Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य सुरक्षा लहान मुलांना रात्रीचा घाम येणे

लहान मुलांना रात्रीचा घाम येणे

लहान मुलांना रात्रीचा घाम येणे

लहान मुलांच्या निरोगी वाढीसाठी आणि विकासासाठी अखंड झोप हा महत्त्वाचा घटक आहे. पण जर तुमच्या मुलाला नीट झोप लागत नसेल तर त्यामागचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. झोपेत असताना तुमच्या लहान मुलाच्या डोक्याला घाम येत असल्यास, त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या मुलाला चांगली झोप घेण्यास त्रास होऊ शकतो. तुमच्या लहान मुलाला रात्री घाम येत असेल तर तो मध्यरात्री रडतो. अशा वेळी परिस्थिती नीट समजून घेणे गरजेचे असते.

रात्रीचे घाम येणे म्हणजे काय?

एखाद्या वैद्यकीय समस्येमुळे लहान मुलांना रात्रीचा घाम येत असेल किंवा वैद्यकीय समस्या नसली तरीसुद्धा रात्रीचे घाम येणे बाळासाठी हानिकारक असते. सामान्यतः वातावरण उष्ण, दमट किंवा दोन्ही प्रकारचे असेल तर रात्रीचा घाम येऊ शकतो. शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी वेळ हवा असतो म्हणून लहान मुलांना रात्रीची गाढ झोप लागणे गरजेचे आहे. जेव्हा हवामान उबदार असते तेव्हा शरीर स्वतःचे तापमान नियंत्रित करते, परंतु ही प्रणाली लहान मुलांमध्ये पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे घामाच्या ग्रंथी सामान्यपेक्षा मोठ्या होतात आणि त्यामुळे घाम येतो.

लहान मुलांना रात्री घाम येण्याची सामान्य कारणे

लहान मुलांना रात्री घाम येण्याची काही सामान्य कारणे खाली दिलेली आहेत

1. जाड किंवा मोठे पांघरूण वापरणे
2. श्वास न घेता येणार्‍या सामग्रीपासून बनविलेले कपडे घालणे
3. सामान्य तापमानापेक्षा खोली जास्त उबदार असणे
4. खोलीमध्ये हवा खेळती नसणे
5. शरीराचे तापमान वाढवणाऱ्या संसर्गामुळे मुलाला त्रास होणे
6. औषधांचा परिणाम
7. एखादे भयानक स्वप्न
8. वजन जास्त असणे, त्यामुळे शरीराच्या समस्या उद्भवतात
9. झोपण्यापूर्वी मसालेदार अन्न खाणे, मसालेदार अन्न पचण्यास कठीण असते
10. वातानुकूलित खोल्यांमध्ये देखील वातावरणातील तापमानात बदल
11. स्लीप एपनियाने ग्रस्त. ह्या स्थितीमध्ये श्वास थांबतो आणि अचानकपणे सुरू होतो
12. घोरण्यासह इतर झोपेच्या समस्या
13. सर्दी आणि खोकला ज्यामुळे नाक बंद होते
14. एखाद्या मुलाला चिंता आणि तणाव असू शकतो

लहान मुलांना रात्रीचा घाम येण्याची लक्षणे

रात्री घाम येण्याची काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे खाली दिलेली आहेत

  • झोपेत असताना तुमचे मूल मधूनमधून श्वास घेत असेल तर
  • तुमच्या मुलाची श्वासोच्छ्वासाची पद्धत कदाचित अनियमित असू शकते
  • तुमचे मूल दिवसभर थकलेले असू शकते
  • तुमच्या मुलाला झोपताना तोंड उघडे ठेवण्याची प्रवृत्ती असते

लहान मुलांना रात्रीचा घाम येण्याची लक्षणे

लहान मुलांना येणाऱ्या रात्रीच्या घामाच्या समस्येचे निदान कसे केले जाते?

तुमच्या लहान मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाणे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार्‍या वरीलपैकी कोणत्याही लक्षणांवर वैद्यकीय मत घेणे चांगले. डॉक्टर तुमच्या मुलाच्या आरोग्याशी संबंधित इतिहास जाणून घेऊ शकतात. त्यामध्ये त्याच्या झोपेशी संबंधित कोणत्याही सवयींचा समावेश असू शकतो. डॉक्टर घराच्या वातावरणाचीही चौकशी करतील, तापमान आणि वेंटिलेशनबद्दल विचारतील. त्यानंतर, तुमच्या मुलाला सायनस किंवा कानात संसर्ग झाला आहे की नाही किंवा इतर कोणतीही समस्या आहे का हे पाहण्यासाठी सामान्य तपासणी केली जाईल.

लहान मुलाला रात्रीचा घाम येत असल्यास त्यावर उपचार

तुमच्या मुलाला रात्रीचा घाम येत असेल तर त्यावर उपचारासाठी कोणतीही विशिष्ट उपचार पद्धती नाही. तुम्ही तुमच्या मुलाला नेहमी हायड्रेटेड ठेवा. त्याला हवा खेळती असलेल्या खोलीत ठेवा. त्याला मऊ, श्वास घेण्यायोग्य कपडे घाला. मऊ आणि हलके पांघरूण घालून त्याला घाम येत नाही ना ह्याकडे लक्ष ठेऊ शकता.

जर एखाद्या विकारामुळे किंवा डॉक्टरांनी निदान केलेल्या आजारामुळे रात्री घाम येत असेल, तर तुमच्या मुलाला त्या समस्येवर उपचार करण्यासाठी औषध दिले जाईल. तुम्ही बाळाला ती औषधे नियमितपणे द्या आणि डोस वगळू नका.

आपल्या मुलाला रात्री घाम येण्याची समस्या असल्यास ती टाळण्यासाठी कशी मदत करावी?

लहान मुलांना रात्रीचा घाम येऊ नये म्हणून तुम्ही वापरू शकता अशा काही टिप्स येथे आहेत.

  1. तुमच्या मुलाची खोली रात्रभर सामान्य तापमानाला असल्याची खात्री करा
  2. रात्रीच्या जेवणात तुमच्या मुलाला मसालेदार किंवा भरपूर पदार्थ देणे टाळा. असे पदार्थ शरीराचे तापमान वाढवू शकतात आणि त्यामुळे रात्री घाम येण्याची शक्यता असते. रात्रीच्या जेवणानंतर लहान मूल कमीतकमी ३० मिनिटे जागे राहते. तुमचे मूल लगेच झोपत नाही ना ह्याची खात्री करा
  3. मुलाला चांगले झोपायला मदत करण्यासाठी, रात्रीच्या जेवणानंतर त्याला हळू हळू घराभोवती फिरवून आणा. त्यामुळे अन्न चांगले पचण्यास मदत होईल
  4. रात्री झोपतानासाठी योग्य, सैल आणि आरामदायी कपडे खरेदी करा
  5. तुमच्या मुलाच्या झोपण्याच्या खोलीतून अनावश्यक ब्लँकेट्स आणि त्याला झोपण्यासाठी खूप उबदार वाटणारी कोणतीही वस्तू काढून टाका
  6. तुमच्या मुलाला शाळेत किंवा इतर कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत आहे का हे समजून घेण्यासाठी दररोज त्याच्या सोबत बोलत रहा. अशा प्रकारे, आपण त्याला त्याच्या चिंता किंवा तणावातून बाहेर येण्यास मदत करू शकता
  7. तुमच्या मुलाच्या लक्षणांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि कोणत्याही वैद्यकीय समस्या ओळखण्यासाठी नियमित तपासणी करा
  8. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या औषधामुळे तुमच्या मुलाला रात्रीचा घाम येतो असे तुमच्या लक्षात आल्यास, तुमच्या डॉक्टरांना त्याबद्दल कळवा आणि ते त्यासाठी पर्याय सुचवू शकतात का ते पहा.

लोकरीच्या अंथरुणामुळे रात्रीचा घाम येणे कमी होते का?

लोकरीचा बिछाना सामान्यतः लहान मुलासाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. लोकरीमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे लोकरीचा बिछाना कोणत्याही वातावरणासाठी योग्य ठरतो. वातावरण थंड असताना लोकरीचा बिछाना तुमच्या मुलाला उबदार ठेवेल आणि गरम असताना थंड ठेवेल. रात्रीचा घाम आल्यास मुलाला अस्वस्थ वाटू शकते.लोकरीचे अंथरूण असल्यास बहुतेक ओलावा शोषून घेतो आणि चिकटपणा येत नाही. कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुमच्या मुलाला गाढ झोप लागेल.

तुमच्या मुलाला रात्रीच्या वेळी जास्त घाम येत असल्यास तुम्हाला काळजी वाटू शकते. बाळाच्या झोपेसाठी चांगले वातावरण, योग्य कपडे आणि एक निश्चित वेळापत्रक ठेवा. त्याला आवश्यक असलेली झोप मिळण्यासाठी तुम्ही मदत करू शकता. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यावर, इतर कोणत्याही समस्या सहजपणे सोडवल्या जाऊ शकतात तसेच रात्री घाम येण्याची समस्या तुम्ही नाहीशी करू शकता.

आणखी वाचा:

मुलांचे जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे
लहान मुलांमधील कानदुखी: कारणे, लक्षणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article