Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी गर्भधारणापूर्व तपासण्या आणि चाचण्या: एक मार्गदर्शिका

गर्भधारणापूर्व तपासण्या आणि चाचण्या: एक मार्गदर्शिका

गर्भधारणापूर्व तपासण्या आणि चाचण्या: एक मार्गदर्शिका

प्रसवपूर्व काळजीचे महत्त्व आणि मूल्य आधीपासून सांगितले गेले आहे . त्यामुळे होणाऱ्या आईच्या आणि बाळाच्या तब्येतीच्या तपशिलांचा मागोवा घेता येतो. गर्भधारणेदरम्यान वैद्यकीय तपासणी बर्‍याच वेळा केली जाते आणि डॉक्टर व स्त्रीरोग तज्ञांनी त्याची शिफारस केली आहे. तथापि, अलिकडच्या काळात, बहुतेक तज्ञांनी गर्भधारणेपूर्वीच काळजी घेण्याची सूचना दिली आहे.

गर्भधारणापूर्व तपासणी म्हणजे काय?

गर्भधारणेपूर्वीच्या तपासणीत तुम्ही दोघेही आजारांपासून मुक्त आहात आणि गर्भधारणेसाठी कुठलाही अडथळा नाही हे निश्चित करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या वेगवेगळ्या चाचण्या करतात. चाचण्यांच्या परिणामावर आधारित, डॉक्टर तुम्हाला व्यायाम, आहार, जीवनशैली आणि आवश्यक पूरक आहार यासाठी सूचना देतील त्याचे तुम्ही पालन करणे आवश्यक असते. सुरक्षित गर्भधारणा आणि निरोगी मूल होण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या काही सवयींमध्ये बदल करण्यास ते सांगतील.

गर्भाधारणेपूर्वीची तपासणी महत्वाची का आहे?

बाळाचे पोटामध्ये नीट पालनपोषण करण्यासाठी स्त्री निरोगी आणि शारीरिकरित्या तयार आहे हे सुनिश्चित करण्यासाठी गर्भधारणापूर्व तपासणी आवश्यक आहे. गर्भधारणेपूर्वीची तपासणी एका जोडप्यासाठी महत्वाची आहे, कारण यामुळे स्त्रीची गर्भवती होण्याची शक्यता वाढू शकते. गर्भधारणेपूर्वीची तपासणी केल्यास जन्मजात अपंगत्व, विसंगती किंवा गर्भपात होण्याचा धोका देखील कमी होतो. पुरुष आणि स्त्री यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे गर्भधारणेदरम्यान उद्भवणारी कोणतीही गुंतागुंत कमी होण्यास ह्यामुळे मदत होते.

गर्भधारणापूर्व तपासणीसाठी तुम्ही कोणते गर्भधारणापूर्व सेवा प्रदाते निवडू शकता?

गर्भधारणापूर्व काळजी घेण्यासाठी प्रदाता निवडताना आपण त्याच डॉक्टर किंवा प्रदात्याची निवड करू शकता ज्याच्याकडे तुम्ही गर्भधारणेनंतर जबाबदारी सोपवू शकता. अशाप्रकारे, वैद्यकीय व्यावसायिकांचा हाच समूह तुमच्या गर्भधारणपूर्व काळात , गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरही काळजी घेऊ शकतो. गर्भधारणापूर्व तपासणीसाठी आपल्याला खालील प्रदाते पहावे लागतील

. कौटुंबिक चिकित्सक

फॅमिली डॉक्टर म्हणूनही हे ओळखले जातात, हे प्रशिक्षित व्यावसायिक गर्भधारणेच्या आधीच्या काळात, गर्भारपणात आणि प्रसूतीनंतर उपचार करण्यास आणि तुमची काळजी घेण्यास सक्षम असतात. जरी स्त्रीरोगतज्ञांना भेटणे जास्त चांगले असले तरीही तुम्ही फॅमिली डॉक्टरांशी सल्लामसलत करणे हे तुमच्यावर अवलंबून आहे

. दाई

सुईण एक प्रशिक्षित आणि व्यावसायिकदृष्ट्या शिक्षित व्यक्ती असते जी स्त्रियांची काळजी घेते मग त्या स्त्रीचे वय कितीही असले आणि ती गरोदर असली किंवा नसली तरीसुद्धा सुईण त्यांची काळजी घेण्याचे काम करत असते.

. प्रसूतितज्ञ

ह्या डॉक्टरांनी गर्भवती महिलांची काळजी घेण्याचे आणि प्रसूती करण्याचे प्रशिक्षण घेतलेले असते.

. मातृगर्भ औषध विशेषज्ञ

एमएफएम विशेषज्ञ एक प्रसूतीतज्ञ असतात जे उच्चजोखीम प्रकारातील स्त्रियांची काळजी घेण्याबाबत तज्ञ असतात. जर आपल्या आरोग्याची स्थिती अशी असेल की ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान किंवा नंतर गुंतागुंत होऊ शकते असे तर तुम्हाला मातृगर्भ औषध तज्ञांची भेट घ्यावी लागेल.

. फॅमिली नर्स

नर्सिंग पात्रतेसह गर्भवती महिलांची निगा राखण्यासाठी पूर्णपणे पात्र असा हा व्यावसायिक आहे.

. स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणारे नर्स प्रॅक्टिशनर

डब्ल्यूएचएनपी म्हणून ओळखले जाणाऱ्या ह्या व्यावसायिकांना स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना महिलांच्या गरोदरपणाशी संबंधित समस्यांविषयी माहिती असते

गर्भधारणापूर्व तपासणीदरम्यान नक्की काय होते?

गर्भधारणापूर्व तपासणी दरम्यान, तुम्ही गर्भधारणेसाठी तयार आहात याची खात्री करण्यासाठी तुमचे डॉक्टर विविध तपासण्या आणि चाचण्या करतात. त्यापैकी काही खाली दिल्या आहेत

. वजन तपासणी

तुमच्या शरीराचे वजन, तुमच्या शरीराचा आकार आणि प्रकारासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर ते तसे नसेल तर वजन कमी करण्यासाठी डॉक्टर तुमच्या आहारात काही बदल सुचवतील किंवा औषधे लिहून देतील. जोपर्यंत आपल्या शरीराचे वजन योग्य होत नाही तोपर्यंत डॉक्टर तुम्हाला गर्भवती राहण्यास सूचित करणार नाहीत. १८. ५ ते २२. ९ ह्या दरम्यानचा बॉडी मास इंडेक्स (BMI) हा स्त्रियांसाठी एक आदर्श बीएमआय आहे.

. मानसिक आरोग्य तपासणी

चिंता, नैराश्य किंवा खाण्याच्या विकारांसारख्या मानसिक समस्यांमुळे गर्भवती होण्यास समस्या उद्भवू शकते. मोठ्या प्रमाणात मनःस्थितीत बदल होत असल्याने, विकार वाढू शकतात आणि गर्भधारणेस अडथळा येऊ शकतो. मूड डिसऑर्डरच धोका कमी करण्यासाठी, तुमच्या तपासणीच्या दरम्यान किंवा नंतर डॉक्टर मानसिक आरोग्याची तपासणी करतील.

. लघवीची चाचणी

मूत्रमार्गाचा संसर्ग आणि मूत्रपिंडाच्या आजारांच्या तपासणीसाठी, लघवीची तपासणी हा प्रत्येक गर्भधारणेच्या पूर्व तपासणीचा एक भाग आहे.

. स्त्रीरोग तपासणी

ही चाचणी गर्भाशयातील फायब्रॉइड्स,सिस्ट्स, साधा ट्यूमर किंवा कोणत्याही (पीआयडी) पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजच्या तपासणीसाठी केली जाते. अनियमित मासिक पाळी आणि पीसीओएस (पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि सिंड्रोम) किंवा गर्भधारणेस अडथळा आणणाऱ्या इतर स्त्रीरोगविषयक स्थितीची तपासणी करण्यासाठी देखील ही चाचणी केली जाते.

. स्तन, ओटीपोट आणि पोटाची तपासणी

ओटीपोटाच्या तपासणीमध्ये यीस्ट किंवा ट्रायकोमोनिआसिस सारख्या संक्रमणांची तपासणी केली जाते ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. कोणतीही शारीरिक विसंगती आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी पोटाची तपासणी केली जाते. गाठ आहे किंवा नाही ह्यासाठी स्तनांची तपासणी केली जाते. त्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

६ रक्तदाब तपासणी

अत्यंत उच्च किंवा कमी रक्तदाब ओळखण्यासाठी ही तपासणी केली जाते, कारण ह्या दोन्हीमुळे गुंतागुंत होऊ शकते.

. पॅप चाचणी

आपल्या डॉक्टरांच्या पहिल्या भेटीचा पॅप स्मीयर चाचणी हा अविभाज्य भाग आहे. गर्भाशयाच्या मुखाची तपासणी करण्यासाठी योनीमध्ये सॅप्यूलम घालून चाचणी केली जाते. त्यानंतर डॉक्टर गर्भाशय मुखावर कापसाने पुसून घेतात आणि त्यावरील पेशींचे विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले जाते. ह्या चाचणीद्वारे आपल्याला गोनोरिया, सिफलिस, एचआयव्ही किंवा हिपॅटायटीस बी सारख्या लैंगिक संक्रमित रोगांचा (एसटीडी) संसर्ग नाही ना याची खात्री केली जाते. तपासणी दरम्यान डॉक्टरांना असामान्य पेशी आढळल्यास कॉल्पोस्कोपी केली जाते.

. रक्त चाचण्या

विविध परिस्थिती तपासण्यासाठी खालील रक्त चाचण्या केल्या जातातः

  • व्हिटॅमिन डीची कमतरता
  • हिमोग्लोबिन संख्या
  • आरएच घटक
  • रुबेला
  • व्हॅरिसेला
  • क्षयरोग
  • हिपॅटायटीस बी
  • टोक्सोप्लाज्मोसिस
  • थायरॉईडची कार्ये
  • एसटीडी

. अनुवांशिक परिस्थिती

तुमच्या कुटुंबात थॅलेसीमिया, सिस्टिक फायब्रोसिस किंवा डाउन सिंड्रोमचा इतिहास असल्यास तुमच्या डॉक्टरांशी त्याविषयी बोला जेणेकरून पुढील तपासणी करता येईल.

१०. गर्भनिरोध

आपण वापरत असलेल्या गर्भनिरोधक पद्धतींबद्दल आपल्या डॉक्टरांना सांगा. बऱ्याच गर्भनिरोधक पद्धती/ साधने वापरण्याचे थांबवल्यावर गर्भधारणा होण्यास किती वेळ लागतो हे सांगता येत नाही. तथापि, आपण गर्भनिरोधक इंजेक्शन वापरत असल्यास, तुमची प्रजनन क्षमता सामान्य होण्यास एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.

११. आधीच्या गर्भधारणा

भूतकाळातील झालेला गर्भपात, गर्भारपणाची समाप्ती किंवा एक्टोपिक गर्भधारणेबद्दल चर्चा करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. जरी हे आपल्यासाठी कठीण असले तरी डॉक्टरांना तुमची सर्वोत्तम काळजी घेण्यास त्याची नक्कीच मदत होईल.

१२. सामान्य प्रश्न

डॉक्टर तुमचा आहार, सामान्य आरोग्य, तुमची जीवनशैली, व्यायामाची पद्धत आणि तुमच्या सध्याच्या व्यवसायाबद्दल चर्चा करतील. तुमच्या मासिक पाळीविषयी कोणतीही गुंतागुंत असल्यास ती डॉक्टरांसोबत शेअर करा. जर दमा किंवा मधुमेह यासारख्या आरोग्यविषयक समस्या असतील तर त्यासुद्धा जाणून घेण्यास तुमचे डॉक्टर उत्सुक असतील.

गर्भधारणापूर्व चाचण्या

आपण गर्भवती होण्याचे ठरवण्यापूर्वी खालील गर्भधारणपूर्व रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजेत. नक्कीच, योग्य चाचण्या तुमचे डॉक्टर तुम्हाला सुचवतील , म्हणून त्यांच्याशी सल्लामसलत करणे चांगले.

. संपूर्ण रक्त गणना (सीबीसी)

तुम्हाला लोह पूरक आहार सुरू करणे आवश्यक आहे की नाही हे ठरवण्यासाठी ही एक अनिवार्य चाचणी आहे. तुम्ही गर्भवती झाल्यास तुम्हाला ऍनिमियाचा त्रास होऊ शकतो आणि तुमच्या बाळाला रक्ताची कमतरता जाणवू शकते.

. हिपॅटायटीस बी चाचणी

डॉक्टरांना या रोगाचा धोका असल्याचे वाटत असल्यास ही चाचणी करण्याची शिफारस केली जाते. तुम्ही गर्भवती होण्यापूर्वी, तुम्ही हिपॅटायटीस बी लसीकरण करू शकता.

. हर्पिस चाचणी

तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदारास हर्पिस झाल्याचा इतिहास असल्यास, गर्भधारणा होण्यापूर्वी ही चाचणी केली पाहिजे. जरी तुम्हाला त्याची लक्षणे कधीही दिसली नसली तरीही ही चाचणी केली पाहिजे.

. रक्त चाचणी

रुबेलावरील आपली प्रतिकारशक्ती ही रक्त तपासणी करून जाणून घेतली जाते.

. सिफिलीसची चाचणी

जर आईला सिफिलीसचा संसर्ग झाला असेल तर तो बाळाला जात नाही ना हे ही चाचणी सुनिश्चित करते. उपचार न घेतलेल्या सिफिलिसमुळे गर्भपात किंवा बाळ जन्मतःच मृत असू शकते आणि म्हणूनच डॉक्टर चाचणी करण्याची शिफारस करतात.

. एचआयव्हीची चाचणी

मानवी रोगप्रतिकारक विषाणूची चाचणी अनिवार्य आहे कारण एचआयव्ही शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर हल्ला करून शरीराची संक्रमणास लढण्याची क्षमता कमी करते. हा विषाणू बाळाच्या जन्मादरम्यान आणि स्तनपान देताना देखील बाळापर्यंत पोहचू शकतो.

सामान्य प्रश्न

आपण आई बनण्याची आणि कुटुंब सुरू करण्याची जबाबदारी घेण्याची योजना आखताच आपल्या मनात असंख्य विचार आणि शंका निर्माण होतील. खाली वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे दिली आहेत जे आपले मन शांत करण्यास मदत करतील.

. मला गर्भधारणेपूर्वी दंत तपासणी करून घेणे आवश्यक आहे का?

गर्भधारणपूर्व इतर तपासण्यांसारखेच दंत तपासणी करणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्या हिरड्यांमध्ये जिवाणू नसल्याची शक्यता नष्ट करून, ते तुमच्या बाळापर्यंत गर्भजलाद्वारे पोहचत नाहीत ना ह्याची खात्री होते. तसेच, गर्भधारणेदरम्यान झालेली साधी दंतदुखी उग्र स्वरूप धारण करू शकते कारण ह्या काळात तुमची प्रतिकारशक्ती कमी असते. जर आधीच्या काही दातांच्या समस्या असतील तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे

. मी माझ्या स्त्रीरोगतज्ञांच्या निवडीबाबत समाधानी आणि आनंदी नसल्यास काय करावे?

अशी शक्यता आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या स्त्रीरोगतज्ञांना भेटता तेव्हा डिस्कनेक्ट झाल्यासारखे वाटेल. ते कदाचित आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नसतील किंवा पहिल्यांदा आईहोणार म्हणून आपली भीती समजू शकणार नाहीत. तुम्ही अस्वस्थही होऊ शकता किंवा डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातील काही विशिष्ट गोष्टीमुळे तुम्ही दु:खी व्हाल. तथापि, आपल्याला असे वाटत असल्यास त्याचे नक्की कारण काय ह्याविषयी तुम्ही अगदी स्पष्ट असले पाहिजे.

स्त्रीरोगतज्ञांचा शोध जेव्हा तुम्ही घेत असता तेव्हा त्यांच्याविषयी शिफारसी आणि संदर्भ विचारणे नेहमीच चांगले असते. महिला बऱ्याचदा स्त्री डॉक्टरांना प्राधान्य देतात कारण यामुळे विशिष्ट प्रमाणात आरामदायक वाटते. परंतु तुम्ही आरामदायक असल्यास पुरुष डॉक्टरांचा सल्ला घेण्यास काहीच हरकत नाही. जर तुम्ही निवडलेल्या डॉक्टरवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तरच त्यांच्याकडे जा. नाहीतर निश्चितपणे तुम्ही दुसरे चांगले डॉक्टर शोधून त्यांच्या कडे जाऊ शकता.

.डॉक्टरांच्या भेटीच्या वेळेला माझ्यासोबत कुणी असण्याची आवश्यकता आहे काय?

डॉक्टरांशी सल्लामसलत करण्यासाठी पती सोबत असणे ही नेहमीच एक चांगली कल्पना आहे. तुम्ही दोघे चर्चा करून तपासणीनंतर तुम्हाला असलेल्या प्रश्नांची आणि शंकांची एक यादी तयार करा. तपासणीसाठी दोघांनी डॉक्टरांना भेटण्याचे बरेच फायदे आहेत. डॉक्टर तुमची सध्याची जीवनशैली आणि आहारातील बदलांसाठी मार्गदर्शनपर सूचना देतील. तुम्ही घ्यावयाची खबरदारी आणि तुम्ही दोघांनीही करावयाच्या चाचण्यांची यादी सुद्धा ते तुम्हाला देतील.

जर तुमचे पती डॉक्टरांच्या भेटीचा वेळी तुमच्यासोबत उपस्थित असतील तर तुम्ही चांगले खाणे, ताणतणाव कमी करणे आणि विश्रांती घेणे किती महत्वाचे आहे हे त्यांना कळेल. डॉक्टरांना एकत्र भेट दिल्यास आपल्या पतीस तुमच्या गर्भावस्थेच्या टप्प्यात अधिक गुंतून राहण्यास मदत होते आणि तसेच हे दोघांनाही एकमेकांच्या जवळ आणते. जेव्हा दोघेही डॉक्टरांच्या अपॉईंटमेन्टसाठी उपस्थित असता तेव्हा डॉक्टरांच्या सूचना लक्षात ठेवणे देखील सोपे जाते.

. डॉक्टरांच्या भेटीच्या वेळी कुठले प्रश्न विचारायचे ह्याचे नियोजन कसे कराल?

गर्भधारणा पूर्व आरोग्य तपासणीसाठी आपल्या स्त्रीरोगतज्ञाला भेट देताना हे लक्षात ठेवले पाहिजे की डॉक्टरांकडे वेळ कमी असतो. याचा अर्थ असा आहे की व्यस्त डॉक्टरसह सल्लामसलत करण्याची सरासरी वेळ १५२० मिनिटांपेक्षा जास्त नसते. त्यामुळे तुम्ही तुमची अधिकतम तपासणी कशी करू शकता हे येथे दिले आहे.

  • नेहमी अगोदरच भेटीची वेळ नोंदवा, ज्यामुळे तुम्हाला आणि डॉक्टरांना योग्य प्रकारे योजना बनविण्यास सोपे जाते.
  • जर तुम्हाला एकापेक्षा जास्त समस्या असतील तर त्या लिहून काढा. तपासणी सुरू झाल्यावर त्या समस्या डॉक्टरांशी शेअर करा किंवा एकेक करून विचारा. सुरूवातीस सर्वात महत्वाच्या चिंतेची चर्चा करा नाहीतर तुम्हाला वेळ कमी पडेल.
  • गर्भवती होण्यापूर्वी आरोग्य तपासणीसाठी प्रथमच स्त्रीरोगतज्ञांना भेट देताना तुम्ही थोड्यात स्वतःची माहिती द्या. डॉक्टरकडे दोन अँपॉईंटमेंट्सच्या मध्ये तुमचा पूर्ण वैद्यकीय इतिहास वाचण्यासाठी वेळ नसतो.
  • जर डॉक्टरांनी त्यांचा नंबर तुमच्याशी शेअर केलेला असेल तर फोनवर मूलभूत प्रश्न विचारू शकता जेणेकरून तपासणी दरम्यान आपल्याला महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकेल.

कुटुंबाची सुरुवात करणे आणि या जगात नवीन जीवन आणणे हा एक मोठा निर्णय आहे. परंतु, गर्भवती होण्याआधी पालकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवून बाळासाठी तयारी करणे चांगले. आई निरोगी असल्यास निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढते आणि म्हणूनच डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या आणि तपासण्या करून घेणे जरुरीचे आहे

आणखी वाचा: गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article