In this Article
गरोदरपणात, स्त्रीच्या पौष्टिक गरजा पूर्ण करू शकतील आणि तोंडाला चव येईल अश्या अन्नपदार्थांची निवड त्या स्त्रीने केली पाहिजे. गरोदर असताना पौष्टिक फळे आणि भाज्या खाणे महत्वाचे आहे. त्यामुळे गरोदरपणात स्त्रीला पौष्टिक घटक मिळतात. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीपासून तुम्ही या फळाचा आहारात समावेश करू शकता कारण त्यातून मिळणारे पौष्टिक घटक तुमच्या बाळाच्या विकासात मदत करतील.
गरोदरपणात डाळिंब खाणे सुरक्षित आहे का?
अनेक डॉक्टर आणि पोषणतज्ञ म्हणतात की गरोदरपणात डाळिंबाचे दाणे खाण्यास किंवा डाळिंबाचा रस पिण्यास काहीही हरकत नाही. गरोदरपणात डाळिंब खाणे हानिकारक असू शकते हे दर्शविणारी कोणतीही घटना किंवा पुरावा नाही. परंतु अर्कांचे सेवन करू नये, रस सेवन करणे सुरक्षित आहे. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि डाळींब खाल्ल्याने तुमची गोड़ खाण्याची इच्छा सुद्धा काही प्रमाणात पूर्ण होऊ शकते.
गरोदरपणात डाळिंब खाण्याचे आरोग्यविषयक फायदे
डाळिंबातील विविध पोषक घटकांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट असतात आणि ही खनिजे गर्भवती स्त्रियांसाठी आवश्यक असतात आणि विविध प्रकारे फायदेशीर ठरतात.
१. ऍनिमिया प्रतिबंधित होतो
डाळिंब म्हणजे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. गर्भवती स्त्रियांसाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे कारण खाल्लेल्या अन्नपदार्थांमधून लोहाचे संश्लेषण करण्यास त्यामुळे मदत होते. जर तुम्ही गरोदरपणात लोहयुक्त पदार्थ खाल्ले किंवा लोह पूरक आहार घेतला तर तुमच्या रक्तात लोहाचा पुरेसा साठा असेल. व्हिटॅमिन सी तुमच्या शरीराला लोह शोषण्यास मदत करेल. तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन सी असेल तर ऍनिमियाचा धोका कमी होतो आणि त्यामुळे अनेकदा मुदतपूर्व प्रसूती होते.
२. पचनसंस्था निरोगी ठेवते
डाळिंब म्हणजे तंतुमय पदार्थांचा चांगला स्रोत आहे. बद्धकोष्ठता आणि इतर पचनाचे विकार दूर ठेवण्यासाठी गर्भवती स्त्रियांना भरपूर फायबर असलेल्या भाज्या आणि फळे खाण्याची शिफारस केली जाते. तंतुमय पदार्थांमुळे पचन संस्था व्यवस्थापित होते आणि अस्वस्थतेपासून सुटका होते तसेच आतड्यांची हालचाल चांगली होते.
३. फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते
विविध शारीरिक प्रक्रियांमुळे शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होतात. त्यांना विषाप्रमाणे बाहेर काढले पाहिजे. परंतु यापैकी काही शरीरात राहू शकतात. त्यांची निरोगी पेशी किंवा अगदी डीएनए रेणूंशी प्रक्रिया होते आणि त्यामुळे शरीराला आंतरिक नुकसान होते. कधीकधी प्लेसेंटावर देखील परिणाम होतो. त्यांचा मुकाबला करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अँटिऑक्सिडंट्स होय. डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात. डाळिंबात असलेले अँटीऑक्सिडंट पेशींना होणारे कोणतेही नुकसान दुरुस्त करण्यास आणि मुलाच्या मेंदूचे कोणत्याही नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
४. पेटक्यांपासून आराम मिळतो
पोटॅशियम हे आणखी एक खनिज आहे आणि ते गर्भवती स्त्रियांसाठी जरुरीचे आहे. दररोज योग्य प्रमाणात डाळिंबाचा रस घेतल्याने तुमच्या शरीरात पोटॅशियमचा चांगला पुरवठा होतो. डाळिंबाचा रस घेतल्याने किंवा पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने गरोदरपणाशी संबंधित पेटक्यांमुळे आराम मिळू शकतो.
५. बाळाच्या मेंदूच्या विकासास मदत करते
फोलेट हे गर्भाच्या योग्य मानसिक विकासासाठी आवश्यक घटक आहे. एक ग्लास डाळिंबाचा रस तुमच्या दैनंदिन फोलेटच्या गरजांपैकी किमान १०% गरजा भागवू शकतो, म्हणून तुमच्या गरोदरपणाच्या आहारात फोलेटचा समावेश करणे आवश्यक आहे. फोलेट बाळाच्या मेंदूचा विकास योग्य मार्गावर ठेवते, न्यूरल ट्यूब आणि मज्जासंस्थेच्या विकासास समर्थन देण्याचे कार्य करते.
गर्भवती स्त्रिया डाळिंबाचा रस पिऊ शकतात का?
होय, गर्भवती स्त्रिया डाळिंबाचा रस पिऊ शकतात. डाळिंबाचा रस गर्भवती स्त्रियांनी घेतला पाहिजे कारण तो निरोगी आणि पौष्टिक आहे. गर्भवती महिलेच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग असू शकतो. गरोदरपणात तुम्ही तुमच्या नेहमीच्या नाश्त्यासोबत डाळिंबाचा रस घेऊ शकता.
डाळिंबाचा रस पिण्याचे फायदे
डाळिंबाच्या रसाचे काही फायदे होतात जसे की-
- एक ग्लास डाळिंबाचा रस सुमारे १५० कॅलरीज प्रदान करू शकतो.
- डाळिंबाचा रस प्यायल्याने हायड्रेशन सुधारते.
- डाळिंबाचा रस तुमच्या दैनंदिन गरजांपैकी एक चतुर्थांश व्हिटॅमिन के एकाच वेळी पुरवू शकतो.
- डाळिंबाच्या रसामुळे तुम्हाला गरोदरपणाच्या अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.
गर्भवती स्त्री किती डाळिंबे खाऊ शकते?
कोणतीही भाजी किंवा फळ कितीही फायदेशीर असले तरीसुद्धा, ते जास्त खाण्याची शिफारस केली जात नाही कारण त्याचा शरीराला फारसा उपयोग होत नाही. जास्त प्रमाणात डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने दातांच्या इनॅमलच्या आवरणाला हानी पोहोचते. ते टाळण्यासाठी, डाळिंबाचे दाणे खाण्यापूर्वी तुम्ही चीज (अर्थातच कमी प्रमाणात) खाऊ शकता. डाळिंबाचे दाणे खाल्ल्यानंतर तुम्ही तुमचे तोंड चांगले धुवावे. परंतु, आहारात या फळाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश कसा करावा?
डाळिंबाचा रस तुमच्या रोजच्या नाश्त्याचा एक भाग असू शकतो. भूक लागल्यावर तुम्ही जाता जाता डाळिंबाचे दाणेही तोंडात टाकू शकता. परंतु आहारात डाळिंबाचे दात समाविष्ट करण्याचे तुम्ही अधिक मार्ग शोधत असल्यास, ते इथे दिलेले आहेत.
- जर तुम्ही मांसाहार घेत असाल, तर काही पुदिन्याची पाने आणि डाळिंबाने ते सजवून चव वाढवू शकता.
- वेगवेगळ्या फळांची स्मूदी किंवा अगदी मिल्कशेक तयार करताना, चव वाढवण्यासाठी डाळिंबाचे काही दाणे घाला किंवा सर्व्ह करण्यापूर्वी ते टॉपिंग म्हणून वापरा.
- तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही डेझर्ट आणि सॅलडमध्ये डाळिंबाचे दाणे घालू शकता. पालक, पनीर आणि डाळिंबाच्या बियांची कोशिंबीर स्वादिष्ट लागते. तुम्ही मिक्स्ड फ्रूट सॅलड डेझर्ट बनवू शकता किंवा रस मलाईमध्ये डाळिंबाचे दाणे घालू शकता.
गरोदरपणात डाळिंबाच्या सेवनाशी संबंधित धोके
डाळिंब खाल्ल्याने गरोदरपणाशी संबंधित विविध संसर्ग टाळता येऊ शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे तुम्ही डाळिंबाचे मोती जास्त प्रमाणात खाऊ नये कारण यामुळे काही गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. गरोदरपणात डाळिंबाच्या सेवनाशी संबंधित जोखीम खालीलप्रमाणे नमूद करता येईल.
- डाळिंबामध्ये कॅलरी जास्त प्रमाणात असतात. आहारातील निर्बंधांमुळे ज्या स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन कॅलरीजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. तथापि, या फळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास कॅलरी वाढतात.
- जर एखाद्या स्त्रीने डाळिंबाचा अर्क खाल्ला तर कळा सुरु होऊ शकतात. गर्भवती स्त्रियांनी डाळिंबाचा अर्क कोणत्याही परिस्थितीत टाळला पाहिजे. हा अर्क सालासकट तयार केला जातो. ह्या अर्कामध्ये काही घटक असतात आणि त्याचा परिणाम गरोदर स्त्रीच्या शरीरावर होतो. त्यामुळे अकाली आकुंचन सुरु होऊ शकते.
डाळिंबाच्या फळाचे सेवन करण्याविषयी काही टिप्स
जर तुम्ही डाळिंब योग्य प्रकारे आणि मध्यम प्रमाणात खाल्ले तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी फायदेशीर ठरू शकते. ह्या स्वादिष्ट फळाचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स पाळा.
- सुपरमार्केटमधून डाळिंबाचा ज्यूस विकत घेण्याऐवजी फळे खरेदी करा आणि ज्यूस घरीच बनवा. घरी केलेला रस आरोग्यदायी आणि शुद्ध असतो. स्नॅक्स साठी तुम्ही मॉकटेल किंवा पॉप सोडा देखील बनवू शकता.
- डाळिंब विकत घेताना वजनदार डाळिंबे विकत घ्या. जड डाळिंबे रसाळ असतात. बाहेरून ते पातळ परंतु कडक असले पाहिजेत. दाणे काढण्याआधी डाळिंब थंड पाण्यात बुडवून ठेवा किंवा हाताने दाणे कडून घ्या आणि फ्रिज मध्ये ठेवा. हे डाळिंबाचे दाणे तुमच्या न्याहारीच्या सीरिअल मध्ये किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये घालू शकता.
पोषणाच्या गरज भागवण्यासाठी तुमच्या गरोदरपणाच्या आहारामध्ये डाळिंबाचा समावेश करावा. ह्या फळाचे फायदे अनेक पटींनी आहेत. डाळिंबाच्या अर्काचे सेवन केल्यास किंवा डाळिंब जास्त प्रमाणात खाल्ल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तुम्ही इतर कोणत्याही आरोग्यदायी पदार्थाप्रमाणेच डाळिंबाचे सुद्धा सेवन करा आणि तुमचे गरोदरपण सुरक्षित जाईल!
आणखी वाचा:
गरोदरपणात भूक न लागणे: कारणे आणि उपाय
गरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ