अन्न आणि पोषण

बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके

मुलांना आवडणाऱ्या मधुर फळांपैकी स्ट्रॉबेरी हे एक फळ आहे आणि ते मुले आवडीने खातात. परंतु मुलांना स्ट्रॉबेरी द्यावी की नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुलांना स्ट्रॉबेरी देणे सुरक्षित आणि योग्य आहे का हा सुद्धा विचार तुमच्या मनात येईल. मुलांना स्ट्रॉबेरीची गोड चव आवडते ह्यामध्ये काही शंका नाही परंतु त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी तुमच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो.

बाळांना स्ट्रॉबेरी द्यावी का?

जरी स्ट्रॉबेरी हे जगातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक असले तरीसुद्धा ते बाळांना खायला देण्यापूर्वी तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण स्ट्रॉबेरीमुळे काही मुलांमध्ये एलर्जी उद्भवू शकते. म्हणूनच, बाळ कमीतकमी १ वर्षांचे होईपर्यंत तुम्ही बाळाला स्ट्रॉबेरी देणे टाळले पाहिजे. तसेच तुमच्या कुटुंबाचा ऍलर्जीचा इतिहास सुद्धा विचारात घेतला पाहिजे.

बाळे स्ट्रॉबेरी कधी खाऊ शकतात?

ज्या वयात मुले स्ट्रॉबेरी खाऊ शकतात त्या वयात अलेर्जीची जोखीम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. लहान वयात अशा प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी, स्ट्रॉबेरी फक्त एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांनाच दिली पाहिजे. स्ट्रॉबेरीमुळे उद्भवणाऱ्या जोखमीमुळे विविध आरोग्य संस्था मुलांना एक वर्ष पूर्ण झाल्यावरच स्ट्रॉबेरी खाऊ देण्याशी सहमत आहेत.

स्ट्रॉबेरीचे पोषणमूल्य

पोषक घटक प्रति १०० ग्रॅम पौष्टिक मूल्य
पाणी ९०.९५ ग्रॅम
प्रथिने .६७ ग्रॅम
कर्बोदके .६८ ग्रॅम
तंतुमय पदार्थ २ ग्रॅम
साखर .८९ ग्रॅम
व्हिटॅमिन ए .०३६ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी ६ .०४७ मिग्रॅ
व्हिटॅमिन सी ५८.८ मिग्रॅ
व्हिटॅमिन के .ug
व्हिटॅमिन ई .२९ मिग्रॅ
कॅल्शियम २८ मिग्रॅ
फॉस्फरस २७ मिग्रॅ
पोटॅशियम २२० मिग्रॅ
मॅग्नेशियम १३ मिग्रॅ
फोलेट २४ ug
स्रोत:https://en.wikipedia.org/wiki/Strawberry वर दिलेले टेबल असे दर्शवते की स्ट्रॉबेरी केवळ चविष्ट नाहीतर तर जीवनसत्त्वे आणि पौष्टिक मूल्यांचा एक समृद्ध स्रोत आहेत. स्ट्रॉबेरी निरोगी आणि स्वादिष्ट असतात. जर बाळाला स्ट्रॉबेरीची ऍलर्जी नसेल तर तुमच्या बाळासाठी तो एक उत्तम चविष्ट पर्याय आहे.

बाळासाठी स्ट्रॉबेरीचे आरोग्यविषयक फायदे

बाळ जेव्हा खूप लहान असते तेव्हा पालक म्हणून आपल्याला नेहमीच त्याच्यासाठी सर्व चांगल्या गोष्टी हव्या असतात. स्ट्रॉबेरीचे बरेच फायदे असल्यामुळे बाळासाठी तो एक उत्तम पर्याय आहे.

तुमच्या बाळाला स्ट्रॉबेरी देण्याचे काही धोके आहेत का?

बाळाला स्ट्रॉबेरी देताना त्याचे काही धोके आहेत ते खाली दिलेले आहेत:
  1. गुदमरणे: स्ट्रॉबेरी खूप चवदार असतात आणि त्यांचे आवरण खूप मऊ आणि गुळगुळीत असते. बर्‍याचदा, लहान मुले स्ट्रॉबेरीचे तुकडे चावत नाहीत तसेच गिळून टाकतात. त्यामुळे गुदमरल्यासारखे होऊ शकते. म्हणूनच, मुलांना स्ट्रॉबेरी चावून खाण्यास सांगा किंवा सर्व्ह करण्यापूर्वी त्याचे बारीक तुकडे करून द्या. खाताना आपल्या मुलावर बारीक लक्ष ठेवा.
  2. ऍलर्जी प्रतिक्रिया: आपल्या मुलास स्ट्रॉबेरीची ऍलर्जी असू शकते आणि अशा प्रकारे, आपल्या मुलाच्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही ह्या शक्यतांचा विचार केला पाहिजे. काही कुटुंबांना अन्न, किंवा दम्याच्या ऍलर्जीचा इतिहास असतो. अशा वेळी, आपल्या मुलाला स्ट्रॉबेरी देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. चेहरा, जीभ किंवा घशाला सूज येणे ही ऍलर्जीची लक्षणे असू शकतात. स्ट्रॉबेरीमुळे त्वचेवर पुरळ सुद्धा उठू शकतात. ह्या ऍलर्जीचा उपचार केला जाऊ शकतो.

बाळांना स्ट्रॉबेरी कशी द्यावी?

स्ट्रॉबेरी कधी खायची हे माहिती करून घेतल्यानंतर आपण त्यांना स्ट्रॉबेरी कशी खाऊ घालायची हे जाणून घेऊयात.

प्रत्येक वेळी तुम्ही बाळांना किती स्ट्रॉबेरी देऊ शकता?

बाळाचे वय लक्षात घेता, त्यांना सुरुवातीच्या काळात पाव किंवा अर्ध्या स्ट्रॉबेरीपेक्षा जास्त देऊ नये. बाळाच्या आहारामध्ये सर्व प्रकारची पोषण मूल्ये असावीत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. फक्त फळांमुळे मुलाला आवश्यक असलेले सर्व पोषण मिळण्यास मदत होऊ शकत नाही.

आपल्या बाळाच्या डायपरमध्ये स्ट्रॉबेरी बियाणे आढळल्यास काय?

आपल्या मुलाच्या डायपरमध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी बियाणे सापडल्यास ते अगदी सामान्य आहे! काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे कुठलाही धोका आंही स्ट्रॉबेरी नक्कीच चवदार आणि फायदेशीर आहे, परंतु आपल्या बाळाच्या आहारात त्याचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या बाळाच्या खाण्यावर लक्ष ठेवा आणि नवीन खाद्यपदार्थांचा समावेश करण्याआधी सांगितलेल्या पद्धतींचे अनुसारण करा. आणखी वाचा: बाळांसाठी साबुदाणा – फायदे आणि पाककृती तुमच्या बाळाला डाळिंब कसे द्याल?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved