आरोग्य

छोट्या मुलांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर ९ सर्वोत्तम घरगुती उपाय

मुलांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाला घन आहाराची ओळख करून दिलेली असेल तर त्याच्या पोटाला त्या अन्नाची सवय होण्यास वेळ लागू शकतो. तुमच्या छोट्या मुलाला काही दिवस शौचास होत नाही आणि जरी झाली तरी ती खूप घट्ट होते. तसेच त्याची भूक मंदावू शकते. ही सगळी लक्षणे बद्धकोष्ठतेची आहेत. जर तुमच्या मुलाला बद्धकोष्ठता झालेली असेल तर तुम्ही त्यास बरे वाटावे म्हणून काय करावे लागेल हे शोधाल. जर तुम्ही औषधे देण्याचा विचार करत असाल तर ती देऊ नका कारण डॉक्टर त्याची शिफारस करत नाहीत. तुम्ही नक्कीच घरगुती उपायांचा विचार करू शकता. घरगुती उपाय सुरक्षित असतात आणि त्यामुळे तुमच्या बाळाला लगेच आराम मिळू शकेल.

छोट्या मुलांमधील बद्धकोष्ठतेसाठी ९ नैसर्गिक उपाय

प्रथम-उपचार म्हणून नैसर्गिक उपाय वापरण्याची शिफारस केली जाते. म्हणून लहान मुलांमधील बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी हे घरगुती उपचार करून पहा.

१. त्याला लिंबाचा रस द्या

लिंबाचा रस हा बाळे आणि मुलांच्या बद्धकोष्ठतेसाठी एक उत्तम उपाय म्हणून कार्य करते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते , त्यामुळे आतड्यात पाणी खेचण्यास मदत होते. आतड्यात पाण्याचे प्रमाण वाढते तेव्हा ते मल नरम करण्यास आणि आतड्यांसंबंधी हालचाल करण्यास मदत करते. एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा, त्यात मध घालून आपल्या मुलास द्या. तसेच,  हे रिकाम्या पोटी सकाळी लवकर खाल्ले पाहिजे. सकाळी हे पेय प्याल्याने आपल्या मुलाची आतड्यांसंबंधी हालचाल होईल आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होईल. लिंबाच्या रसाव्यतिरिक्त, आपल्या मुलाला बद्धकोष्ठता होत असल्यास तुम्ही सफरचंदाचा रस देखील देऊ शकता.

२. त्रिफळा वापरून पहा

नावाप्रमाणेच त्रिफळा हे तीन औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. त्या वनस्पती म्हणजे अमालकी, बिभीतकी आणि हरितकी आहेत. त्रिफळाचे अनेक फायदे आहेत आणि ते सहसा दुधासोबत घेतले जाते. कोमट दुधात एक चमचा त्रिफळा घाला आणि झोपेच्या आधी मुलास द्या. बद्धकोष्ठतेसाठी हि सर्वोत्तम औषधी वनस्पती आहे. लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेसाठी हा सर्वात लोकप्रिय भारतीय घरगुती उपाय आहे.

३. पाणी नेहमीच सर्वोत्तम उपाय असतो!

काहीवेळा पालक आपली मुले पुरेसे पाणी पितात की नाही याचा मागोवा घेण्यास अपयशी ठरतात. आतड्यांच्या हालचाली आणि अन्नाचे योग्य पचन सुनिश्चित करण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे. पुरेसे पाणी पिणे देखील मल कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते. तुमचे मूल हायड्रेटेड राहील ह्याची खात्री करा.

४. मध आणि जवस

मध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते आणि पाचक प्रणालीस मदत करते. एक ग्लास दुधात १-२ चमचे मध घाला आणि रिकाम्या पोटी आपल्या मुलास द्या. जवसामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. जवसाच्या काही बिया पाण्यात उकळवा, मग गाळा आणि हे पाणी आपल्या मुलाला द्या. असे केल्याने बद्धकोष्ठता प्रतिबंधित होते.

५. त्याला व्यायाम करु द्या आणि कोमट पाण्याने अंघोळ घाला

शारीरिक हालचालींच्या अभावामुळे पाचन समस्या उद्भवते आणि चयापचय कमी होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची लक्षणे आणखी वाढतात. दररोज आपल्या लहान मुलाला कोणत्या ना कोणत्या शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त ठेवल्याने त्याच्या आतड्यांसंबंधी हालचाली उत्तेजित होतात. आपल्या मुलास दररोज कमीतकमी एक तास घराबाहेर खेळू द्या. त्याला बद्धकोष्ठतेपासून मुक्त करण्यासाठी,तुम्ही त्याला कोमट पाण्याने अंघोळ देखील घालू  शकता. त्याच्या आंघोळीच्या पाण्यात काही चमचे बेकिंग सोडा घाला आणि आपल्या मुलास दहा ते पंधरा मिनिटे त्या पाण्यात आरामात राहू द्या.

६. त्याच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा

फळ आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यांचे सेवन केल्यास आतड्यांच्या हालचाली सुलभ होतात. जर तुम्ही बाळाला राईस सीरिअल देत असाल तर त्याऐवजी बार्ली सीरिअल द्या.   तृणधान्याबरोबरच तुम्ही बाळाला फळांचा रस देऊ शकता, यामुळे त्याला बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळेल. आपल्या मुलाच्या आहारात सोयाबीन, पालक, गोड बटाटा आणि ब्रोकोली यासारख्या भाज्या व संत्री आणि जर्दाळू यासारख्या फळांचा समावेश घ्यावा. आपल्या मुलास कॉर्न सिरप देखील देऊ शकता कारण त्यात साखर आधारित प्रथिने असतात. आतड्यांच्या हालचालींना उत्तेजन देण्यासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

७. त्याला ब्लॅकबेरी द्या

आतड्यांच्या हालचालींच्या उत्तेजनासाठी ब्लॅकबेरी अत्यंत उपयुक्त आहे. पचनसंस्थेमध्ये आतड्यांच्या हालचाली लाटांप्रमाणे होतात आणि त्यामुळे अन्न पुढे ढकलले जाते. ब्लॅकबेरीमुळे आतड्यांसंबंधी हालचाली नियमित होतात आणि शौचास होण्यास मदत होते. रिकाम्या पोटी ब्लॅकबेरीचे सेवन केल्याने इच्छित परिणाम मिळण्यास मदत होते.

८. केळी आणि गरम पाण्याचे मिश्रण द्या

बद्धकोष्ठतेसाठी हा एक लोकप्रिय उपाय आहे. सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पिऊन त्यानंतर केळं खाल्ल्यास पचन होण्यास मदत होते तसेच त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

९. मिल्क ऑफ मॅग्नेशिआ

बरेच लोक बद्धकोष्ठतेचे उपचार करण्यासाठी मिल्क ऑफ मॅग्नेशिया देखील वापरतात कारण ते रेचक आहे. हे प्रामुख्याने आतड्यांमध्ये पाणी ढकलण्याचे कार्य करते, त्यामुळे आतड्यांच्या हालचाली सुरू होतात. परंतु हे केवळ अल्प कालावधीसाठी वापरले जाते. आपण एक चमचा ही पावडर दुधात मिसळू शकता आणि ते आपल्या मुलास देऊ शकता. परंतु आपल्या मुलाच्या बालरोगतज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतरच हा उपाय करून पहा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर आपण एक किंवा दोन दिवस नैसर्गिक उपचारांचा प्रयत्न केला आणि इच्छित परिणाम दिसत नसेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिवाय, जर आपल्या मुलास दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बद्धकोष्ठता असेल तर वैद्यकीय मदत घ्या.

सामान्य प्रश्न

१. आपल्या मुलाला बद्धकोष्ठता आहे हे तुम्हाला कसे समजेल?

जर तुमच्या  मुलाला  आठवड्यातून तीन वेळेपेक्षा कमी वेळेला शौचास होत असेल तर बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे. बद्धकोष्ठतेच्या इतर काही लक्षणांमध्ये पोटदुखी, मळमळ, भूक न लागणे आणि सूज येणे यांचा समावेश आहे. जर आपले मूल शौचास करताना रडत असेल किंवा किंचाळत असेल तर कदाचित त्याला शौचास करताना त्रास होत असेल आणि ते बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे.

२. बद्धकोष्ठतेसाठी एनिमा द्यावा का?

जर तुमच्या मुलाला बराच काळ शौचास होत नसेल तर अशा परिस्थतीत कृत्रिम औषधांचा अवलंब करावा लागेल. तुम्ही एनिमाचा उपाय डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करू शकता. एनिमा रात्रीच्या वेळी द्यावा जेणेकरून गुदद्वाराच्या आजूबाजूचा परिसर वंगण मिळाल्याने तयार होईल आणि मल शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया सुलभ होईल. एनिमा साठी नारळाच्या तेलाचा अवलंब करावा कारण त्यामुळे आतड्यांच्या हालचाली उत्तेजित होतात आणि शौचास होते. परंतु एनिमा हा शेवटचा उपाय म्हणून करावा आणि तो सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय करू नये. तुमच्या मुलाला स्वतःच्या मनाने एनिमा देऊ नका. पर्यवेक्षणाशिवाय आपल्या मुलास एनिमा लावण्याचा प्रयत्न करू नका. नैसर्गिक उपाय केल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका होते आणि पचनास मदत होते. म्हणून आपल्या मुलासाठी हे उपाय करून पहा - दोन दिवसांत तो बरा होईल. तथापि, जर हे उपाय अयशस्वी ठरले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु प्रतिबंध हा उपचार करण्यापेक्षा नेहमीच चांगला असतो. म्हणून आपल्या मुलाच्या आहारात निरोगी आणि तंतुमय पदार्थांचा समावेश करुन बद्धकोष्ठता टाळण्याचा प्रयत्न करा. तसेच, तो दररोज कोणत्या ना कोणत्या शारीरिक हालचाली करत आहे ना आणि तो हायड्रेटेड राहतो आहे ना याची खात्री करुन घ्या. प्रतिबंधात्मक उपाय करा म्हणजे आपल्या छोट्या मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास मुळीच होणार नाही. आणखी वाचा: मुलांमधील पोटदुखीसाठी १० प्रभावी घरगुती उपचार लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved