मोठी मुले (५-८ वर्षे)

कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही बोधकथा मराठीमध्ये

'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' ही लहान मुलांसाठीची कथा खूप प्रसिद्ध आहे. ह्या गोष्टीतील कोल्ह्याला झाडावर लटकलेला द्राक्षांचा घड दिसतो. द्राक्षे मिळविण्यासाठी कोल्ह्याने काय केले आणि तो त्यात यशस्वी झाला का? हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचा. ही प्रभावी कथा केवळ मनोरंजकच नाही तर त्यातून बोध घेता येईल अशी आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही एक नैतिक कथा आहे.

कोल्हा आणि द्राक्षे ही लहान मुलांसाठीची गोष्ट

एके काळी, कोल्हा हा आशिया खंडातील "सुंदरवन" जंगलात भर दुपारी फिरत होता. थोडावेळ एकटाच  फिरल्यावर त्याला भूक लागली. थोड्याच वेळात कोल्हा सुंदर झाडे आणि फुलझाडांनी भरलेल्या हिरव्यागार बागेत पोहोचला. मग, त्याला अचानक द्राक्षाच्या वेलीवर द्राक्षांचा एक मोठा घड दिसला. झाडाच्या फांद्यांवर लटकलेले द्राक्षांचे घड पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. रसाळ द्राक्षांकडे तो पाहू लागला. तहानलेला कोल्हा उद्गारला, “व्वा, द्राक्षे किती रसाळ दिसतात! द्राक्षे खाण्यासाठी तयार दिसत आहेत. कोल्ह्याला द्राक्षे खावीशी वाटत होती कारण तो भुकेला आणि तहानलेला होता. द्राक्षे जास्त होती, तरीही कोल्ह्याने पूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने उडी मारली. धावत जाऊन  द्राक्षांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो थोडासा मागे सरकला. पहिल्यांदा जेव्हा त्याने उडी मारली तेव्हा तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यानंतर, तो त्यांना स्पर्श करू शकण्याइतपतही जवळ नव्हता. त्याने सर्व धीर एकवटला आणि म्हणाला, "पुन्हा प्रयत्न करूया," पुन्हा, त्याने प्रयत्न केले, परंतु सर्व व्यर्थ गेले. त्याचे प्रयत्न कमी पडले. द्राक्षे अजूनही त्याच्या आवाक्याबाहेर होती. आत्मविश्वासू कोल्हा म्हणाला, "तिसऱ्या आणि शेवटच्या वेळी, द्राक्षे माझीच असतील," परंतु त्याने खूप प्रयत्न करूनही द्राक्षे पूर्णपणे त्याच्या आवाक्याबाहेर राहिली. निराश, भुकेला कोल्हा पुटपुटला, “मी किती मूर्ख आहे, हा योग्य हंगाम नाही. द्राक्षे नक्की आंबट असतील" स्वतःचे सांत्वन करत तो निघून गेला.

'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' ह्या कथेतून काय बोध घ्यावा?

मुलांसाठी  असलेली, 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' ही कथा इसापनीतीच्या दंतकथांमधून घेतलेली आहे . नैतिकता असलेली ही लोकप्रिय कथा आहे. या मनोरंजक कथेतून आपण एक धडा शिकू शकतो आणि तो म्हणजे आपल्या आवाक्यात नसलेली एखादी गोष्ट नापसंत करणे किंवा तिचा तिरस्कार करणे आपल्यासाठी स्वाभाविक आहे. परंतु चिकाटी आणि दृढनिश्चय सोडू नका. प्रयन्त करत रहा. आणखी वाचा:  लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या १४ सर्वोत्तम कथा लहान मुलांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या १० छोट्या प्रेरणादायी भारतीय पौराणिक कथा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved