Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी घरी तयार केलेले पौष्टिक मिश्रण

बाळांसाठी घरी तयार केलेले पौष्टिक मिश्रण

बाळांसाठी घरी तयार केलेले पौष्टिक मिश्रण

बाळासाठी अनेक हेल्थ मिक्स पावडरी बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या तयार करणे देखील सोपे आहे तयार मिश्रण पाण्यात मिसळा आणि तुमचे काम होते! परंतु बाजारातील पॅक केलेली उत्पादने वापरून कदाचित आपण आपल्या बाळाच्या आरोग्याविषयी तडजोड करत असतो. घरगुती शिजवलेले अन्न कधीही प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा चांगले असते. तर, ह्या लेखात, आम्ही तुम्हाला घरी केलेल्या पौष्टिक मिश्रणाचे फायदे सांगणार आहोत तसेच आपण ती कशी तयार करू शकता आणि त्याची साठवणूक कशी करावी ह्याविषयी सुद्धा माहिती देणार आहोत.

पौष्टिक मिश्रण म्हणजे काय?

बाळे ६ महिन्यांची झाल्यावर पौष्टिक मिश्रण घेऊ शकतात. धान्य, तृणधान्ये आणि कडधान्ये ह्यांचे मिश्रण करून पाण्यात मिसळली जातात आणि त्याची बाळासाठी लापशी चांगली बनते. काही घटकांची पौष्टिक सामग्री वाढविण्यासाठी रात्रभर मोड येण्यासाठी ठेवले जाऊ शकतात.

सेरेलॅकचे पौष्टिक मूल्य

घटक पोषणमूल्यांची माहिती
गहू दलिया हे कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे
बदाम चरबी आणि प्रथिने, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आहे
तांदूळ आहारातील फायबरचा चांगला स्रोत (तांदूळ फायबरमध्ये समृद्ध नसतो) आणि कार्बोहायड्रेट आहे
कॉर्न उच्च कार्बोहायड्रेट सामग्री आणि प्रथिने, व्हिटॅमिन बी६ असते आणि ते अँटीऑक्सिडेंट आहे
काळी उडद डाळ प्रथिने आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समृद्ध
काजू चांगली चरबी आणि मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी ६ आणि प्रथिनांनी समृद्ध आहे
विलायची आहारातील फायबर आणि लोहयुक्त पदार्थांनी समृद्ध आहे
साबुदाणा कार्बोहायड्रेट समृद्ध आहे आणि त्याचे कॅलरी मूल्य उच्च आहे
कुळीथ ह्यामध्ये १/४ प्रथिने असतात. लोह, कॅल्शियम, मोलिब्डेनमचा ह्यांचा चांगला स्रोत आहे
मसूर डाळ प्रथिने, फायबर, लोह आणि फोलेटने भरलेले आहे
हिरवा हरभरा हे प्रथिने, आहारातील फायबर, लोह आणि मॅग्नेशियम इत्यादींनी समृद्ध आहे

आपण पॅक केलेली बेबी मिश्रण उत्पादने का वापरू नये?

हि पॅक केलेली उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाऊ शकतात आणि ती वापरण्यास सुलभ आहेत. परंतु त्यांचे काही तोटे आहेत जसेः

  • संरक्षक पदार्थ आणि रसायने

हवाबंद डब्यात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये संरक्षक पदार्थांचा उल्लेख कदाचित नसतो, परंतु जवळजवळ प्रत्येक उत्पादनामध्ये ते असतात. ह्या रसायनांमुळे आपल्या बाळाच्या विकसित होणाऱ्या पाचक प्रणालीवर हानिकारक परिणाम होऊ शकतात

  • सुरक्षिततेच्या अटी

पॅक केलेले मिश्रण योग्य प्रकारे साठवलेली नसते. जरी तयार करणाऱ्याने त्या आवश्यकतांचे पालन केले असले तरीही स्टोअर्समध्ये आवश्यक ते पालन केले जात नाही.

  • ऍलर्जिक घटक

दूध, शेंगदाणे, ग्लूटेन आणि अंड्यांच्या मिश्रणामध्ये वापरल्या जाणार्‍या काही पदार्थांमुळे आपल्या बाळाला ऍलर्जी होऊ शकते.

घरी केलेल्या पौष्टिक मिश्रणचे फायदे

काही फायदे येथे दिलेले आहेत.

  • तुम्ही तुमच्या बाळाला असलेली ऍलर्जी आणि आवश्यकता लक्षात घेऊन पौष्टिक मिश्रण तयार करू शकता
  • ह्या लापशीच्या मिश्रणाचा उपयोग फक्त बाळाच्या आहारासाठी नाही तर इडली, केक आणि डोसा ह्यामध्ये देखील केला जाऊ शकतो.
  • तपकिरी तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पचनास मदत करते.
  • घरी केलेले हे मिश्रण रसायने आणि संरक्षकांपासून मुक्त आहे आणि ताजे असताना त्याचे सेवन केले जाऊ शकते.
  • ह्यातील प्रमुख घटकांपैकी एक म्हणजेच नाचणी, कॅल्शियमने समृद्ध आहे त्यामुळे हाडांच्या योग्य विकासात मदत होते.
  • कुळीथ आपल्या बाळाला उच्च प्रमाणात प्रथिने प्रदान करते. ज्यामुळे वेगवान वाढ आणि विकासात मदत होते.
  • मिश्रण सामान्य तापमानाला एक महिन्यासाठी आणि सुमारे तीन ते सहा महिने फ्रिजमध्ये ठेवता येते.

घरी केलेल्या पौष्टिक मिश्रणचे फायदे

पौष्टिक मिश्रण वापरून करता येतील अशा रेसिपी

इथे खाली पौष्टिक मिश्रणची रेसिपी दिलेली आहे

साहित्य:

  • तपकिरी तांदूळ १ कप
  • नाचणी १ कप
  • कुळीथ /२ कप
  • मसूर डाळ /२ कप
  • मूग डाळ /२ कप
  • बदाम /२ कप
  • वेलची १०

पद्धत:

  • नाचणी, कुळीथ, मसूर डाळ आणि मूग डाळ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये रात्रभर भिजवून ठेवा.
  • नंतर, मऊ सुती कपड्यात धान्य स्वतंत्रपणे बांधा आणि कोरड्या जागी बाजूला ठेवा.
  • एक दिवस धान्य सुकवून घ्या.
  • तपकिरी तांदूळ, नाचणी, कुळीथ, मसूर डाळ, मूग डाळ, बदाम आणि वेलची स्वच्छ आणि कोरड्या नॉनस्टिक भांड्यात स्वतंत्रपणे भाजून घ्या. बाहेरूनच नव्हे तर आतून चांगले भाजले गेले आहे आहे हे सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घटक मध्यम आचेवर भाजून घ्या. एकदा चांगले भाजून झाले की रंग अधिक गडद होतो. थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • एकदा थंड झाल्यावर मिश्रण ब्लेंडर (ग्राइंडर) वर घालून बारीक करून घ्या.
  • थंड होऊ द्या.
  • मिश्रण एका हवाबंद डब्यात ठेवा.

सावधानता

पौष्टिक मिश्रण बनवताना ह्या गोष्टी लक्षात घ्या:

  • कोणताही घटक भाजण्यापूर्वी, भांडे पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा.
  • ते चांगले भाजलेले असल्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक घटकांचा स्वाद घ्या.
  • भाजण्यापूर्वी धान्य / कडधान्ये / तृणधान्ये धुवा.
  • बारीक मिश्रण करण्यापूर्वी मिश्रण थंड होऊ द्या.

सावधानता

बाळांसाठी पौष्टिक मिश्रणाच्या लापशीची रेसिपी

बाळांसाठी लापशी तयार करण्यासाठी खालील पद्धतींचे अनुसरण करा

  • १ कप पाण्यात २ टेबलस्पून मिश्रण घाला.
  • मिश्रणच्या गाठी तयार होऊ नयेत म्हणून ढवळत रहा.
  • दलियामध्ये आपण गूळ (गुळ) किंवा मीठ घालू शकता.

भरवण्यासाठी टिप्स

आपल्या बाळाला हे मिश्रण भरवताना खालील मुद्द्यांचे अनुसरण कराः

  • नवीन पदार्थांची ओळख करून देताना तुम्ही ३ दिवसाचा नियम पाळला असल्याचे सुनिश्चित करा. असे केल्याने ऍलर्जिक प्रतिक्रिया शोधणे सोपे करते. दररोज हळूहळू प्रमाण वाढवा आणि ३ दिवसांनंतर आपल्या मुलाची प्रतिक्रिया लक्षात घ्या.
  • ह्या मिश्रणचा एक चमचा आपण १०० मिली अंगावरच्या किंवा फॉर्म्युला दुधात मिसळू शकता.
  • जर आपल्या बाळाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल तर गोड चवीसाठी मध घालणे टाळा. मधात बीजाणू असतात ज्यामुळे बोटुलिझम होऊ शकते.
  • लापशी घट्ट किंवा सरसरीत असू शकते.

पौष्टिक मिश्रण कसे साठवावे

  • हवाबंद भांड्यात थंड आणि कोरड्या जागी ठेवता येते.
  • तयार झालेली लापशी २ तासांपेक्षा जास्त वेळ वापरू नका.

तुमच्या बाळाला घरी केलेल्या अन्नपदार्थांची ओळख करून देण्यासाठी हे पौष्टिक मिश्रण वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर आरोग्यासाठीही हे मिश्रण उपयुक्त आहे.

आणखी वाचा:

बाळाला सुरुवातीला तुम्ही कुठल्या घनपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे?
बाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article