Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य लहान मुलांमधील कानदुखी: कारणे, लक्षणे आणि उपाय

लहान मुलांमधील कानदुखी: कारणे, लक्षणे आणि उपाय

लहान मुलांमधील कानदुखी: कारणे, लक्षणे आणि उपाय

लहान मुलांमध्ये कान दुखणे हि खूप सामान्य समस्या आहे. कान दुखत असल्यास कानाचा संसर्ग झालेला असल्याची शक्यता असते आणि त्याचा तुमच्या लहान बाळाला त्रास होतो. बाळाचा कान दुखत असल्यास सामान्यत: बाळाच्या कानाचा मधला किंवा बाहेरील भाग दुखतो आणि असे विविध कारणांमुळे होऊ शकते. आपल्या मुलाच्या कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य असले तरी, काही घरगुती उपाय केल्यास बाळांची कानदुखीची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

लहान मुलांचे कान दुखण्याची कारणे

खालील कारणांमुळे लहान मुलांचे कान दुखू शकतात किंवा कानात संसर्ग होऊ शकतो.

. बाहेरील गोष्टी

लहान मुले सहसा त्यांच्या तोंडात, नाकात आणि अगदी कानात विविध लहान गोष्टी घालतात. म्हणून, जेव्हा एखादी लहान गोष्ट चुकून किंवा हेतुपुरस्सर कानात घातल्यावर कानात वेदना होऊ शकतात.

. कानात मेण साचणे

काहीवेळा जेव्हा तुमचे शरीर खूप जास्त प्रमाणात कानातील मेण तयार करते तेव्हा किंवा तुमच्या कानातील मळ जेव्हा कानाच्या कालव्यामध्ये खूप खोलवर ढकलले जाते, तेव्हा कान दुखू शकतात. तुम्‍हाला कानात गुंजन किंवा वाजणारे आवाज देखील ऐकू येऊ शकतात, तुमचा कान भरलेला वाटू शकतो आणि तुम्हाला कानात तीव्र वेदना जाणवू शकतात.

. सायनस किंवा सायनुसायटिसचा संसर्ग

जेव्हा तुमचा सायनस किंवा अनुनासिक मार्ग सूजतो तेव्हा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. सायनुसायटिसमध्ये श्लेष्मा जमा होणे खूप सामान्य आहे आणि त्यामुळे बॅक्टेरिया किंवा विषाणूजन्य संसर्ग होऊ शकतो. अशा संसर्गामुळे कानात तीव्र वेदना होऊ शकतात.

. मध्य कानात संक्रमण

जेव्हा तुमच्या मुलाच्या मधल्या कानाला विषाणू किंवा जिवाणूंचा संसर्ग होतो तेव्हा त्याला तीव्र वेदना होऊ शकतात. मुलांमध्ये हे खूप सामान्य आहे.

. सर्दी आणि खोकला

सर्दीमुळे मुलांमध्ये कान दुखणे देखील सामान्य आहे. सामान्यतः जेव्हा एखाद्या बाळास दीर्घकाळ किंवा वारंवार सर्दी किंवा खोकला येतो तेव्हा असे होते.

. कानाच्या दाबात बदल

कानाच्या दाबातही बदल झाल्यामुळे तुमच्या बाळाचे कान दुखू शकतात. हे जास्त उंचीमुळे घडते, बाळ जेव्हा विमान प्रवास करते तेव्हा त्याचे कान दुखू लागतात. ह्यास एरोप्लेन एअरअसेही म्हणतात.

. कानात संक्रमण

जर तुमच्या बाळाला कानाचा संसर्ग झाला असेल तर त्याच्या कानात तीव्र वेदना होऊ शकतात.

मुलांच्या कानदुखीची चिन्हे आणि लक्षणे

तुमच्या बाळामध्ये खालील लक्षणे दिसत असल्यास ती कानदुखीची लक्षणे असू शकतात:

  • तुमच्या बाळाला नीट ऐकू येत नसेल तर
  • झोपताना, चोखताना किंवा चघळताना तुमच्या बाळाचे कान दुखू शकतात
  • तुमचे मूल नेहमीपेक्षा जास्त कान ओढत असेल किंवा कान चोळत असेल तर

मुलांच्या कानदुखीची चिन्हे आणि लक्षणे

  • तुमच्या मुलाला ताप, मळमळ किंवा डोकेदुखी असेल तर
  • तुमच्या मुलाच्या कानातून गळती होत असेल तर
  • तुमचे मुल नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ असेल तर

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, तुम्ही वेदना कमी करण्यासाठी विविध घरगुती उपाय करून पाहू शकता.

लहान मुलांच्या कानाच्या दुखण्यावर घरगुती उपाय

तुमच्या मुलाचे कान दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही अवलंबलेले काही घरगुती उपाय येथे आहेत:

. गरम आणि कोल्ड कॉम्प्रेशन्स

तुमच्या मुलाच्या कानाच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही एकतर हीटिंग पॅड किंवा आइस पॅक वापरू शकता. गरम आणि थंड कॉम्प्रेशन मुलांसाठी खूप सुरक्षित आहेत. वेदना कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सुमारे १० मिनिटांच्या अंतराने कॉम्प्रेशनच्या वेगवेगळ्या पद्धती वापरणे. तथापि, जर तुमच्या मुलाला कोणत्याही कॉम्प्रेशनमुळे अस्वस्थता वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला सोयीस्कर वाटेल ते कॉम्प्रेशन वापरू शकता.

. वेदना कमी करणारी औषधे

बाजारात आयबुप्रोफेन सारखी अनेक ओव्हरकाउंटर वेदना कमी करणारी औषधे उपलब्ध आहेत. वेदना कमी करण्यासाठी तुम्ही अशी वेदनाशामक औषध देऊ शकता परंतु निर्धारित डोसपेक्षा ही औषधे जास्त प्रमाणात देऊ नका. तथापि, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतरच बाळाला कुठलीही औषधे द्या.

. कानदुखीसाठी टीट्री ऑइल

टी ट्री ऑइल लहान मुलांसाठी कानदुखीपासून आराम देण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे तेल अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्मांनी भरलेले आहे. जर तुम्हाला संवेदनशीलतेबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही या तेलात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब देखील घालू शकता.

. कायरोप्रॅक्टिक समायोजन

हे काहीसे विचित्र वाटेल, परंतु कानदुखीपासून आराम मिळण्यासाठी कायरोप्रॅक्टिक समायोजन देखील खूप प्रभावी आहे. एका वैज्ञानिक अभ्यासात, असे दिसून आले की कायरोप्रॅक्टिक समायोजन घेतलेल्या ९०% पेक्षा जास्त रुग्णांना समायोजनानंतर कानदुखीमुळे आराम पडला.

. कानात घालायचे हर्बल थेंब

हर्बल किंवा नॅचरोपॅथिक कानातले थेंब तुम्ही निसर्गोपचार औषधांच्या दुकानातून किंवा अगदी ऑनलाइन सहज मिळवू शकता. हे थेंब लहान मुलांमधील कानदुखीची लक्षणे कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

. ऑलिव्ह ऑइल वापरा

शतकानुशतके ऑलिव्ह ऑइल कानाच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी वापरले जाते. हे तेल गरम करा आणि तुमच्या मुलाच्या दुखणाऱ्या कानात त्याचे काही थेंब घाला. तेल जास्त गरम नसल्याची खात्री करा. तुमच्या मुलाच्या कानात तेल टाकण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

. झोपण्याची स्थिती

झोपेच्या काही पोझिशन्स कानदुखी कमी करण्यासाठी खूप प्रभावी असतात. दुखऱ्या कानावर दबाव येऊ नये म्हणून आपल्या मुलाला दुसऱ्या कुशीवर झोपायला लावावे. तुम्ही तुमच्या मुलाला त्याचे डोके उंच करून झोपायला लावू शकता. ही स्थिती पू निचरा होण्यास देखील मदत करेल.

. आले वापरा

आल्यामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात आणि हे दाहक विरोधी गुणधर्म कानदुखी कमी करण्यासाठी खूप प्रभावी असतात. तुम्ही एकतर आल्याचा रस वापरू शकता (आले खरवडून, पिळून आणि गाळून) किंवा आले घालून गरम केलेले तेल देखील वापरू शकता. तुम्ही तुमच्या मुलाच्या कानात आल्याचा रस किंवा तेल थेट घालू शकता.

. मानेचे व्यायाम करणे

जेव्हा कानावर दाब पडल्यामुळे कान दुखतो, तेव्हा दाब कमी करण्यासाठी आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी मानेचे व्यायाम करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला साधे मानेचे व्यायाम करण्यास मदत करू शकता. मानेचे व्यायाम करण्याचा योग्य मार्ग जाणून घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे.

१०. हायड्रोजन पेरॉकसाईड वापरा

हायड्रोजन पेरॉक्साईड हा बऱ्याच काळापासून कान दुखीवर एक परिणामकारक घरगुती उपाय आहे. तुम्ही वेदना होत असलेल्या कानामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचे काही थेंब घालू शकता. आणि काही वेळानंतर ते थेंब तुम्ही काढून टाकू शकता. स्वच्छ पाण्याने कान स्वच्छ करा.

११. कान दुखण्यासाठी लसूण

लसणामध्ये दाहकविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात, आणि म्हणूनच कानदुखीवर उपचार करण्यासाठी ते खूप प्रभावी आहे. तुम्ही लसणाच्या काही पाकळ्या चिरून त्या ऑलिव्ह ऑईल किंवा तिळाच्या तेलात भिजवू शकता. हे तेल गाळून घ्या आणि या तेलाचे काही थेंब दुखणाऱ्या कानामध्ये घाला.

कान दुखण्यासाठी लसूण

१२. विचलित होण्यास मदत होते

जेव्हा तुमचे मूल कानाच्या दुखण्याशी झुंज देत असते, तेव्हा सर्वोत्तम उपायांपैकी एक उपाय म्हणजे लक्ष विचलित करणे. तुम्ही तुमच्या मुलाला एक चांगला चित्रपट दाखवू शकता, त्याला एक नवीन खेळणी देऊ शकता किंवा फक्त त्याचा आवडता नाश्ता बनवू शकता.

आपण घरगुती उपचार कधी करावेत?

कानदुखीची लक्षणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत. तथापि, आपण ते कधी वापरावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दात किडल्यामुळे होणारी कान दुखी घरगुती उपायांनी बरी होणार नाही. एखाद्या प्रकारच्या विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणारी कान दुखी घरगुती उपायांनी बरी होऊ शकते. कानदुखीची बहुतेक प्रकरणे एक किंवा दोन आठवड्यांत बरी होऊ शकतात. परंतु जर तुमच्या मुलाचे वय दोन वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुमच्या डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, जर तुमच्या मुलाला ताप येत असेल आणि तो एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकत असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लहान मुलांचे कान दुखणे प्रतिबंध

  • तुमच्या मुलाचे कान तीक्ष्ण वस्तूंनी किंवा कापसाच्या फडक्याने स्वच्छ करणे टाळा
  • तुमच्या मुलाला झोपलेल्या स्थितीत (विशेषतः बाटलीने) दूध पाजणे टाळा
  • इतर मुलांसोबत खेळल्यानंतर किंवा बाहेर खेळल्यानंतर तुमचे मूल हात धुत असल्याची खात्री करा
  • तुमचे मूल नियमितपणे पोहत असल्यास, इअरप्लग वापरा
  • वारंवार होणाऱ्या सर्दी आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका
  • तुमच्या मुलाला फ्लू आणि पीव्हीसी शॉट झाला आहे याची खात्री करा, यामुळे त्याला कानाच्या मधल्या भागाला संसर्ग होण्याची शक्यता कमी होऊ शकते

डॉक्टरांना कधी भेटायचे?

  • कानाच्या मागे लालसरपणा आणि सूज असल्यास.
  • तुमच्या मुलाला खूप ताप असल्यास (१०४ अंश किंवा जास्त)
  • एखादी टोकदार वस्तू कानात घातली तर
  • तुम्हांला तुमचा मुलगा खरोखरच आजारी वाटत असल्यास
  • तुमच्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास
  • वेदनाशामक औषधे देऊनही तुमच्या मुलाचे रात्रीचे कान दुखणे कमी होत नसल्यास

लहान मुलांमध्ये कान दुखणे सामान्य आहे आणि घरगुती उपायांनी प्रभावीपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते. तथापि, जर तुमच्या मुलाची लक्षणे सुधारत नसतील आणि तुमच्या मुलाचे वय दोन वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही बालरोगतज्ञांशी संपर्क साधावा.

आणखी वाचा:

मुलांचे जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे
लहान मुलांच्या कानदुखीवर १२ परिणामकारक घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article