मुलांच्या केसात कोंडा होणे ही सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या आहे. त्यामुळे टाळूवर जळजळ होते आणि खाज सुटते. मुले सहसा घराबाहेर खेळतात. यामुळे मुले डोक्यातील कोंड्यासह, धुळीमुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्येस अधिक संवेदनाक्षम असतात. अँटीडँड्रफ शाम्पू वापरून डोक्यातील कोंड्यापासून मुक्त होऊ शकतो का असा प्रश्न पालकांना पडू शकतो. परंतु, मुलांच्या डोक्यात कोंडा होण्यामागे धूळ हे एकमेव कारण नाही. […]