणांची माहिती असणे आणि त्यांनी हे सण साजरे करणे महत्त्वाचे आहे. असे लेखन केल्याने मुलांना ह्या सणाची माहिती मिळते. या सणाबद्दल शिकण्यासोबतच, मुलं कुशलतेने निबंध कसा लिहायचा हे शिकतील. मुलांची  वाचन आणि लिहिण्याची आवड देखील वाढू शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. मकर संक्रांत म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते?

हा भारतामध्ये साजरा केला जाणारा हिंदूंचा एक प्रसिद्ध सण आहे. भारतात कापणीची वेळ आली आहे आणि लोक त्यांची जमीन सुपीक ठेवल्याबद्दल आभार मानतात.

२. मकर संक्रांतीला लोक काळे कपडे का घालतात?

कारण मकर संक्रांती जानेवारीत येते, त्या काळात भारतात खूप थंडी असते. काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि आपल्याला उबदार ठेवतो म्हणून लोक काळे कपडे घालतात. आम्हाला आशा आहे की या लेखामुळे तुमच्या मुलाला निबंध-लेखन शिकण्यास मदत झाली आहे. तसेच, ह्या लेखामुळे तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल माहिती मिळाली असेल. तुम्हाला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! आणखी वाचा: मकर संक्रांतीच्या सणाची माहिती मकर संक्रांतीसाठी विशेष पदार्थ आणि रेसिपी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved