काळजी

लहान मुलांच्या दातांसाठी ब्रेसेस – प्रकार, काळजीविषयक टिप्स आणि किंमत

तुमच्या लहानपणी, किंवा आताही, तुम्ही लहान मुलांना ब्रेसेस घातलेल्या पाहिल्या असतील. त्यांच्यापैकी काही मुलांचे दात परफेक्ट असून सुद्धा ब्रेसेस घातलेल्या दिसतात. त्यामुळे तुमच्या मुलाचे दात दिसायला लागल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल की, त्याला ब्रेसेसची गरज आहे का?तुमच्या मुलाला ऑर्थोडॉन्टिक उपचारांची गरज आहे की नाही हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याबाबतचे विविध पैलू समजून घेतल्यानंतर निर्णय घेतला पाहिजे.

लहान मुलांना ब्रेसेसची गरज का आहे?

लहान मुलांना नेहमीच योग्य पद्धतीने दात येतात असे नाही. काही मुलांचे दात वाकडे असू शकतात, काहींना दात येताना ते एकावर एक असे येऊ शकतात किंवा इतर अनेक लहान मुलांचे दात एकाच ठिकाणी एकत्रित झालेले आढळून येतात. मालोक्लुजन म्हणून ओळखल्या जाणार्‍या ह्या स्थितीमुळे दातांचे असामान्य संरेखन होऊ शकते.  आणि असे होऊ नये ब्रेसेसची आवश्यकता असू शकते. सतत अंगठा चोखण्यासारख्या काही सवयींमुळे दात बाहेर येऊ शकतात. दातांच्या विकासात आनुवंशिक कारणे देखील एक प्रमुख घटक आहेत.

कोणत्या वयात लहान मुलांना ब्रेसेस लावावेत?

ब्रेसेस हे दात सरळ करण्याचे साधन आहे. म्हणून, मोठी माणसे देखील ब्रेसेस लावू शकतात. परंतु, हाडांची रचना अद्याप विकसित होत असल्याने बालपणात परिणामकारकता जास्त असते. १० ते १५ वर्षांच्या बहुतेक मुलांना ब्रेसेस असतात. तुमच्या मुलासाठी ब्रेसेस घेण्याची योग्य वेळ कधी आहे याबद्दल तुम्ही दंतवैद्याशी बोलले पाहिजे, कारण अगदी लहानपणापासून ब्रेसेसचा वापर करू नये. तुमच्या लहान मुलाला चुकीच्या पद्धतीने दात आलेले असल्यास, तुम्ही इतर उपचारांचा विचार करू शकता. उदा: एक्स्ट्रा ओरल रिमूव्हेबल डिव्हायसेस. परंतु या उपकरणांचा वापर देखील प्रत्येक मुलाप्रमाणे बदलू शकतो, म्हणून दंतवैद्याकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

पहिली ऑर्थोडॉन्टिस्ट भेट – काय अहेक्षित आहे?

दात आणि ब्रेसेसशी संबंधितच्या सर्व बाबींसाठी दंतवैद्याचा सल्ला घेणे चांगले. तुमच्या मुलाचे दंतचिकित्सक तोंडाच्या अनेक पैलूंवर जसे की, दातांची मांडणी, त्यांचा आकार, जबड्याचे संरेखन इत्यादींचे योग्य निरीक्षण आणि विचार करतील. दंतचिकित्सक तुमच्या मुलाला चावण्यास सांगतील आणि जबड्याची हालचाल तपासून, तुमच्या मुलाला बोलत असताना किंवा खाताना काही विशिष्ट समस्या आहेत का किंवा हाडात काही क्लिकचे आवाज येत आहेत का हे विचारून त्याचा पाठपुरावा करू शकतात. पुढील तपासणीमध्ये, दात कसे व्यवस्थित आहेत किंवा भविष्यातील दात कसे येतील हे तपासण्यासाठी तोंडाचा एक्स-रे काढण्यास सांगितले जाऊ शकते. तुमच्या मुलाच्या दातांचा ठसा घेतल्याने मॅलोक्ल्यूशनचे दातांच्या डॉक्टरांना अधिक चांगले विश्लेषण करण्यात मदत होते आणि तुमच्या मुलाला ब्रेसेसची आवश्यकता असल्यास ते निर्णय घेऊ शकतील.

तुमच्या मुलाच्या दातांना ब्रेसेसची आवश्यकता असल्यास त्याची काही चिन्हे खाली दिलेली आहेत -

खालील परिस्थितींमध्ये मुलाला ब्रेसेसची आवश्यकता असू शकते:

मुलांच्या दातांसाठी विविध प्रकारचे ब्रेसेस

दंतचिकित्सक मुलांसाठी सुचवू शकतील असे विविध प्रकारचे ब्रेसेस येथे उपलब्ध आहेत:

१. डॅमन ब्रेसेस

हे विशिष्ट प्रकारचे ब्रेसेस आहेत. ह्या ब्रेसेसमध्ये दात व्यवस्थित ठेवण्यासाठी तारांऐवजी स्लाइड्सचा वापर केला जातो. दात दुरुस्त करण्याची ही एक निष्क्रिय पद्धत आहे कारण ह्या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या इलॅस्टिकचा वापर केला जात नाही. यामुळे काही समस्या देखील उद्भवू शकतात कारण हे ब्रेसेस  आवश्यकतेपेक्षा जास्त दात ढकलतात आणि त्यामुळे अचूकता कमी असते. दुसरीकडे, ह्या ब्रेसेसमधे रिंग्जचा वापर  नसल्यामुळे, या ब्रेसेसची देखभाल करणे सोपे आहे आणि दीर्घकाळ स्वच्छ ठेवता येते.

२. ए-आकाराचे ब्रेसेस

दंत बाजारातील तुलनात्मकदृष्ट्या नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. दंत कर्मचार्‍यांच्या गरजेशिवाय ह्या ब्रेसेस तुम्हाला लावता येतात. ब्रेसेसचा आकार 'A' अक्षरासारखा असतो. या ब्रेसेसवरील रिटेनर तुम्ही जे खात आहात त्यानुसार समायोजित केले जाऊ शकतात. शिवाय ह्या ब्रेसेसमुळे जास्त दबाव पडत नाही त्यामुळे वेदना कमी होतात. ह्या ब्रेसेसची नकारात्मक बाजू म्हणजे झोपण्यापूर्वी ब्रेसेस काढणे आवश्यक आहे.

३. स्प्रिंग अलाइनमेंट ब्रेसेस

इतरांपेक्षा अधिक सोयीस्कर  अशा या ब्रेसेसमध्ये एक स्प्रिंग आहे आणि संरेखानासाठी ह्या स्प्रिंगचा उपयोग केला जातो. हे ब्रेसेस सामान्यतः दोन्ही जबड्यांच्या पुढच्या ६ दातांसाठी असतात. हे ब्रेसेस किंचित महाग असले तरी ते खूप आरामदायक असतात.

४. टायटॅनियम ब्रेसेस

नेहमीच्या स्टील ब्रेसेससारखेच हे असतात परंतु ह्यामध्ये वापरलेले घटक वेगवेगळे आहेत. हे ब्रेसेस  नेहमीच्या ब्रेसेसपेक्षा थोडे मजबूत आणि तुलनेने हलके असतात. तुमच्या मुलाला, पारंपारिक ब्रेसेसमध्ये वापरल्या जाणार्‍या निकेलची ऍलर्जी असल्यास हे ब्रेसेस वापरू नयेत. त्यांच्या दुर्मिळतेमुळे त्यांची किंमत नेहमीपेक्षा जास्त असते.

५. एनव्हीसीयालीन ब्रेसेस

वापरायला सर्वात सोप्या ब्रेसेसपैकी हे ब्रेसेस आहेत. हे ब्रेसेस म्हणजे अक्षरशः तुमच्या दातांचे प्लास्टिकचे साचे आहेत. सामान्यतः वाकडे दात असलेले लोक हे ब्रेसेस वापरतात. हे अत्यंत महाग असतात आणि लहान मुलांच्या दातांप्रमाणे तयार केले जात असल्याने ते तयार होण्यास बराच वेळ लागतो. तथापि, त्यांचा प्रभाव अधिक प्रगत आहे.

६. लिंग्वल ब्रेसेस

ब्रेसेसच्या नेहमीच्या फ्रंटल प्लेसमेंटच्या विरूद्ध, हे दातांच्या मागे बसवलेले असतात. लहान मुलांसाठी एक प्रकारचे हे अदृश्य ब्रेसेस असतात. शाळेत ब्रेसेस दिसू नयेत म्हणून लहान मुले जागरूक असतात, त्याच्यासाठी असे ब्रेसेस चांगले आहेत. परंतु, हे ब्रेसेस बरेच महाग आहेत आणि त्यांची तयार करण्याची  प्रक्रिया लांब आणि गुंतागुंतीची आहे. शिवाय, यामुळे नंतर जीभेला खूप जळजळ होते.

७. गोल्ड प्लेटेड ब्रेसेस

मुलांमध्ये असे ब्रेसेस क्वचितच वापरले जातात. ज्या लोकांना प्रामुख्याने ब्रेसेसचा उत्कृष्ट लुक हवा असतो किंवा त्यांना निकेल कोटिंगची ऍलर्जी असते त्यांच्यासाठी हे ब्रेसेस वापरले जातात. हे ब्रेसेस स्टेनलेस स्टीलचे बनलेले असतात, आणि ते इतर पैलूंमध्ये पारंपारिक ब्रेसेससारखेच आहेत.

८. क्लियर ब्रेसेस

हे ब्रेसेस किंचित अदृश्य आणि पारदर्शक असतात. ते वेगवेगळ्या छटांमध्ये देखील उपलब्ध असू शकतात. नेहमीपेक्षा मजबूत असतात आणि त्यांच्यात घर्षण जास्त असते, ज्यामुळे दात ठिसूळ होण्याची शक्यता असते. प्रक्रियेनंतर ते काढताना त्रास होतो.

९. सेल्फ-लिगेटिंग ब्रेसेस

दंतचिकित्सकाकडे सतत भेटी टाळण्यासाठी, उपचाराचा वेळ कमी करण्यासाठी आणि दंत परीक्षण कमी करण्यासाठी अशा ब्रेसेसचा वापर केला जातो. हे ब्रेसेस महाग आहेत कारण ते तुमच्या पॅटर्नला अनुरूप बनवलेले आहेत. आणि म्हणूनच,  नंतरच्या काळात कमीत कमी समायोजन आवश्यक आहे.  ह्या ब्रेसेस मध्ये इलॅस्टिकचा वापर केला जात नाही. ह्या ब्रेसेस मध्ये फक्त एक वायर वापरली जाते त्यामुळे, वेदना आणि जबड्यातील अस्वस्थता खूप कमी होते.

१०. पारंपारिक ब्रेसेस

हे ब्रेसेस सर्वात सामान्य असतात आणि ते फक्त स्टेनलेस स्टीलचे बनलेले असतात. एक ब्रॅकेट दाताला चिकटवला जातो आणि त्यातून एक वायर टाकली जाते आणि ती इलास्टीकने उचलून धरली जाते. आजकाल बहुतेक लोक या ब्रेसेस वापरणे टाळतात कारण हे ब्रेसेस लावल्यावर च्युइंगम किंवा चिप्स टाळण्यास सांगितले जातात कारण ते सहज अडकतात.

ब्रेसेसची काळजी कशी घ्यावी?

स्वच्छता राखण्यासाठी आणि मुलाच्या तोंडाच्या आरोग्यासाठी ब्रेसेसची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. ब्रेसेसची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या:

मुलांसाठीच्या ब्रेसेसची किंमत किती आहे?

ब्रेसेसची किमान आणि कमाल किंमत दंतवैद्याच्या सेटअप, स्थान आणि पात्रतेवर अवलंबून असेल. काही दंतचिकित्सक कमी शुल्क घेतात आणि काही जास्त शुल्क घेतात. तुम्ही राहता ते ठिकाण, दंतचिकित्सकाचा अनुभव आणि वापरल्या जाणार्‍या ब्रेसेसच्या प्रकारावर किंमत अवलंबून असेल. मुलांच्या ब्रेसेस आणि दंतचिकित्सा प्रक्रिया खूप महाग आहेत. त्यामुळे ब्रेसेस लावण्याचा निर्णय घेणे हे जलद आणि सोपे काम नाही. सर्व पर्याय समजून घ्या. तुमच्या बजेट आणि गरजेनुसार ब्रेसेसचा प्रकार निवडा. जेणेकरून तुमच्या मुलाच्या दातांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही आणि उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निराकरण तुम्ही करू शकाल. आणखी वाचा: लहान मुलांमधील कानदुखी: कारणे, लक्षणे आणि उपाय मुलांच्या तोंड येण्याच्या (तोंडातील अल्सर) समस्येवर घरगुती उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved