गर्भारपण

गरोदरपणात स्तन आणि स्तनाग्रांमध्ये होणारे सामान्य बदल

तुम्ही गर्भधारणा चाचणी घेण्यापूर्वीच तुम्ही गर्भवती आहात हे सांगणारी अनेक चिन्हे आणि लक्षणे असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे स्तनांमधील वेदना होय. गर्भधारणा हा स्त्रीसाठी जीवन बदलावणारा अनुभव आहे, केवळ एक नवीन जीवन निर्माण होते म्हणून नाही तर, तिच्या शरीरात नऊ महिन्यांपर्यंत वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी आणि बाळाचे पोषण करण्यासाठी अनेक बदल होत असतात आणि जन्मानंतर बाळाला पोषण देण्याची देखील तयारी शरीर करत असते जसे की स्नायू सैल होतात, बरगड्या रुंदावतात, पोट ताणले जाते आणि अंतर्गत अवयव बदलतात, स्तनांचा आकार वाढतो आणि बाळाला जन्मानंतर दूध देण्यासाठी ते तयार होतात. तथापि, गरोदरपणात होणारी स्तनांची वाढ हा काही नेहमीच आनंददायक अनुभव नसतो. बर्‍याच स्त्रिया वेदना होत असल्याची तक्रार करतात, परंतु अस्वस्थतेची पातळी वेगवेगळी असते. जर तुम्ही गर्भवती असाल तर स्तनांमध्ये काय बदल होतील हे जाणून घेण्यासाठी त्याचा पटकन आढावा घेऊयात!

गरोदरपणात होणारे स्तनांमधील बदल

गर्भधारणेशी संबंधित इतर लक्षणांप्रमाणेच, गरोदरपणात स्तन नाजूक आणि हळुवार होतात. त्यास मुख्यत्वे कारणीभूत दोन घटक असतात आणि ते म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. तुम्ही पौगंडावस्थेत असताना तुमच्या स्तनांच्या निर्मितीस कारणीभूत असणारी ही संप्रेरके , आता तुम्हाला स्तनपानासाठी तयार करीत असतात. ह्या संप्रेरकांमुळे दुग्धनलिका रुंद होतात आणि स्तनांना पुरेसा रक्त पुरवठा होतो. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात स्तनांमध्ये वेदना होणे सामान्य आहे, कारण गर्भधारणेच्या दोन ते चार आठवड्यांच्या दरम्यान म्हणजेच पहिल्या तिमाहीत बहुतेक बदल होत असतात. गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळात म्हणजेच पहिले १२ आठवडे प्रत्येक आठवड्यात होणारे स्तनांमधील बदल इथे दिले आहेत. भ्रूणाचे रोपण होताच स्तनांमधील बदलास सुरुवात होते. दुसर्‍या आठवड्यात मोठे बदल दिसून येतात आणि तुम्हाला स्तनांमधील वाढलेली संवेदनशीलता जाणवेल विशेषकरून ज्या बाजूला स्तन रक्तवाहिन्या असतील तिथे ह्या वेदना जास्त जाणवतील. हा काळात दुग्धनलिका वेगाने वाढतात. ह्या काळात स्तनाग्रांमध्ये लक्षणीय बदल होतात. वाढलेल्या रक्तपुरवठ्यामुळे थोडे टोचल्यासारखे होऊन स्तनाग्रांच्या आजूबाजूला थोडे मुंग्या आल्यासारखे वाटू शकते. तापमानातील बदलांमुळे हे वाढू शकते. ह्या टप्प्याच्या शेवटी, रंगद्रव्यांमध्ये वाढ होते आणि स्तनाग्रांभोवतीचा वर्तुळाकार भाग गडद होतो आणि स्तनाग्रे ठळक दिसू लागतात. सातव्या आठवड्यात, चरबी साठल्याने आणि दुग्ध नलिकांमध्ये वाढ झाल्याने स्तन आकाराने वाढतात. रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामुळे लोब्युल तयार होतात, त्यामुळे स्तन हळुवार आणि दुखरे होतात. ८ व्या आठवड्यात स्तनाग्रांभोवतीच्या गडद वर्तुळाकार भागात छोट्या पुटकुळ्या दिसू लागतात. १२ व्या आठवड्यात स्तनाग्रांभोवतीच्या ह्या गडद वर्तुळाभोवती आणखी एक फिकट रंगाचे वर्तुळ तयार होते. आत ओढली गेलेली स्तनाग्रे सरळ होतात. ह्या काळात स्तनाग्रे पूर्णपणे बाहेर येतात आणि जर तुमचे हे पहिलेच गरोदरपण असेल तर त्यातील फरक नक्कीच तुमच्या लक्षात येईल.

गरोदरपणात स्तनांमध्ये होणारा सर्वसामान्य बदल

जरी बरेचसे बदल पहिल्या १२ आठवड्यांमध्ये होत असले तरी संपूर्ण गरोदरपणात स्तनांमध्ये बदल होत राहतात आणि ते खालीलप्रकारे

. स्तनांच्या आकारात होणारी वाढ

गरोदरपणात स्तनांचा वाढणारा आकार हा लक्षणीय बदल असतो, परंतु ही आकारातील वाढ प्रत्येक स्त्रीपरत्वे बदलते. काही स्त्रियांच्या बाबतीत ही वाढ हळू आणि नियमित होते तर काहींच्या बाबतीत स्तनांच्या आकारात अचानक वाढ होते. जर तुमची ही पहिली वेळ असेल तर तुमच्या ब्रा चा आकार किमान एका कप ने वाढला असल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचे स्तन भरीव आणि जड होतील. अचानक वाढलेल्या आकारामुळे त्वचा ताणली जाते आणि त्यामुळे स्तनाना खाज सुटते. स्तनांवर स्ट्रेच मार्क्स येणे सामान्य आहे आणि ते काही काळ राहतात तुम्ही त्याची काळजी करण्याचे कारण नाही.

. स्तन नाजूक होतात

पहिल्या तिमाही मध्ये स्तन दुखरे आणि नाजूक होतात. दुसऱ्या तिमाहीमध्ये ह्या वेदना कमी होतात. संप्रेरकांमधील वाढीमुळे असे होते. वेदनांमुळे तुमची दैनंदिन कामे करणे सुद्धा तुम्हाला अवघड होतील

. रक्तवाहिन्या दिसू लागतील

रक्तप्रवाह वाढल्यामुळे स्तनांच्या नाजूक त्वचेवर गरोदरपणात रक्तवाहिन्या स्पष्ट दिसू लागतील. ही स्थिती काही काळापुरती असून, रक्तवाहिन्या आधीसारख्या होतात आणि बाळाच्या जन्मानंतर किंवा स्तनपानानंतर त्यांचा आकार सामान्य होतो.

. गाठी

काही स्त्रियांना स्तनांमध्ये गाठी झाल्याचे लक्षात येईल. जरी ह्या गाठी कॅन्सरच्या नसल्या तरी काही बदल जाणवले किंवा नवीन गाठी आल्यास तपासणी करून घेणे चांगले. बऱ्याचशा गाठी ह्या गॅलॅकटोसेल्समुळे (दुधाने भरलेल्या सिस्ट) , फाइब्रोडेनॉमस किंवा सिस्ट ह्यामुळे होतात.

. गरोदरपणात स्तनाग्रांमध्ये होणारे बदल

गर्भधारणेमुळे तुमच्या स्तनाग्रांमध्ये रंगद्रव्य वाढते, त्या भागास एरिओला देखील म्हणतात. तिसऱ्या तिमाहीतील बदलांमध्ये स्तनाग्रांच्या आकारात वाढ आणि मॉन्टगोमेरी ट्युबरक्युलस दिसू लागणे ह्यांचा समावेश होतो.

. मॉन्टगोमेरी ट्युबरक्युलस

स्तनाग्रांभोवतीच्या काळ्या वर्तुळांमध्ये छोट्या पुटकुळ्या येतात आणि एका आयरिश डॉक्टरला त्या पहिल्यांदा दिसल्या त्यामुळे डॉक्टरांचे नाव पुटकुळ्यांना देण्यात आले. ह्या पुटकुळ्यांची संख्या प्रत्येक स्त्रीसाठी वेगळी असते. ह्या तेल साठवून ठेवण्याचे काम करतात त्यामुळे स्तनाग्रांभोवतीचा भाग ओलसर राहतो आणि गरोदरपणात स्तनाग्रे दुखत नाहीत. त्यांना फोडण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर संसर्ग होण्याची शक्यता असते.

. स्तनांमधून द्रव गळणे

गरोदरपणात १६ व्या आठवड्यांपासून स्तनांमधून स्त्राव गळणे हे खूप सामान्य आहे. प्रसूतीनंतरच्या कार्यासाठी दुग्ध नलिका त्यांचे काम करत असतात आणि पिवळसर रंगाचे कोलेस्ट्रम स्तनांमधून गळण्यास सुरुवात होते. हे कोलेस्ट्रम तुमच्या बाळाने जन्मानंतर लगेच घेतले पाहिजे कारण त्यामध्ये तुमच्या नवजात बाळाला संरक्षित करण्यासाठी अनेक अँटीबॉडीज असतात.

स्तनांमधील वेदना कमी करण्यासाठी काही टिप्स

जरी स्तनांमधील बदल आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता टाळता येत नाही तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी हा बदल सोपा करू शकता
गरोदरपणात स्तनांच्या आकारात बदल होत असल्याने जेव्हा जेव्हा तुम्हाला जुन्या ब्रा मुळे घट्ट वाटत असेल तेव्हा नवीन मापाच्या ब्रा घ्या. पहिल्या तिमाहीच्या अखेरीला आणि तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीला एकदा माप घेऊन व्यवस्थित आरामदायक ब्रा खरेदी केल्याने तुमच्या स्तनांना नीट आधार मिळत आहे ह्याची खात्री होईल. मॅटर्निटी ब्रा खरेदी केल्याने तुम्हाला त्या बाळाच्या जन्मानंतर सुद्धा वापरता येतील. गरोदरपणात स्तनांच्या बदलणाऱ्या आकारानुसार त्या ऍडजस्ट केल्यास स्तनांच्या वेदना टाळण्यास मदत होईल गरोदरपणात स्तनांना खाज सुटते त्यासाठी त्वचेला मॉइश्चराइज करणे जरुरीचे आहे. कारण गरोदरपणात त्वचा ताणली जाते आणि त्यास पोषण मिळणे जरुरीचे असते जेणेकरून त्वचा मऊ राहील. वायर असलेल्या ब्रा मुळे रक्तप्रवाह आणि दुधाची निर्मिती नीट होत नाही. परंतु संशोधनाद्वारे ही थिअरी चुकीची असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, बऱ्याच स्त्रियांना वायर असलेल्या ब्रा आधीच हळुवार आणि दुखत असलेल्या स्तनांसाठी आरामदायक वाटत नाहीत. जर तुमच्या ब्रा मुळे तुम्हाला आरामदायक वाटत असेल तर वायर नसलेली ब्रा वापरण्यास सुरुवात करा. कॉटन सारख्या हायपोअलर्जिक कापडामुळे त्वचेच्या त्रासापासून संरक्षण होते, त्यामुळे त्वचेचे चांगले श्वसन होते. ह्या मऊ कापडामुळे घाम टिपण्यास मदत होते, त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि कोरडी राहते. कॉटन ब्रा ची निवड केल्यास आरामदायक वाटते आणि ते खूप गरजेचे असते. अधून मधून होणाऱ्या वेदनांमुळे तुम्हाला त्रास होणार नाही ह्याची खात्री करण्याचा प्रतिबंध हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही कुठे जात आहात ते पहा, तुम्ही घरी आहात की बाहेर हे बघा त्यामुळे शारीरिक इजा होणार नाही. शारीरिक संबंधांमध्ये सुद्धा दुखऱ्या स्तनांचा अडथळा येऊ शकतो. तुमच्या पतीसोबत तुमची समस्या शेअर करा आणि त्यांना स्तनांना स्पर्श करू नका असे सांगा. गरोदरपणात दुखऱ्या स्तनांवर उपचार म्हणून तुम्ही कोमट पाण्याचा ओला टॉवेल त्यावर ठेऊ शकता. गरम पाण्याने शेकल्याने सूज आणि हळुवारपणा कमी होऊन रक्ताभिसरण वाढेल स्तन दुखण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने ते टाळता येऊ शकते. ह्यामुळे जास्तीची संप्रेरके तसेच ज्या द्रव्यांमुळे वेदना होतात ती शरीराबाहेर टाकली जातात. कमी मीठ खाल्ल्याने थोड्या काळासाठी का होईना गरोदरपणातील स्तनांच्या वेदना कमी होतात. पाण्यात, फळांच्या ज्यूस मध्ये किंवा दह्यात एक चमचा जवसाच्या बियांची पूड घाला. ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषणमूल्ये असतात आणि जवस म्हणजे तंतुमय पदार्थांचा उत्तम स्रोत असतो आणि त्यामुळे स्तनांच्या वेदना कमी होतात. जर तुमचे शरीर निरोगी असेल तर स्तनांच्या वेदना चांगल्यापैकी हाताळता येतात. व्हिटॅमिन आणि खनिजद्रव्ये असलेले अन्नपदार्थ खा त्यामध्ये बिया आणि सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि सीरिअल्स ह्यांचा समावेश होतो आणि त्यामुळे स्तनांचा हळुवारपणा कमी होतो.

स्तनांची तपासणी - डॉक्टरांना केव्हा भेट द्याल?

गरोदरपणात इतर लक्षणांप्रमाणेच स्तनांची अस्वस्थता सामान्यपणे आढळते. जर तुम्हाला काही वेगळ्या प्रकारची वेदना किंवा स्तनांमधून स्त्राव आढळला तर तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या

गरदोरपणानंतर स्तनांमध्ये बदल होतो का?

गरोदरपणा आणि बाळाच्या जन्माचा प्रवास महिलांच्या स्तनांमध्ये लक्षणीय बदल घडवून आणतो. गरोदरपणात स्तन वाढतात, प्रसूतीनंतर मुलाचे पोषण करण्यासाठी दुधाचे उत्पादन होते. एकदा तुम्ही बाळाला जन्म दिला की तुम्ही स्तनपान देण्यास सुरुवात करता आणि दुधाचे उत्पादन होईपर्यंत स्तन मोठे राहतात. बर्‍याच स्त्रियांचे स्तन घट्ट होतात, स्तनपानातील समस्यांमुळे किंवा दुधाचे अत्याधिक उत्पादन झाल्यामुळे स्तन खूप भरले जाते. स्तनपानानंतर दूध पंप करून हे कमी केले जाऊ शकते एकदा स्तनांनी दुधाचे उत्पादन बंद केल्यावर काही स्त्रियांच्या स्तनांचा आकार पूर्ववत होतो, तर काहींचे स्तन गर्भधारणेच्या आधीच्या आकारापेक्षा मोठे राहू शकतात. लवचिकता गमावल्यामुळे काही स्त्रियांचे स्तन खाली ओघळतात. प्रत्येक महिलेच्या स्तनांमधील बदल अनुवांशिकता , स्तनपान कालावधी आणि वजनातील चढ-उतार यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. गर्भावस्थेदरम्यान निपल्स सामान्यत: काळे होतात आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर हळूहळू रंग फिकट होत जातात. स्तन बदलांशी सामना करण्यास शिकणे हा गरोदरपणात आपल्या शरीराच्या अनेक बदलांना स्वीकारण्याचा एक भाग आहे. पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत जास्तीत जास्त विकास दिसून येत असताना, दुसऱ्या तिमाहीतील बदलांमुळे सौम्य अस्वस्थता जाणवते. जोपर्यंत ह्या बदलांचा आरोग्यास धोका नसतो, तोपर्यंत या बदलांमुळे आपणास चिंता वाटणार नाही आणि गर्भारपणाचे दिवस जसजसे पुढे सरकतील तसे हे बदल सौम्य प्रमाणात होतील. आणखी वाचा : गरोदरपणातील पोटदुखी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved