आरोग्य

बाळांमधील ऍसिड रिफ्लक्सच्या समस्येवर १० नैसर्गिक उपाय

    In this Article

पालक म्हणून, आपल्याला बाळाच्या खोकल्याची आणि बाळाने अन्न थुंकून बाहेर काढण्याची सवय होते. ऍसिड रिफ्लक्स असल्यास काहीसे असेच होते परंतु त्यासोबतच बाळ अस्वस्थ दिसते आणि बाळ रडू लागते. बाळांना हा त्रास अधेमधे होत असतो परंतु तो वारंवार होत असेल तर त्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऍसिड रिफ्लक्स साठी काही नैसर्गिक उपाय आहेत आणि ते बाळासाठी वापरण्यासाठी सुरक्षित आहेत.

बाळांची ऍसिड रिफ्लक्सची समस्या नैसर्गिकरित्या कशी हाताळावी?

आपल्या बाळाच्या ऍसिड रिफ्लक्सवर उपाय करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय खालीलप्रमाणे

१. जिरे

जिरे पचनासाठी चांगले असल्याचे प्रसिध्द आहे, त्यामुळे आम्लता आणि वायू होण्याची शक्यता कमी होते. बाळांना जिऱ्याचे पाणी दिले जाऊ शकते. काही चमचे जिरे पाण्यात उकळवून ते पाणी आपण बाळाला देऊ शकतो. दररोज दिलेल्या या पाण्याचे काही चमचे ऍसिड रिफ्लक्स पासून आराम देण्यास मदत करतात.

२. एरंडेल तेल

ह्या तेलातील घटकांमध्ये विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची क्षमता असते.  त्यामुळे बाळाच्या शरीरात समस्या निर्माण करू शकतात असे कोणतेही घटक थेट बाहेर काढण्यास मदत होऊ शकते. एक कापड घ्या आणि एरंडेल तेलात बुडवा. बाळाच्या पोटावर आता ते कापड ठेवा आणि त्यावर प्लास्टिक गुंडाळा जेणेकरून तेल इतरत्र ठिबकणार नाही. आता त्यावर कापड घाला आणि कापड तासाभर राहू द्या. नंतर, आपल्या मुलास एक छान उबदार अंघोळ घाला त्यामुळे त्याला बरे वाटण्यास मदत होईल.

३. नारळ तेल

नारळ तेलामध्ये अँटीइंफ्लामेंटरी घटक असतात. याचा थेट परिणाम बाळांना होणाऱ्या ऍसिड रिफ्लक्सवर होतो. याव्यतिरिक्त, तेल पाचकप्रणालीला वंगण म्हणून ओळखले जाते, त्यामुळे ते कार्यक्षमतेने कार्य करते. तेलामध्ये लॉरिक ऍसिड देखील असते. हे एक प्रतिरोधक फॅटी ऍसिड आहे. त्यामुळे नवजात बाळांमध्ये  रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बाळाला अन्नपदार्थ भरवण्याआधी गरम पाण्यामध्ये एक चमचा शुद्ध नारळ तेल घालून आपल्या बाळाला खायला घालण्यापूर्वी दिवसातून तीनदा द्यावे.

४. बेकिंग सोडा

हे ऐकल्यावर विचित्र वाटू शकते परंतु वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्याचा उपयोग होतो. ऍसिड रिफ्लक्स पासून आराम मिळण्यासाठी बेकिंग सोडा वापरण्याची शिफारस केली जाते. बाळाच्या शरीराची पी एच कमी असल्याचे ऍसिड रिफ्लक्स हे लक्षण आहे. बेकिंग सोडा, अल्कली युक्त असल्याने पोटाची आम्लता त्यामुळे कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स पासून आराम पडण्यास मदत होते आणि पचन संस्थेचे कामकाज सामान्य स्थितीत सुरु राहण्यास त्यामुळे मदत होते.

५. पुदिना

पुदिन्याचे तेल हे ऍसिड रिफ्लक्सवर चांगला उपाय आहे. कुठलेही स्नायू आखडले असल्यास पुदिन्यामुळे तात्काळ आराम मिळतो. पुदिन्याच्या तेलामुळे अपचन आणि दाह कमी होण्यास मदत होते. आणि त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स सुद्धा कमी होतो. एका लहान चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये पेपरमिंट ऑईलचे काही थेंब मिसळून ते बाळासाठी वापरले जाऊ शकते. नंतर हे मिश्रण बाळाच्या पोटाला चोळता येईल  आणि बाळाला ऍसिड रिफ्लक्स पासून आराम मिळेल. हे दिवसातून दोनदा केले पाहिजे. पेपरमिंट कॅप्सूलचे सेवन करू शकतो का किंवा पेपरमिंट चहा बनवून दिवसातून २-३ वेळा घेतला जाऊ शकतो का ह्याविषयी आपल्या डॉक्टरांशी तुम्ही संवाद साधू शकता.

६. प्रोबायोटिक्स

ऍसिड रिफ्लक्स होण्यामागे असलेल्या कारणांमध्ये आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया नसणे हे देखील कारण असू शकते. ज्या जिवाणूंमुळे पचन समस्या उद्भवू शकते अशा जिवाणूंची तुलनात्मक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. चांगल्या जिवाणूंची उपस्थिती संतुलन राखण्यास मदत करते आणि वाईट जीवाणूंचा प्रतिकार करते आणि आतडे निरोगी ठेवते. जर तुमचे डॉक्टर ह्याच्याशी सहमत असतील तर तुम्ही तुमच्या बाळाला प्रोबायोटिक्स देऊ शकता. प्रोबायोटिक्स पावडरच्या रूपात येते जे बाळाला पाण्यातून दिले जाऊ शकते. पावडर एका बाटलीमध्ये दूधात मिसळून सुद्धा बाळाला दिली जाऊ शकते. जर तुमचे बाळ थेट स्तनपान घेत असेल तर पावडर तुम्ही तुमच्या स्तनाग्रभोवती लागू करू शकता जेणेकरून ती बाळाला चोखत येईल.

७. व्यायाम

बहुतेक बाळे कुठलीही हालचाल किंवा व्यायाम न करता पाळण्यात झोपलेली असतात. त्यामुळे अयोग्य पचन किंवा ऍसिड रिफ्लक्स होऊ शकते. थोड्या प्रमाणात हालचालींशी संबंधित व्यायाम पचन प्रक्रियेस उत्तेजन देण्यास मदत करतात आणि पोटातील गॅसची आणि पोट फुगल्याची पण काळजी घेतात. त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता कमी होते. सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपल्या मुलास सपाट झोपू द्या आणि जणू तो सायकल चालवत आहे अशा पद्धतीने त्याचे पाय हलवा.  दररोज काही मिनिटे हा व्यायाम करणे बाळासाठी मजेदार असेल तसेच पचनास मदत करेल. आहार दिल्यानंतर किंवा बाळाला खायला घालण्याच्या किमान अर्धा तास आधी हे करू नका.

८. कॅमोमाइल

कॅमोमाइल चहा प्रौढांसाठी पोटची काळजी घेण्यासाठी तसेच रात्रीची झोप नीट लागण्यासाठी एक सुप्रसिद्ध उपाय आहे. बाळांमधील ऍसिड रिफ्लक्स चमत्कारिकरीत्या कार्य करते, कॅमोमाईलमध्ये वेदना कमी करणारे तसेच झोपेसाठी पूरक घटक असतात. ते, एकत्रितपणे कार्य करतात आणि त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स पासून आराम मिळतो आणि शरीराला विश्रांती मिळते. पाण्यात काही फुले उकळवून आणि गाळून दररोज बाळाला त्याचे काही चमचे दिले जाऊ शकतात.

९. ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर पोटातील पीएच मूल्य सामान्य स्थितीत ठेवते. एकदा ऍसिडची पातळी संतुलित झाली की ऍसिड रिफ्लक्स कमी होतो आणि आपल्या बाळाला अस्वस्थता जाणवते. या कच्च्या अनफिल्टर्ड व्हिनेगरला थोडेसे कोमट पाण्यात मिसळून हे मिश्रण काही चमचे आपल्या बाळास देणे फायदेशीर आहे.

१०. आहार आणि झोपेचा सराव

झोपेच्या आणि बाळाच्या भरवण्याच्या स्थितीत छोटे बदल करून, ऍसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता कमी केली जाऊ शकते. आहार सुरू असताना मूल नेहमी सरळ स्थितीत आहे हे सुनिश्चित करणे चांगले. झोपेच्या वेळी, जर ऍसिड रिफ्लक्सची समस्या जाणवली तर बाळाच्या शरीराचा वरचा भाग ३० डिग्री अंशाच्या कोनात ठेवा. असे केल्याने अन्न पोटात राहते आणि बाळ ते बाहेर काढत नाही. बाळांमधील ऍसिड रिफ्लक्सची समस्या सहजपणे नियंत्रित केली जाऊ शकते. वर दिलेले घरगुती उपाय वापरून तुम्ही त्यास प्रतिबंध घालू शकता आणि जरी बाळाला त्रास झाला तरी ह्या उपायांनी त्यास लवकर बरे वाटेल. आणखी वाचा: बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर १२ घरगुती उपाय बाळांमधील अतिसारावर (जुलाब) १५ घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved