बाळाचे डोळे गुलाबी रंगाचे पाहिल्यावर कुठल्याही आईला गुलाबी रंगाच आकर्षण राहत नाही. बाळाचे डोळे आल्यावर बाळाच्या डोळ्याच्या पापण्यांच्या आतील भागास सूज येते तसेच रक्तवाहिन्या अधिक स्पष्ट दिसू लागतात आणि त्यामुळे डोळ्यांना गुलाबी रंग येतो. संसर्ग झाल्यामुळे किंवा ऍलर्जीमुळे डोळे येऊ शकतात. डोळे आल्यामुळे बाळाला डोळ्यात खाज जाणवू शकते आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात स्त्राव देखील दिसू शकतो. […]