आरोग्य

लहान मुलांच्या तापावर ८ घरगुती उपाय

मध्यम प्रमाणात ताप आल्यास ते चिंतेचे कारण नसते, कारण तेव्हा शरीर संसर्गाविरुद्ध संरक्षण यंत्रणा तयार करीत असते. सहसा, एखादे लहान मूल शरीराचे तापमान १०० डिग्री पर्यंत सहज हाताळू शकते. बहुतेकदा, अशा सौम्य तापावर घरगुती उपचार केले जातात. जर तुमच्या मुलाला मध्यम प्रमाणात ताप आला असेल तर असे काही प्रभावी घरगुती उपचार आहेत ते तुम्ही करून बघू शकता.

तुमच्या लहान मुलाच्या तापासाठी घरगुती उपचार

कधीकधी तुमच्या लहान मुलाला सौम्य ताप आल्यास डॉक्टरांकडे घेऊन जावे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. काही वेळा तो रडत उठेल किंवा तापामुळे अस्वस्थ असेल तर त्याला शांत करण्यासाठी तुम्हाला मध्यरात्री उठावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत, अनपेक्षित गोष्टींसाठी तयार असणे चांगले असते आणि अशा वेळी तुम्हाला घरगुती उपचार कामास येतात. एक वर्षाच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलासाठी, तापावर काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत.

. कॅमोमाइल चहा

केडमॉइल चहा हे लहान मुलांना येणाऱ्या तापावर एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. लागणारे साहित्य कॅमोमाइल चहाची पाने आणि मध. कृती थोडेसे पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये कॅमोमाइल चहाची पाने काही मिनिटे भिजवा. त्यात मध घाला आणि ह्या चहाचे काही थेंब आपल्या मुलाला दिवसातून दोनदा द्या.

. मनुके

मनुका अँटीऑक्सिडेंटचा एक समृद्ध स्त्रोत आहे आणि मनुक्यांमध्ये जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. ते संसर्गाविरुद्ध लढण्यास आणि तापमान कमी करण्यास मदत करू शकतात. लागणारे साहित्य तुम्हाला फक्त मूठभर मनुका (२०-२५, अगदी तंतोतंत), लिंबाचा रस एक चमचा, एक कप पाणी आवश्यक आहे. कृती सर्व मनुका एक कप पाण्यात सुमारे एक तास भिजवा. एकदा ते मऊ झाल्यावर वाटून घ्या आणि द्रव गाळा. चांगल्या परिणामानासाठी त्यात लिंबाचा रस घाला. दिवसातून दोनदा तुमच्या मुलाला हे टॉनिक द्या आणि जादू पहा.

. कोमट पाण्याने अंघोळ

तापमान कमी करण्यासाठी तुमच्या मुलाला कोमट पाण्याने आंघोळ घाला. अंघोळ घातल्याने बाळाच्या शरीराला आराम मिळतो आणि त्याला बरे वाटण्यास मदत होते. तथापि, पाणी पुरेसे कोमट असल्याची खात्री करा जेणेकरून बाळ थरथर कापणार नाही. जर बाळ थरथरत असेल तर त्यास बाथटबच्या बाहेर काढा आणि ताबडतोब त्यास कोरडे करा. लागणारे साहित्य टब मध्ये कोमट पाणी आणि स्पंज कृती थंड पाणी वापरू नका. आपल्या मुलास बसवण्यासाठी कोमट पाण्याने भरलेला टब तयार करा. त्वचेच्या संपर्कात हे कोमट पाणी आल्यानंतर शरीराचे तापमान कमी होईल. तुम्ही कोमट पाण्याने किंवा सामान्य तापमानाच्या पाण्याने देखील स्पंजिंग करू शकता. ह्या उपायाने जवळजवळ ३० मिनिटांत २ डिग्री तापमान प्रभावीपणे कमी होते.

. इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन्स

कधीकधी तापामुळे मुलाला अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या मुलाच्या शरीरातून आवश्यक लवण, खनिजे आणि पोषक पदार्थ गमावले जातील. शरीरातून गमावलेले द्रव पुन्हा पुनर्स्थापित करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन्सचा वापर करण्याचा सल्ला तज्ञ देतात. तुम्हाला तुमच्या जवळच्या स्थानिक औषध स्टोअरमधून ही इलेक्ट्रोलाईट सोल्युशन्स सहज मिळू शकतात. लागणारे साहित्य ओआरएस सोल्यूशनचा एक पाऊच कृती इलेक्ट्रोलाइट सोल्यूशनची सामग्री १ लिटर पाण्यात घाला किंवा त्यावर लिहून दिल्याप्रमाणे प्रमाण घ्या. थोड्या थोड्या वेळाने तुमच्या मुलाला हे द्रावण देत रहा.

. आले

आले औषधी मूल्यांसाठी प्रसिध्द आहे आणि तापासाठी जबाबदार असलेले जिवाणू नष्ट करू शकते. आले अंघोळीच्या पाण्यात घातल्याने ते घाम वाढवण्यास कारणीभूत ठरते तसेच उष्णता आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. लागणारे साहित्य २ चमचे आले पावडर, एक बाथटब आणि कोमट पाणी. कृती गरम पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये आल्याची पूड घाला. पावडर पाण्यात नीट ढवळून घ्या. आपल्या मुलास बाथटबमध्ये ठेवा आणि घाम येईपर्यंत त्याला पाण्यातच राहू द्या. पाणी जास्त गरम नसल्याचे सुनिश्चित करा. पाणी कोमट असुद्या.

. लसूण घातलेल्या मोहरीच्या तेलाने मालिश

मोहरीचे तेल आणि लसूण हे दोन्ही औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. मोहरीचे तेल आणि लसूण यांचे मिश्रण हे २ वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी तापासाठी केल्या जाणाऱ्या घरगुती उपचारांपैकी एक आहे. लागणारे साहित्य २ चमचे मोहरीचे तेल आणि १ चमचा लसूण पेस्ट. कृती २ चमचे मोहरीचे तेल आणि १ चमचा लसूण पेस्ट मिक्स करावे. मिश्रण गरम करा आणि झोपण्याच्या आधी आपल्या मुलाचे पाय, तळवे, मान, छाती आणि पाठ हळू हळू मालिश करण्यासाठी हे तेल वापरा. असे केल्याने मुलास घाम येईल आणि तापमान कमी करण्यात मदत होईल. हे तेल शरीरातील दुखण्यापासून देखील त्याला मुक्त करेल.

. मध आणि लिंबाचा रस

लिंबू रोग प्रतिकारशक्ती वाढवते. मध प्रतिजैविक आणि जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो. लिंबाचा रस आणि मधाचे मिश्रण हे फ्लू आणि तापावर एक प्रभावी उपाय आहे. हा उपाय केवळ १२ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आहे. एक वर्षाच्या खालच्या वयाच्या मुलांसाठी घरगुती उपचार म्हणून मध देण्यास टाळा. लागणारे साहित्य १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध कृती एक चमचा मधात एक चमचा लिंबाचा रस घाला. आपल्या लहान मुलास ते देण्यापूर्वी चांगले मिक्स करा.

. कांदा

कांदा हा भारतीय किचनचा अविभाज्य भाग आहे, परंतु ताप कमी करण्यासाठी त्यामध्ये औषधी मूल्ये देखील आहेत हे तुम्हाला माहिती आहे काय? कांदा शरीराचे तापमान हळूहळू खाली आणतो असा विश्वास आहे. तथापि, त्यांची कार्यक्षमता सिद्ध करण्याबाबतचा कोणताही अभ्यास नाही, हा उपाय करण्याआधी एखाद्या तज्ञांशी तुम्ही संपर्क साधावा असे आम्ही सुचवतो. ह्या उपायाचा उपयोग न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. लागणारे साहित्य कांद्याचे दोन तीन पातळ काप. कृती आपल्या मुलाच्या पायाच्या तळव्यावर कांद्याचे २-३ पातळ काप ठेवावेत. चांगल्या परिणामांसाठी दिवसातून दोनदा हे पुन्हा करा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

हे घरगुती उपचार मुलांमध्ये सौम्य तापासाठी चांगले उपयोगी ठरू शकतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये तापाची स्थिती अधिक गंभीर असू शकते, म्हणूनच आपल्या मुलामध्ये खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  1. तापमान १०० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त असेल
  2. मूल दिवसभर चिडचिड करत असेल आणि झोपत नसेल
  3. तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप टिकून राहत असेल
  4. तुमचे मूल प्रतिसाद देत नसेल आणि तुमच्याकडे बघत नसेल तर
  5. खाण्यास नकार देत असेल किंवा खाण्यास असमर्थ असेल तर
  6. तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस सर्दी आणि खोकला टिकत असेल तर
  7. अतिसार
  8. सतत मळमळ किंवा उलट्या होणे
  9. फिट येत असेल तर
  10. त्वचेवर असामान्य पुरळ येत असेल तर
लहान मुलांमध्ये ताप येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु ताप येणे हे कानाचा संसर्ग, दात येणे , टॉन्सिलाईटिस, गोवर, फ्लू इ. सारख्या समस्यांचे मूळ लक्षणदेखील असू शकते. ताप सौम्य असल्यास तुम्ही घरगुती उपचारांच्या साहाय्याने तो बरा करू शकता. अ‍ॅलोपॅथीच्या औषधांच्या तुलनेत घरगुती उपचार चांगले असतात, कारण बहुतेक वेळा त्यांच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि, जर हे घरगुती उपचार अयशस्वी ठरले तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणखी वाचा: तुम्ही लहान बाळे आणि मुलांना सर्दी खोकल्यासाठी औषधे द्यावीत का? बाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर १४ घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved